स्नान
💬 प्रतिसाद
(4)
म
मदनबाण
Mon, 04/12/2010 - 15:48
नवीन
आपली स्नानाचि वेळ काय असते? >>>
इच्छा होईल तेव्हा...
व कसे करता? >>>
आता सारी दुनिया कपडे काढुनच अंघोळ करते...त्यामुळे म्या जगरीत फॉलो करतो.
गरम कि गार पाण्याने?
उन्हाळ्यात गार...आणि गारव्यात गरम
काय अजुन प्रश्न हाय का ?
म्हणजे साबण कंचा वापरता ?
टावेल वापरता का पंचा ?
उभ्या उभ्या अंघोळ करता की खाली बसुन?
बादली मधल्या पाण्याने की फवार्या खाली ?
चला एका ओळी पेक्षा जास्त टंकल्या हायेत्... त्ये यक ओळचा धागा परवडीत व्हता का ? असा म्या इचार करतोय.
(२ टेम अंघोळ करणारा)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
- Log in or register to post comments
श
शुचि
Mon, 04/12/2010 - 15:40
नवीन
सकाळी आंघोळ न करता ऑफीसात जाणारे काही महाभाग असू शकतात, मी त्यातली नाही. I firmly believe one should rediate freshness least early in the morning. त्यामुळे स्नान आवश्यक.
संध्याकाळी झोप, पूजा आदि गोष्टींची व्यवस्थित पूर्तता होण्यासाठी , संध्याकाळचे स्नान आवश्यक.
जे लोक होलसेल मधे एकाच प्रकारचे साबण विकत घेऊन महीनोंमहीने त्याच सुगंधाचा साबण वापरत बसतात त्यांची मला कीव येते. मला महीन्या / पंधरवड्यानी नवीन सुगंधाची वडी लागते. - चंदन, लव्हेंडर, गुलाब म्हणाल तो : )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
- Log in or register to post comments
स
सुचेल तसं
Mon, 04/12/2010 - 20:53
नवीन
>>माझ्या पहाण्यात असे बरेच स्त्री पुरुष आहेत जे १२ महिने गार पाण्याने स्नान करतात...<<
पहाण्यात म्हणजे? आंघोळ करताना?
>>आपली स्नानाचि वेळ काय असते?
घान वाटायला लागलं की स्नान करतो.
>>कसे करता?<<
जेवढा प्रदेश हाताक्रांत करता येतो तिथपर्यंत साबण लावून स्नान करतो.
>>गरम कि गार पाण्याने?<<
सुरूवातीला पाणी गरम असतं. साबण लावून होऊस्तोवर कोमट होऊन जातं. फारच कंटाळा आला तर आंघोळीची गोळी घेऊन बाहेर येतो.
अजून असे मनोरंजक धागे येऊ द्या - साबण कोणता वापरता? शाम्पू कितीवेळा लावता? आंघोळीला किती वेळ लागतो? आंघोळ करताना गाणी म्हणता की स्तोत्रं म्हणता की गप राहता?
- Log in or register to post comments
क
केशवराव
Tue, 04/13/2010 - 07:27
नवीन
असले धागे मिसळ पाव वर टाकून काय मिळते ? [ कि साबणासाठी सर्वे करता ?]
- Log in or register to post comments