Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

व्यभिचार- पाप आणि पुण्य???

ड
डॉ.श्रीराम दिवटे
Sun, 05/23/2010 - 13:02
🗣 81 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
26915 वाचन

💬 प्रतिसाद (81)
स
स्पंदना Tue, 05/25/2010 - 03:31 नवीन
नाही रे बाळा.. एडस नव्हता झाला त्याला...मी सांगते ना...आणि पिंपळा जवळ नाही रे माझ्या घराशेजारी रहायचा. आता तु मला मुंजा समजत असशील तर गोष्ट वेगळी... शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Tue, 05/25/2010 - 07:48 नवीन
नाही रे बाळा..
बाळा हा शब्द हृदयाला भिडला मौषी :)
एडस नव्हता झाला त्याला...मी सांगते ना...
अरे बापरे ? :ऑ :ऑ :ऑ =)) =)) =)) =))
आणि पिंपळा जवळ नाही रे माझ्या घराशेजारी रहायचा.
आहो मी "बहुतेक" हा शब्द वापरला आहे , कळावे.
आता तु मला मुंजा समजत असशील तर गोष्ट वेगळी...
का म्हणे ? आहो होतंच आमच्या घराच्या वायव्येला एक पिंपळाचं झाड , त्याचा अर्थ तुम्ही "मुंजा" कशा ? आणि मुंजा तर मेल असतो ना ? - बाळा गबाळा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
न
नितिन थत्ते Mon, 05/24/2010 - 18:25 नवीन
>>मुळात शारिरिक भुक भागविण्यासाठी समाजाने दिलेली मान्यता म्हणजे लग्न. शारीरिक भूक भागवणे हा लग्न संस्थेचा दुय्यम हेतू आहे. त्यासाठी लग्नसंस्थेची आवश्यकता समाज मानीत नाही. एकमेकाविषयी असणारे प्रेम वगैरे साहित्यिक गोष्टी समाजाच्या खिजगणतीत नसतात. लग्नसंस्थेचा खरा उद्देश मालमत्तेचा वारसा हक्क कोणत्या व्यक्तींकडे जाऊ शकेल आणि कोणत्या व्यक्तींकडे जाऊ शकणार नाही याचा निर्णय करणे हाच आहे. इतर कोणत्याही गोष्टींसाठी समाज लग्न हे आवश्यक मानीत नाही. व्याभिचारास समाजाचा विरोध असण्याचे कारण मालमत्तेचा वारस ठरवण्याच्या कामात या संबंधामुळे अडथळा निर्माण होतो. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
M
Manoj Katwe Tue, 06/01/2010 - 07:38 नवीन
माला ह्या लेखाचि आठ्वन झालि. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=73162:2010-05-28-10-38-13&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
त
तिमा Mon, 05/24/2010 - 17:15 नवीन
नैतिकता = संधीचा अभाव या एका व्याख्येतच सर्व काही आले.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 05/24/2010 - 18:13 नवीन
व्याख्या अमान्य! अर्थात एका व्यक्तीला संधी "दिसेल" तर कदाचित दुसरीला ती "समजणारच" नाही! बेसनलाडूंचे प्रतिसाद पटले/आवडले. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
त
तिमा Tue, 05/25/2010 - 09:50 नवीन
समस्त स्त्री वर्गाची या व्याख्येसंदर्भात माफी मागतो. ही व्याख्या फक्त पुरुषांनाच (तेही बहुतांशी) लागू आहे. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शिल्पा ब Mon, 05/24/2010 - 18:10 नवीन
"संधी" मिळूनसुद्धा आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणारे लोक आहेत...अर्थात आपली व्याख्या अमान्य. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
श
शिल्पा ब Mon, 05/24/2010 - 18:27 नवीन
इथे लग्न हे फक्त शारीरिक भूक भागविन्यासाठीच आहे असा सूर येत आहे....विवाहबाह्यसंबंध हे सहसा मानसिक गरजेतून निर्माण होतात...साथीदाराचे आपल्याकडे लक्ष नाही, अपमानकारक वागणूक देणे अशा वेळेस हे संबंध शक्यतो येतात...जर कोणी व्यक्ती फक्त शारीरिक गरजेसाठीच असे संबंध ठेवत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे...जरी आपल्या fantasy प्रमाणे साथीदाराचे "वागणे " नसेल तरी केवळ त्या कारणासाठी कोणी आपला संसार उधळेल असे वाटत नाही...म्हणजे शारीरिक संबंध आहेत पण ते त्या व्यक्तीच्या fantasy प्रमाणे नाहीत असे गृहीत धरले आहे... ज्यावेळी शारीरिक आणि मानसिक, भावनिक घुसमट होते तेव्हा असे संबंध निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळेस पती-पत्नी या नात्यात आधीच दुरावा असतो, विश्वास नसतो. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 05/24/2010 - 19:31 नवीन
