Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो

आ
आवशीचो घोव्
Sun, 05/16/2010 - 07:07
🗣 81 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
17265 वाचन

💬 प्रतिसाद (81)
आ
आशु जोग गुरुवार, 02/14/2013 - 18:54 नवीन
खरे आहे हे अरबी लोक जगभरात आतंक माजवीत असतात पण त्यात सर्वात जास्त तेच स्वतः मरतात आज पाकीस्तानातही तेच चालू आहे या लोकांना आपला शेजारी आपला वाटत नाही पण जगात दुसरीकडचा कुणी आपल्या पंथाचा म्हणून जवळ वाटतो -- ('हे अरबी लोक' म्हटल्याने कुणा भारतीयांच्या भावना दुखावल्या असतील तर आमचा नाइलाज आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
न
नानबा गुरुवार, 02/14/2013 - 10:50 नवीन
असले बलीवर्दनेत्रभञ्जक शब्दसंपुट पाहून सकलशब्दकुंतलत्वग्विच्छेदकचमूत ही अभिनवप्रतिभांकित भर दिसल्याचे निजचक्षूंस समाधानातिशय जाहला.
४-५ येळा पुन्ना पुन्ना वाचूनबी यकदाही बरोबर वाचता आलं न्हाई. लिवलत कसं वो??
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 02/14/2013 - 14:56 नवीन
जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो
असेलही. काय म्हाईत नाय बॉ ;) पण जन्माला येणारा प्रत्येक हिंदू हा मनुष्य असतो, हे वाक्य त्रिकालाबाधित सत्य आहे की नाही :)
  • Log in or register to post comments
म
मनोरा गुरुवार, 02/14/2013 - 15:44 नवीन
द ग्रेट विनायक दामोदर सावरकर यांची सगळी पुस्तकं जर विकत घेउन मन लावुन वाचली तर थोडासा "हिन्दू" म्हणजे कोण ह्या प्रश्ना च्या उत्तरा वर प्रकाश पडेल असा मला वाटते. सुदैवाने ती व्यक्ती मराठी होती महणुन त्यांचे लिखाण हे मराठीतच आहे. म्हणजे कमीत कमी मराठी माणसाला समजन्यात अडचण येणार नाही असे वाटते. त्या पाप बिचार्या एव्ह्ढ्या विद्वान महान मानसाने आपले पुर्न आयुष्य च वेचले हो फक्त ह्या कामासाठी. " सागरा प्राण तळमळला" फार छान कवीता आहे त्यांची. " माझी जन्मठेप" वाचले तर आत्महत्या कुणी करनारच नाही असे कुठे तरी वाचले आहे मी. मी वाचलेय त्यांचे माझी जन्मठेप व भारतीय ईतिहासातील सहा सोनेरी पाने. माझ्या डोक्यात लख्ख उजेड पडला. मला पडलेले प्रश्न- १) मुसलमानात सर्कमसीझन काच करतात? साधी गोष्ट आहे. जीथे गरज आहे तीथे निसर्गाने केस दिलेत, छिद्रं दिलीत. सगळं काही गरजेनुसार दिले आहे. जर जी त्वचा कापुन टाकन्यात येते आणी त्याची गरजच नसती तर ती निसर्गाने दिलिच नसती.मुसलमानातील फीमेल सर्कमसीझन तर फारच भयंकर. ज्यु मधे मुलगा जन्मल्याच्या सातव्या दिवसी त्याचे सर्कमसीझन करतात. फार वाईट. हो. जर मुलगा जन्माला आला. त्याला लघवी होत नसेल असे कळले. फोरस्कीन टाईट असल्यामुळे. तर नाईलाजाने त्याचा जीव वाचावा म्हनुन ती थोडीशी कापुन लघवीचा अमार्ग मोकळा करुन देने ही गोष्ट मला कळते.तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, जर मुलाला असा त्रास आहे कळला की आजचे डॉक्टर्स ताबडतोब हे ऑपरेशन करतात.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 02/14/2013 - 18:22 नवीन
" माझी जन्मठेप" वाचले तर आत्महत्या कुणी करनारच नाही असे कुठे तरी वाचले आहे मी.
हे जे काही कुठे वाचले आहे ते चूक असावे. स्वतः सावरकरांनीच प्रायोपवेशन करुण प्राणत्याग केला होता. त्यामुळे वरील दावा खरा मानला तर सावरकरांनी 'माझी जन्मठेप' वाचले नसावे असे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनोरा
व
विकास गुरुवार, 02/14/2013 - 19:40 नवीन
स्वतः सावरकरांनीच प्रायोपवेशन करुण प्राणत्याग केला होता. त्यामुळे वरील दावा खरा मानला तर सावरकरांनी 'माझी जन्मठेप' वाचले नसावे असे होईल.
प्रायोपवेशन म्हणजे आत्महत्या नाही हे आपणास माहीत नाही असे वाटत नाही. तरी देखील जसे सध्याच्या काळात इच्छामरण अथवा स्वेच्छामरण हा एक शब्द कायद्याने प्रस्थापित करायचा प्रयत्न होत आहे त्याच पठडीतले प्रायोपवेशन आहे. त्यात देखील सावरकरांनी "ही (त्यावेळेस नुसतेच planned असलेले प्रायोपवेशन म्हणजे) आत्महत्या का नाही" याबद्दल देखील आधी लेख लिहून प्रकाशीत केला होता. विनोबांनी जेंव्हा असेच प्रायोपवेशन केले तेंव्हा काहीजण कोर्टात ते आत्महत्या करत आहेत म्हणून तक्रार घेऊन गेले (आत्महत्या करणे बेकायदेशीर आहे), अर्थात कोर्टाने देखील ती आत्महत्या मानली नव्हती. इंदीराजी केवळ एकदा त्यांना विनंती करू शकल्या होत्या (की पुनर्विचार करा म्हणून). असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ध
धन्या Fri, 02/15/2013 - 19:42 नवीन
विकास, आपण किंवा आजानुकर्ण कुणीतरी प्रायोपवेशन म्हणजे काय आणि ते आत्महत्येपेक्षा वेगळं कसं आहे यावर थोडा प्रकाश टाकू शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 02/15/2013 - 20:53 नवीन
प्रायोपवेशन म्हणजे जीवनात कृतार्थता आली आणि आता काही उरले नाही (अवघा रंग एक झाला) अशी भावना आली की जीवन संपवायची पद्धत आहे. त्याउलट आत्महत्या ही आयुष्यात आलेल्या निराशेतून केलेली तात्काळ घडणारी कृती आहे. आत्महत्येत माणूस पाण्यात बुडेल, विष घेईल, गळफास लावेल, कड्यावरून उडी मारेल - थोडक्यात आत्महिंसा करेल. त्यात स्वतःस आणि इतरांना धक्का असतो. पण प्रायोपवेशन ही जीवन पायरी पायरीने संपवायची पद्धत आहे. त्यात त्यामुळे मनुष्यास (काही कारणाने) जमले नाही तर पुर्नविचारास वाव असतो. तसेच नातेवाईक-सहकारी-फॉलोअर्स ना मनाची आणि इतर कसली असेल तर ती तयारी करायला वाव असतो. सावरकरांनी १ फेब्रुवारीस प्रायोपवेशन करत आहे म्हणून जाहीर केले आणि २६ फेब्रुवारीस त्यांचे देहावसन झाले. विनोबांना पण मला वाटते साधारण आठवडाभर वेळ लागला. आत्महत्या इतक्या वेळ चालत नाही. मला वाटते पार्श्वनाथ जैन या तिर्थंकराने देखील प्रायोपवेशन केले होते. ज्याचा प्रभाव धर्मानंद कोसंबींवर होता. एका (शेवटच्या) क्षणी त्यांना देखील प्रायोपवेशन करावेसे वाटले आणि त्यांनी तसे ते चालू केले. पण गांधीजींनी त्यांना तसे न करायची विनंती केली, जी धर्मानंदांनी ऐकली. पण नंतर काही दिवसांमधे/महीन्यांत त्यांना नैसर्गिक मृत्यू आला. प्रायोपवेशनात हळू हळू अन्नपाणी वर्ज्य केले जाते आणि देहाच्या हालचाली कमी करत आणल्या जातात. मला वाटते, ते येरागबाळ्याचे काम नाही. कारण त्यातून जे साध्य करायचे आहे ते म्हणजे मृत्यू कधी येईल याची कुणालाच कल्पना असू शकत नाही. विनोबांच्या वेळेस वाचल्याचे अंधुकसे आठवते की जेंव्हा व्यक्ती प्रायोपवेशन करू लागते तेंव्हा त्या व्यक्तीस कमीत कमी त्रास होण्यासाठी बाहेरून काय उपचार केले जातात वगैरे. पण नीटसे आठवत नाही. जन्मापासून कॅलिफोर्नियातील सद्गुरू सिवया सुब्रम्हण्यम स्वामी यांना कॅन्सर झाला होता. त्यांच्या जेंव्हा लक्षात आले की त्यावर काही उपाय नाही, तेंव्हा त्यांनी फक्त पेनमेडीकेशन चालू ठेवले आणि बाकी प्रायोपवेशन करून देहत्याग केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
श
श्रीरंग_जोशी Fri, 02/15/2013 - 21:02 नवीन
फार पूर्वी एक उदाहरण ऐकले होते. कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे समाजसेवक (त्यांचे आडनाव बहुधा चांदुरकर) यांनीही असाच प्राणत्याग केला. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी केवळ एका द्राक्षाच्या रसाचे ते सेवन करायचे अन अखेरच्या काही दिवसात केवळ पाणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 02/15/2013 - 21:38 नवीन
कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे समाजसेवक (त्यांचे आडनाव बहुधा चांदुरकर) यांनीही असाच प्राणत्याग केला.
कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे हे मला देखील आठवत आहे, पण नाव आठवत नाही. त्या वेळेस वाचल्याचे आठवते त्याप्रमाणे बहुतेक त्यांचे नाव देखील विनायक असावे. कारण तीन विनायकांनी (सावरकर, विनोबा आणि हे समाजसेवक) प्रायोपवेशन केले असे म्हणले गेल्याचे पुसटसे आठवत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीगुरुजी Sat, 02/16/2013 - 09:29 नवीन
जैन धर्मामध्ये असणारे "संथारा" व्रत हे प्रायोपवेशनच आहे. दरवर्षी अनेक जैन स्त्रीपुरूष हे व्रत करून जीवन संपवितात. या व्रताचा अंगिकार करणारे अन्नपाण्याचा त्याग करून प्राणत्याग करतात. "संथारा" व्रत घेणे हे जैनांमध्ये अत्यंत उच्च त्याग समजला जातो. हे व्रत सुरू केल्यावर या व्यक्तिला सर्व नातेवाईक, सगेसंबंधी भेटून जातात व प्राणत्यागानंतर मांडी घातलेल्या अवस्थेत अंत्ययात्रा काढली जाते. प्रायोपवेशन म्हणजे आत्महत्या नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
मदनबाण गुरुवार, 02/14/2013 - 15:48 नवीन
माणसा माणसा कधी होशील माणुस ही बहिणाबाईंची ओळ उगाच आठवली. बाकी चालु द्या.
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 02/14/2013 - 15:56 नवीन
धागा वर आणण्याची आयडिया असणार्‍यांनी तो खाली कसा न्यावा याचेही मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 02/14/2013 - 17:53 नवीन
चांगली कल्पना आहे! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
प
प्यारे१ गुरुवार, 02/14/2013 - 15:59 नवीन
<<<जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो का? शक्यता नाकारता येत नाही. - थोर द्रष्टे नाना चेंगट
  • Log in or register to post comments
श
श्रिया Fri, 02/15/2013 - 17:10 नवीन
"हिंदू" हा शब्द संस्कृत आहे का? काही जणांच्या मते हा शब्द अरबांकडून आला आहे,पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द त्यांच्याकडून आलेला नाही.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 02/15/2013 - 17:19 नवीन
"हिंदू" हा शब्द संस्कृत आहे का? काही जणांच्या मते हा शब्द अरबांकडून आला आहे,पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द त्यांच्याकडून आलेला नाही.
सावरकरांच्या मते तो अरबांकडून आलेला नाही त्या आधी देखील वापरला गेलेला आहे, पण संस्कृतमधून आलेला आहे असे त्यांचे म्हणणे नसावे. त्यांच्या मते देशाला सप्तसिंधू असे म्हणले जायचे. बहुतांशी इतर विद्वान देखील सिंधू नदीच्या तिरावरील लोकांना संबोधताना सिंधू नदीच्या संदर्भानेच बोलायचे. पण पर्शिअन्स लोकांच्या भाषेत "स" चा उच्चार "ह" केला जात असल्याने आणि त्यांच्याशी जुना संबंध असल्याने, त्यांनी म्हणलेले "हिंदू" हे जगातील इतर म्हणू लागले. तेच नंतरच्या काळात सिंधूचे इंडस आणि त्यावरून इंडीया असे झाले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया
श
श्रिया Fri, 02/15/2013 - 17:32 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
य
यसवायजी Fri, 02/15/2013 - 17:35 नवीन
धर्माला अफूची गोळी मानले, तर मनुष्य जन्माला येतो तेंव्हा निर्व्यसनी असतो.. काही जण, मुल जन्मलं की लगेच त्याला 'हिंदु' असं लेबल लावतात.. काही जण थोड्या वर्षांनी काही दुसरे लेबल लावतात.. पण शेवटी ते फक्त 'लेबल'च असतं..
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 02/15/2013 - 17:48 नवीन
काहीजणांसाठी धर्म ही अफूची गोळी आहे. तर काही जणांसाठी अफू हाच धर्म आहे. धर्माला अफूची गोळी म्हणणार्‍या कम्युनिस्टांसाठी कम्युनिझम पण अफूच ठरला - धर्मापेक्षाही वाईट, ज्यामुळे ७० वर्षात होत्याचे नव्हते झाले. कम्युनिस्ट सोव्हीएट केजीबीमधील ऑफिसर (नंतरच्या काळात प्रमुख) आणि रशियन अध्यक्ष व्लादीमिर पुतीन सकट सगळे परत धर्माच्या लेबल मागे लागले... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
अ
अधिराज Fri, 02/15/2013 - 18:10 नवीन
मित्राबरोबर बोलता बोलता अचानक विषय निघाला असता त्याने एक असे विधान केले की,
कंच्या इशयावर, काय आन का बोलत व्हता, ते कळू द्या, म्हंजे उत्तर द्यायाला सोपं जाइल. परवा आमचा पण मित्र बोलता बोलता म्हणाला कि, "जन्माला आल्यावर प्रत्येक मनुष्य हा आधी रडतो."
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Fri, 02/15/2013 - 22:35 नवीन
हिंदू हा धर्म नसून एक जीवनशैली आहे असे विवेकानंद म्हणाले होते. ह्यावर ह्या निमित्ताने थोडा प्रकाश टाकला गेला तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 02/16/2013 - 11:47 नवीन
" हिंदू" ही जीवनशैली आहे हेच खरे आहे.त्यात "प्रमाणा"चा बलात्कार करणारा धर्मग्रंथ नाही नास्तिक माणसाला तेवढाच मान आहे जेवढा आस्तिकाला. परमतत्वाला व्यक्त वा अव्यक्त स्वरूपात व आपल्या स्वता: च्या पद्धतीने पूजावयाची सोय व स्वातंत्र्य आहे. परधर्माच्या देवालाही पूजायाला परवानगी आहे.त्यांच्या धार्मिक स्थळाप्रत जाण्यास मज्जाव नाही व जाउन आला तर अपवित्र झाला असे मानण्याची मानसिकता नाही. गर्व से कहो हम हिंदू है याचा खरा गर्व या मुक्तपणापायी वाटला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
भ
भाग्यश्री कुलकर्णी Sun, 12/29/2013 - 15:28 नवीन
मला वाटते की डॉ.रवी बापट यांच्या आईने पण प्रायोपवेशन केले होते ना.
  • Log in or register to post comments
ब
बाळराजे Sun, 12/29/2013 - 19:43 नवीन
"धर्मांतराचे संस्कार" हा शब्दप्रयोग चुकीचा वाटतो. एखादा मनुष्य जन्माला आला की त्याच्यावर जे संस्कार केले जातात ते त्याच्या माता-पित्याच्या भक्तिचा भाग असतात, त्याला धर्मांतर म्ह्णणे कितपत योग्य आहे? धर्मांतर हे जाणून बुजून वा मारून केले जाते - एकात स्वेच्छा असते तर दुसर्‍यात सक्ती - समज दोन्हींमध्ये असतो. बादवे माझ्या मते, जन्माला येणारा प्रत्येक भारतीय हा हिंदू असतो आणि हिंदू ही एक जीवनशैली आहे - संस्कृती आहे.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Mon, 12/30/2013 - 10:54 नवीन
ह्याला धर्म म्हणुन न पाहाता एक जीवनशैलि म्हणुन बघावे. असे माझे व्यैयक्तीक मत आहे. कुठेतरि वाचलेले आठवते कि "हिन्दु असायला माणुस हिन्दु म्हणुनच जन्मला यायला हवा" कारण बाकि कुठल्याहि धर्मातुन धर्मांतर करुन हिन्दु होता येत नाहि, तशी कुठलीहि व्यवस्था / विधि / पुजा ह्या जिवनशैलित नाहि. कारण हि जिवनशैलि अस्तित्वात आलि तेव्हा असा कुठलाहि धर्म अस्तित्वात नव्ह्ता कि ज्याचा धर्मांतराच्या आधाराने अंगीकार करता यावा. नंतर नंतर जसे बाकि धर्म प्रस्थापित झालेत तसे तसे लोक धर्मांतर करुन नविन धर्म स्वीकारु लागले.
  • Log in or register to post comments
म
म्हैस Mon, 12/30/2013 - 11:10 नवीन
हिंदू हा धर्म नसून एक जीवनशैली आहे असे विवेकानंद म्हणाले होते.
सहमत आहे. पुढे जेव्हा ह्या बेसिक जीवन प्रणाली शी फारकत घेऊन वेगवेगळ्या जीवन प्रणाली स्वीकारल्या गेल्या तेव्हा त्यांना वेगवेगळी नावं दिली. इस्लाम, खिश्चन वगेरे . आपल्याही जीवन प्रणालीला हिंदू नाव देण्यात आलं. त्यापूर्वी हिंदू नावाचा असा कुठला धर्म नवता. हि जीवन प्रणाली लाखो वर्षांपासून चालत आलेली असल्यामुळे हिंदू धर्माला सनातन म्हणलं जातं.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 12/30/2013 - 11:28 नवीन
हि जीवन प्रणाली लाखो वर्षांपासून चालत आलेली असल्यामुळे हिंदू धर्माला सनातन म्हणलं जातं.
आफ्रिकेतली माकडेही हिंदूच होती हा शोध या निमित्ताने प्रथमच वाचायला मिळाला आणि हिंदू धर्माच्या अभिमानाने डोळे पाण्याने अगदी डबडबून आले. गर्व से कहो हम हिंदू है!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस
थ
थॉर माणूस Mon, 12/30/2013 - 11:43 नवीन
होमो सेपिअन सेपिअन्स जवळपास २ लाख वर्षांपूर्वीच अस्तित्वात आल्यामुळे दावा अगदीच फोल नसावा. आफ्रिकेतले होमो सेपिअन सेपिअन सुद्धा हिंदूच होते असं म्हणा हवंतर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 12/30/2013 - 11:52 नवीन
अवश्य! अतिअवांतरः तुमचे नावदेखील इंद्रावरूनच घेतले आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
ब
बाबा पाटील Mon, 12/30/2013 - 16:19 नवीन
मी सध्या कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी सध्या जिल्हाधिकारी व मामलेदार कचरीचे उंबरे झिजवतोय्,त्यात मला माझ्या खानदानाची नक्की जात कोणती हेच कळत नाहीये. १८७० ते १९०० मराठा देशमुख,१९०० ते १९३० कुणबी,१९३० ते १९५५ हिंदु आणी १९५५ पासुन मराठा. या सगळ्यामुळे कुनबी प्रमाणपत्र काही मिळत नाही.मला हेच कळत नाही माझी जात अथवा पोटजात नक्की कोन आणी कश्यासाठी बदलत होत.त्यामुळे मी नक्की कोन ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा