Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुणेरी (सर)मिसळ...

ड
डॉ.श्रीराम दिवटे
Sun, 05/23/2010 - 11:03
🗣 36 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6721 वाचन

💬 प्रतिसाद (36)
श
शुचि Sun, 05/23/2010 - 20:59 नवीन
लेखन ढिसाळ नसून रसाळ झाले आहे. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sun, 05/23/2010 - 21:13 नवीन
रटाळ :( ----- सौरभ
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Mon, 05/24/2010 - 21:49 नवीन
पुण्यात कधी ओरिजिनल मिसळ मिळते यावर निदान माझा तरी विश्वास नाही बसत. यकदम वर्जिनल मिसळ चापायची असेल तर ५ नद्यांच्या गावाला पर्याय नाही! नाद्या बाद मिसळीचे एकमेव ठिकाण--> कोल्हापुर!!!!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 05/24/2010 - 21:57 नवीन
पुण्यात कधी ओरिजिनल मिसळ मिळते यावर निदान माझा तरी विश्वास नाही बसत.
=)) =)) =)) =)) अरे वा ? =)) मिसळीही ड्युप्लिकेट बनायला लागल्यात की =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
अ
अन्या दातार Tue, 05/25/2010 - 17:22 नवीन
पुण्यात मिसळ म्हणजे पोहे, शेव आणि त्यावर थोडी तवंग असलेली आमटी छ्या! ही काय मिसळ झाली? तर्री नाही, बटाट्याची भाजी नाही, मटकीची उसळ नाही. म्हणजे मिसळीच्या नावावर गळ्यात मारलेले पोह्याला मि डुप्लिकेट मिसळ म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Tue, 05/25/2010 - 17:25 नवीन
म्हणजे मिसळीच्या नावावर गळ्यात मारलेले पोह्याला मि डुप्लिकेट मिसळ म्हणतो!
अच्छा म्हणजे ही दातार सर्टिफाईड ड्युप्लिकेट मिसळ आहे तर .. मग असु द्या :) - वाण्या उधार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 05/26/2010 - 08:25 नवीन
अरे टारू, कोल्ह्याला द्राक्षे आंबट रे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मदनबाण Tue, 05/25/2010 - 17:59 नवीन
Image removed. Image removed. Image removed. कुरुंदवाडला एकाटेंची मिसळ लयं भारी असते... गायक अजित कडकडे कधी नरसोबावाडीला आले आणि त्यांना जर वेळ मिळाला तर ते इथे अवश्य भेट देतात असे मला वाडीकर मंडळींकडुन कळाले,तेव्हा मी सुद्धा या ठिकाणी मिसळ चापुन आलो. :) कोल्हापूरच्या मिसळीला तोड नाही !!! चोरगे,फडतरे,मोहन यांच्या इथे मिसळ चापणार्‍यालाच खर्‍या मिसळीची चव कळते... ;) जाता जाता :--- ही खातांना झणकेबाज 'शांपल' ची मागणी दणकेबाज खवय्यांकडून झाली खी खी खी... ख्या ख्या ख्या...झणझणीत तर्रीला असलं पांचट नाव दिल जात यातच सर्व आलं... ;) मदनबाण..... Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
ड
डॉ.श्रीराम दिवटे Wed, 05/26/2010 - 19:56 नवीन
मिपावर एखादे चित्र कसे डकवावे ते कितीही प्रयत्न केला तरी जमत नाहीये. जाणकार मित्रांनी मदत करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
र
रामपुरी Wed, 05/26/2010 - 00:23 नवीन
१००% सहमत... 'मिसळीत पोहे' हा भयंकर प्रकार फक्त पुण्यातच बघायला मिळतो. उगीच गुळमुळीत काहीतरी खाण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
य
युयुत्सु Tue, 05/25/2010 - 07:14 नवीन
यत्ता सात्वीत आम्ही अस्ले निबंध लिहायचो.... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Tue, 05/25/2010 - 09:08 नवीन
ओरिगिनल मिसळीसाठी आमच्या घरी यावे चोरगे मिसळवाले आमच्या बिल्डींग मध्ये राहतात.. सगळ्याना फुकट व अनलिमिटेड कोल्हापुरी मिसळ मिळेल... खुले निमंत्रण (फडतरे दिली असती हो, पण ती फार कमी वेळ मिळते आणि खुप गर्दी असते) आपलाच, विनायक पाचलग वाँट टु टॉक
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/25/2010 - 09:22 नवीन
ओरिगिनल म्हणजे ओरिगामीतली मिसळ का? च्यायला, हे फडतरे आणि मिसाळ बनवतात ती ओरिजिनल मिसळ तर आम्ही इतर सगळे काय उल्हासनगर मिसळ खातो, बनवतो का? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
प
पंगा Tue, 05/25/2010 - 16:48 नवीन
च्यायला, हे फडतरे आणि मिसाळ बनवतात ती ओरिजिनल मिसळ तर आम्ही इतर सगळे काय उल्हासनगर मिसळ खातो, बनवतो का?
अरे वा! उल्हासनगरवाले मिसळसुद्धा बनवू लागले काय हल्ली? आमच्या वेळीं असें नव्हतें. - (दिवंगत अण्णा बेडेकरांचा (पत्यांशांदे) कट्टर फ्यान, पण तरीही 'ओपन माइंड'वादी) पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मेघवेडा Tue, 05/25/2010 - 19:09 नवीन
>> उल्हासनगरवाले मिसळसुद्धा बनवू लागले काय हल्ली अरे कर्मा! आता मिसळीचीही सिंधी आवृत्ती?? -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/25/2010 - 19:22 नवीन
छ्या, या लोकांना "उल्हासनगर माल" म्हणजे काय तेही सांगायचं का? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
प
पंगा Tue, 05/25/2010 - 19:29 नवीन
म्हणूनच विचारले. की आजकाल तेथे हेही बनू लागले काय, म्हणून. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मेघवेडा Tue, 05/25/2010 - 19:31 नवीन
कार्टे, वरच्या प्रतिसादाला अनुसरून लिहिलाय तो प्रतिसाद मी. लागली लगेच डमरू वाजवायला ;) -- मेघवेडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/25/2010 - 19:37 नवीन
मेल्या, मी किंवा इतर कोणीही घरी बनवलेली मिसळ "उल्हासनगर" का नाही हे सांग ... असेल तर तुला कायम जॅकेट पटोटो खावं लागेल, कध्धी कध्धी मिसळ मिळणार नाही! फडतरेंची मिसळ ओरिजिनल तर त्या फडतरेच्या घरी जी मिसळ बनते ती पण चीनी बनावटीची का? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
प
पंगा Tue, 05/25/2010 - 19:54 नवीन
मेल्या, मी किंवा इतर कोणीही घरी बनवलेली मिसळ "उल्हासनगर" का नाही हे सांग ...
"का नाही"? की "की नाही"? नाही, भलताच अर्थ निघाल्यासारखे वाटले, म्हणून विचारले...
असेल तर तुला कायम जॅकेट पटोटो खावं लागेल
हे "जॅकेट पटेटो" काय असते म्हणे?
फडतरेंची मिसळ ओरिजिनल तर त्या फडतरेच्या घरी जी मिसळ बनते ती पण चीनी बनावटीची का?
"चिनी" की "यूएसए"? एकदाच काय ते नक्की ठरवा! - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मेघवेडा Tue, 05/25/2010 - 20:06 नवीन
वरचे काही प्रतिसाद वाचून अंमळ मौज आली! =)) हे "जॅकेट पटेटो" काय असते म्हणे? संजोबै, द्या उत्तर!! :D -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 05/26/2010 - 08:17 नवीन
घ्या उत्तर! Image removed. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
प
पंगा Wed, 05/26/2010 - 17:02 नवीन
आस्क अ स्टुपिड क्वेश्चन... - पंडित गागाभट्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
वेताळ Tue, 05/25/2010 - 09:36 नवीन
मिसळ खायला मी तरी नक्की येतो रे. आज रिझल्ट ना? किती टक्के पडले? पेढे कधी? वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
प
पंगा Tue, 05/25/2010 - 16:08 नवीन
एक प्रश्नः
चोरगे मिसळवाले आमच्या बिल्डींग मध्ये राहतात.. सगळ्याना फुकट व अनलिमिटेड कोल्हापुरी मिसळ मिळेल... खुले निमंत्रण
हे खुले निमंत्रण देण्यापूर्वी चोरग्यांना विश्वासात घेऊन त्यांचे याबद्दलचे मत अजमावले आहेत काय? - पंडित गागाभट्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
व
विनायक पाचलग Tue, 05/25/2010 - 16:33 नवीन
त्यांनी समजा पैसे मागितले तर मी देइन... एवढे काय त्यात??? अतिथी देवो भव विनायक पाचलग वाँट टु टॉक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
प
पंगा Tue, 05/25/2010 - 19:55 नवीन
त्यांनी समजा पैसे मागितले तर मी देइन...
