॥ प्राजक्त ॥
💬 प्रतिसाद
(25)
आ
आवशीचो घोव्
गुरुवार, 04/15/2010 - 06:38
नवीन
कथा माहित नव्हती. फार छान आहे. माझ्या चुलतबहिणीचं नाव प्राजक्ता आहे. तिला पाठवीन हि गोष्ट. :)
पण एक प्रश्न पडला कविता वाचून (कदाचित चुकीचा असावा) प्राजक्ताच्या झाडाचा उल्लेख पुल्लिंगी करावा की स्त्रिलिंगी?
- Log in or register to post comments
भ
भूंगा
गुरुवार, 04/15/2010 - 07:04
नवीन
सर्वसाधारणपणे मराठीत झाडांचे नपुंसक लिंगाने उल्लेख केले जातात.
भुंगा
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 04/15/2010 - 20:17
नवीन
तर प्राजक्ता (प्राजक्ताच्या फुलांसारखी सुंदर नि नाजूक अशी) आणि शेफाली हे स्त्रीलिंगी उल्लेख असावेत, असे वाटते.
(अंदाजपंचे)बेसनलाडू
- Log in or register to post comments
भ
भूंगा
गुरुवार, 04/15/2010 - 07:17
नवीन
अपर्णाताई
आपण प्राजक्ताचे वर्णन खरोखर बहारदार केले आहे. तुम्ही तुमच्या कृज्ञतेला योग्य वाट करून दिल्यानें तुम्हाला आता बरेच मोकळे वाटेल.
भुंगा
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 04/15/2010 - 07:20
नवीन
पुरे तो स्त्री जन्म ! म्हणुन 'तिचा',' तो' म्हणुन जन्म झाला असेल.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
- Log in or register to post comments
प
प्रदीपा
गुरुवार, 04/15/2010 - 09:08
नवीन
क्या बात है.... बहोत अच्छे...!!
....ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
फारच छान... हे आपलच्...की ऐकीवातल?...
कसही असुद्या पण छान आहे..!
- Log in or register to post comments
म
मीनल
गुरुवार, 04/15/2010 - 15:30
नवीन
शेफ़ालिका म्हणजे प्राजक्त.
प्राजक्ताला आधी खूप दिवस फ़ुलं येत नव्हती.
रंगरुपाने सामान्य असलेलं ते झाड बिचारं अबोल होऊन गुमसुम उभं असायचं.
पानं काळवंडलेली उदास.
वनातले इतर वॄक्ष फ़ुलांनी बहरुन गेलेले.
देवानेच दया वाटून सांगितलं की, "बहरशील तु ही. पण फ़ुलांच हे लेणं मिळवायला तुला तपश्चर्या मात्र करावी लागेल. "
प्राजक्ताने ती केली.
दिवस-महिने-वर्ष उलटले.
तपात रमून गेल्यावर फ़ुलांची असोशीचं फ़िकट झाली मनात.
आणि एकदिवस पहाटे सुगंधी हिर्या माणकांनी डहाळी न डहाळी ओथंबली.
प्राजक्ताच्या ह्या अवर्णनीय वैभवाकडे सारं वन मंत्रमुग्ध होऊन पहात राहिलं.
पण प्राजक्ताला कसली जाणीवच नव्हती.
तपातच दंग शेफ़ालिकेला शेवटी शेजारच्या एका वृक्षाने हलवून जाग आणली.
वैभव? करू काय मी ह्याच?
निरिच्छपणे काया झटकून दिली तिने ती सारी दौलत मातीत उधळून..
धुळीत पडल्यावर लखलखती हिरे माणकं जराशी मंदावली आणि सूर्याच्या पहाटेच्या किरणांत मोती पोवळ्यांच रुप ल्यायली.
शेफ़ालिकेला आता हवं असो की नसो. तिच्या डहाळ्या रोज संध्याकाळी ह्या लालबुंद देठांच्या शुभ्र कांतिमान फ़ुलांनी सजत रहातात आणि उत्तररात्रीपासून त्यांची पखरण जमिनीवर ती करतच रहाते.
बंगालमधे प्राजक्त खूप फ़ुलतो.
आणि शगुन म्हणून घरात येणार्या सूनेची ओटी प्राजक्ताच्या फ़ुलांनी भरायची पूर्वीची रीत.
काळाच्या ओघात, वैभव दाखवण्याच्या हौसेपायी त्यांची मोती पोवळी झाली.
श्री रंवींद्रनाथ टागोर यांचे हे सुंदर लेखन फार पूर्वी http://tulipsintwilight.blogspot.com/ येथे वाचायला मिळाले होते.
आता तो ब्लॉग फक्त invited readers साठीच आहे. मला आमंत्रण नाही याचे वाईट वाटते. लेखिकेचे स्वतःचे लेखन ही छान असते.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
- Log in or register to post comments
म
मनीषा
गुरुवार, 04/15/2010 - 17:28
नवीन
मीनल, खूप छान कथा आहे ही प्राजक्ताची
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
गुरुवार, 04/15/2010 - 14:20
नवीन
सुंदर रचना .
मीनल ताईंचा प्रतिसाद ही आवडला.
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 04/15/2010 - 14:27
नवीन
सुंदर वर्णनं एकेक या लेखातली, प्रतिक्रियेतली.
खरच प्राजक्ताचा सुगंध मादक अथवा जीवघेणा नसून एक प्रकारचा विरक्तीचा असतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
- Log in or register to post comments
अ
अरुंधती
गुरुवार, 04/15/2010 - 15:53
नवीन
प्राजक्ताची निर्मळ शुभ्रता आणि त्याच्या देठातील ते गडद केशरीपण....
का कोण जाणे, मला प्राजक्ताची ही पांढरीशुभ्र - केशरी मोत्या-पोवळ्याची फुले कायम काळ्याकुळकुळीत विठुरायाच्या गळ्यातच गुंफलेली दिसतात. दोघेही एकमेकांची शोभा वाढवतात. सत्यभामा व रुक्मिणीलाही श्रीकृष्णाकडे रुसवे-फुगवे धरायला लावणारी ही सुगंधी पुष्पे म्हणजे पहाटेचे साखर स्वप्नच जणू! पहाटेच्या दंवाप्रमाणे दिवसाच्या प्रखरतेत विरघळून जाणारे...पण आपली सुमधुर आठवण मनात ठेवून जाणारे....
अपर्णा, मीनल दोघींचे कौतुक! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 04/15/2010 - 16:10
नवीन
अरे व्वा!
अपर्णा आणि मीनल,
दोघिंच्याही गोष्टी छान आहेत. अपर्णा, कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 04/15/2010 - 20:15
नवीन
कविता असोत, गोष्टी असोत की मोहक प्रकाशचित्रे..प्राजक्ताशी नाते जोडले गेले आहे ते जन्मभराचे!
(नातलग)बेसनलाडू
वरीलपैकी सूर्याबद्दलची गोष्ट माहीत होती; तपश्चर्येबद्दलची नाही. श्रीकृष्णाची ही अत्यंत आवडती फुलं असल्याने त्याने नंदनवनातून एक फांदी चोरून पृथ्वीवर आणली आणि सत्यभामेच्या अंगणात लावली. फुले रुक्मिणीच्या अंगणात पडत. दोघी खूष! मात्र इंद्राची चिडचिड शापाच्या रुपाने भोगायला लागली ती त्या प्राजक्ताला. श्रीकृष्ण म्हणजे साक्षात श्री विष्णूचा अवतार; त्याला शाप देणे इंद्राला शक्य झाले नाही. तेव्हा त्याने प्राजक्तालाचा शाप दिला - तू बहरशील अशा वेळी की तुझे सौंदर्य कोणालाच दिसू शकणार नाही; आणि तू फुललास तरी फळणार नाहीस. प्राजक्ताची फुले गळून जातात नि त्याला फळे येत नाहीत याबद्दलची ही रोचक कथा ऐकली आहे.
(स्मरणशील)बेसनलाडू
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 04/15/2010 - 23:12
नवीन
वरचा फोटु आवडला रे बेसनलाडवा :)
-(अचानक नातलग) घासुनपाडु
- Log in or register to post comments
S
sur_nair
Sat, 04/17/2010 - 08:03
नवीन
सुंदर आहे तुमची कविता. प्राजक्त माझाही आवडता वृक्ष. ही कथा माहित नव्हती. . सत्यभामा -भामिनी एवढाच संदर्भ माहित होता. मीनलतैंचा संदर्भही सुंदर. यावरून माझी एक चारोळी आहे ती आठवली
स्वर्गलोकीचा प्राजक्त
पृथ्वी वर उभा असतो
आसवांची फुले का
ढाळीत सदा असतो?
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sat, 04/17/2010 - 10:26
नवीन
छान धागा,अन् त्यावरचे प्रतिसादही सुंदर...
लाडुराव फोटु लयं भारी हाय... :)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
- Log in or register to post comments
म
मीनल
Sat, 04/17/2010 - 15:06
नवीन
वरचे देठ पाहून एक आठवलं.
आमच्या ओळखीच्या एक बाई दूधात प्राजक्ताची देठ चुरडून घालतात म्हणे.
त्यात साखर आणि मसाला घालून मसाले दूध करतात. बारीकसा सुगंध येतो दूधाला. शिवाय रंग ( केशर न घालताही)
मी ट्राय केले नाही. पण ऐकले आहे.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sat, 04/17/2010 - 15:08
नवीन
मीनल तै...शिरा करताना त्यात सुद्धा घालतात् असं ऐकलयं...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
- Log in or register to post comments
अ
अनन्न्या
Tue, 09/17/2013 - 14:53
नवीन
माझी आजी नेहमी ताटात देठ काढून सावलीत वाळवायची. तेच केशर म्हणून वापरले जायचे आमच्याकडे! वेगळे केशर असते हेच माहित नव्हते लहानपणी!
@ अपर्णा, कविता खूप आवडली.
- Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ
Mon, 09/16/2013 - 14:12
नवीन
मस्त कविता, अपर्णा तै, खरच खूप भावली मनाला.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 09/16/2013 - 16:59
नवीन
मस्तच.
खूप दिवसांनी काल प्राजक्त पाहिला.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Mon, 09/16/2013 - 18:36
नवीन
ही वाचलीच नव्हती. खूपच छान. :)
- Log in or register to post comments
स
सुधीर
Mon, 09/16/2013 - 18:40
नवीन
कविता आवडली होती त्यावेळी, पुन्हा वाचली, काही प्रतिसादही आवडले.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 09/17/2013 - 19:24
नवीन
अतिशय सुंदर कविता... प्राजक्ता इतकीच सुंदर! :)
- Log in or register to post comments
र
रुमानी
Fri, 09/20/2013 - 09:55
नवीन
प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेले एक प्राजक्त अस्तोच..!
संदर्भ आणि कविता दोन्हि छान..!
- Log in or register to post comments