आयुष्याचा 'अर्धा' प्याला..
💬 प्रतिसाद
(11)
ड
डॉ.श्रीराम दिवटे
Tue, 05/18/2010 - 16:40
नवीन
किँवा अंथरुण पाहून पाय पसरण्यापेक्षा अंथरुणाची लांबी वाढविण्यासाठीही प्रयत्न करावेत.?
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 05/18/2010 - 16:57
नवीन
लेख छान! सद्यपरिस्थितीमध्ये नक्की काय घडते आणि काय करायला हवे ह्याचे अत्यंत साधेसुधे पण दुर्लक्षीत गणित मांडलंय.
पण मी ओढला गेलो ते तुमच्या ह्या प्रतिसादामुळे.
खरंच, खुपदा हे वाक्य ऐकलंय. विशेषतः परदेशी मार्केटिंग कंपन्यांकडुन...
पण खरंच अंथरुण मोठं होत जातं का? दुर्दैवानं आपले पायही लांब होत जातात.
मला वाटतं, हल्ली 'अंथरुण पाहुन पाय पसरावे' हे अमेरिकेची आर्थिक घडी विस्कटल्यानंतर फी घेऊन आर्थिक सल्लागार तिथे शिकवायला लागले.
ह्या संदर्भातील एक घटना:
माझ्या एका नातेवाईकाच्या हापिसात "How to be Rich" की "How to grow your balance" असं काहीसं व्याख्यान ठेवलं होतं. हे आमचे नातेवाईक गेले बिचारे चार पै आणखी गाठीला लावता येतील म्हणून.. कसलं काय? तुमच्या आमच्या आज्या-पणज्यापासुन जे सांगतात, "उधळमाध्ळ करु नका, किमान रक्कम शिल्लक टाका, त्या रकमेला हात लाऊ नका..." वगैरे वगैरे ऐकवलं आणि पुढच्या कन्सल्टिंगसाठीच्या (सशुल्क) सेमिनारची जाहिरातही केली..
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तिथले भारतीय लोक सोडुन सगळे ह्या गोष्टीने भारले गेले होते म्हणॅ..ताबडतोब त्यांनी पुढच्या सेमिनारसाठी पैसे भरुन टाकले. =))
तात्पर्य काय? दुसर्याची बायको सुंदर दिसत असली म्हणुन आपलीही बायको तशी व्हावी अशी बळजबरी करु नये. कधी काय अंगलट येईल सांगता येत नाही. :)
- Log in or register to post comments
S
sagarparadkar
Wed, 05/19/2010 - 14:44
नवीन
>> - किँवा अंथरुण पाहून पाय पसरण्यापेक्षा अंथरुणाची लांबी वाढविण्यासाठीही प्रयत्न करावेत.?
हे एकदम पटलं ... अंगभूत क्षमतांचा अधिकाधिक विकास करत जाणे, सतत काहितरी नवीन शिकत राहणे, कोणत्या कौशल्यांना कामाच्या जागी अधिक मागणी आहे ते हेरून त्याप्रमाणे ती ती कौशल्ये स्वतःमधे विकसित करत जाणे, अशा काहि उपायांमुळे अंथरुणाची लांबी वाढवता येते असे मला वाटते. किमानपक्षी आपल्याला पुरून थोडेसे जास्त उरेल एव्ह्ढे लांब अंथरूण असायलाच हवे ...
वरील सर्व प्रयत्न करत असताना एक निखळ मनःशांती लाभतेच, शिवाय कार्यव्यग्र रहिल्यामुळे निराशा, दुसर्याशी तुलना करायला वेळच मिळत नाही
- Log in or register to post comments
ड
डॉ.श्रीराम दिवटे
Tue, 05/18/2010 - 18:09
नवीन
तुमचे मत अगदी योग्य आहे. आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे काटकसरीचे अनेक मार्ग पिढ्यानुपिढ्या चालत आले होते. परंतु दुर्दैवाने आजकाल मोठं कुटुंब किँवा खटल्याचं घर केवळ वाचावयास मिळतं. अशावेळी हेच ज्ञान त्रिकोणी कुटुंबाला खूप नवं अन् संशोधित केल्यासारखं वाटतं व ते जुनेच सोने नव्या पँकीँगने सजवून प्लँटीनमच्या भावात खपतं..
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 05/18/2010 - 18:28
नवीन
अगदी लाखमोलाचं बोललात डॉक्टर तुम्ही.
अग्गदी हिच्च परिस्थिती दिसते जिकडेतिकडे हल्ली.
- Log in or register to post comments
अ
अरुंधती
Tue, 05/18/2010 - 18:20
नवीन
समाधान हे ''मानण्यात'' असतं.... काहीजण अल्पसंतुष्ट असतात, काहींना कितीही द्या, कितीही उपभोगा - ते अपुरेच पडते! माझ्या मते ही आपापली मनोवृत्ती आहे.
माझ्या ओळखीत अनेक मित्र-मैत्रिणी आहेत, ज्यांना भरपूर पगार आहे आणि त्याबरोबर येणार्या वाढीव जबाबदार्या, व्यक्तिगत जीवनासाठी अपुरा वेळ हेही आहे. पण तरीही ते प्रगती न थांबविता वेगवेगळ्या मार्गांनी सुख शोधत राहतात. कोणी बाहेरगावी फिरायला जाते, कोणी करमणुकीच्या कार्यक्रमांना जरूर हजेरी लावते, कोणी मनसोक्त खादडते, कोणी भरपूर मैदानी खेळ खेळते, कोणी ध्यान करते, कोणी पार्ट्या करते.... त्यातील काहींना आपल्याला कशात आनंद मिळतो हे कळालंय, आणि ते लोक आपला आनंद आसुसून मिळवत राहतात. त्यातील काहीजण समाधानी आहेत, काही नाहीत. कारण वृत्ती.
आणि पैसे कमी मिळणारे दोस्तही सतत आर्थिक विवंचनेत असताना मी पाहिलंय. हप्त्यांवर वस्तू विकत घेतात. हप्ते, घरखर्च, औषधे, अतिरिक्त खर्च झाले की हाताशी काहीही पैसा उरत नाही म्हणून चिडचिड करणारे. स्वस्त गोष्टी विकत घ्यायला लागतात म्हणून नाराज असणारे. तडजोड करावी लागते म्हणून नाखूष असलेले. पुन्हा कारण, वृत्ती.
आणि असाच कमी पगार असला तरी समजुतीने, काटकसरीने राहणारी समाधानी जोडपीही पाहिली आहेत मी. पुन्हा तेच कारण, आपली वृत्ती.
ती आपली आपण ठरवायची! असमाधान हे आजूबाजूच्या गोष्टींमध्ये नसते तर मनामध्ये असते. मनाला प्रसन्न ठेवले, निरामय ठेवले, पूर्वग्रहमुक्त ठेवले तर सर्वच असंतोष संपुष्टात येईल.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 05/18/2010 - 18:34
नवीन
अगदी उत्तम प्रतिसाद!
आणि हे समाधान मानणारे लोकं श्रीमंत, गरीब, मध्यमवर्गीय सगळ्याच स्तरांमधे आढळतील.
(समाधानी) अदिती
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 05/18/2010 - 18:36
नवीन
अतिशय महत्वाचा विषय तुम्ही चर्चे साठी काढला आहे.
सगळी कडे जगात( हल्लि अमेरिका म्हणजे जग असा एक गैर समज आहे)बहुतेक लोक त्यान्ची पुर्वीची सन्स्क्रुती टिकवुन ठेवण्याचा अट्टाहास करताना मी पहाते.
फक्त आपल्यालाच पुर्वजान्च सार मोडित काढावस वाटत. पण सार या टक्क्या टोणप्यान्ना पुरुन उरेल , रोजच आपल जगण सुलभ होइल अश्यासाठी दिलेली त्यन्ची शिकवण आज ही तेव्हढाच अर्थ आणि उप्युक्तता वाहताना दिसते.
आज काल अगदी घसा फोडुन सान्गीतल जात, निदान दोन भाज्या खा. कोन्डा आरोग्यदायक! घरच अन्न पोषक.
अरे आम्ही हेच तर जगतो. आत्ताच कुठ हे बाहेर खाल्ल् नाही तर करमत नही आणी अय्या तुला कोणत्या हॉटेल मध्ये काय मिळत माहित नाही? ची फॅशन आली आहे.
माझ्या नवर्याच्या ऑफिसातल्या काही चायनिज पोरी मला तु रोज घरी बनवते? अस अगदी खोदुन खोदुन विचारत होत्या. मी हो म्हन्टल्या वर इन्डीयन बायको होण फार मुश्किल अशी टीप्पणी मिळाली.
आपण जे काही आपल्या आई वडीलन पर्यन्त शिकलो ते आपणच भन्गार मध्ये काढायला निघालो आहोत. फार पैसा आहे म्हणुन तो उड वुन मजा करण्या ऐवजी थोड व्यवस्थी त राहील तर पुढच्या पिढीला आपण आपल्याला मिळालेल्या सन्स्कारातली काही तरी पुन्जी आपण सुपुर्द करु शकु.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
- Log in or register to post comments
ड
डॉ.श्रीराम दिवटे
Wed, 05/19/2010 - 11:09
नवीन
नक्कीच. व्यक्तिची वृत्ती अथवा स्वभावानुसारच काटकसर करायची की डामडौल मिरवायचा हे निश्चित ठरलेले असते. त्यामुळे विरोधाभासाची उदाहरणे पदोपदी आढळतील.
- Log in or register to post comments
प
पुरणपोळी
Wed, 05/19/2010 - 14:32
नवीन
कुठल्याहि गोष्टिचा अतिरेक वाईट..योग्य, साध्य आणि निकोप (मनातून आलेली, तुलनेतुन नाही) मह्त्वाकांक्षा असणे आणि त्याद्वारे आपला आणि कुटुंबाचा उत्कर्श करुन घेणे, हा माझा व्यक्तिगत सुवर्णमध्य आहे.
- Log in or register to post comments
ड
डॉ.श्रीराम दिवटे
गुरुवार, 05/20/2010 - 14:20
नवीन
सुवर्णमध्य साधला तरच साध्य साधित होत असते. अन्यथा साधेपणातच आयुष्य घालवावे लागते.
- Log in or register to post comments