दुर्ग आणि ढाकोबा संदर्भातील काही क्वेरीज
💬 प्रतिसाद
(1)
प
प्रचेतस
Tue, 06/01/2010 - 06:23
नवीन
दुर्ग ते ढाकोबा यांमधील अंतर ४ ते ५ किमी आहे. अंदाजे २.५ ते ३ तास लागतात. दुर्गवरील मंदिर मुक्कामास अति सुंदर आहे. आजुबाजूला घनदाट झाडी, निरव शांतता आहे. डोणीदारालाच तिरंगी घाट अथवा त्रिगुणधारी घाट असेही म्हणतात. घाट तसा सोपा आहे. पण पावसाळ्यात इथून जरूर जा. मध्ये एक अतिभव्य सुंदर धबधबा येतो. खुटेदाराची वाट अवघड आहे. दोराची तशी गरज नाही पण असलेला बरा.
डोणीदार आणी दार्या घाट हे दोघेही नाळेतून असल्याने सुरुवातीला अतिशय खडी उतरण आहे. कोकणात उतरायला २ ते ३ तास लागतातच. अर्थात घाटावरून कोकणात उतरायचे म्हणजे जवळजवळ ३५०० फूट उतरतांना कुठल्याही घाटांतून तेव्हडा वेळ लागतोच.
पावसाळ्यात मात्र दार्या घाट आणी खुटेदार टाळा.
अवांतरः आनंद पाळंदे यांचेच चढाई उतराई सह्याद्रीतील घाटांची हे पुस्तक विकत घ्याच. सह्याद्रीतील घाटवाटांची यात भरपुर माहिती मिळेल.
- Log in or register to post comments