जर कोणी व्यक्ती फक्त शारीरिक गरजेसाठीच असे संबंध ठेवत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. का बरे? ती सुद्धा एक प्रकारची गरजच नाही का? शारीरिक गरज ही भावनिक गरजेपेक्षा कमी महत्त्वाची का आणि कशी? अशी गरज वैवाहिक संबंधांतून भागत नसेल, तर भुकेल्या व्यक्तीची भावनिक घुसमट व्हायची नाही, तिला मानसिक क्लेष व्हायचे नाहीत, असे तुम्हाला वाटते का? भावनिक वि. शारीरिक अशा फरकावर आधारीत विवाहबाह्य संबंधांचे समर्थन करता येऊ शकते किंवा आले पाहिजे, असे तुम्हाला वाटते का? तसे असल्यास अर्थातच ते चुकीचे आहे. तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा व्यक्त होतोय की भावनिक गरजेतून निर्माण होणारे विवाहबाह्य संबंध समाजमान्य व्हावेत, शारीरिक गरजेतून होणारे नाहीत. असो. माझ्या मागील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे शारीरिक संबंध आणि भावनिक जवळीक यांची बव्हंशी घट्ट वीण असते. त्यामुळे विवाहबाह्य संबंधांची "गरज" भावनिक, शारीरिक किंवा दोन्ही स्वरूपाची असू शकते. आणि माझा मूलभूत विरोध अशा संबंधांकडे गरजेचे निमित्त करून वैवाहिक संबंध संपुष्टात आणायचे सोद्देश साधन म्हणून बघण्याकडे आहे. (गरजू)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
ट
टारझन Mon, 05/24/2010 - 19:38 नवीन
शारीरिक संबंध आणि भावनिक जवळीक यांची बव्हंशी घट्ट वीण असते. त्यामुळे विवाहबाह्य संबंधांची "गरज" भावनिक, शारीरिक किंवा दोन्ही स्वरूपाची असू शकते.
बिंगो ... -(सहमत) गरजलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
श
शिल्पा ब Mon, 05/24/2010 - 19:45 नवीन
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे कि भावनिक गरज फाट्यावर मारून फक्त शरीरसुखासाठी कोणी असे संबंध ठेवत असेल तर ते चुकिचे...म्हणजे इथे जरी आपल्या fantasy प्रमाणे साथीदाराचे "वागणे " नसेल तरी केवळ त्या कारणासाठी कोणी आपला संसार उधळेल असे वाटत नाही...म्हणजे शारीरिक संबंध आहेत पण ते त्या व्यक्तीच्या fantasy प्रमाणे नाहीत असे गृहीत धरले आहे... शारीरिक संबंध आणि भावनिक जवळीक यांची बव्हंशी घट्ट वीण असते. त्यामुळे विवाहबाह्य संबंधांची "गरज" भावनिक, शारीरिक किंवा दोन्ही स्वरूपाची असू शकते. - सहमत. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू Mon, 05/24/2010 - 20:00 नवीन
तुमचे म्हणणे समजले. पण केवळ शारीरिक गरजेपोटी ठेवलेले संबंध चूक का आणि कसे याचे सयुक्तिक, पटण्याजोगे कारण तुम्ही अजूनही दिलेले नाहीत. त्यामुळे ते चूक मानण्याशी मी असहमत आहे. (असहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Mon, 05/24/2010 - 20:22 नवीन
घरी मिळत असून बाहेर बदलाकरता जातात हे चूक असे माझे म्हणणे आहे...कारण हा विश्वासघात करणे आहे असे मला वाटते...तरीही याच करणे दोघेही बाहेर जातात आणि त्यांचे एकमेकांशी संबंध चांगले आहेत अशी जोडपी (भारतीय आणि भारतात राहत असलेली ) मला माहिती आहेत...अशा वेळेस आपण का नाक खुपसायचे ...जेव्हा केवळ भावनिक गरज असते तेव्हा ती मैत्री या सदरात मोडते पण मनावर ताबा नसेल शारीरिक संबंधसुद्धा येऊ शकतात,त्याला विवाहबाह्य नाते म्हणू...या बाबतीत अजून फारसे मला काही लिहिता येईल असे सध्यातरी वाटत नाही...तुमचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचत आहे...बाकी लोकांना जे करायचे ते करणारच, चोरून किंवा उघड...आपल्या चर्चेने काय फरक पडणार आहे? :D *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ट
टारझन Mon, 05/24/2010 - 20:31 नवीन
बाकी लोकांना जे करायचे ते करणारच, चोरून किंवा उघड...आपल्या चर्चेने काय फरक पडणार आहे?
=)) आहो , पण ह्या ब्रम्हज्ञानाची प्राप्ती जर मराठी संस्थळावरच्यांना झाली , तर संस्थळं ओस पडतील हो ;) बाय द वे ह्या प्रकारच्या चर्चेला "वांझोटी चर्चा" असा संस्थळीय शब्द प्रचलित आहे :) -चर्चिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Mon, 05/24/2010 - 20:35 नवीन
मस्तच टारबा!!! =)) =)) =)) =)) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 05/25/2010 - 05:07 नवीन
टारूशी सहमत. ज्याला शेण खायचंय तो खाणारंच त्याला आपल्या चर्चेने काय फरक पडतो? जसं मनीषा एक कॉलेज तरुणी अचानक एकाच्या तरुणाच्या मोहजालात फसली. अखेर तिला गर्भपात करून घ्यावा लागला. अन् दुसऱ्याच कोणाशीतरी तिचे लग्न लावून देण्यात आले! त्यानंतरही पूर्वीचा आशिक तिला भेटतो, तीही त्याची वाट पाहते.. हे कुणाच्याही लक्षात न येत चालूच आहे... आता या उदाहरणात तिच्या आशिकाने तिची फसवणूक केली आहे हे लेखक उघडपणे म्हणतो. आणि तरीही परत ती मुलगी तिच्या आशिकाशी परत संबंध ठेवते. म्हणजे तिच्याशी लग्नं करणार्‍याची तिने फसवणूकच केली नाही का? मग त्याचे समर्थन कसे होऊ शकते? कदाचित साईझ मॅटर्स असेल. पण तरीही ही फसवणूकच आहे. त्यामुळे पापभिरू लोकच तिचा डंका पिटताना दिसतात ही तर साधीच गोष्ट आहे. ते लोक ते पाप करत नाहीत म्हणूनच तसे करू नका असा डंका पिटणार ना. तसे नसले तर लोक त्याला 'आपण हसे लोकाला अन् शेंबूड आपल्या नाकाला' असे नाही का म्हणणार? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
स्पंदना Tue, 05/25/2010 - 03:43 नवीन
बे. ला. शी सहमत. ईस्टेटी साठी तुम्ही दत्तक विधी करु शकता!! विवाह हा समाजाच्या नैतिक मुल्यांवर आधारित शरिर संबंधांसाठी प्रस्थापित केला गेला आहे. एक वेगळा द्रुष्टीकोण....९८ माणस धडधाकट आहेत. उरलेली दोन अपंग्....काय करता तुम्ही? अपंगांसाठी सोय्...पण हेच अपंगत्व जर ९८ विवाहात नाही म्हणुन उरलेले दोन विवाह तसेच फरफटावयाचे...??? इथे व्यभिचार (कुणी फोड करेल का या शब्दाची? ) हा चान्स मारु लोकांसाठी मी चर्चीत नाही आहे. घरात सर्व सुख असेल तर बाहेर जाणारी व्यक्ती कायमच दोषी असेल पण कारण मिमांसा न करता जर फक्त ...व्वाईट्टच ....या द्रुष्टी न तुम्ही पहात असाल तर .. ते न्याय्य नाही. विवाहाला फक्त शारिरिक सुख म्हणुन न बघता...म्हणनारे ...शारिरिक सुखाशिवाय विवाह बंधनात आहेत अस म्हणायच का? वर मनिषा न जे म्हंटलय ते १००% खर आहे. त्या परिस्थीतीला सामोरे जावे लागणार्‍या व्यक्तीला हा निकष लागु पडतो जिथे तीचा कस लागतो. साधारणतः सर्व साधारण व्यक्ती समाजाचे कायदे कानुन उल्लंघुन नविन काही करताना दिसत नाही पण अचानक आपण ज्याला काल पर्वा पर्यंत एक चांगली व्यक्ती म्हणुन ओळखत असतो तिलातिची ही बाजु समोर आल्यावर ,कलुषीत नजरेने पहाण्या आधी किंवा तेव्हढ्या एका निकषावर मुल्य मापन करण्या आधी.....आम्ही फक्त त्यांच्या कडे बघायचा द्रुष्टी कोण बदलायचा यत्न करतो आहोत. नाही तरी कुठल्याच समाजात हा विषय उघड उघड बोलला जात नाही. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 05/24/2010 - 20:03 नवीन