त्यापेक्षा सरळ तुम्हीच का नाही देत? उगाच चोरग्यांना गृहीत धरून 'प्रायमरी पेयर' म्हणून मध्ये कशाला आणायचे? - पंडित गागाभट्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
ट
टारझन Tue, 05/25/2010 - 17:22 नवीन
ओरिगिनल मिसळीसाठी आमच्या घरी यावे
जबरा !! हा मात्र अभिनव प्रकार उत्सुकतावर्धक आहे :) सद्ध्या आमच्या इथे इलेच्रिकीटी गेलीये ... लाईट आली की येतो उत्साह वाढवायला ;) बाकी कोदांनी त्यांचा लेख सोडुन अन्यत्र प्रतिसाद लिहीण्याचा उपास सोडलेल्या दिसतोय .. अभिणंदण ;) - (ओरिगिनल) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
अ
अन्या दातार Tue, 05/25/2010 - 17:24 नवीन
कधी येउ ते सांगा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 05/26/2010 - 08:23 नवीन
नको नको फडतरे मिसळ नको हो.. फार फालतू आणि सपक असते. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
व
विशाल कुलकर्णी Tue, 05/25/2010 - 14:53 नवीन
डॉक्टरसाहेब अहो काळाचा महिमा आहे, मिसळ असो किंवा मिसळपाव चव ही बदलतच राहणार. कधी एकदम फर्मास लागेल तर कधी थोडीफार बेचवही लागेल. महत्वाचें काय तर मिसळपाव खायचे सोडायचे नाही. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
P
Pain Tue, 05/25/2010 - 20:58 नवीन
कोल्हापूरच्या मिसळीला तोड नाही !!! चोरगे,फडतरे,मोहन यांच्या इथे मिसळ चापणार्‍यालाच खर्‍या मिसळीची चव कळते... जाता जाता :--- ही खातांना झणकेबाज 'शांपल' ची मागणी दणकेबाज खवय्यांकडून झाली खी खी खी... ख्या ख्या ख्या...झणझणीत तर्रीला असलं पांचट नाव दिल जात यातच सर्व आलं... बेडेकर मिसळीएवढी चवदार मिसळ आजपर्यन्त कुठेच खाल्ली नाही. सहापैकी तिखट ही एकच चव कळणार्यांसाठी*: कुठ्ल्याही टपरीवर मिसळ मागवा आणि त्यात १ किलो तिखट घाला. झाली तुमची आवडती मिसळ तयार.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 05/25/2010 - 21:09 नवीन
बेडेकर मिसळीएवढी चवदार मिसळ आजपर्यन्त कुठेच खाल्ली नाही. अस्स होय्...बरं ठीक आहे...कधी योग आला तर तिथेही मिसळीचा आस्वाद नक्कीच घेईन. ;) सहापैकी तिखट ही एकच चव कळणार्यांसाठी*: कुठ्ल्याही टपरीवर मिसळ मागवा आणि त्यात १ किलो तिखट घाला. झाली तुमची आवडती मिसळ तयार. ही अशी मिसळ अजुन माझ्या तरी खाण्यात आलेली नाही... ;) मदनबाण..... Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
र
रामपुरी Wed, 05/26/2010 - 00:33 नवीन
योग आला नसेल तर आनंदाची गोष्ट आहे. आमचा एकदाच योग आला होता. अजून पस्तावतोय. कोल्हापूरचे असाल तर बेडेकर मिसळीच्या नादाला लागू नका. ती फक्त पुणेरी लोकांसाठीच ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 05/26/2010 - 08:33 नवीन
सहमत. बेडेकर मिसळ अगदीच टुकार आहे. गोड लागते गोड. त्यापेक्षा श्री उपहार गृह, रामनाथ इथल्या मिसळी मस्त आहेत. किंवा हातगाड्यांवर मिसळ विकणारे असंख्य आहेत. मस्तं असते मिसळ त्यांच्याकडे पण. आणि गाडी जितकी कळकट तितके सँपल भारी असतं तिथलं. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
प
पांथस्थ Wed, 05/26/2010 - 14:50 नवीन
गाडी जितकी कळकट तितके सँपल भारी असतं
येकदम बराबर. जाता जाता: पुणेरी मिसळ कशीही असो अनेक जणांना लगेच जळजळ सुरु होते. असो! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा