Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाल वाहनधारक

४
४ऊ दत्त
Sun, 04/11/2010 - 12:18
🗣 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1753 वाचन

💬 प्रतिसाद (4)
र
रेवती Sun, 04/11/2010 - 17:35 नवीन
गंभीर विषय आहे हा! परभणीत असे आहे तर पुण्यामुंबईत जास्तच असेल असा अंदाज परस्पर न बांधल्याबद्दल आपले अभिनंदन! खरंतर मलाही माहीत नाही त्याबद्दल पण माझ्या जाऊबाईंनी त्यांच्या मुलाला मात्र लायसन्स मिळेपर्यंत गाडीला हात लावू दिला नव्हता असे म्हणाल्या ते आठवले. नंतर मात्र त्याने एकही दिवस गाडी वापरणे सोडले नाही. अगदी कोपर्‍यावरच्या दुकानात जायचे तर गाडी.... आता तेव्हढा उत्साह नसेल राहिला त्याला! पण लहान वयातल्या मुलांना त्यांच्या उद्योगांच्या परिणामांची कल्पना मात्र नसते. माझ्या दोन नातेवाईक महिला अश्या प्रकारच्या अपघातात दगावल्यामुळे मला भिती वाटते हे खरे! रेवती
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 04/12/2010 - 00:22 नवीन
पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहीजेच जर पालकांना अक्कल नसेल तर. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 04/12/2010 - 07:32 नवीन
पोकळ बांबु चे फटके दिले पाहिजे त्या पालकांना .. आणि बालगाडीवानांना !! - १३मेरा७
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Mon, 04/12/2010 - 07:59 नवीन
इथे कोल्हापुराततर या सुट्टीच्या दिवसात बाल वाहनधारकांचा निव्वळ हैदोस चालू असतो, यंदाही आहे. शिवाय हे अभिमन्यू (.....आणि केवळ अभिमन्यू नाही, तर उत्तरादेवी ही मागे नाहीत, बरे का !!) वेळ निवडतात ती नेमकी शाळा भरायची व सुटायची ~~ कारण उघड आहे. आता त्यांना ह्या दुचाकी चारचाकी गाड्या दिल्या कुणी? तर अर्थातच पूज्य पिताश्रीनी. बरे विचारायला जावे तर आपणा सर्वाना `कोल्हापुरी` उत्तराची पद्धत माहित आहेच. `तो बाराबोड्याचा पोलीस काय बी विचारत न्हायी, तर तुमाला का तरास होतोय ?`` आहे याला काय उत्तर? यांच्या मातोश्रींची देखील काही वेगळी प्रतिक्रिया नसते. त्या म्हणतात `आहे गाडी म्हणून चालवतोय, नसती तर गेला असता कि चालत चालत !` आता यांना परवानापत्र, पात्रता, यातील धोके याविषयी काही सांगणे म्हणजे `गाढवापुढे वाचली गीता, काळाचा गोंधळ बरा होता !`` यदाकदाचित पोलीस मामाने पकडले तर जास्तीतजास्त काय करेल? एक तर स्वत: दहा वीस रुपये घेईल नाहीतर ५० ची पावती करेल. म्हणून काय यांचा हवेत वाहन उडविण्याच्या कार्यक्रमात खंड पडणार आहे का ? कोल्हापुरात या बाबतीत एक म्हण आहे : `या पोरांना व पोरांच्या बापांना शहाणपण शिकविणे म्हणजे वाळूत मुतल्यासारखे आहे.` ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा