सन्त श्रेश्ठ तुकाराम महाराजान्च्या दोन गोष्टी ...
💬 प्रतिसाद
(12)
क
केतन अघोर
Tue, 04/27/2010 - 13:53
नवीन
I think that there is no visangati here. Tukaram Maharaj has shown the 2 steps for climbing the ladder of Adhatma. 1st step would be to start your journey and the other being improving " Bhav " in you. Karan dev ha bhavacha bhukela aahe.
आपले मन निर्मळ नसेल तर कितीही तीर्थयात्रा केल्यात तरी काहि उपयोग नाही - yacha artha asa kadhu naye ki yatra karu naye.....yacha artha evadhach ki tumache man nirmal kara.
Jya pramane aapan Graduate vhyayala pahili, dusari, tisari ...etc chya vargat jato tya pramane he aahe. Graduate chi pariksha denya sathi dahavi, baravi zalya shivay entry milat nahi, yacha artha ha nahi ki pahili dusari karu naye.
Tumhala he patala tar daad dya.....
केतन अघोर
- Log in or register to post comments
त
तिमा
Wed, 04/28/2010 - 08:42
नवीन
मराठी लिहिता येत नसेल तर इंग्रजी समजू शकतो. पण अर्धे मराठी व अर्धे इंग्रजी का ? पूर्ण मराठीत लिहावे हे विनंती.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
- Log in or register to post comments
C
chipatakhdumdum
गुरुवार, 04/29/2010 - 16:41
नवीन
अहो भाउ, त्यानी ते मराठी वाक्य copy and paste केल आहे. त्याना खरोखरच देवनागरीतून लिहीता येत नसेल तर त्यात त्यांचा दोष नाही.
- Log in or register to post comments
र
राघव
Wed, 04/28/2010 - 10:43
नवीन
केतनशी सहमत.
अगोदर प्रवासाला निघा तर खरे. अन मग त्यात भाव ओतून ते करा एवढेच ते सांगताहेत.
केतन,
मराठीत लिही. काही फार कठीण नाही रे! :)
राघव
(आधीचे नाव मुमुक्षु)
राघव
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Tue, 04/27/2010 - 13:56
नवीन
तीर्थयात्रेला जाताना, आपण केलेली 'पापे' 'फुकट' धुवून मिळावित, अस उद्देश असतो.
विठोबाच्या 'वारीचा' असा काही स्वर्थी उद्देश नसतो, तिथे प्रेम, भक्ती असते.
============
माउ
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Tue, 04/27/2010 - 14:01
नवीन
मला वाटते, तिर्थ्यात्रेला जाणारे मनानी 'कडू' असावेत, त्याना 'जागे' करायला, तुकोबानी, त्याना भोपळा दिला.
शेजारी मनानी 'गोड' असावा, त्यमुळे त्याला प्रपन्चातुन मन काढून घे, देवाचेहि थोडे प्रेम ठेव. असे सान्गण्यासाठी वारीला येण्याचा आग्रह केला असेल.
============
माउ
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 04/27/2010 - 16:07
नवीन
अति प्रपंच प्रपंच करणं जसं वाईट तसं अति तीर्थयात्रा तीर्थयात्रा देखील वाईटच.
तुकराम महाराज संतुलन साधण्याचा संदेश देत असावेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
- Log in or register to post comments
J
jaypal
Tue, 04/27/2010 - 16:19
नवीन
तुकाराम महाराजांनी एकदाच पंढरपुरची वारी केली होती. त्यातला फोल पणा कळल्याने त्या नंतर ते परत कधी वारीला गेले नाहीत. असो , मन चंगा तो कटौटे में गंगा :-)
तुकारामांचा अजुन एक अभंग पुसटसा आठवतो ..."एक ब्रम्हचारी गर्दभासा झोंबला"...
जाणकारांना माहीत असल्यास कॄपया प्रकाश टाकावा ही विनंती
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
- Log in or register to post comments
M
Manoj Katwe
Wed, 04/28/2010 - 01:46
नवीन
आधी पोटोबा, मग विठोबा
- Log in or register to post comments
अ
अडगळ
Wed, 04/28/2010 - 04:55
नवीन
अधिकार तैसा दावियेला मार्ग |
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 04/29/2010 - 19:55
नवीन
मुळात ह्या दोन्ही कथा तुकारामांच्याच आहेत का, याचा शोध करावा लागेल.
वरच्या प्रश्नाचे उत्तर काहीही असले तरी, बर्याचदा एखादा मुद्दा व्यक्त करण्यासाठी एखादे witty उदाहरण घेतले जाते. त्यात हुशारी असते, पण जेव्हा तुम्ही out of context घेता तेव्हा त्यातला विरोधाभास वगैरे दिसतो. ते असो. (आता तो भोपळा तीर्थयात्रावगैरे करे पर्यंत बरा टिकला वगैरे तांत्रिक भानगडीत तर पडायला ही नको)
तुकारामांनी असे म्हणले आहे असे समजा, मग पुन्हा परिस्थितीनुसार उपदेश केला असेही असु शकते, म्हणजे पहिल्या प्रपंचात गुंतुन स्वतःला/समाजाला काहि नुकसान करत असेल का? दुसर्यावेळेस लोक नुसतेच तीर्थयात्रा करताहेत त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही असे सांगायचे असेल का? (माझ्या तोकड्या ज्ञानानुसार संतांनी तिर्थयात्रेला फारसे महत्त्व दिले नाही असे वाटते, 'देव तुमच्यातच आहे', 'देव सगळीकडे आहे' अशीच संतांची शिकवण दिसते. 'जे का रंजलेगांजले त्यासी जो म्हणे आपुले, साधु तोची ओळखावा, देव तेथेची जाणावा' ही शिकवणही तुकारामांचीच.)
थोडक्यात, ह्या 'कथा' मी pinch of salt सारख्याच घेईन.
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 04/29/2010 - 23:38
नवीन
खरे तर ह्या दोन्ही प्रसंगात रूपकात्मक संदेश आहे.
१. भगवंताच्या नामाला लागायचे आहे तर आधी त्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे. प्रपंचाच्या कारणाने जर हे घडत नसेल असे आपण म्हणत असू, तर ते कधीच घडणार नाही कारण प्रपंच सोडू म्हणता सुटत नसतो. तो संतांनाही जरूरीपुरता का होईना करावाच लागतो. त्यामुळे प्रपंच करता करता नाम घेणं सुरु व्हायला हवं.
२. आता नुसतेच नाम घेऊन चालेल का? ते का घ्यायचे, कुणासाठी अन् कशासाठी घायचे हा विचार करून जाणिवपूर्वकच घ्यायचे. पण हा विचार मनापासून उगम पावण्यासाठी आधी जमेल तसे का होईना नाम घेण्यास सुरुवात करणे जरूर आहे. नामाबद्दल विचार उगम पावणे ही भाव उत्पन्न होण्याची पायरी म्हणायला हवी. त्यासाठीच प्रत्येकाच्या योग्यतेनुसार संत साधना करण्यास सांगत असतात. हा विचार नसेल तोवर गंगेत स्नान करा वा गटारात, फारसा काही फरक पडत नाही. एकदा भाव उत्पन्न झाला अन् मनाला नामात गोडी लागली म्हणजे घोडे मार्गी लागले. भाव तेथे देव म्हटले आहे ते खरेच आहे.
या दुसर्या गोष्टीत श्रीतुकाराम महाराज ह्याच गोष्टीकडे वळण्याचा उपदेश करत आहेत. नाम भरपूर घेतलेत.. आता जाणिवपूर्वक घ्या असे ते सांगताहेत. श्रीजनाबाई स्वतःबद्दल म्हणतात तसे "रित्यामापे भरे गोणी" अशी स्थिती व्हायला हवी. गोणी=भाव, माप=मन. मन जेवढे साधे अन् सरळ तेवढे चांगले. तिथे अहंकारादी विकार जेवढे जास्त तेवढे वाईट. मनात नाम, नामाचे प्रेम भरेल तेव्हा तर भाव फुलेल. पण ते जर मापच रितं नसेल तर सर्व वरून वाहून जाणार ना. त्यामुळे माप रितं करण्याकडे, विकार कमी करण्याकडे जाणिवपूर्वक लक्ष द्यायला हवे अन् सोबत नाम घ्यायला हवे. नामामुळे मन पवित्र, शांत, प्रसन्न होते; स्वभावात बदल होत जातो तो असा.
लहान मूल सगळ्यांना आवडते. का? कारण विकार, वासना मुळात सुप्त आहेत. त्यामुळे मन अजून निर्मळ आहे. मग ज्याचे मन असे निर्मळ होत गेले त्याचा संग आवडणार नाही का? :)
या दोन्ही गोष्टी श्रीतुकाराम महाराजांच्याच आहेत किंवा नाहीत हे मला माहित नाही. पण असावयास हरकत नसावी! :)
स्वगतः राघवा, पुनःप्रतिसादाचा दोष न लगो म्हणजे झाले!
राघव
- Log in or register to post comments