Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिलीपकुमार आणि चंदेरी वर्ख निघालेले अन्य कुणी....

म
मुक्तसुनीत
Tue, 04/20/2010 - 20:24
🗣 53 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
11491 वाचन

💬 प्रतिसाद (53)
ह
हुप्प्या गुरुवार, 04/22/2010 - 18:56 नवीन
मला दिलीपकुमारचे उर्दू बोलणे आवडते. अगदी अस्खलित. मला नया दौर आवडला होता. राम और शाम ठीक वाटला. पण मुघले आझम मधला दिलीप कुमार अगदी भयाण वाटत होता. ते भुरके केस काय नि बाकी दिसणे काय. अजून एक दिल दिया दर्द लिया. ह्याचे टोपणनाव पैसा दिया और सरदर्द लिया असे शोभेल. ह्याचा एक नमुना सिनेमा म्हणजे दाग. ह्यातली गाणी उत्तम आहेत. पण गोष्ट इतकी बिनडोक की काही विचारू नका. नायक (दिकु) गटागटा दारू पितो, भसाभसा सिगरेटी फुंकतो आणि ढसाढसा रडतो. काम धंदा काही करत नाही. जे काही काम जमत असते त्याचीही वाट लावतो आणि मग दु:खाचा अभिनय. असले सिनेमे लोक आवडीने का बघायचे हे एक अनाकलनीय आहे.
  • Log in or register to post comments
म
मनिष गुरुवार, 04/22/2010 - 19:03 नवीन
बरोबर!!! हेच नाव सकाळपासून आठवत होतो. मलाही हा सिनेमा नव्हता आवडल...खासकरून कर्मा, सौदागर ने खराब केलेली पाटी कोरी करुन दिलीपकुमारचा जुना चित्रपट म्हणून खूप अपेक्षा ठेवून पाहिला, पण वैताग आला...तसच नया दौर आणि थोड्या प्रमाणात मधुमतीलाही झाले होते. त्यानंतर नाद सोडला तो आजतागायत... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 04/22/2010 - 19:55 नवीन
दिलीप कुमार बद्दल इतक्या मोठ्या प्रमाणावर वाचल्यानंतर मला असे वाटू लागले आहे की, काही का असेना डाव्या वा उजव्या बाजूने हा महान कलाकार चर्चेच्या योग्यतेचा आहे, आणि मला वाटते हीच त्याच्या मोठेपणाची एक खूण आहे. नाहीतर "त्याच्यात अभिनय नावाचा कोणताही गुण नाही" हे सांगण्यासाठी शेकडो सदस्य पुढे सरसावले नसते. असो. ज्याला दिलीप कुमार आवडतो तो त्याना आवडत राहणारच, भले मग आवडणा-यांचे आणि न आवडणा-यांचे प्रमाण हे एकास नऊ असे असले तरी फरक पडत नाही. मी इथे त्याच्या चित्रपटांची जंत्री देणार नाही की, ज्या संवाद फेकीसाठी तो फेमस होता त्या संवादाविषयीही काही लिहित नाही, शिवाय तसे लिहिणे व्यर्थ आहे कारण येथील प्रत्येक सदस्याला दिलीपकुमारच्या त्या लकबी माहित आहेत. मी स्वत: त्याचा एकमेव चित्रपट "शक्ती" हा मोठ्या पडद्यावर पहिला आहे, अन्यथा जे काही पहिले ते प्रथम सीडी स्वरूपात आणि त्याच्याविषयी आमच्या येथील "सिने क्लब" वरिष्ठ सदस्यांकडून विस्ताराने ऐकले, वाचले, चर्चा केली, त्यावेळी असे वाटू लागले की हा अभिनेता निव्वळ एक चित्रपट पाहून मत बनविण्याच्या पलीकडील स्थितीचा आहे. त्यावेळीही त्याच्या बाजूने वा विरुद्ध बोलणारे, लिहिणारे कमी नव्हते, किंबहुना तो अशा चर्चेच्या केंद्रस्थानी कायम राहिला होता. राज कपूर आवडणारे लोक होते, देव आनंदचे प्रेमी होते, पण एकाच वेळी आवडतोही आणि आवडतहि नाही असा असणारा एकमेव कलाकार म्हणजे दिलीप कुमार. त्याच्या अभिनय क्षमतेबाबत मी काय बोलणार? कोल्हापुरात चित्रपट (मराठी, हिंदी, इंग्लिश) या विषयावर चर्चा करणारे, भरभरून बोलणारे, अनुभव वाटणारे, हमरीतुमरीवर येणारे यांची संख्या अजिबात कमी नाही. कित्येकांना तर महाराष्ट्र कर्नाटका सीमा वादापेक्षा "लता मोठी कि आशा", "शंकर जयकिशन पेक्षा ओ. पी. नय्यर किती आवडीचा", "दिलीपकुमार आणि राज कपूर यांच्यात उजवा कोण?" यावर अथक चर्चा झडत असतात. यांच्यात बसून बसून मलाही तीव्रतेने वाटू लागले कि निदान एखाद्या कलाकारावर टीका करण्यापूर्वी त्याच्या कलाकृती एकदा तरी पाहिल्या पाहिजेत. ज्यावेळी शक्य होते तेथून सी. डी. मिळविल्या, आणि नंतर डीव्हीडी चा जमाना आला त्यावेळी तर खजिना खुला झाला. नेटचे साहाय्य तर मिळत होतेच. मग एका पाठोपाठ मी दिलीप कुमार याचे जवळपास सर्वच चित्रपट पाहिले (सर्व म्हणजे त्यांचे नायक या भूमिकेतील). त्या वरून माझे निश्चित असे मत झाले आहे की या कलाकाराला त्याच्या काळात तर अजिबात तोड नव्हती. आजच्या कलाकाराबरोबर तुलनाच करायची झाल्यास मी प्रथम आमीर खानला पहिली पसंती देईन. ही तुलना राहू दे एक वेळ. पण त्याच्या जमान्यातील प्रत्येक नायिकेची दिलीप कुमार बरोबर काम करण्याची कामना असायची, हे कशाचे प्रतिक आहे? वर्षाला एक चित्रपट करणे, व पहिला पूर्ण झाल्याशिवाय दुसरा चित्रपट साईन करायचा नाही हे प्रौढपण फक्त दिलीपकुमारच दाखवू शकत होता. गुरु दत्त यांना इतराप्रमाणे मी देखील मानतो, पण याच गुरु दत्त यांनी "प्यासा" साठी सर्व प्रथम दिलीप कुमारची विजयच्या भूमेकेसाठी निवड केली होती, ही त्याच्या अभिनयाला दिलेली पावती म्हणावी लागेल. प्रत्येक दिग्दर्शकाचे स्वप्न असायचे की एकदा तरी दिलीप कुमार यांना घेऊन आपण चित्रपट तयार करायचा. तीच गोष्ट संगीतकारांची.... मीना कुमारीची हळहळ होती कि आपण दिलीप कुमार बरोबर फक्त पोशाखी चित्रपटातच काम केले.... नूतन, माला सिंह, या त्या त्या वेळेच्या प्रसिद्ध अभिनेत्रींची हीच खंत होती. दुर्दैवाने राजकीय पटलावर दिलीप कुमारची ओळख ही एक कलाकार या नात्यापेक्षा तो पाकिस्तानचा हस्तक आहे अशा काना नसलेल्या प्रचारामुळे जास्त झाली. आता यात सत्य किती कपोलकल्पित किती हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, पण एक रसिक प्रेक्षक म्हणून या नात्यानेच आपण चित्रपट अभिनेत्याकडे पाहिले तर दिलीप कुमार या नावाला दुसरा पर्याय नाही. धन्यवाद मुक्त सुनीत, या सुंदर धाग्याबद्दल ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा