Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रतापगडाचा जीर्णोद्धार??

र
राघव
Mon, 04/26/2010 - 19:47
🗣 10 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3206 वाचन

💬 प्रतिसाद (10)
इ
इंटरनेटस्नेही Mon, 04/26/2010 - 19:57 नवीन
स्वागतर्ह कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज Mon, 04/26/2010 - 20:04 नवीन
बेटर लेट दॅन नेव्हर..... - हर हर महादेव
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 04/27/2010 - 00:45 नवीन
वरील दुव्यावर मला खालील बातमी दिसली. बातमी नि तुमच्या लेखाच्या शीर्षकाचा मेळ लागत नाही. ही दुवा देताना झालेली गडबड आहे की लोकसत्तेने दुवा बदलला आहे? - महाराष्ट्रातील पत्रकारांच्या लेखणीतून साकारलेल्या दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे २१ ऑगस्टला केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या आठवणींचे संकलन असलेली ‘डायरी’ तसेच गेल्या अर्धशतकातील ठळक घटनांची नोंद घेणाऱ्या ‘महाराष्ट्राचा लेखाजोखा’ या दिलीप चावरे यांनी संपादित केलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनाचा हा समारंभ मुंबईच्या लोकमान्य सेवा संघाच्या पु.ल. देशपांडे सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. ग्रंथाली प्रकाशन, लोकमान्य सेवा संघ आणि श्री.वा. फाटक ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या समारंभात ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि घटना यांच्या संबंधित घडामोडींचा गोफ विणणारी प्रवीण बर्दापूरकर यांची ‘डायरी’ म्हणजे गेल्या तीस वर्षातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय उलथापालथींचा लेखाजोखा आहे. कुमार केतकर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. ‘महाराष्ट्राचा लेखाजोखा’ हे पुस्तक महाराष्ट्राच्या लढय़ापासून १ मे १९६०चा सोहोळा, विविध मुख्यमंत्र्यांची कारकीर्द आणि गेल्या अर्धशतकातील काही ठळक घटनांच्या आठवणींनी सजलेले आहे. दिलीप चावरे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात वसंतराव देशपांडे, मधू शेटय़े, दि.बा. खाडे, नीला उपाध्ये, प्रल्हाद नाईक, वसंत नाईक, ल.त्र्यं. जोशी, बा.न. मग्गीरवार, वसंत उपाध्ये आणि नीळकंठ खाडिलकर यांच्यासह वसंत खेर आणि प्रभाकर शांडिल्य या प्रसिद्धी अधिकाऱ्यांनीही अनुभव शब्दबद्ध केले आहेत. प्रकाशन सोहोळ्यात ही दोन्ही पुस्तके रसिकांना विशेष सवलतीत उपल्ध करून देण्यात येणार आहेत. रसिकांनी या समारंभाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथालीचे धनंजय गांगल आणि मंगला गोखले यांनी केले आहे. (गोंधळलेला)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
I
II विकास II Tue, 04/27/2010 - 04:36 नवीन
मलाही अशीच बातमी दिसली होती. मिपावरील लेखाचा आणि लोकसत्तामधील लेखाचा काही ताळमेळ काही लागला नाही. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
स
सुचेल तसं Tue, 04/27/2010 - 02:10 नवीन
मला वाटतं ती लिंक ही असावी: http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=64950:2010-04-24-16-50-03&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 04/27/2010 - 03:45 नवीन
अरे पण त्या कबरीचे काय करणार? ती ही उद्धारेल का नाही? Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 04/27/2010 - 05:15 नवीन
त्या कबरीला आता जे मढवले आहे ते सर्व दूर करुन महाराजांनी ती ज्या स्थितीत ठेवली होती त्या स्थितीला आणावी. अफजलखान हा स्वराज्याचा शत्रु होता. त्याचे उदात्तीकरण थांबवावे. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज Tue, 04/27/2010 - 06:28 नवीन
मी लोकसत्ता मध्ये तो लेख वाचला होता. त्यामुळे लिंक न पाहता प्रतिसाद लिहिला.
प्रतापगढ की प्रतापगड ???
हर हर महादेव
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 04/27/2010 - 06:44 नवीन
अरे! असे कसे झाले.. काल तर मी ती लिंक आधी उघडून खात्री करून मगच डकवली होती. :B असो. वर सुचेल तसं यांनी दिलेली लिंक त्या बातमीचीच आहे. भारद्वाज, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे - प्रतापगडच हवे. बदल करतो लगेच. धन्यवाद! राघव
  • Log in or register to post comments
ज
जिप्सी Tue, 04/27/2010 - 09:37 नवीन
सगळ्यात पहिल्यांदा हा उपक्रम सुरू करणार्‍या बुटाला आणि प्रवीण भोसले यांचे अभिनंदन. किल्ले वाचवणे हे किती कष्टाचे आहे हे सुधा समजावून घ्यायची गरज आहे. मी स्वता: राजगडावर संवर्धनाचे काम करतो. या कामाला अफाट पैसा आणि मनुष्यबळाची गरज आहे. आसपासच्या गावांचीसुद्धा मदत मिळणे आवश्यक आहे. पण राजगडावर काम करताना अतिशय वाईट अनुभव आलेले आहेत. गावातल्या मंडळीना काहीही देणे घेणे पडलेले नाही. ते स्वता हौसेने गडावर मटन आणि दारू पोचवतात. आम्ही गडावर स्वच्छता करतो त्यामुळ त्यांच्या लेखी आमच कामाच आहे ते. पण आम्ही अजुन सुद्धा हिंमत सोडलेली नाही ,आम्ही काम करणाराच आणि स्वराज्याची पहिली राजधानीचे संवर्धन करणारच.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा