कलि...
💬 प्रतिसाद
(8)
व
वेताळ
Fri, 05/07/2010 - 09:25
नवीन
कलि हा विष्णुचा अवतार मानला जातो.
उगाच घोड्याची शेपुट गाढवाला जोडु नका.
वेताळ
- Log in or register to post comments
अ
अमोल नागपूरकर
Fri, 05/07/2010 - 10:09
नवीन
कल्की हा विष्णुचा दहावा अवतार मानला गेला आहे, कली नव्हे. कली तर अधर्म आणि अनाचाराचे प्रतीक आहे.
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Fri, 05/07/2010 - 10:10
नवीन
उगाच घोड्याची शेपुट गाढवाला जोडु नका.>>>>
माणुस जेव्हा वाईट वागतो तेव्हा त्याच्या अंगात कलि शिरला असे म्हणण्याची पद्धत आहे. आजचे युग दिवसेंदिवस विनाशाच्या, अधर्माच्या मार्गावर चालते आहे म्हणुन याला कलियुग म्हणले जाते. त्या पार्श्वभुमीवर मी कलि हा शब्द वापरला आहे. कलि हा शब्द 'कसाब' साठी नव्हे तर माणसाच्या मनात असणार्या 'कसाब' वृत्तीवर आहे.
बाय द वे माझ्या माहितीप्रमाणे विष्णुचा अवतार कल्कि आहे , कलियुगात मानवाची रक्षा करण्यासाठी भगवान विष्णू जो अवतार घेतील तो कल्की असेल.
< की कलिलाच कल्कि म्हणतात. सुज्ञ मिपाकर सांगतीलच.
Hindus believe that human civilization degenerates spiritually during the Kali Yuga,[5] which is referred to as the Dark Age because in it people are as far removed as possible from God. Hinduism often symbolically represents morality (dharma) as a bull. In Satya Yuga, the first stage of development, the bull has four legs, but in each age morality is reduced by one quarter. By the age of Kali, morality is reduced to only a quarter of that of the golden age, so that the bull of Dharma has only one leg.[6][7]
Kali Yuga is associated with the apocalyptic demon Kali, not to be confused with the goddess Kālī (these are unrelated words in the Sanskrit language). The "Kali" of Kali Yuga means "strife, discord, quarrel, or contention."
मुळ दुवा : http://en.wikipedia.org/wiki/Kali_Yuga
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Fri, 05/07/2010 - 12:10
नवीन
माझे दोन पैशांचे मत असे आहे-->
प्रत्येक माणसात सत आणि असत (ईश्वर आणि कलि म्हणा हवे तर) अशा दोन प्रवृत्ती असतात. आपण केलेली सगळी कृत्ये ही ह्या दोन तत्वांच्या मिसळीतून जो एकत्रित परिणाम येतो, त्यानुसार ड्राईव्ह केली जातात. टोकाची उदाहरणे द्यायची तर एखादे कृत्य पुर्णपणे सत भावनेने केले असेल (०% कलि + १००% ईश्वर), किंवा एखादे पूर्ण सैतानी कृत्य असेल. (१००% कलि + ०% ईश्वर).
प्रत्येक माणूस हा वेळोवेळी ० ते १०० च्या स्केल वर एकत्रित परिणाम येणारे कृत्य करीत असतो. त्याची आजवरच्या आयुष्यातील सरासरी जर पाहीली, तर त्यावरून, आजवर तो एक सज्जन किंवा दुर्ज्रन माणुस आहे असे म्हणता येते. पण हे फक्त आजवरच. कारण परिस्थितीमुळे किंवा आत्मनिर्धारामुळे भविष्यात तो वेगळाही बनू शकतो.
>>>क्षणात माणसाचा राक्षस का होतो?<<<
मला नाही असे वाटत. एकदम वेडाचा झटका आल्याचे उदाहरण सोडले, (किंवा टीव्ही सिरीयल मधले किरदार सोडले ;)) , तर स्वभावात बदल असा क्षणात होत नसतो. त्याला एकूण योजनाबद्ध, किंवा दूरगामी परिस्थितीजन्य ईतिहास कारणीभूत होतो.
कसाबच्या बाबतीत कदाचित योजनाबद्ध नियोजन (पक्षी ब्रेनवॉशींग) हे कारण असेल.
- Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी
Fri, 05/07/2010 - 12:50
नवीन
नको करुस.. आणि ह परमेश्वर वगैरे कोणी करत नाही.. करतो तो माणुस..
त्याला आधीपासुनच जगदनियंता व्हायची खाज आहे.. ती प्रत्येकाच्या खाली खाजवत असते.. ज्याच्या नशिबात ताकद \ सत्ता मिळते तो सत्तेचा वापर ही खाज शमवायला करतो..
सत्तेची धुंदी डोळ्यावरअसली काही केले जाते घौरी, मुघल, हबशी, ईंग्रज, पोर्तुगीज.. नाझी सगळीकडे तेच आहे रे..
निसर्गाने दिलेली बुध्दीमत्ता, विचार करण्याची शक्ती हीचा गैरवापर करणे हीच माणसाची सवय आहे.. अनादी काळा पासुनची ..
गोळी घालुन दुसर्याला मारणे सोपे आहे, अरे किती मोठे वीर, राजे, महाराजे होऊन गेले पण मृत्युला कवटाळणारे अगदी थोडे.. आणि हा तर साला धर्मांध, कुणीतरी भडकावुन दिल्याने माणसे मारत सुटलेला सैतान.. हा मरणारच होता त्यालाही माहीती होते, पण उसने अवसान आणुन बसला होता, भारतीय न्याय(??) प्रक्रीयेत किमान 10-12 वर्षे आरामात जगु असे त्याला वाटत असणार.. हा रडला तर विचार करण्यासारखे काय??
so just chill.. let him cry ..he deserve it..
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Fri, 05/07/2010 - 13:09
नवीन
फारच गहन , मोठा विषय आहे.
मान्यवरांचे प्रतिसाद वाचायला आवडतील
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 05/07/2010 - 17:45
नवीन
शिक्षेची अंमल बजावणी व्हायला..खुप वेळ आहे..कसाबचा नंबर ५८ आहे..तो पर्यंत तो सरकारी जावै बनुन बिर्याणी चापत राहिल...मग माझ्याच सारखा एक माणूस...हे विधान पट्ले नाहि..दोन हात व पाय तुमच्या सारखे आहेत म्हणुन तो तुम्च्या सारखा होत नाहि..मनाचा विचार करा ते तुम्च्या इतके सरळ नसुन क्रुर आहे..असे वाटते...
तरीपण चु.भु.दे.घे.
- Log in or register to post comments
ड
डॉ.श्रीराम दिवटे
Sat, 05/08/2010 - 06:14
नवीन
कसाब सारख्या कलि व्रुत्तीच्या लोकांची-खरे तर बदमाशांची फाशीसाठी भलीमोठी रांग लागलेली असतांना कसाबचा फाशी हिसाब होईल्से वाटत नाही...
- Log in or register to post comments