Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असाच व्हावा शेवट माझा......

झ — झुम्बर, Fri, 04/23/2010 - 07:09

प्रतिक्रिया द्या
2808 वाचन

💬 प्रतिसाद (15)
व
विसोबा खेचर Fri, 04/23/2010 - 07:15 नवीन
छान आहे काव्य.. तात्या.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 04/23/2010 - 08:34 नवीन
अबोल.... - पिंगू
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Fri, 04/23/2010 - 08:39 नवीन
" मी अशीच गुणगुणता गाणे श्वासांनी थांबून जावे लिहिता कविता मृत्यूने हळूच मजला कुशीत घ्यावे " व्वा ! क्या बात है ! ! अप्रतिम कल्पना आणि काव्य ! ! शब्दान्च्या फेररचनेने सौन्दर्य अजुन खुलवता येईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 04/23/2010 - 08:44 नवीन
काव्य आवडले!!! जलाधीच्या वेगवान लाटेतुनी मृत्यूने घालावी साद कधी मी त्याच्यात विलीन व्हावे जणू मीच व्हावे मुग्ध नदी मुसळधार पावसात मजला दामिनीने करावे चिंब मी हासत हासत तिचे मनोरम बनावे प्रतिबिंब क्लास!!!! आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 04/23/2010 - 11:02 नवीन
कल्पना चांगल्या आहेत. पैलू पडावे लागतील.. मग आणखी खुलेल कविता! पु.ले.शु. राघव
  • Log in or register to post comments
झ
झुम्बर Fri, 04/23/2010 - 12:33 नवीन
आभार , पैलु पडायला हवे आहेतच ..... मार्ग दाखवा .... चालोत्सुक झुम्बर....
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 04/24/2010 - 00:32 नवीन
कवितेला पैलू पाडण्याबाबत माझे काही विचार. सर्वांनी लिहिल्याप्रमाणे कविता चांगली झाली, कल्पना छान आहेत. गेयता आणि नादमयता वाढली तर खूपच फायदा होईल असं वाटतं. तुम्ही लिहिलेल्या पहिल्या ओळींचं वजन आणि 'मुसळधार...' कडव्याचं वजन वेगवेगळं आहे. दुसरी सूचना अशी की जवळपास प्रत्येक कडव्यात मृत्यू शब्द येतो. त्याने एक प्रकारचा बटबटीतपणा येतो. त्याऐवजी नुसतं जाणं, किंवा तू एवढंच म्हटलं तर त्याची अर्थघनता वाढेल असं वाटतं. हे माझे व्यक्तीगत विचार आहेत, तुम्हाला मान्य होतीलच असं नाही. फक्त एक वेगळा दृष्टीकोन म्हणून पहा. असा यावा मृत्यू मला की वेदनांनी सुखावून जावे आणि सुखानीही माझ्या कडे आता असूयेने पाहावे असे मला तू भेटावे की सुखावून जखमांनी जावे आनंदाच्या क्षणानिंही मज असुयेच्या डोळ्यानि पहावे (इथे सुख या शब्दाचा द्विकार टाळला आहे. शिवाय एक लय ठेवली आहे... टडा टडाडा डाडाडाडा टडा टडा टट डाडा डाडा... अशासारख्या वजनावर, हाताने ठेका देऊन गुणगुणता आली तर कविता जास्त लयबद्ध होते.) मी अशीच गुणगुणता गाणे श्वासांनी थांबून जावे लिहिता कविता मृत्यूने हळूच मजला कुशीत घ्यावे अशीच मी गुणगुणता गाणे श्वास क्षणांनी गोठुन जावे लिहिता कविता नकळत अल्लद, हळू तुझ्या मीठीत शिरावे (दुसरी ओळ अजून पक्की करता येईल... पण मृत्यू प्रियकरासारखा यावा हे थोडं त्यात येतं. मग तुम्हाला हवं असेल तर तो कोण हे शेवटी उघड करता येईल. तसं करण्याची आवश्यकताच आहे असं नाही. ) मी हुंगावे फुल सुगंधी आणि क्षणात राख व्हावे खाली ही असे पडावे जणू वेली वरुनी कुसुम गळावे सहज गळावे वेलीवरुनी तसे स्वत:ला सोडुन द्यावे हुंगुन वा मी फूल सुगंधी, वासापरते विरून जावे (इथे वाक्यांची उलटापालट केली आहे, राखऐवजी जास्त चपखल बसणारं वास हे रूपक वापरलं आहे. पहिल्या ओळीत व वरती अनुप्रास साधला आहे. तो संपूर्ण कविताभर करता आला, तर अधिक नादमय होऊ शकेल.) जलाधीच्या वेगवान लाटेतुनी मृत्यूने घालावी साद कधी मी त्याच्यात विलीन व्हावे जणू मीच व्हावे मुग्ध नदी (इथे लाटा बनून तू गर्जावे, किंवा साद घालावी, हे रूपक व नदीने मिळण्याचं, विलीन होण्याचं रूपक चांगलं आहे, फक्त पुन्हा मृत्यूऐवजी तू आलं तर जास्त चांगलं होईल. करून बघा) मुसळधार पावसात मजला दामिनीने करावे चिंब मी हासत हासत तिचे मनोरम बनावे प्रतिबिंब (रूपक चांगलं, शब्दरचनेने वजन बदलता येईल...) असाच व्हावा शेवट माझा थेट भिडवा मृत्यू मला आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला (इथे पुन्हा ओळी बदलून शेवटच्या दोन शब्दात 'तू' कोण हे कळलं तर प्रभावी होईल असं वाटतं. 'असाच व्हावा..' या ओळीला जवळपास वरच्या ठेक्यावर म्हणता येईल असं वजन आहे [मला ऐवजी मजला केलं तर]. तोच ठेका कविताभर जपता आला तर बघा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झुम्बर
म
मदनबाण Fri, 04/23/2010 - 13:03 नवीन
वा.... अप्रतिम कविता. मी हुंगावे फुल सुगंधी आणि क्षणात राख व्हावे खाली ही असे पडावे जणू वेली वरुनी कुसुम गळावे क्लासच... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 04/23/2010 - 13:23 नवीन
क्लास आहे कवितेचा आशय . कविता खूप आवडली . मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 04/23/2010 - 13:25 नवीन
आवडली कविता......:) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. тельца имени индиго :D
  • Log in or register to post comments
S
sagarparadkar Fri, 04/23/2010 - 15:07 नवीन
वा फारच छान ... आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला ... हि ओळ वचुन कविवर्य सुरेश भट यान्च्या दोन ओळि आठव्ल्या सरणावर जाताना इतकेच मला कळले होते, जग्ण्याने सुटका केली मरणाने छळले होते ....
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 04/23/2010 - 19:50 नवीन
क्लास!! मस्त लिहिले आहे. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 04/23/2010 - 21:52 नवीन
>> आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला >> खूप छान आहे कविता. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.
  • Log in or register to post comments
S
sur_nair Fri, 04/23/2010 - 22:03 नवीन
कल्पना खूप सुरेख आहेत. पण वाक्यरचना काहीठिकाणी जराशी तुटक, ओबड-धोबड वाटते. पुन्हा पुन्हा वाचली तर कदाचित तुम्हालाच सुचेल काय बदल करावेत. (स्पष्ट सांगितल्याचा फायदाच होईल अशी अपेक्षा बाळगतो)
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Fri, 04/23/2010 - 23:31 नवीन
कवितेचा आशय खूप छान आहे..... वेगळी! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा