Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अरे कोणीतरी भीती दाखवाल का?

S
sagarparadkar
Fri, 05/28/2010 - 12:55
🗣 50 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10217 वाचन

💬 प्रतिसाद (50)
ग
गणपा Fri, 05/28/2010 - 13:53 नवीन
१ मिस्ड कॉल पहा.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 05/28/2010 - 13:58 नवीन
तुम्ही ४०+ म्हणजे गहराई (लागू, कोल्हापुरे, नाग) पाहिला असावा. तो पाहताना मला थोडी भीती वाटली होती. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 05/28/2010 - 18:35 नवीन
+१ खूप भिती नव्हती वाटली पण सिनेमा चांगला वाटला होता. सिनेमाने भितीदायक वातावरण निर्मिती चांगली केली होती. 'वो कौन थी ' मध्ये मनोज कुमार हॉस्पीटल च्या बेड वर असतो, त्या खोलीत त्यावेळी कोणीच नसते आणि त्याचे लक्ष सहज वरच्या बाजू कडील खिडकी कडे जाते आणि क्षणात तिथे त्याला साधनाचा चेहरा दिसतो. त्याक्षणी तो टरकतो. आणि त्या एका क्षणी मला देखील टरकायला झाले होते जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/28/2010 - 14:02 नवीन
"रामू की आग" पहा, नक्की भीती वाटेल! झालंच तर 'भूत' पहा, भीती नाही वाटली तर पिच्चर नक्की आवडेल. पार्श्वसंगीत खत्तरनाक आहे. अदिती
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 05/28/2010 - 14:05 नवीन
डिसेंट, राँग टर्न, हिल्स हॅव आईज वगैरे बर्‍यापैकी भितीदायक आहेत. भूत/पिशाच्च/हडळींनो - वाटते का हो तुम्हांस स्वतःची भिती , मध्यरात्री?
  • Log in or register to post comments
प
पंगा Fri, 05/28/2010 - 14:18 नवीन
भूत/पिशाच्च/हडळींनो - वाटते का हो तुम्हांस स्वतःची भिती , मध्यरात्री?
याचीच प्रतीक्षा होती! =)) धन्यवाद! - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
अ
अप्पा जोगळेकर Sun, 05/30/2010 - 08:25 नवीन
राँग टर्न पाहिलाय. भाजी चिरतो तशी माणसं चिरली आहेत. नुसता रक्तामांसाचा चिखल . सिनेमाच्या सुरुवातीलाच एका बाईला उभं कापून तिच्या शरीराच्या दोन चिरफाळ्या करतात. त्यानंतर मेलेलं जनावर ओढत न्यावं तशा त्या दोन चिरफाळ्या ओढून घेऊन जातात खाण्यासाठी. हा सिनेमा पाहिल्यानंतर या बाबतीतल्या माझ्या सगळ्या संवेदनाच मरुन गेल्या. आणि तेच व्हायला नको. कारण मनाच्या संवेदना जाग्या असणं हेच तर माणूसपणाचं लक्षण आहे. असे सिनेमे बॅनच केले पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/28/2010 - 14:10 नवीन
" सरीवर सरी" हा मराठी सिनेमा पहा. खूप भीती वाटली होती मला हा सिनेमा पाहताना...( हा जर अ‍ॅवॉर्डविनिन्ग सिनेमा असेल तर कसं होणार मराठी सिनेमाचं?" अशी ती भीती) :)
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 05/28/2010 - 15:05 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
प
पंगा Fri, 05/28/2010 - 14:20 नवीन
आरशात पहा. प्रतिबिंब दिसले नाही, तर भीतीदायक. दिसले, तरीही... (दोन्हीकडून विन-विन...) - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Fri, 05/28/2010 - 19:45 नवीन
मै भी येईच बोलनेवाला था! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
र
राजेश घासकडवी Fri, 05/28/2010 - 14:34 नवीन
रुचिकाच्या जागी स्वत:ला कल्पून बघा...
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज Fri, 05/28/2010 - 15:14 नवीन
हे पाहा आणि घाबरण्याचा आनंद लुटा... http://www.iam-she.com/contestantsdetails.php?id=2
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/28/2010 - 15:15 नवीन
"I am she" हे इंग्लिश वाचूनच मला भीती वाटली. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज
भ
भारद्वाज Fri, 05/28/2010 - 15:28 नवीन
त्याचे मराठी भाषांतर 'मी शीssss आहे' असे (घाबरवण्याच्या दृष्टीने) करता येईल का? =)) =)) =)) जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
स्वप्निल.. Fri, 05/28/2010 - 16:06 नवीन
"द ब्लेअरविच प्रोजेक्ट" म्हणून एक सिनेमा आहे .. बघा ..
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Fri, 05/28/2010 - 19:48 नवीन
मला पण आवडला होता. आणि ज्या पद्धतीने तो चित्रित केला आहे, दर्शक पण गुंतत जातो आणि भीतीचा थोडाफार तरी अंमल होतो. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल..
स
संताजी धनाजी Tue, 06/01/2010 - 13:25 नवीन
त्याच्यात क्यामेरा सतत हलत असतो त्यामुळे माझे डोके [भितीने नाही] गरगरायला लागले होते. - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
प
परिकथेतील राजकुमार Fri, 05/28/2010 - 16:25 नवीन
कोदाचे लेख वाचा. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 05/28/2010 - 19:02 नवीन
मपला प्रतिसाद चोरला :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
P
Pain Fri, 05/28/2010 - 20:20 नवीन
कोदा म्हणजे कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 05/28/2010 - 16:34 नवीन
मला कुठलाहि हिंदि सिनेमा बघायची खुप भिति वाटते
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Fri, 05/28/2010 - 17:17 नवीन
रामगोपाल वर्माचा 'भूत' पाहतांना शेवटचे घाबरल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 05/28/2010 - 17:51 नवीन
जालिंद्र बाबांच्या पट्ट शिष्या " शरदिनी ताइंच्या" कविता वाचा नाही दोळे फिरली आणि घाम फुटला तर सांगा Image removed. ******************************************* दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Sat, 05/29/2010 - 18:45 नवीन
जयपाल मला तुमची स्मायली आवडली कृपया दुवा द्या...अजुन कुथे भेटतील...? ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
ऋ
ऋषिकेश Fri, 05/28/2010 - 18:06 नवीन
exorsist बघुन घाबरलात? का? त्यात फक्त किळस आहे हिरव्या उलट्या- पिळलेली मान वगैरे त्यापेक्षा श्यामलन नाईट बरा (आपला) ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 05/28/2010 - 18:41 नवीन
रात हा एक सुंदर पिक्चर होता... ओम पुरी आणि रेवतीचा मित्र जेव्हा तळघरात उतरतात तेव्हा थोडं पुढं गेल्यावर लाल साडीत एक बाई बसलेली असते.. तो सीन मला अजूनही भितीदायक वाटतो... तसेच, रेवती आणि तिचा मित्र एकदा हिंडायला जातात आणि बाईक पंक्चर होते. तेव्हा तो मित्र पंक्चर काढून जेव्हा परत येतो तेव्हाचा सीन पण अफाट आहे. जेव्हा रेवती लग्नघरी गच्चीवर तिच्या मैत्रीणीची मान मोडते तो पण सीन क्लासिक!!! एकंदरीतच 'रात' मधे असे अनेक सुंदर (भितीदायक) प्रसंग आहेत. भूत/पिशाच्च/हडळींनो - वाटते का हो तुम्हांस स्वतःची भिती , मध्यरात्री?
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Fri, 05/28/2010 - 19:51 नवीन
रात बघुन आपलीबी तंतरली होती. बर्‍याच वर्षांनी तसा अनुभव The Grudge 1 बघितल्यावर आला होता. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
ह
हर्षद आनंदी Fri, 05/28/2010 - 23:25 नवीन
ह्यांच्या पलिकडे भीतीदायक चित्रपट नाही पाहीला.. किळसवाणे प्रकार जास्त असतात..आणि बर्‍याच सीनवर हसायला येते. भूत ह सिनेमा पहाताना मंगला मध्ये मार खाण्याची वेळ आली होती!! हाऊसफुल्ल शो... सगळे चित्रपटात गुंतलेले आणि आम्ही प्रत्येक सीनला टाळ्या देऊन हसत होतो.. खास करुन तो आरसा आणि डोअर बेलचा सीन... तेव्हा कहर झाला होता :D :D :D EVIL DEAD मध्ये सांगाडा नाचायला लागतो तेव्हा मी धबधब्या सारखा कोसळलो होतो... that is most fantastic comedy scene I have ever seen दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 06/01/2010 - 05:53 नवीन
खरे आहे.. आम्ही मंगला मधे भूत पहायला गेलो होतो तेव्हा असंच झालं होतं. तो आरशाचा वगैरे सिन चालू होता तेव्हा आमचा एक मित्र जोरात ओरडला "कुबड्या मी आलोय". सग्ळं थेटर हसत सुटलं. ते आठवलं. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
स
सुमीत भातखंडे Sat, 05/29/2010 - 09:14 नवीन
सहमत. रात मलापण आवडला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
भ
भारद्वाज Sat, 05/29/2010 - 09:19 नवीन
'रात'ने खूप फाडली होती. 'भूत'ने सुद्धा. (नंतर जमेना म्हणून रामू 'फूंका'यला लागला.) जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
प
प्रियाली Fri, 05/28/2010 - 19:48 नवीन
इतके घाबराल की पुढला कोणताही रामसेपट बघणार नाही. :)
  • Log in or register to post comments
ए
एक Fri, 05/28/2010 - 19:49 नवीन
भिती जरी नाही वाटली तरी प्रचंड अस्वस्थता वाटते.. वेगळाच अनुभव आहे. -एक
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Fri, 05/28/2010 - 19:54 नवीन
कॅनिबल होलोकॉस्ट बघा अजुन अस्वस्थ वाटेल. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
म
मदनबाण Fri, 05/28/2010 - 19:52 नवीन
कारण हल्ली भुतापेक्षा माणूस प्राण्याचीच जास्त भीती (जर वाटली तर) वाटते ... एकदा उत्तरप्रदेशला भेट द्या...बहुतेक भिती वाटेल !!! का ? कारण... उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांची संपत्ती ८८ कोटी आहे... मला इतक्या वेगाने प्रगती करणार्‍या लोकांची फार भिती वाटते. :S संदर्भ :--- http://epaper.esakal.com/esakal/20100527/5654747046681324965.htm महिन्याला १ कोटी असा या प्रगतीचा अफाट वेग आहे, मी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम जरी केले तरी माझा पगार या वेगाने वाढेल काय याचा विचार करतोय सध्या !!! :? (हत्तीचे पुतळे बांधुन खरचं लाभ होत असेल काय ? ):? मदनबाण..... Jealousy is nothing more than a fear of abandonment.
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Sat, 05/29/2010 - 00:53 नवीन
मला उर्मिलाचा 'कौन' बघताना वाटली होती थोडी भीती आणि व्हॉट लाइज बिनिथ मध्ये १-२ दृष्यात पण ... पुष्करिणी
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sun, 05/30/2010 - 08:28 नवीन
उर्मिलेचा 'कोन'??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
स
सुमीत भातखंडे Sat, 05/29/2010 - 09:19 नवीन
मला पण भयपट खूप आवडतात. काही चित्रपट, जे मला बर्यापैकी हॉरर वाटले होते: १) द शायनिंग २) सेशन ९ ३) हिल्स हॅव आईज (२००६) ४) द ब्लेअर विच प्रोजेक्ट ५) पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिविटी ६) REC
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sat, 05/29/2010 - 09:30 नवीन
झोपेच्या गोळ्या जास्त खा "मी मरणार" अशी भीती वाटायची शक्यता आहे........ ************************************************* Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 05/29/2010 - 18:36 नवीन
=)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................... =)) =)) ... =)) .................. =)) .... .... =)) ......................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................... =)) =)) ... =)) .................... =)) .... ...... =)) ....................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................... =)) =)) ... =)) .............. =)) .... ........ =)) ........................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ......................... =)) =)) ... =)) .............. =)) .... ......... =)) .......................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................ =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ......................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ......................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ............................. =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................... =)) लै भारी शाणबा५१२ - जोजोबा१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
भ
भाग्यश्री कुलकर्णी Sat, 05/29/2010 - 09:32 नवीन
सायकोच्या एका भागात तो पिपहोल मधुन बाहेर बघत असताना दुसर्‍या बाजुनेही एक निळा डोळा त्याला बघत असतो . हे बघताना मला जाम भिती वाटली होती.अन "रात"चे अनुभव वर दिल्याप्रमाणेच भितीदायक होते.
  • Log in or register to post comments
ब
बाळकराम Sat, 05/29/2010 - 15:44 नवीन
जेन्युइनली घाबरायचं असेल तर रात, द रिंग १ व २ बघा विशेषकरुन द रिंग १- जाम मजा येते. भूतही छान होता. बाळकराम
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 05/29/2010 - 18:47 नवीन
:D मस्त मटणाच्या जेवणाचा बेत करा. जवळच्या स्मशानात रात्री एक दोन ला जेवायला जा.भिती पळुन जाईल. वेताळ
  • Log in or register to post comments
P
Pain Sat, 05/29/2010 - 21:47 नवीन
मिसळपाववर प्रसिद्ध झालेल्या सर्व भयकथांची यादी मिळेल का ?
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 06/01/2010 - 05:42 नवीन
सर्च फॉर तात्या अभ्यंकर.. हल्ली, इथले लोक भयकथा तशाच शोधतात म्हणे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
द
दादा कोंडके Sun, 05/30/2010 - 08:47 नवीन
भयपटांमध्ये बर्‍याचवेळा प्रेक्षकांना दचकवतात किंवा काहीतरी किळसवाणं दाखवतात. जेन्युन भयपट खूपच कमी असतात. मला आवडलेले काही भयपट, १. क्वारंटाईन २. डिसेंट ३. ड्रॅग मी टू हेल ४. राँग टर्न ५. डे ऑफ द डेड
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 05/31/2010 - 13:39 नवीन
डर्टी मूव्ही नावाचा सिनेमा पाहीला आहे का कुणी? एकसे एक किळसवाणे प्रकार आहेत. एकदुसर्यांच्या ओकार्या पिणारी माणसे..व्याSSSSSSSक..!!! फ्राय डे द १३ चित्रपट सिरीज ही अशीच किळसवाणी आहे. नेल गनने डोळ्यात घुसणारे खिळे.. करवतीने कापाकापी... पुन्हा व्याSSSSSSक !!!! ब्रेनडेड.. व्याSSSSSSSक..व्याSSSSSSSक.! मुंडके मिक्सरमध्ये घालुन मिक्सर फिरवीणे.. ग्रास कटरने झोंबीं (zombie)ची कापाकापी.. डोळे लोंबत असलेल्या..हातापायाचे मास बाहेर आलेल्या झोंबींचा सेक्स.. व्याSSSSSSSक..व्याSSSSSSSक...व्याSSSSSSSक..व्याSSSSSSSक.! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 06/01/2010 - 05:57 नवीन
होस्टेल नावाचा असाच एक किळसवाणा सिनेमा होता. मानवी अवयवांचे छिन्नविछिन्न अवशेष बघून फारशी किळस वाटत नसल्याने फार त्रास नंतर झाला नाही. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
म
मस्त कलंदर Mon, 05/31/2010 - 14:42 नवीन
मी सहसा भयपट पाहात नाही.. भूत पाहताना आधीच इतकी मानसिक तयारी झाली होती की मूव्ही पाहताना आम्ही एकमेकींना जोक्स सांगून खदखदा हसत होतो... नि अर्थातच शेजारचं पब्लिक वैतागलं होतं.. आमच्या एका मैत्रिणीला यांच्याकडं इतका सारखा पाऊस पडतो तर यांच्या घरातले कपडे कसे वाळत असतील हा प्रश्न पडला होता.. अजूनही तिला आम्ही यावरून छळतो.. ब्लेअर विच.. च्या बाबतीत पण हेच घडलं.. घरी काहीतरी काम चालू होतं नि घरी थांबणं भाग होतं.. आजवर या सिनेमाबद्दल ऐकलं होतं.. म्हणून अ‍ॅन्टीसिपेशनमध्ये घाबरून एका मित्राला बोलावलं.. त्याला आधीच अस्स्सला भयानक पिक्चर आहे म्हणून सांगू.. असं म्हणून आधीच घाबरवलं.. आणि आम्ही दोघे बसलो आता भीती वाटतेय, मग भीती वाटतेय याची वाट बघत.. शेवटी कळलं.... पिक्चर संपला!!!!!! मोठ्या पडद्यावर पाहिला असता तर कदाचित भीती वाटली असती.. ओन मिस्ड कॉल नि सिक्स्थ सेन्स बघताना मात्र भीती वाटली होती!!! ;;) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा