Skip to main content

पालक पुरी

लेखक मीली यांनी शनिवार, 17/04/2010 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
जिन्नस :- गव्हाचे पीठ ६ वाट्या चण्याच्या डाळी चे पीठ १ वाटी तिखट, मिठ, हळद, ओवा चवीप्रमाणे लसुण पेस्ट १ चमचा मिर्ची कोथिंबीर पेस्ट २ चमचे धने, जिरे पुड १/२ चमचा प्रत्येकी १ पालक जुडी ,मळताना लागेल इतके पाणी मार्गदर्शन :- सर्वात प्रथम गव्हाचे पीठ व चण्याचे पीठ एकत्र करावे. त्यात वरील सर्व जिन्नस घालावे. पालकाची जुडी धुवून पेस्ट करून घ्यावी व कणिक मळून घ्यावी तेल लावून ५ मिनीटे झाकून ठेवावी. छोटा गोळा घेवून पुरी लाटावी व खरपुस तळावी. टीपा :- सारख्या आकाराच्या पुरया हव्या असल्यास वाटी वापरता येते. पुरी तळून झाल्यावर टिपकागदा वर ठेवावी म्हणजे पुऱी तेलगट लागणार नाही. तळण नको असल्यास घडीच्या पोळी सारखे लाटल्यास पालक दशमी होते. प्रवासात मुलांना द्यायला उत्तम! सोबत लसुण चटणी, लोणचे आणी कांदा असेल तर मस्तच !

वाचने 7488
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

यात मळताना थोडे तेलाचे मोहन घातल्यास पुर्या खमंग होतील ..... तळताना तेलात थोडी साखर घालावी म्हणजे पुर्या टम्म फुगतील ... बाकी पाकृ छान ....

हा,,,आत्ता कसं...फोटु बिगर पाकृ उघडायला मजाच नाय !!! :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार! सल्ल्यानुसार पुर्या अजून टम्म फुगवायचा प्रयत्न करेल नक्की.तो पर्यंत ह्यावर ताव मारायला आपली हरकत नसावी. हा पण प्रतिसाद वाचून उत्साह नक्की वाढला.