पाककृती

चटकदार भेळ

Primary tabs

साहित्य : चुरमुरे, फरसाण (३:१ प्रमाणात असावे) बारीक शेव -खारेदाणे - तिखट बुंदी (आवडत असल्यास), कांदा बारीक चिरून, टोमॅटो बारीक चिरून, चिरलेली कोथिंबीर, चिरलेली कैरी, तिखट, चिंचेचे पाणी (चिंचेचा कोळ + गूळ + तिखट + मीठ), मिरचीचा ठेचा (थोडासा), पुदिन्याची चटणी (पर्यायी) सोबत कडक पुरी :-) Image removed. एक मोठे पसरट भांडे घ्यावे. त्यात चुरमुर्‍यांत फरसाण, चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कैरी, चिंचेचे पाणी, ठेचा इ. साहित्य घालून हाताने चांगले मिसळावे. [हाताने/ चमच्याने घोटणे तुमच्यावर....पण जेवढे चांगले, खटखट मिसळाल तेवढी चांगली चव!] देताना वरून पुन्हा कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, शेव पेरावी, कडक पुरी खोचावी व द्यावे. -- अरुंधती http://iravatik.blogspot.com/
शुचि

हा हा मस्त शैली लिखाणाची. खटखट मिसळा काय अन कडक पुरी खोचा काय :)
म्हटलं अरुचा लेख आहे पैसा (= वेळ) वसूलच मंगताय आणि वैसाइच हुआ!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I fly when you persue me, But when you shy I woo thee
Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.

नितिन थत्ते

मस्त. पाणी सुटले तोंडाला.

भेळ चांगली होण्यासाठी आमच्या (निरीक्षणातून आणि अनुभवातून बनलेल्या)टिप्स...

१. कांदा भेळकरण्याच्या किमान २ तास आधी चिरावा. म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होतो.

२. मोठ्या पातेल्यात (२-३ लिटर) एकच प्लेटच्या भेळेइतके जिन्नस घेऊन ढवळावे. म्हणजे चिंचेचे पाणी, चटणी वगैरे सगळीकडे सारखे लागते. (पसरट भांड्यात/परातीत नीट ढवळता येत नाही. सांडासांड फार होते.) भेळवाला नेहमी पातेल्यात भेळ बनवतो हे सर्वांनी पाहिलेच असेल. :)

३. चुरमुरे वार्‍याने उडणार नाहीत इतपत ओले होण्याइतके चिंचेचे पाणी आणि चटणी घालावी.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

शुचि

सांडासांड फार होते =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I fly when you persue me, But when you shy I woo thee
Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.

नितिन थत्ते

भेळ खायला? =))

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

jaypal

आवडत अस्ल्यास बटाटा आणि चाटमसाल/आमचुर वापरता येइल.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अरुंधती

शुचि, नितीन, जयपाल धन्यवाद!

नितीन : टिप्स एकदम १ नंबर! :-) पातेल्यातली भेळ येकदम बेष्ट! पुण्यात आम्ही पुष्करिणी भेळवाल्या काकांना अशी भेळ बनवताना त्या पातेल्याकडे (व त्यातल्या भेळेकडे) जिभल्या चाटत पाहिलंय.

जयपाल : बटाटा उकडलेला असावा ;-) हा हा हा! चाटमसाला व आमचूर... आवडत असल्यास, येस्स...पण मग चिंचेच्या पाण्याचे, कैरीचे व टोमॅटोचे प्रमाण थोडे कमी करावे लागेल. एकदम दात आंबण्याइतकी आंबट नको भेळ!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

छ्या !! आता संध्याकाळी एक भेळ खायलाचा पाहिजे, त्याशिवाय आत्मा शांत / तृप्त होणार नाही !

कोल्हापुर / सांगली ह्याभागात भडंगाचे चिरमुरे वापरुन जी भेळ बनवतात ती पण उच्चच !

पुढच्या कट्ट्याचा चकणा श्री. थत्तेच घेउन येतील ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

नितिन थत्ते

चालेल.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

डावखुरा

लालच आह लप्लप........

केव्हाही चालते.......

तोंडाला पाणी सुटलेय राव!!!!

"राजे!"

भेळ म्हणजे माझा अक्षरशः जीव की प्राण आहे ग अरूंधती !
आता उन्हाळा सुरू होतोय म्हणजे जास्तीत जास्त वेळा भेळ खायचे योग येणार ! अर्थात आम्ही इथल्या ऐन हिवाळ्यातही भेळ खातोच म्हणा :)

चतुरंग

तोंडाला पाणी सुटले!! =P~ =P~
नगरचा अंबिका भेळवाला भेळेत थोडी कचोरी कुस्करुन टाकतो! वा, काय फर्मास चव येते म्हणून सांगू!! साला आत्ताच्या आत्ता जावं असं वाटायला लागलंय!

(अंबिकाभेळप्रेमी)चतुरंग

सुचेल तसं

अगदी अगदी!!! प्रभाकरवाल्याची पण भारी असते.......

विलासराव

मस्त चटकदार झालेली दिसतेय भेळ.

नगरचा अंबिका भेळवाला : काय बोलु आता. चतुरंगजी चाललाच आहात तर आपलीही एक भेळ सांगा. मी आलोच.

खादाड_बोका

भेळ...ईथे अमेरीकेत कुठे ??
8> 8> 8> 8>

मला तर स्वप्नातही भुक लागते....

सुचेल तसं

बादलीभर पाणी सुटलं तोंडाला!!!!

माझ्याकडूनही एक टीपः भेळेत मटकी घातली कि अतिशय सुंदर लागते भेळ.....

Arun Powar

भेळेचे बरेच प्रकार करून पाहिलेत घरी, पण मला कोल्हापुरातल्या "राजाभाऊ भेळ"चीच चव जास्त आवडते.