समलिंगी संबंधा मधे व्यभिचार असतो का? व असेल तर त्याला व्यभिचार मानायचा का?
  • Log in or register to post comments
प
पंगा Mon, 05/24/2010 - 20:05 नवीन
नसण्याचे किंवा न मानण्याचे तत्त्वतः काही कारण दिसत नाही. अनुभवींनी खुलासा करावा. - पंडित गागाभट्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
ट
टारझन Mon, 05/24/2010 - 20:09 नवीन
व्वा !! बायक्युरियस दिसता साहेब =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
आ
आवशीचो घोव् Mon, 05/24/2010 - 20:39 नवीन
:lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
आ
आवशीचो घोव् Mon, 05/24/2010 - 20:39 नवीन
:lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
क
कवितानागेश Mon, 05/24/2010 - 20:25 नवीन
जी गोष्ट आत्यंतिक भावनिक जवळीकीची, शारीरिक अभिव्यक्ती असते, तिला केवळ शारीरिक गरज समजणे चूकीचे आहे. ============ माउ
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 05/25/2010 - 03:26 नवीन
बे. ला. शी सहमत. ईस्टेटी साठी तुम्ही दत्तक विधी करु शकता!! विवाह हा समाजाच्या नैतिक मुल्यांवर आधारित शरिर संबंधांसाठी प्रस्थापित केला गेला आहे. एक वेगळा द्रुष्टीकोण....९८ माणस धडधाकट आहेत. उरलेली दोन अपंग्....काय करता तुम्ही? अपंगांसाठी सोय्...पण हेच अपंगत्व जर ९८ विवाहात नाही म्हणुन उरलेले दोन विवाह तसेच फरफटावयाचे...??? इथे व्यभिचार (कुणी फोड करेल का या शब्दाची? ) हा चान्स मारु लोकांसाठी मी चर्चीत नाही आहे. घरात सर्व सुख असेल तर बाहेर जाणारी व्यक्ती कायमच दोषी असेल पण कारण मिमांसा न करता जर फक्त ...व्वाईट्टच ....या द्रुष्टी न तुम्ही पहात असाल तर .. ते न्याय्य नाही. विवाहाला फक्त शारिरिक सुख म्हणुन न बघता...म्हणनारे ...शारिरिक सुखाशिवाय विवाह बंधनात आहेत अस म्हणायच का? वर मनिषा न जे म्हंटलय ते १००% खर आहे. त्या परिस्थीतीला सामोरे जावे लागणार्‍या व्यक्तीला हा निकष लागु पडतो जिथे तीचा कस लागतो. साधारणतः सर्व साधारण व्यक्ती समाजाचे कायदे कानुन उल्लंघुन नविन काही करताना दिसत नाही पण अचानक आपण ज्याला काल पर्वा पर्यंत एक चांगली व्यक्ती म्हणुन ओळखत असतो तिलातिची ही बाजु समोर आल्यावर ,कलुषीत नजरेने पहाण्या आधी किंवा तेव्हढ्या एका निकषावर मुल्य मापन करण्या आधी.....आम्ही फक्त त्यांच्या कडे बघायचा द्रुष्टी कोण बदलायचा यत्न करतो आहोत. नाही तरी कुठल्याच समाजात हा विषय उघड उघड बोलला जात नाही. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/25/2010 - 10:40 नवीन
विवाह हा समाजाच्या नैतिक मुल्यांवर आधारित शरिर संबंधांसाठी प्रस्थापित केला गेला आहे. करेक्ट...! अमर्यादित व स्वैर वर्तन सामाजिक हिताला घातक ठरते. म्हणून सामाजात काही मूल्ये, नीती तत्त्व, सामाजिक नियमने आदिंची व्यवस्था सामाजिक संस्था करीत असतात. विवाहसंस्थेंच्या उद्देशापैकी व्यक्तीच्या अफाट कामवासनेवर नियंत्रण ठेवण्याचाही उद्देश असावा. स्त्री-पुरुषांच्या वैषयिक संबंधावर नियंत्रण ही समाजाच्या दृष्टीने आवश्यक बाब होती. आणि म्हणूनच विवाह म्हणजे 'वैषयिक संबंध' प्रस्थापित करण्याचा समाजमान्य मार्ग म्हटल्या जातो. बाकी, चर्चा चांगली चालू आहे. लगे रहो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ड
डॉ.श्रीराम दिवटे Tue, 05/25/2010 - 06:11 नवीन
चर्चेत सर्वाँनीच(पुरुष/स्त्रियांनी) हिरीरीने सहभाग घेऊन या गहन विषयावर मुद्देसुद विवेचन केले त्याबद्दल आभार!
  • Log in or register to post comments
व
वैदेहीजी Tue, 05/25/2010 - 10:10 नवीन
एक मुलगी .... जन्मापासूनच आर्थिक सुबत्ता असूनही विक्षिप्त वादळामुळे अनेक सामान्य सुखानही पारखी झालेली . शाळे पासूनच घराच्या बंदिवासा मुले जवळचे कोणीही मित्रं मैत्रीण नाही . सतत सावटाखाली जगल्यामुळे कोणाशी बोलण्याचा आत्म विश्वास नसलेली . कोलेज मध्ये घाबरून राहणारी पण आईच्या मजबूत पाठींब्या मुले योग्य ते शिक्षण घेतल्यावर नोकरीच्या रूपाने नवीन पंख लाभलेली ती. नंतर मात्र ४० -५० लोका समोर हि आत्मविश्वासा ने बोलू शकणारी उत्तरो उतार प्रगतीच करत जाणारी ती . तिच्या सकारात्मक दृष्टी कोनाने तिच्या मित्र परिवार ची मोठी होत जाणारी जाणारी यादी. "छु लो सितारो को अब दूर नाही ही मंझील " गाण्याचा शब्द शब्द जीवनात जगणारी ती . आता तिला गरज वाटू लागते आपल्या विचाराशी जुळणार्या , मनावर लहान पणापासून झालेल्या असंख्य जखमा वर मायेची फुंकर घाला णार्या साथीदाराची . तिला वाटते ओढ स्व कष्टाने प्रतिकूल परिस्थितही ठामपणे उभे राहिलेल्या पायांना कधी थकले तर कोणाच्या तरी प्रेमळ बाहुमाध्य विश्वासाने विसावण्याची. बाकी काही अपेक्षा हि नसते पोकळ डाम डौलाची किंवा विलासाची ... त्यातला भंपक पणा अमुभावाला असतो जन्मा पासूनच पण तसे कोणी मिळ न्याआधीच आई च्या इच्छे नुसार केलेलं लग्न ... नवीन नात.... एक जीवनाला किनारा मिळवून देणारा जीवनसाथी ... ती हरखून जाते आता पर्यंत साठ वून ठेवलेले सगळे प्रेम या व्यक्ती वर उधळून टाकण्याची तिने तयारी केलेली . पण कोणाचा तरी आधार शोधात असलेली ती आपणच त्याचा आधार बनते . अरे हा पण माझ्या सारखा च ! चला याचे हि आयुष्य आपल्या सारखे घडवू या ... ती जीव तोडून प्रयत्न करत राहते . पण तो काहीशा अंतर राखून दूर राहतो . निसर्ग नियमाने दोघे शरीराने एकत्र येतात २ वर्षांनी मुलगी हि होते पण मनाने ते दुरावत जातात . लोकार्थाने ते उत्तम वैवाहिक जीवना जगात