Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिंसात्मक कार्टून्स

श
शिल्पा ब
Wed, 05/12/2010 - 00:46
🗣 25 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5739 वाचन

💬 प्रतिसाद (25)
स
स्वाती२ Wed, 05/12/2010 - 01:43 नवीन
दिड दोन वर्षांच्या मुलांना टी. व्ही. बघू देऊ नये. त्या पेक्षा लेगो ब्लॉक्स, चित्र असलेली पुस्तके द्यावीत.३ वर्षाच्या मुलालाही १ तासापेक्षा जास्त टि.व्ही. बघू देऊ नये. अगदी PBS असले तरीही. माझा मुलगा टीनेजर आहे आणि आमच्या कडे व्हिडिओ गेम्स, केबल वगैरे प्रकार नाहित. स्कूल नाईटला टि.व्ही. नसतो. विकेंडचा टिव्ही देखिल लिमिट मधे.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 05/12/2010 - 03:43 नवीन
इतके विपरीत परीणाम होत नाहित...थोडी मोठी झाली कि त्यातली व्यर्थता पटते..आमची मुले असे प्रो बघायचे..पण आक्रमक झाली नाहित..व्यर्थ भिति बाळगु नका.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 05/12/2010 - 04:25 नवीन
सहमत आहे. याचा टीव्हीशीच संबंध नाही. आम्ही पुस्तकातलीच चित्रे पाहून धनुष्यबाणाने (हिरकुटाच्या) खेळायचो. आणि गदेने (ताक घुसळायच्या रवीने) मांड्या फोडायचो. तलवारीने (फूटपट्टीने)मुंडके छाटायचो. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
श
शिल्पा ब Wed, 05/12/2010 - 04:48 नवीन
धन्यवाद #:S ... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
स
स्पंदना Wed, 05/12/2010 - 05:02 नवीन
:)) :)) :)) थत्ते साहेब!!!! मी सान्गु का शिल्पा तुला लहाण वयात त्यन्ची ऑब्झरवेशन,इमॅजिनेशन,आणि इमिटेशन या गोश्टीन्ची ताकद फार मोठी असते. मी समजु शकते आपल्याला बॅक अप नसल्याने सारा वेळ मुलान्च्यात रहाव लागत आणि टि. व्ही. चा वापर आपण थोडा वेळ आपल्या ला मिळावा म्हणुन करतो. थोडे दिवस काढ आणि आपल्याकडे गिरवायच्या पाट्या मिळतात अजुन त्या आणुन दे! मुल रमतातहि अक्षर ही छान होत,आणि एव्हढ गिरवल तर आई पप्पी देणार वगैरे(खाउ ची आमिष टाळ) करुन बघ. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 05/12/2010 - 06:58 नवीन
~X( दीड वर्षाच्या मुलीला अक्षरे गिरवायला? (मीच येतो डोक्यात काय काय मारायला......) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्पंदना गुरुवार, 05/13/2010 - 04:44 नवीन
अहो थत्ते साहेब गिरवायची म्हणजे काढायची नाहीत काही. अक्षर कोरलेली प्लास्टीक ची एक स्लेट मिळते. मुल खेळ म्हणुन त्यातुन पेन्सील फिरवत रहातात. जरा अजुबाजुच्या भिन्ती खराब होतात पण टी. व्ही. पेक्षा बर. तीचा प्रश्न काही फक्त मुलाशीच सम्बन्धीत नाही आहे. माहेर सासर पासुन लाम्ब आम्ही आधीच एकट्या असतो. आणि लहान मुलान्च्या बरोबर तर घरची काम आणि त्यान्च मनोरन्जन ही दुहेरी कसरत करावी लागते. शेजारीही कुणी तसे मुलान्शी जास्त बोलत नाहीत, जसे भारतात बोलतात्.एकट्यावर या सार या जबाबदार् या म्हणजे अगदी तारेवरची कसरत होते. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sat, 05/15/2010 - 07:01 नवीन
तुमचा प्रॉब्लेम मान्यच आहे हो. "फळाची अपेक्षा न धरता" ;) अक्षरे गिरवायची पाटी द्यायला पण हरकत नाही. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ट
टारझन Wed, 05/12/2010 - 05:55 नवीन
हॅहॅहॅ... आम्ही छोट्या टारझनलसाठी डायरेक्ट डब्लुडब्लुएफ पासुन सुरूवात करू म्हणतोय =)) - (ट्रिपल एच) टारझन
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 05/12/2010 - 07:58 नवीन
=)) =)) =)) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 05/12/2010 - 10:25 नवीन
आयला आत्तापासूनच छोट्या टारझनची तयारी? :) असूदे अर्थात. पुढच्या गोष्टींचा विचार करून आत्तापासून योग्य कृती करणार्‍याला दूरदृष्टी असलेला म्हणतात. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
शानबा५१२ Wed, 05/12/2010 - 07:00 नवीन
GTA 4 किंवा GTA San Andreas खेळुन बघा आणि नंतर Tom And Jerry बघा. ह्याच्याने काय होईल माहीती नाही.(कदाचीत Tom And Jerry बद्दलच मत बदलेल) पण मुलांना ईसापनीतीच्या गोष्टी सांगण चांगल असत. आता तुमची मुलगी तेवढी मोठी आहे का ते कळायला ते माहीती नाही पण आता पासुनच सुरवात करायला हरकत नाही. टी.व्ही हे काही एकच साधन नसत मुलांसाठी त्याच्या बुद्धीला चालना द्यायचे, खुप प्रकार/पद्धती आहेत.त्या वापरुन आपण मुलांना tv पासुन कायमच दुर करु शकतो,आता उदाहरण मागाल तर drawing आणि तत्सम,creativity वाढते. शकुंतला देवी ह्यांचे "make your child maths(?) genius" हे पुस्तक छान आहे(?).मी नाही बघितल पण त्यांची सर्वच पुस्तक छान असतात.
  • Log in or register to post comments
स
सारिका Wed, 05/12/2010 - 07:46 नवीन
Tom And Jerry ? violent ? आहे मला असे वाट्त नाहि :-) तुमची मुलगी लहान असेल त्यामुले तिला समझत नसेल . अविनाश कुलकर्णी च्या reply var सहमत आहे.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 05/12/2010 - 07:57 नवीन
violent म्हणजे ते एकमेकांना मारतात...bomb फोडतात...गोळ्या घालतात..डोक्यावर वस्तू मारतात...इ. violence आहे...लहान मुलांना कळत नाही हे खरे नाही ते...सारखं सांगावं लागतं हे खोट आहे...टीव्ही आहे......माझा अनुभव...आणि माझी मुलगी विचारायची " ते का मारामारी करतायत ?"... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सारिका
न
नाना बेरके Wed, 05/12/2010 - 08:47 नवीन
हॅहॅहॅ... आम्ही छोट्या टारझनलसाठी डायरेक्ट डब्लुडब्लुएफ पासुन सुरूवात करू म्हणतोय - हे मला फाल्फाल आवदलं टालझनअंकल . . चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील. नाना बेरके
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Wed, 05/12/2010 - 08:55 नवीन
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट! शिल्पा, तुझी मुलगी दिवसातून कार्टून किती वेळ पाहाते हेही महत्त्वाचे आहे. माझ्या ओळखीत अशीही काही मुले आहेत जी त्यांना मुभा दिली तर दिवसभर कार्टून्स पाहतात.... अगदी दात घासण्यापासून ते जेवण्यापर्यंत, सर्व वेळेला त्यांना कार्टून्स बघायला हवी असतात. ती त्याच दुनियेत रमतात. त्यांच्या मित्र मैत्रिणींशीही त्याच विषयांवर गप्पा मारतात किंवा त्या कार्टूनवरून कल्पना घेऊन खेळतात. तुझी चिंता अगदी रास्त आहे. त्यामुळे आपली मुले टीव्हीवर नक्की काय बघत आहेत ह्याबद्दल जागरूक राहणे चांगलेच! डोरेमॉन, बॉब द बिल्डर, हाईडी, एल्मोज वर्ल्ड वगैरे कार्टून्स त्यातल्या त्यात बरी! मी असं ऐकलं आहे की चिंटू ही आता कार्टून फिल्म रूपात येत आहे. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 05/12/2010 - 09:32 नवीन
ह्याविषयीचे अभ्यास करून नोंदविलेले मत : माझ्या मुलाच्या शाळेने ( अक्षर नंदन, पुणे ) पालकांसाठी एक सभा आयोजित केली होती. त्यामध्ये पालकांच्या दृष्टीने नेहमीच चिंतेचा वाटणारा हा विषय मांडला होता. त्यासाठी शाळेने एफ्.टी. आय. आय. मध्ये मोठ्या हुद्यावर काम केलेल्या एका रिटायर्ड व्यक्तीला बोलाविले होते. त्याने संपूर्ण महाराष्ट्राचे विभागवार - प. महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण -भाग पाडून, तिथे जाऊन व्यक्तिगत पातळीवर सर्वेक्षण केलेले होते. आणि त्याने त्याचे सादरीकरण ह्या सभेत केले. त्याच्या अभ्यासानुसार लहान मुले टि.व्ही. बघून मुले कुठल्याही गोष्टी शिकत नाहीत, ते जे काही बघत असतात ते अगदी तात्कालीक स्वरुपाचे असते, त्याचा त्यांच्या मनावर फार काही परीणाम होत नाही. (पण हे महाराष्ट्रातले ( पक्षी : भारतातले ) आहे, त्यामुळे अभ्यासलेल्या गटांची मानसिकता हि भारतातल्या मुलांची आहे.) उलट असे समजले जाते कि, मुले आईवडीलांच्याच गोष्टींचे अनुकरण करत असतात. त्यामुळे आपण हिंसक, हट्टी असू तर मुले तशी होतील.
  • Log in or register to post comments
स
सुखदा राव Wed, 05/12/2010 - 14:19 नवीन
टी वी बघनार्या मुलान्चा १ अनुभव आला अलिकडेच. १ मुलगा म्हनाला 'आता मी अतिरेकी होतो. तुम्ही साधी मानस व्हा. आणि मी गोल्या मारल्या की मरा.' हे ऐकुन १ आई बाहेर आली अन म्हनाली ' हे असे खेल खेलन्यापेक्षा आत चला अन कार्टून बघा बर सरळ.' आता बोला.
  • Log in or register to post comments
ब
बारक्या_पहीलवान Wed, 05/12/2010 - 14:28 नवीन
| दीड वर्षाच्या मुलीला अक्षरे गिरवायला? | (मीच येतो डोक्यात काय काय मारायला......) चावले सगळे 'ब' ला.... हॅहॅहॅ... सगळे प्रतिसाद वाचुन हसुन वाट .... सर्वे लेख वाचुन झालेवर पहिले टारझन ची प्रतिक्रेया वाचतो. - तारक्या पहीलेवाच.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 05/12/2010 - 18:50 नवीन
यापेक्षा एक वेगळेच...मी आठवीत होते तेवा चोली के पीछे हे गाणं जोरात होतं....केव्हाही कुठेही वाजत असायचं...आम्ही माझ्या काकाकडे गेलो होतो..त्याचा मुलगा त्यावेळी ४-५ वर्षाचा असेल...टीव्ही वर गाणं लागलं आणि घरात काकू, आई, आम्ही लहान मुलं असल्याने च्यानल बदललं....तेव्हड्यात हे कार्ट माझ्याजवळ आलं आणि विचारलं "ए , चोली के पीछे काय असतं गं ?"...काय सांगणार कपाळ ....सगळ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 05/12/2010 - 21:48 नवीन
थोडीशी हिंसा ही जमलीच पाहीजे. उद्या आपल्या मुलाला कोणी मारायला आलं तर आपल्या मुलानी त्या दुसर्‍या मुलाच्या झिंज्या उपटल्याच पाहीजे. मी लहानपणी सुद्धा बावळट होतेच. एका मुलानी मला खेळण्यातली पिस्तूल दाखवली होती माझी जाम तंतरली होती. :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
C
chipatakhdumdum Fri, 05/14/2010 - 17:19 नवीन
आपल्या मुलाला....आपल्या मुलानी एका मुलानी .. या आणि अशा शुध्धलेखनाच्या चुका कृपया करु नका अशी नम्र विनंती. चांगल लिहीता, पण अशा वेळी दाताखाली खडा येतो आणि मजा जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 05/17/2010 - 05:46 नवीन
"शुध्धलेखनाच्या" या शब्दातही चूक आहे, हा शब्द शुद्धलेखन असा लिहीतात! मराठी संस्थळावर रोमन लिपीतला आयडी पाहून डोळ्यासमोर अंधारी येते आणि वाचता येत नाही. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chipatakhdumdum
भ
भडकमकर मास्तर Wed, 05/12/2010 - 22:19 नवीन
माझी आतेभावंडे (ती दोघे नऊ वर्षे आणि ५ वर्षे वयाची असताना )मे महिन्याच्या सुट्टीत सलग १० तास सर्व प्रकारची कार्टून्स पाहताना पाहिलेली आहेत...आज त्या दिवसाला १३ वर्षे झाली... दोघेही हुशार आहेत , प्रचंड अभ्यासबिभ्यास करतात आणि भरपूर मार्क पाडतात..आणि हिंसक बनली नाहीत ... ;) अवांतर : या धाग्याच्या प्रत्येक प्रतिसादातून इतके विविध निष्कर्ष निघताना पाहून मज्जा वाटली... अतिअवांतर : माझ्या प्रतिसादाचा निष्कर्ष : शालांत परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळवून हुशार बिशार असा शिक्का बसवून घेण्यासाठी बालपणी किमान दहा तास रोज कार्टून नेटवर्क पाहिले पाहिजे... _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 05/15/2010 - 06:49 नवीन
कार्टून चॅनेल मुळे मुलसुद्धा मारामारी/आरडाओरडा करतात हे फारसे खरं नाहीये .. पण टि. व्ही . , व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर याच्या (अतिरेकी) वापरामुळे अनेक दुष्परिणाम होतात. हे लहान मुलांप्रमाणे मोठ्या व्यक्तिंना सुद्धा लागू होते.. चित्रकला, वाचन, पाठांतर, मैदानी खेळ इ. चांगले छंद जोपासले जात नाहीत. कुटंबातील व्यक्तींचा एकमेकांशी संवाद कमी होतो, किंवा अजिबात होत नाही. सतत टि.व्हि. पाहिल्याने मुलांच्या आभ्यासावर आणि आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. (ह्ल्लीच्या सांस - बहू सिरियल्स मुळे घरातील भांडणे तसेच कट कारस्थाने आणि विवाहबाह्य संबध इ. ला प्रोत्साहन मिळतं असं तुम्हाला वाटतं का ? )
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा