जनातलं, मनातलं
कविवर्य सुरेश भट स्मृती मुशायरा
Primary tabs
दिनांक १८ एप्रिल २००८ रोजी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे कविवर्य सुरेश भट ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुशायरा आयोजित करण्यात आला आहे.ह्या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना सुरेशभट.इनतर्फे आग्रहाचे आमंत्रण आहे. मुशायऱ्याचे स्थान: भरत नाट्य मंदिर, पुणेमुशायऱ्याची तारीख: शुक्रवार, १८ एप्रिल २००८मुशायऱ्याची वेळ: रात्रौ ९.३० वाजता
अतिशय सुंदर होणार हा मुशायरा यात शंकाच नाही. मलाही आवडलेल. १३ एप्रिल तारखेला भारतात येण्याचा विचार आहे. बघू कसे आणि काय जमते. पण उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन नक्की.
चित्तर, आपण याचा वृतांत इथे लिहावा , फोटो द्यावेत.. आणि जमल्यास यू-ट्यूब एखादी चित्रफितही टाकावी. ही विनंती..
- (सर्वव्यापी)प्राजु
अतिशय सुंदर होणार हा मुशायरा यात शंकाच नाही. मलाही आवडलेल. १३ एप्रिल तारखेला भारतात येण्याचा विचार आहे. बघू कसे आणि काय जमते. पण उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन नक्की.
-- मीही १४ एप्रिलला मुंबईत येतोय. १८ ला पुण्याला यायचा नक्की प्रयत्न करेन. मुशायर्यास हार्दिक शुभेच्छा.
(प्रवासी)बेसनलाडू
(मला मात्र भारतात यायला हवे तितके जमत नाही. ताकावर तहान भागवू.)
मुशायर्याला माझ्या वैयक्तिक व संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा! तसेच भट साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...
कृपया कार्यक्रमाचा तपशील, कोण कोण मंडळी भाग घेणार आहेत, ही माहिती इथे अवश्य कळवावी...
आपला,
(सुरेशभट प्रेमी) तात्या.
आपण येणार राव..
विवेक वि.
कार्यक्रमासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
स्वाती
आपण येणार.
शुभेच्छा.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे १८-४-२००८ ला भरत नाट्यमंदिरात मिळतीलच.
ह्याशिवाय, प्रवेशिका हव्या असल्यास खालील दूरध्वनींवर संपर्क साधावा:
चित्तरंजन भट ९३७३१०४९०३
अनिरुद्ध अभ्यंकर ९८५००००४३४
१५, १६ ला कविवर्य सुरेश भट ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची गल्लत होण्याची संभावना आहे. वरील कार्यक्रम १८ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता भरत नाट्यमंदिरात आहे. ह्याची कृपया पुन्हा एकदा नोंद घ्यावी.
कार्यक्रमाला मी सुध्दा येतोय. थोडा लवकरच पोहोचेन. कुणी लवकर आलात तर शक्यतो आल्यावर कॉल करा, भेटूया.
९८२३५५२५२३
नीलकांत