Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निसर्गाचे चिरंजीवित्व आणि आपण

C
chintamani1969
गुरुवार, 05/20/2010 - 19:55
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5412 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ब
बेसनलाडू गुरुवार, 05/20/2010 - 19:59 नवीन
अज्ञात लेखकाचे विचार रोचक वाटले. चूक की बरोबर यावर वाद-चर्चा होऊ शकेल. तेव्हा त्यावेळच्या प्रतिसादांसाठी ऊर्जा राखून ठेवतो. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज गुरुवार, 05/20/2010 - 20:14 नवीन
मानव जातीचे भवितव्य काहीही असले तरी निसर्गाला काहीही फरक पडत नाही
१००% सहमत
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 05/20/2010 - 20:41 नवीन
>> वायटूके हा संपूर्णपणे फसवणुकीचा प्रकार होता हे सर्वांना उशिरा कळले. असं का म्हटलं असावं? वाय टू के हा प्रत्यक्ष घडलेला प्रॉब्लेम आहे ज्यासाठी संगणक क्षेत्रातल्या लोकांना अहोरात्र काम करावं लागलं होतं. 'स्काय लॅब' पडण्याचा बागुलबुवा केला गेला होता पण त्यावेळच्या दळणवळणाच्या मोजक्या सुविधांमुळे माहिती नीट न मिळता अफवा पसरल्या होत्या.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 05/20/2010 - 21:11 नवीन
हा लेख मला किराणा सामानाच्या कागदावर लिहिलेला सापडला मला वाटते एखाद्या शिक्षकाने उत्तरपत्रिका रद्दीत विकल्या असतील आणि त्या रद्दीचा वापर किराणामालवाला पुड्या बांधायला करत असेल. त्यात हा निबंध मिळाला असावा. ;) पण त्यामुळे reduce, reuse आणि recycling असे सर्वच झाले असे वाटते. शिवाय असे झाले असेल अथवा तसे गृहीत धरले तर, अर्थव्यवस्थेलापण चालना मिळाली. कारण शिक्षकाने रद्दी विकून पैसे मिळवले, दुकानदाराने पुड्या बांधायला लागणारा कागद कमी पैशात मिळवून खर्च वाचवला आणि शिवाय तोच कागद वापरून स्वतःकडील माल देखील खपवला! :-) असो, यातील थट्टा सोडून देऊया (कृपया व्यक्तीगत घेऊ नका)! पृथ्वीला living planet असे म्हणतात. कारण भुकंप, ज्वालामुखी, इत्यादीपासून ते टोकाचे हवामान सर्व सहन करून, कालानुरूप स्वतःत बदल करत, पृथ्वी तग धरून आहे. शिवाय भूकंप-ज्वालामुखी आदी हे स्वतःमधील एका अर्थी संतुलन टिकवायला गरजेचे देखील आहे. असे म्हणतात की हिरोशिमा-नागासाकीवरील आण्विक हल्ल्यांनंतर, जेंव्हा काही विचार करू शकणारे आणि काळजीत असलेले विचारवंत तिथे भेट देयला गेले तेंव्हा त्यांना एक रोपटे (आण्विक उच्छादानंतरच्या पावसामुळे आलेले) दिसले आणि त्यांना हायसे वाटले. विंदांच्या प्रसिद्ध कवितेतील, "रक्तांमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावेत" या ओळी याच संदर्भात आहेत. पृथ्वी सृजनशील आहे यात काही वाद नाही. ती स्वतःची काळजी घेईल. पण मानवाने स्वतःला कसे सांभाळायचे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जे काही पर्यावरणापासून कशाच्याही संदर्भात आपण निसर्गासाठी करतो, ते स्वतःचे (मानवाचे आणि त्याला गरज असलेल्या चराचर सृष्टीचे) अस्तित्त्व आणि सातत्य टिकवण्यासाठी करतो हे वास्तव आहे. आज जी काही स्थलांतरे चालली आहेत त्यामागे हे असे बदल देखील आहेत, केवळ आर्थिक नाहीत. मात्र अशी स्थलांतरे जास्त होऊ नयेत म्हणून हळू हळू पाश्चिमात्य देश विचार करू लागले आहेत. स्वतःच्या सीमा बंद करणे अथवा शक्यतितक्या घट्ट करणे चालू आहेत. अशी भुमिका ही नविन वादाची आणि कदाचीत भविष्यातील युद्धाची ती नांदी ठरू शकेल... असो. बरेच काही लिहीता येईल. पण तुर्तास येथेच थांबतो. :) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
अ
अडाणि Fri, 05/21/2010 - 03:57 नवीन
सहमत आहे... लेखाची सुरवात चांगली आहे पण शेवट तितकासा पटला नाही.... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
मिसळभोक्ता Fri, 05/21/2010 - 23:00 नवीन
मला वाटते एखाद्या शिक्षकाने उत्तरपत्रिका रद्दीत विकल्या असतील आणि त्या रद्दीचा वापर किराणामालवाला पुड्या बांधायला करत असेल. त्यात हा निबंध मिळाला असावा. Wink असू शकते. किंवा साधना मासिकाची रद्दी असावी. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
N
Nile Fri, 05/21/2010 - 23:31 नवीन
किंवा साधना मासिकाची रद्दी असावी.
=)) =)) =)) आमच्या क्लास मध्ये हीच शक्यता असेल असे शिकवले आहे ब्वॉ! -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
अ
अरुण मनोहर Fri, 05/21/2010 - 02:46 नवीन
सर्व प्रथम chintamani1969 ह्यांचे एक उत्तम आणि वेगळा दृष्टीकोन दाखवणारे लिखाण रद्दीच्या गर्तेतून काढून मिपावर ठेवल्यासाठी आभार. विचार करायला लावणारा लेख. ह्यातील खुप विचारांशी सहमत आहे. स्वतःच्या फायद्यासाठी आपण गोंडस नावे देऊन आपल्या कृत्यांचे समर्थन करून घेत असतो. आपण आपल्या फायद्यासाठी निसर्ग बिघडवला, आता आपल्याच फायद्यासाठी ठीक करण्याच्या गोष्टी करत आहोत.
  • Log in or register to post comments
P
Pain Fri, 05/21/2010 - 22:09 नवीन
बळच.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा