अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आयचा घो! - २
💬 प्रतिसाद
(10)
अ
अरुण मनोहर
Fri, 05/07/2010 - 12:36
नवीन
मानसशास्त्रात ऑटोसजेशन म्हणून एक प्रकार असतो. आपणच आपल्याला एखादी सुचना करून ठेवायची, व बाह्य मनात ती विसरून जायची. (म्हणजे त्याचा नंतर काहीही विचार करयचा नाही, ते होण्यासाठी मुद्दाम काही प्रयत्न करायचा नाही).
योग्य तो परिणाम हमखास एकना एक दिवस दिसतो.
पहा करून.
तावित हे एकप्रकारचे ऑटोसजेशनचेच साधन आहे. हा तावित मी बांधला आहे. नक्की मी सगळ्या संकटांमधून तरणार. किंवा प्रसाद घेऊन निघालो आहे, नक्कीच सगळे चांगले होणार.
ही स्वत्ळ्चीच शक्ती स्वत्: साठी काम करत असते. ह्यात कोणतीच अंधश्रद्धा नाही. पण खरोखर आंधळेपणानेच विश्वास ठेवून केले तरच परिणाम दिसतो. म्हणजे दगडातला देव पावतो. अन्यथा टाईम पास.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Fri, 05/07/2010 - 12:43
नवीन
आंधळा विश्वास आणि अंधश्रद्धा यात नेमका फरक काय?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Fri, 05/07/2010 - 12:54
नवीन
माझे ते वाक्य ऑटोसजेशन च्या संदर्भात होते. ऑटोसजेशन जर परिणामकारक करायचे असेल तर त्यावर पूर्ण, आणि एकही प्रश्न न करता विश्वास हवा.
त्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणा किंवा आणखी काही.
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 05/07/2010 - 17:33
नवीन
आंधळा विश्वास आणि अंधश्रद्धा यात नेमका फरक काय?
मला वाटते, अंधश्रद्धा ही देव-धर्म आणि त्यासंदर्भात बुवाबाजी करणार्यांवर असते. बहुतांशी तशी श्रद्धा बहुतेक करून "निर्बुद्ध, मद्दड" जनता ठेवते.
आंधळा विश्वास हा मला वाटते अशा अंधश्रद्धेवर टिका करणार्या आणि त्यासाठी विज्ञानाचे (कसेही) संदर्भ दाखवणार्यांना (आक्रस्ताळी) पाठींबा देणार्या तथाकथीत बुद्धीवाद्यांच्या प्रतिसादातून दिसतो...
श्रद्धा अथवा विश्वास काही का असेना जर काही आंधळे असले तर तसा ठेवणारे आंधळेच...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
- Log in or register to post comments
स
स्मृती
Sat, 05/08/2010 - 15:51
नवीन
निर्बुद्ध.. मद्दड... वाचून खरंच हसू आलं. .. असो.
मला वाटतं की कमकुवत मनाचे लोक साधारणतः अंधश्रद्धाळू असतात.. ज्यांना काहीही करताना कुठल्यातरी प्रकारे नैतिक पाठिंबा लागतो.. म्हणजे आपण करतोय ते योग्य आहे यावर ज्यांचा विश्वास नसतो असे हे लोक असतात बहुधा..
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 05/07/2010 - 12:54
नवीन
या धाग्याला योग्य जागी मारायचे ठरवले होते.
नितिन थत्ते
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Fri, 05/07/2010 - 13:21
नवीन
का हो? एव्हढे का रागावलात?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
- Log in or register to post comments
अ
अरुंधती
Fri, 05/07/2010 - 17:09
नवीन
प्लासिबो इफेक्टसंदर्भात वैद्यकेतर क्षेत्रांमध्ये झालेल्या संशोधनात अजून एक भर : मार्केटिंग व प्लासिबो इफेक्ट : http://www.neurosciencemarketing.com/blog/articles/marketing-and-the-placebo-effect.htm
माहिती खूपच रोचक वाटली! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
- Log in or register to post comments
ड
डॉ.श्रीराम दिवटे
Sat, 05/08/2010 - 06:23
नवीन
डॉक्टर जेव्हा प्लासिबो म्हणून एखादे औषध देतात तेव्हा रूग्ण विश्वास ठेऊन ते ग्रहण करतो. इथे अंधश्रध्देचा संबंध येतो कुठे???
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Sat, 05/08/2010 - 09:54
नवीन
चर्चेच्या सोयी साठी अंधश्रद्धेची आणि विश्वासाची व्याख्या कराल का डॉक्टर साहेब?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
- Log in or register to post comments