असतात तो हि आपल्या जगामध्ये आनंदी असतो. त्याला गरज असेल तेव्हा "बायको" मिळत असते ती च्या मानसिक परिस्थितीची त्याचे काही देणे घेणे नसते ती एकटी पडत जाते . लग्ना आधी जेवढी एकटी असते त्यापक्षा किती तरी पटीने जास्त . मुलगी मोठी होत असते. परिस्थिती च्या उलट सुलट थपडा नि बेजार झालेली ती ३ वर्षांनी पुन्हा भानावर येते . पुन्हा सुरु होतो परीस्थीतीवर मात करण्याचा संघर्ष . पण यावेळी असते मुलीलाही घडवण्याची जिद्द . पुन्हा एकदा नोकरीच्या रूपाने नशीब अजमाव याचा प्रयत्न . ... कलायटस ... पैसे ...बँक अकौंट मध्ये भर ..... ती स्वत:ला बुडवून घेते मग मन गुंतवण्यासाठी बाहेर पिकनिक ... फिरणे ... अशाच फिरण्या मधून कधी तरी जन्माला आलेली निखळ मैत्री ... त्याच्या नजरेतून वेळो वेळी झळकणारी आत्मीयता ... तिने न सांगता जीवाच्या आकांताने केलेली मदत ... तिच्या बाळाची त्याच्या नजरेतून सतत व्यक्त होणारी काळजी ... तिची लहान सहान टेन्शन्स हि मोठ्या जबाब दारी ने दूर करण्याची त्याने केलेली प्रयत्नांची पराका ष्ठा . तो हि तसाच .... परिस्थिती नुसार आत मधून दगड होत गेलेला .. पण माणूस कीचा झरा जिवंत ठेवणारा पण "खरा खुरा" माणूस . 15 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात "शरीरिक सुख आणि मुले जन्माला घालणे " एवढेच असलेले नाते .....रोज रात्री "नकोसे संबंध" डिमांड करणारी त्याची बायको आणि आता त्यांची स्वत च्या वैवाहिक आयुष्यात हि ना होवू शकलेली मानसिक जवळीक . त्याने तिने एक मेकांकडे मोकळे केलेलं मन. आणि अशाच एका अलगद क्षणी खांद्यावर डोक ठेवून मन मुक्त रडताना एकमेकांचे होवून गेलेले ते दोन जीव ... या नात्याला तुम्ही काय म्हणाल ?? रानफुल
  • Log in or register to post comments
P
Pain Mon, 05/31/2010 - 02:48 नवीन
उत्तरः व्यभिचार (अपुर्‍या माहिती आणि व्याख्येनुसार) तुमची मैत्रिण असल्याने तिची बाजू कळली. "त्या" च्या बाजूचे काय ? तिची आणि त्या उतारवयातील माणसाची मैत्री निखळ वाटत नाही. [ त्याला ती हवी होती, नवर्‍याला अगोदरच मिळालेली होती. Of course दोघांच्या वागण्यात फरक असणार ;) ] पहिल प्रेम, स्वप्नातला जोडीदार वगैरे गोष्टी चित्रपट, कथा कादंबर्‍यातून सतत मारा केल्याने हव्याहव्याशा वाटतात. वास्तव जग वेगळे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैदेहीजी
D
Dipankar Tue, 05/25/2010 - 10:28 नवीन
हि कुठल्या चित्रपटाची कथा आहे? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
  • Log in or register to post comments
व
वैदेहीजी Tue, 05/25/2010 - 11:57 नवीन
हि आमच्या ट्रेन मधल्या ग्रुप मधिल मैत्रीणिच्या आयुष्यात घडलेली खरीखुरी घटना आहे रानफुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dipankar
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा