Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महात्म्याची अखेर

ऋ
ऋषिकेश
Tue, 06/01/2010 - 20:53
🗣 102 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
32343 वाचन

💬 प्रतिसाद (102)
भ
भारद्वाज गुरुवार, 06/03/2010 - 19:34 नवीन
आगाखान पॅलेसात नव्हे
जबरदस्त हाणला... =D>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 06/03/2010 - 04:34 नवीन
सावरकर असोत किंवा गांधीजी असोत त्यांच्या चुकांची किंवा उत्कृष्ट कॄत्यांची छाननी करण्याचा आपणा भारतीय नागरिकांना पूर्ण अधिकार आहे. स्वातंत्र्य मिळवताना काय टाळावे आणि काय करावे यासंदर्भातील दोघांचे मार्ग भिन्न होते हे उघडच आहे. परंतु इथे प्रतिक्रिया देण्यापलीकडे कोणतेही कर्तृत्व न गाजवलेल्या तुमच्या आमच्या सारख्या लोकांना या महनीय व्यक्तींवर चिखलफेक करण्याचा किंवा अकारण त्यांचा एकेरी उल्लेख करण्याचा नैतिक अधिकार नाही असे माझे स्पष्ट मत आहे. या धाग्यावर काही जणांकडून गांधीजींचा अनादराने उल्लेख होताना दिसतो आहे. सुदैवाने सावरकर यातून बचावले आहेत असं वाटतय.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता गुरुवार, 06/03/2010 - 05:08 नवीन
आणखीन एक नमूद करण्याजोगी गोष्ट म्हणजे इथे काही परदेशी नागरिक वटवट करताहेत अशी मला शंका आहे. निदान त्यांना तरी आमच्या भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांवर टीका करण्याचा अधिकार नाही. कोणीतरी त्यांना थोबडवलं पाहिजे. ज्यांनी भारतीय राज्यघटना मान्य केली आहे निदान त्यांना तरी हे रुचलं पाहिजे की भारतीय मूळ असणं आणि भारतीय नागरिक असणं या दोन निराळ्या गोष्टी आहेत. मी कबूल करतो, की गेले ७ महिने मी परदेशी नागरीक आहे (माझ्या आयुष्यातील ४२ वर्षांपैकी सात महिने परदेशी नागरीक, उरलेली ४१ वर्षे आणि ५ महिने भारतीय नागरीक, हे महत्त्वाचे आहे का?). गांधींविषयी बोलल्यमुळे मला थोबाडवणे योग्य आहे की नाही, हे मी जागतिक जनतेवर सोपवतो. गांधीजी हे आपल्या सर्वांसारखेच जगाचे नागरीक आहेत, असे मला वाटते. मात्र, समजा मिपाकरांनी असे ठरवले, की गांधी अणि सावरकरांविषयी बोलण्याचा आणि मते व्यक्त करण्याचा अधिकार फक्त भारतीय नागरीकांचा आहे, तर प्रत्येक संदर्भ देताना सदर संदर्भ भारतीय नागरीकाचा आहे की नाही, हे स्पष्ट करावे. सुरुवात तुमच्यापासून करावी. अप्पाजोगळेकर हा भारतीय नागरीक आहे, ह्याचा पुरावा द्यावा. रेशनकार्ड देखील चालेल. पासपोर्ट असल्यास उत्तम. तसेच ओव्हरसीज सिटिझन इंडिया, ह्या भारतमान्य (१७५ डॉलर्स भरून) बहिर्भारतीयांना गांधीजी आणि सावरकरांविषयी बोलण्याचा अधिकार आहे की नाही, हे देखील स्पष्ट करावे. धन्यवाद. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
श
शिल्पा ब गुरुवार, 06/03/2010 - 05:10 नवीन
+१ *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता गुरुवार, 06/03/2010 - 06:36 नवीन
प्रा डॉ संपादक, आपण नागरीकत्त्वाचा मुद्दा अवांतर म्हणून सदर प्रतिसादानुषंगाने आलेले सर्व उपप्रतिसाद खारीज केले. पण ह्या यड*व्या अप्पाचा मूळ प्रतिसाद मात्र तसाच ? झोपलात काय ? नाही, बपोरिया ह्या शब्दाच्या विविध छटा रामदासांनी व्यक्त केल्या, म्हणून अंमळ संशय. दुसरे काही नाही. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
आ
आनंदयात्री गुरुवार, 06/03/2010 - 06:44 नवीन
हॅ हॅ हॅ !! अभ्यासाची कमतरता अजून काय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 06/03/2010 - 05:26 नवीन
सध्या काहि वैयक्तीक गडबडीत असल्याने विस्ताराने उत्तर देणे कठीण आहे. मात्र केवळ मला किंवा कोणालाहि 'काय वाटते' या पेक्षा जवळचे पुरावे, विविध लेख, लेखांतील उल्लेख, तत्कालिन बातम्या, दस्तऐवज यावरून जो निष्कर्ष निघतो तो खरा असण्याची शक्यता मी अधिक मानतो. एक पटेल व गांधींमधील 'त्या' उपोषणा दरम्यानची चर्चा देऊन पुढचा १२ जानेवारीसारखा (जो श्री.थत्ते यांनी आधीच चुकीचा आहे हे दाखवले आहे) पुरावा समोर येइपर्यंत थांबतो आहे. पटेल गांधींना भेटायला गेले होते तेव्हा गांधी म्हणाले "सरदार, मी चीन मधे नाहि, दिल्लीत आहे. माझे कान व डोळे शाबुत आहेत. मी डोळ्याने पाहिलेल्या व कानाने ऐकलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेऊ नये व मुसलमानांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करावे असे जर सांगणे असेल तर ते शक्य नाहि. हिंदु व शीख माझे बांधव आहेत. त्यांच्यात व माझ्यात एकच रक्त आहे. आज ते संतप्त असतील तर त्यांनाही मी दोष देणार नाहि. त्यांच्याकडून घडलेल्या हत्येचे क्षालन मी स्वतः प्रायश्चित्त घेऊन केले पाहिजे. माझ्या उपोषणाने तरी सगळ्या समाजांचे डोळे उघडतील व दंगल थांबेल अशी मला आशा आहे." इथे देखील कुठेही ५५ कोटींचा उल्लेख नाहि.. उपोषणादरम्यान कोणी विचारल्याशिवाय त्यांनी ५५ कोटींबद्दल ते बोललेले नाहित. आणि विचारल्यास त्यांनी त्यांचे मत दिले जे आपल्याला माहित आहे. माझ्यामते इथे सगळ्यांची (माझ्यासकट) मते बरीचशी स्थिर आहेत. किंबहूना ह्या चर्चेचा फायदा असा की यानंतर ती अधिक बळकट झाली आहेत (कारण दोन्ही मताच्या लोकांसमोर आपापल्या मतांना पुष्टी देणारे नवनवीन पुरावे मिळाले आहेत) चर्चेतून आपली मते बदलतील ही शक्यता दोघांपैकी कुणी नवा व दमदार पुरावा दिल्याशिवाय शुन्यवत आहे. तेव्हा मी तुर्तास इथेच थांबतो. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता गुरुवार, 06/03/2010 - 05:31 नवीन
सहा डिसेंबर १९४७ ते ३० जानेवारी १९४८ ह्या काळात महात्मा गांधींनी लिहिलेल्या पत्रांचे आणि दिलेल्या भाषणांचे वृत्तांत येथे उपलब्ध आहेत (पीडीएफ स्वरूपात). त्यात ५५ कोटींविषयी गांधीजींनी लिहिलेला एकही संदर्भ आढळत नाही. जानेवारी १, १९४८ ला वर्तमान पत्रांत आलेल्या ५५ कोटींच्या उल्लेखाविषयी, गांधीजींनी त्यांच्या मृत्यूपर्यंत कुणालाही काहीही लिहिलेले नाही, किंवा त्याविषयी ते कुठेही बोलले नाही, ह्याविषयी आश्चर्य वाटते. (खादी, काश्मिर, स्न्हेह्यांचे आजार, धान्याच्या किमती, लोकशाहीचे अपेक्षित स्वरूप, आणि ह्यापेक्षाही लहानसहान सर्व विषयांचा उल्लेख त्यांच्या लिखाणात आढळतो.) वल्लभ भाई पटेलांचे पत्रकार परिषदेतील वक्तव्य देखील ह्या दुव्यावर उपलब्ध आहे. त्यांचा मुख्य दावा असा, की ३० डिसेंबरला लाहोरला श्री अर्चिबाल्ड रोलँड्स ह्याच्या समोर लियाकत अली खान ह्यांनी वीस कोटी मगितले होते, आणि आम्ही ते तात्काळ मंजूर केले होते. आता ते ५५ कोटी मागताहेत. परंतु, अतिरीक्त ३५ कोटींसाठी श्री. रोलँड्स सोबत पाकिस्तान आणि भारताच्या अर्थमंत्र्यांची पुन्हा बैठक आवश्यक आहे. आता, प्रत्यक्ष लोहपुरुष ५५ कोटींचा दावा १२ डिसेंबर १९४८ ला पूर्णपणे खारीज करत नाहीये, तर तिथे गांधीजींच्या उपोषणाचा काय संबंध ? (ता. क. प्रतिसादलेखकाचे वय ४२ वर्षे. गेले ७ महिने सदर लेखक अमेरिकेचा नागरीक आहे.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/03/2010 - 05:47 नवीन
नागरीकत्व व त्यावरील चर्चा इथे अवांतर होत आहे असे वाटते. त्यावर काही आक्षेप असतील तर वेगळ्या धाग्यावर त्याची चर्चा करावी इथे नको. कृपया सहकार्य करावे........! -दिलीप बिरुटे [संपादक]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 06/03/2010 - 06:34 नवीन
जरुर सहकार्य करु. पण माझे काही प्रतिसाद उडवले गेले आहेत. आता हा तरी किती टिकतो देव जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 06/03/2010 - 06:14 नवीन
वा ! आत्ता कुठे गांधी नेहरु सावरकर धाग्यावर आल्यासारखं वाटलं... ...
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता गुरुवार, 06/03/2010 - 06:54 नवीन
सर्वसाक्षी सध्या ममीप्रेमात आहेत. पण ते त्यांचे खरे प्रेम नव्हे. ते लवकरच इकडे येतील. मग बघू. पुराव्यांविषयी पूर्णपणे नैराश्य, हे मराठी संकेतस्थळांवरील सदस्यांचे वैशिष्ट्य. विशेष म्हणजे जे स्वतःला "इतिहास तज्ञ" म्हणवून घेतात, ते सदस्य. पुरावा आहे असे छातीठोकपणे सांगतात, आणि मग गप्प बसतात आणि इजिप्तचे फोटो टाकतात. पुरावे काढा, साहेब. मग पुढे बोलू. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
व
विकास गुरुवार, 06/03/2010 - 13:17 नवीन
पुरावा आहे असे छातीठोकपणे सांगतात, आणि मग गप्प बसतात आणि इजिप्तचे फोटो टाकतात. मला वाटते त्या फोटोंमधून (इजिप्शियन) ममी कसा पुरावा हे समजते. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 06/03/2010 - 07:07 नवीन
श्री. मिसळभोक्ता यांचे सर्व प्रतिसाद मी अगदी मनःपूर्वक वाचले. त्याबद्दल मी त्यांना एकच विनंती करीत आहे की, त्यांनी "इन्द्रराज, इतिहासाचे अभ्यासक आहेत" हा भ्रम सर्वप्रथम आपल्या मनातून काढून टाकावा. मी कुठल्याही लिखाणात त्या पध्द्तीचा आव आणलेला नाही.... आणूच शकत नाही, इतका क्षुल्लक प्राणी आहे मी. .... हां, हे मी निश्चित म्हणू शकतो की, माझे वाचन बर्‍यापैकी आहे, सततच्या प्रवासामुळे देशाच्या विविध भागात या ना त्या निमित्ताने वेगवेगळ्या लेव्हलच्या लोकांसमवेत अनेकविध विषवावर चर्चा झडत असतात.... आणि त्या कारणानेच ज्ञानाचे दोनचार शिंतोडे अंगावर उडतात त्यांची जपणूक मी करतो.... आणि शक्य तर त्यांची अधिकृत पुराव्यासोबत तुलनाही करतो. त्यामुळे तुम्हाला मला विशेषण द्यायचे असेलच तर नगर वाचन मंदिरात एका कार्डावर एकापेक्षा दोन पुस्तके कशी मिळतील या प्रयत्नात असणारा एक किरकोळ वाचक असे म्हटले तर ते जास्त सयुक्तीक होईल. "अभ्यासक" "संशोधक" हे शब्ददेखील मला नीटपणे टंकीत करता येत नाही. असो. प्लीज आणखीन एक ~~ ज्यावेळी मी किंवा अन्य कुणीही टिळक, सावरकर, भगतसिंग, नेताजी, पटेल या सारख्या जहाल विचारसरणीच्या नेत्यावर लिहितो (मग लिहिणारा कालचा असो वा आजचा...) त्यावेळी असा अर्थ बिलकुल नसतो की, त्याने गांधीजी, नेहरू, गोखले यांच्या नावावर फुल्या मारलेल्या आहेत. या प्रत्येकाचे भारताच्या इतिहासातील स्थान तेजस्वी तार्‍यासारखे आहेत आणि मला तर ही सर्व नावे देवाचे नाव घेण्याइतपत प्रिय व आदरणीय आहेत. एकाद्या दुसर्‍या प्रसंगातील त्यांची भूमिका आगेमागे झाली म्हणून माझ्या मनातील त्यांच्या स्थानाला धक्का कदापिही लागणार नाही इतपत मला विश्वास आहे. असो. माझ्यापुरता तरी हा विषय इथे संपला असे मी म्हणतो...धन्यवाद ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता गुरुवार, 06/03/2010 - 07:35 नवीन
"इतिहासाचा किरकोळ वाचक" ह्या व्यक्तीशी वाद घालण्यात मला अजीबात इंटरेस्ट नाही. थत्त्यांची देखील माफी माग. त्यांनी तुला सीरियस अभ्यासक समजले, आणि पुरावे दाखवले. त्यांच नक्की बराच वेळ गेला असणार. असा इतरांचा वेळ घालवणे बरोबर नाही. धन्यवाद. तुझ्यासारखी "सेल्फ-असेसमेंटची" अनेकांना बुद्धी मिळावी, अशा अपेक्षेत. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
स
समंजस गुरुवार, 06/03/2010 - 07:44 नवीन
इन्द्र्राजसाहेब मला स्वत: ला तरी वाटतयं की भारतीय स्वातंत्र्य इतिहास संबंधात तुमचं फक्त वाचनच नाही तर अभ्यास सुद्धा ईतरांपेक्षा जास्त आहे(या चर्चेत भाग घेणार्‍यांमधे). आतापर्यंत तुमच्या कडून मुद्दाला धरूनच प्रतिसाद आलेत आणि ते सुद्धा नविन संदर्भांसहित. या विषयावर चर्चा करणार्‍या ईतरांनी स्वतः किती कष्ट घेतलेत संशोधन करण्याचे ते आवर्जून पाहावे लागेल(सध्या तरी काही विशेष दिसत नाहीय). किती जणांनी स्वतः त्या काळातील भारतीय/परदेशीय वर्तमानपत्रे वाचलीत, किंवा आकाशवाणीवरच्या बातम्या ऐकण्याची तसदी घेतली ते सुद्धा बघावं लागेल. आणि मुख्य म्हणजे दुसरी बाजू उचलून ठेवणार्‍यांनी फक्त तुटक संदर्भ न देता किंवा तुमच्याच संदर्भांवरून ते कसे विरोधाभासी आहेत फक्त हे बघण्याचा प्रयत्न न करता, स्वतः जर काही नविन पुरावे/संदर्भ दिलेत तर बरं होईल. विशेषकरून, उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तनला देण्याचा निर्णय भारत सरकारने १५ जानेवारीला घेतला त्या मागे उपोषण हे कारण नसून, दुसरंच कारण होतं हे दाखवून द्दायला हवं आणि ते कारण तसेच त्या कारणासंबंधीत काही पुरावा/संदर्भ द्दावा. हे शक्य नसेल तर मग परिस्थितीजन्य पुरावा म्हणून ज्या काही घटना घडल्यात(पैसे न देण्याची घोषणा ते पैसे तात्काळ दिले जाणार ही घोषणा या दरम्यान) त्या वरून हा निष्कर्ष सहज काढता येतो की महात्मा गांधींचं उपोषण हे कारणीभूत होतं उर्वरीत ५५ कोटी तात्काळ द्यायला कुठल्याही पुर्वअटी शिवाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
म
मिसळभोक्ता गुरुवार, 06/03/2010 - 08:00 नवीन
विशेषकरून, उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तनला देण्याचा निर्णय भारत सरकारने १५ जानेवारीला घेतला त्या मागे उपोषण हे कारण नसून, दुसरंच कारण होतं हे दाखवून द्दायला हवं आणि ते कारण तसेच त्या कारणासंबंधीत काही पुरावा/संदर्भ द्दावा. का रे बॉ ? इथे प्लेंटिफ कोण आणि डिफेंडण्ट कोण ? इद्रराज पवार नावाचा सदस्य नितीन थत्ते नावाच्या सदस्याला विरोध करतो. म्हणून इंद्रराज प्लेंटिफ. नितीन थत्ते हा डिफेंडंट. मी पुरावे देऊन फ्रेंड ऑफ द कोर्ट ब्रिफ फाईल करतो नितीन च्या बाजूने. आता, तू समजा फेंड ऑफ द कोर्ट ब्रिफ फाईल करत असशील तर ते बघू दे जरा. प्लेंटिफ ला काय सपोर्ट ऑफर करतोस तू, ते जरा तरी बघू दे. बघणे, हे महत्त्वाचे. ऐनवेळी कोर्टात सरप्राईज म्हणून एव्हिडन्स देणे, (न्यायालयात ऐनवेळी चमत्कारिक पुरावा देणे) हे चुकीचे आहे, आणि त्यामुळे ही केस खारिज होऊ शकते. थोडक्यात. "पुरावा दे ना भाऊ!" -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस
स
समंजस गुरुवार, 06/03/2010 - 09:04 नवीन
साहेब आपण चुकून न्यायालया ऐवजी मिपावरच्या चर्चेत आला वाटतं :? माझ्यापुरतं बोलायचं झाल्यास, मी मिपावरच्या चर्चेत सहभागी आहे. ते मला पडलेल्या प्रश्नांना/शंकांना उत्तरे मिळवण्याकरीता. आपल्या सहभागा मागे काय कारण आहे हे मला ठाउक नाही. जाणुन घेणे मला आवश्यक नाही. मिपाच्या नियमांप्रमाणे माझा सहभाग अनावश्यक असेल तर मिपा व्यवस्थापक आणि संपादक मंडळ काय ते ठरवतील. आपणांस काही हरकत असल्यास आपण अर्थातच त्यांच्याकडे नोंदवू शकता. (गैरसोईच्या मुद्द्यांना बगल देण्याचा आपला हा प्रयत्न स्तुत्य आहे. ) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता गुरुवार, 06/03/2010 - 09:12 नवीन
पुरावा दे ना भाऊ !!! तुझ्यासारखे अनेक वाद घालून गेले. आता ते पिरॅमिड्स बघतात. मूळ मुद्दा घे मनात. पुरावा दे ना भाऊ !!!! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस
स
समंजस गुरुवार, 06/03/2010 - 07:05 नवीन
कृपया या चर्चेत सहभागी होणार्‍यांनी, प्रतिसाद टाकणार्‍यांनी चर्चेला मुख्य विषय/मुद्दा या पासून भरकटू देउ नये. इतर मुद्दांवर चर्चा गेल्यास हि चर्चा अपुर्ण राहणार आणि या चर्चेचा उद्देश पुर्ण होणार नाही तसेच अपुर्णावस्थेत ही चर्चा बंद पडल्यास परत काही काळाने(महिने/वर्ष) ही चर्चा सुरू होणार(अनावश्यक). ---------------------------------------------------------- सध्या मुख्य वादाचा मुद्दा हा आहे की, उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तनला न देण्याचा जो निर्णय भारत सरकारने घेतला (१ जानेवारीच्या वर्तमानपत्रांनुसार), आणि त्या निर्णयाचा जो पुनरूच्चार सरदार पटेलांनी केला (१२ जानेवारीच्या वर्तमानपत्रांनुसार) तो निर्णय भारत सरकारने का फिरवला?? (१५ जानेवारीच्या वर्तमानपत्रांनुसार). या निर्णय फिरवण्या मागे महात्मा गांधींचं उपोषण कारणीभूत होतं का??? आणि नव्हतं तर मग खरं कारण काय होतं???? कृपया चर्चा ही या मुद्दाशी संबंधीत असू द्यावी.......धन्यवाद... :)
  • Log in or register to post comments
भ
भोचक गुरुवार, 06/03/2010 - 07:21 नवीन
गांधीजींचे उपोषण नेमके कशासाठी होते? यासंदर्भात मी फाळणी ते फाळणी, अवघड अफगाणिस्तान आणि याच स्वरूपाची पुस्तके लिहिणार्‍या प्रतिभा रानडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मते ''गांधीजींच्या उपोषणाचा मूळ उद्देश दिल्ली आणि देशात शांतता नांदावी हाच होता. विशेषतः दिल्ली पेटलेली होती. त्यामुळे तिथे शांतता नांदणे गरजेचे होते. त्यामुळेच त्यांनी उपोषण केले. परंतु, त्याचवेळी पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा प्रश्नही उपटला. पाकिस्तानने लॉर्ड माऊंटबॅटन यांना मध्यस्थीची विनंती केली. त्यावर माऊंटबॅटन यांनी गांधीजींना सुनावले, की तुम्ही तत्वाची, नैतिकतेची भाषा करता आणि दुसरीकडे पाकिस्तानचे ठरलेले ५५ कोटी देणेही बाकी आहे. त्यावर गांधीजींनी हे पैसे देण्यास आपली हरकत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यांची हे पैसे देण्यास हरकत नव्हतीच. पण उपोषणाचा मूळ उद्देश मात्र ५५ कोटी देण्यासाठी नव्हता.'' (भोचक) जाणे अज मी अजर
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता गुरुवार, 06/03/2010 - 07:41 नवीन
परंतु, त्याचवेळी पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा प्रश्नही उपटला. अर्थातच. हा प्रश्न ३० डिसेंबरला २० कोटींचा होता. ३१ डिसेंबरला ५५ कोटींचा झाला. १ जानेवारीला ला भारत सरकार ह्या विषयी विचार करत आहे, असे सांगण्यात आले. १२ जानेवारीला भारतीय गृह मंत्र्यांनी ५५ कोटी मंजूर न करण्याची कारणे सांगितली. सर्वांना उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक पुराव्यांनुसार हे स्पष्ट आहे. श्री/सौ/कु रानडे, ह्यांनी वेगळे काय सांगितले ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक
स
समंजस गुरुवार, 06/03/2010 - 07:59 नवीन
अर्थातच, ५५ कोटि पाकिस्तानला कुठल्याही पुर्वअटीशिवाय देण्यात यावे फक्त हा उद्देश महात्मा गांधींच्या उपोषणामागे नव्हताच. दिल्लीत होत असलेल्या मुस्लिम-हिंदू-सिख या दंगली थांबवणे हा सुद्धा होता. उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तनला देण्याकरीता जी अट भारत सरकारने घातली होती, ती अ‍ट पाकिस्तानने १५ जानेवारीच्या आत पुर्ण केली का???????? नाही केली तर भारत सरकारने का निर्णय फिरवला???? स्वतः चे हसे करून घ्यायला????? कुठलं कारण होतं त्या निर्णया मागे ????? या बद्दल काही माहिती आहे का?????????? कुठे मिळेल??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक
म
मिसळभोक्ता गुरुवार, 06/03/2010 - 08:04 नवीन
अर्थातच, ५५ कोटि पाकिस्तानला कुठल्याही पुर्वअटीशिवाय देण्यात यावे फक्त हा उद्देश महात्मा गांधींच्या उपोषणामागे नव्हताच. दिल्लीत होत असलेल्या मुस्लिम-हिंदू-सिख या दंगली थांबवणे हा सुद्धा होता. ओके. आता पहिल्यांदा तुमचा "उपोषण हे ५५ कोटी च्या व्यतिरीक्त" ह्या मुद्द्याला होकार आला. दुसरा आरोप काय आहे ? कृपया, सभ्य शब्दांत सांगावा. एकाहून अधिक प्रश्नार्थक चिन्हे हे सभ्यतेचे लक्षण नाही. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस
स
समंजस गुरुवार, 06/03/2010 - 08:41 नवीन
मला वाटतं मी माझ्या कुठल्याही प्रतिसादात कोणावरही आरोप केलेले नाहीत आपणांस तसे आढळे असल्यास कृपया सांगावे, योग्य ती दुरुस्ती करण्यात येईल :) ---------- ओके. आता पहिल्यांदा तुमचा "उपोषण हे ५५ कोटी च्या व्यतिरीक्त" ह्या मुद्द्याला होकार आला. मी हा मुद्दा सुरूवातीलाच मान्य केलेला आहे. त्यामुळे होकार/नकार चा प्रश्न येत नाही. ------------------------- दुसरा आरोप काय आहे ? दुसरा आरोप काय आहे?? माझ्या प्रतिसादातल्या कुठल्या वाक्या वरून असं दिसून येतयं?? जाणून घ्यायला आवडेल :) प्रश्न विचारणे हे केव्हा पासून आरोप करण्यात आला या प्रकारात यायला लागलायं?? तरी सुद्धा तुमच्या सोईकरीता परत तो प्रश्न खाली देत आहे, कृपया उत्तर द्दावे. "उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तनला देण्याकरीता जी अट भारत सरकारने घातली होती, ती अ‍ट पाकिस्तानने १५ जानेवारीच्या आत पुर्ण केली का?? नाही केली तर भारत सरकारने का निर्णय फिरवला?? स्वतः चे हसे करून घ्यायला?? कुठलं कारण होतं त्या निर्णया मागे ?? या बद्दल काही माहिती आहे का??कुठे मिळेल??" -------------------------------------------- कृपया, सभ्य शब्दांत सांगावा. एकाहून अधिक प्रश्नार्थक चिन्हे हे सभ्यतेचे लक्षण नाही. सभ्य शब्दांत सांगणे तसेच एकाहून अधिक प्रश्नार्थक चिन्हे हे सभ्यतेचे लक्षण नाही यावर बोलणे हे अवांतर होइल आणि मुख्य चर्चे पासून दुर जाणे होइल. ते मला नकोय. त्यामुळे या वर नंतर बोलता येइल. ----------------------------------------------- आणि हो, माझा प्रतिसाद हा भोचक यांना उद्देशून होता, तुम्हाला नाही. तो प्रतिसाद फक्त तुमच्या प्रतिसादाच्या खाली आला एवढचं. तरी पण तुम्ही आपणहून विचारणा केल्या मुळे, माझ्या प्रश्नास तुम्ही सुद्धा उत्तर दिल्यास आनंदच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता गुरुवार, 06/03/2010 - 08:56 नवीन
श्री/सौ/कु समंजस, आपल्याला खरेच आपल्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत का ? मला खरेच कमी वेळ आहे, आणि आपण विचारलेले प्रश्न इतके मूलभूत आहेत, की आपल्याला स्वतःला देखील त्या प्रश्नांची उत्तरे लगेच सापडतील. त्यामुळे, खरेच सांगा, आपल्याला असलेल्या प्रश्नांची उत्तरे मीच देणे आवश्यक आहेत का ? श्री/सौ/कु अप्पा जोगळेकरांना दिलेल्या उत्तरात मी ६ डिसेंबर १९४७ ते ३० जानेवारी १९४८ पर्यंत श्री. मोहनदास करमचंद गांधी ह्यांनी लिहिलेली सर्व पत्रे, सर्व भाषणे, ह्यांचे संदर्भ दिलेले आहेत. आपल्याला त्यापेक्षा जास्त संदर्भ हवे आहेत काय ? का ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस
प
पक्या गुरुवार, 06/03/2010 - 09:14 नवीन
मर्यादेपेक्षा जास्त विरजण पडलं की दह्याची चव जाउन ते जास्तच आंबट होतं. आरोप काय? श्री ,सौ ,कु. काय? प्रत्येक वेळी वाकड्यातच शिरायला हवयं का? जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता गुरुवार, 06/03/2010 - 09:42 नवीन
यूसलेस पक्या, समंजसला दर वेळी छोट्या छोट्या प्रश्नांना दिलेली उत्तरे बघ, आणि मग नंतर मला हा प्रश्न विचार. खरच सांगतो, अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मला हजार हजार डॉलर्स मिळतात. तुम्हा लोकांना उत्तरे देतोय भाड्यांनो, मला मिसळपाव आवडते म्हणून, फक्त. खरच, समंजस आणि पक्या, ह्या दोघ्यांनी मला उगाच उत्तरे मागितलीत, तर मी त्यांना कोर्टात खेचीन. सँटा क्लॅरा काउंटीच्या नियमांनुसार कमाल ७५०० डॉलर्स मागता येतात, आणि अगदी "दिलेली उत्तरे पुन्हा मागितली" तरी. आणि हो, "लॅटिट्यूड्स डीलिंग विथ सूडोनिम्स" क्लॉज मला माहिती आहे. समंजस, पक्या, तुम्ही "कोर्टातील नियम माहिती नसल्याने कोर्टात नजर राहू शकलो नाही'" अशा प्रकारचे विरोध केलेत, तरी देखील, वरचे क्लाउज बघा. ७५०० डॉलर नक्की. आणि तुमच्याविरुद्ध केस नक्की. एकदा केस नक्की झाली, की क्रेडिट हिस्टरी भोकात. बेस्ट लक. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
प
पक्या गुरुवार, 06/03/2010 - 10:02 नवीन
यूसलेस मिसळभोक्ता, तुला प्रतिसादच कळला नाही बघ. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
स
समंजस गुरुवार, 06/03/2010 - 09:15 नवीन
धन्यवाद साहेब. आपण दिलेल्या दुव्या वर जाउन माझ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो(१५ जानेवारीच्या भारत सरकारच्या निर्णयामागची कारणे शोधण्याचा). उत्तर मिळाल्यास परत तुम्हाला धन्यवाद देईनच, उत्तर नाही मिळाल्यास परत प्रश्न करेन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
स
समंजस गुरुवार, 06/03/2010 - 13:17 नवीन
धन्यवाद मिसळभोक्ता साहेब :) तुम्ही दिलेल्या दुव्यावर माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं... हा पुरावा/संदर्भ जर आधीच सापडला असता तर माझ्यापुरती तरी का होईना ही चर्चा (वाद नाही) संपुष्टात आली असती. संक्षेपात सांगायचं तर; महात्मा गांधीचं उपोषण हे प्रमुख दोन कारणांकरीता होतं. १. दिल्लीतील दंगल थांबवणे (हिंदू-मुस्लिम-शिख) यांच्यात सलोखा निर्माण करणे, मुस्लिमांना दिल्लीत पुर्वी सारखी वागणूक-सुरक्षा मिळेल ही हमी घेणे. २. उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तानला तात्काळ देणे (घातलेल्या अटी विसरून) . नेमकं तसंच झालं. पहिलं कारण विविध गटांनी/नेत्यांनी दुर केलं(१८ तारखेला हमीपत्र देउन). आणि दुसरं कारण भारत सरकारनी दुर केलं १५ तारखेला निर्णय घोषीत करून. ------------------------------------------ आता या पत्रांच्या सत्यते बद्दल जर कोणाला शंका असेल तर ही त्यांची समस्या मला मात्र सत्यते बद्दल काहीच शंका नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस
न
नितिन थत्ते गुरुवार, 06/03/2010 - 13:22 नवीन
मिभो यंनी दिलेल्या दुव्यावर तुम्हाला ही माहिती कोठे आढळली त्याचा संदर्भ....उदा. पान नं/ अमुक तारखेचे भाषण/तमुक यांना लिहिलेले पत्र वगैरे दिला तर खूप बरे होईल. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस
स
समंजस Fri, 06/04/2010 - 06:55 नवीन
नितिनसाहेब मला वाटलं तुम्ही ही चर्चा थांबवली आहे त्यामुळे तुम्हाला आता जास्तीच्या संदर्भांची गरज नसावी :) माझ्या प्रश्नाचं उत्तर मला पान ४६५-४६६ वर सापडलं..... [वैधतेबद्दल मला संशय नाही. हे भारत सरकारचं जाहिर निवेदन. या निवेदनाचं खंडन करणारं दुसरं कुठलही पत्र/निवेदन(तत्कालीन) माझ्या वाचण्यात आता पर्यंत आलेलं नाही] तुम्हाला आणि इन्द्रराजसाहेबांना धन्यवाद. तुमच्या दोघांमुळे ही चर्चा एवढी लांबली आणि मुद्देसुद झाली तसेच बरेचसे नवे संदर्भ/माहिती मिळाली. शालेय पुस्तकांमधून शिकलेल्या इतिहासा पेक्षा बराचसा इतिहास या मुळे कळला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 06/03/2010 - 09:33 नवीन
श्री. मिभो यांना त्यातल्या त्यात श्रीमती प्रतिभा रानडे यांनी दिलेली कारणमीमांसा काही प्रमाणात पटली असेल असे मी गृहीत धरतो.... (त्यात "त्यावर माऊंटबॅटन यांनी गांधीजींना सुनावले, की तुम्ही तत्वाची, नैतिकतेची भाषा करता आणि दुसरीकडे पाकिस्तानचे ठरलेले ५५ कोटी देणेही बाकी आहे. त्यावर गांधीजींनी हे पैसे देण्यास आपली हरकत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यांची हे पैसे देण्यास हरकत नव्हतीच. पण उपोषणाचा मूळ उद्देश मात्र ५५ कोटी देण्यासाठी नव्हता.") अशी टिपणी आहे....!! चला इथपर्यंत तर आलो आहोतच की...."गांधीजींनी हे पैसे देण्यास आपली हरकत नसल्याचे सांगितले..." ~~ या बिंदूवर थोडी "जर-तर" ची भाषा वापरली तर चालेल का, भाऊ? ~ समजा तो विविध समाजाच्या १३० नेत्यांनी सही करून आणलेला एकात्मतेच्या "हमीपत्रा" चा कागद गांधीजींच्यासमोर ठेवला आणि त्याचवेळी नेहरू आणि पटेल यांनी सांगितले असते की, जोपर्यंत पाक आपले घुसखोर सैन्य काश्मिर घाटीतून काढून घेत नाही तोपर्यंत आम्ही ते ५५ कोटी रुपये अडवून ठेवणारच ! अशावेळी तुम्हाला का वाटते गांधीजी असे म्हटले असते, "ठिक आहे, तुम्हाला वाटेल ते करा.... मला फक्त दिल्लीतील दंगलीची काळजी वाटत आहे, ती आता या हमीपत्रामुळे मिटली....मी आता उपोषण सोडतो." याला जर तुमचे उत्तर "होय. असे नक्कीच झाले असते..." तर मग हा वादच संपला. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 06/03/2010 - 09:49 नवीन
हो. आता वाद संपवूनच टाका. एक दुसरी घटना सांगतो. (गांधी चित्रपटाच्या स्क्रीनप्ले मध्ये आहे. त्याच्या सत्यतेबाबत इतर पुरावा आत्ता माझ्याकडे नाही). द. आफ्रिकेतील आंदोलनानंतर सरकारने कायदा मागे घेतला. त्यावेळी "पण यापुढील दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांच्या देशांतरावर - इमिग्रेशन- कडक निर्बंध घालण्याचा सरकार विचार करेल" अशी धमकी जनरल स्मट्स यांनी दिली. त्यावेळी गांधींनी दिलेले उत्तर असे. "इमिग्रेशन हा आमचा मुद्दा कधीच नव्हता. आता आम्ही वरचढ स्थितीत आहोत - पोझिशन ऑफ अ‍ॅडव्हान्टेज- म्हणून तो मुद्दा बनवण्याची आमची इच्छा नाही". (बैठकीनंतर गांधी तेथून निघून जात असताना जनरल स्मट्स आपल्या सहकार्‍याला - चित्रपटात- म्हणतात, "ही इज आयदर अ ग्रेट मॅन ऑर अ कोलोसल फ्रॉड") हे पाहता ज्या मुद्द्यासाठी उपोषण केले नाही त्याचा आग्रह गांधींनी उपोषण सोडण्यासाठी घेतला नसता असे दिसते. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
म
मिसळभोक्ता गुरुवार, 06/03/2010 - 09:57 नवीन
आपल्या लिखाणात इतके "जर तर", इतकी गृहीतके, आहेत की आपल्याला नक्की म्हणायचे आहे ते मला कळत नाही. तुम्हाला तरी नक्की कळते आहे का ? पण तरी देखील तुम्हाला, का कुणास ठावूक, मदत करावीसी वाटते आहे. (एक विनंती. सर्वसाक्षी, अथवा समंजस किंवा असेच इतर सदस्य आपापल्या छात्या फुगवून पुढे आलेत, तर त्यांना इतिहासाबद्दल आठवण करून द्याल का?) सो, नाऊ, मिष्टर इंद्र, मला कृपया दोन पत्रे दाखवा. एकः दिल्लीतील दंगल मिटली म्हणून गांधीजींनी उपोषण मिटवले असा पुरावा (तुम्ही सांगितले त्याप्रमाणे सौ. प्रतिभा रानडे ह्यांचे पत्र). दुसरे: श्री/सौ/कु इंद्र ह्यांनी छातीठोकपणे सांगितलेले हमीपत्र. (ही दोन्ही पत्रे तुमच्याकडे नाहीत, हे मला माहिती आहे. कारण... दोन्ही दाखवा मग सांगीन.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
म
मी ऋचा गुरुवार, 06/03/2010 - 11:26 नवीन
अवांतरः मिभो काका, तुमचे मुद्दे जर तुम्च्यापुरते स्पष्ट अहेत आणि ते इतरांनी समजुन घ्यावे अशी आपली इच्छा असेल तर तुम्ही ते योग्य शब्दात आणि इतरंच्या मुद्द्यांचा आणि इतरांचा योग्य मान राखुन सांगावे,तर तुमचे मुद्दे जास्त seriously विचारात घेतले जातील अन्यथा शायरीपेक्षा अन्दाज-ए-बयाँ जास्त लक्ष वेधतो आहे आणि चर्चेचे उद्दिष्ट गाठण्यापासुन आपण भटकतो आहे. इंद्रराज दादांचे मुद्दे निश्चितच अभ्यासपूर्ण आहेत पण त्याही पेक्षा त्यांची मुद्दे मांडण्याची पद्धत अतिशय सोबर आहे. त्यामुळे please let's try to maintain mutual dignity. मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... गुरुवार, 06/03/2010 - 11:41 नवीन
(कठीण आहे, पण तरी...) या मिभोला आवरा रे कोणीतरी !! बाकी इन्द्रा द टायगर यांच्या संयमाचे कौतुक वाटते. (त्यांनीही संयम सोडला, तर अजून मजा येईल.) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा
म
मी ऋचा गुरुवार, 06/03/2010 - 12:23 नवीन
=)) मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 06/03/2010 - 12:48 नवीन
श्री. नितिन थत्ते म्हणतात ~~~ "हो. आता वाद संपवूनच टाका."... तर मी हे इथे मान्य करीत आहे.... कारण दोन्ही धाग्यात ("सावरकर" आणि "महात्मा") चर्चेची जी काय घागर घुमली आहे ती आम्हा दोघांमुळे असे मी व्यक्तीशः मानतो, त्यामुळे श्री.थत्ते यांनी या क्षणापर्यंत दाखविलेल्या संयमाचा आदर राखून इथे पूर्णविराम घेत आहे. धन्यवाद...!! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु गुरुवार, 06/03/2010 - 13:49 नवीन
भावे - अत्रे वाद.. अत्रे-फडके वाद.. अत्रे-ठाकरे वाद.. ठाकरे-पु.ल वाद अश्या एकसेबढकर एक वाद इतिहास असलेल्या मराठी साहित्यक्षेत्रातला थत्ते-पवार हा अजून एक वाद संपला.. ;) --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी गुरुवार, 06/03/2010 - 14:12 नवीन
मराठी साहित्यक्षेत्रातला थत्ते-पवार हा अजून एक वाद संपला. अरेरे.... म्हणजे आता परत नव्या झाडाच्या शोधात निघावे लागणार.... दुर्बिणीतून अशी लांबची झाडे लगेच दिसतात म्हणे... कुणाला दिसले तर कळवा रे.... आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
व
वेताळ गुरुवार, 06/03/2010 - 14:16 नवीन
बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल,हा त्याचा बाणा आवडला. मिभो काकांच्या लिखाणातुन स्पष्ट होते आहे कि त्याना अमेरिकेतील कोर्टकचेर्‍याचा खुप अनुभव आहे व त्याच्या अश्या विरजण घालण्याचा फटका देखिल पडला असावा असे वाटते. :\ त्यामुळे इतरानी संभाळुन राहवे. वेताळ
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 06/03/2010 - 14:19 नवीन
थत्ते-पवार असा काहीच वाद नव्हता असे वाटते. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
र
रामपुरी गुरुवार, 06/03/2010 - 23:18 नवीन
तो थत्ते-पवार वाद नव्हता तर "७ महिने अमेरीकन नागरीक" - पवार वाद होता :) :). प्रतिसाद गुणिले १००० $ (की आणखीन जास्त???) एवढं प्रचंड नुकसान झालंय या वादातून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
आ
आनंद गुरुवार, 06/03/2010 - 15:03 नवीन
खालच्या साइट वर व्ही. कल्याणम , पर्सनल सेक्रेट्र्री महात्मा गांधी यांनी गांधीजीच्या शेवटच्या दिवसा विषयी लिहीतात... http://www.mkgandhi-sarvodaya.org/last%20days/glastday.htm Bomb Explodes at Gandhiji’s Prayer Meeting There was a bomb explosion at the prayer meeting on 20 January. Madan Lal, the Punjabi refugee had thrown a bomb, but it didn’t hit him. A wall was broken that’s all and Gdhi never thought somebody had come to kill him. Gandhiji had undertaken a fast against the Government of India’s decision to hold back payment of Pakistan’s share of the cash balances (Rs. 50 Cr) due to them on the ground that Pakistan had connived with the Afridi tribesmen to invade and occupy Kashmir. To save Gandhiji’s life, the government relented and released the amount. Fundamentalist Hindus were infuriated by Gandhiji’s tactics and felt that he was appeasing Muslims to the detriment of the Hindu community. The bomb incident referred to was a consequence of this बाकी काही बोलायसारख राहयलच नाहीय. --आनंद
  • Log in or register to post comments
S
sagarparadkar गुरुवार, 06/03/2010 - 15:14 नवीन
अहो आनंद साहेब, हा प्रतिसाद आधीच नाही का देवून टाकायचा? उगाचच मजा बघत बसता का राव? तरी सुद्धा, कल्याणम हे जरी गांधीजींचे पर्सनल सेक्रेट्र्री असले (पुरावा काय?) तरी गांधीजी त्यांच्याशी सहमत असतीलच असे नाही ... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद
न
नितिन थत्ते गुरुवार, 06/03/2010 - 18:36 नवीन
=)) =)) =)) अहो ती सगळी कल्याणम यांनी सांगितलेली The bomb incident referred to was a consequence of this या वाक्याची पार्श्वभूमी आहे. असो. १. कल्याणम हे गांधींचे सेक्रेटरी होते हे खरे आहे. २. पुन्हा एकदा...... गांधींचे म्हणणे काय याविषयी सेक्रेटरींचे म्हणणे आणि गांधींचे स्वतःचे म्हणणे यात तफावत असेल तर कोणाचे म्हणणे ग्राह्य? (अवांतर: जब बच्चा बच्चा जानता है की ते ५५ कोटी रुपये होते...श्री. कल्याणम ५० कोटी का म्हणताहेत बरे? त्यांच्या स्मरणात काही चूक असेल का?) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 06/03/2010 - 20:10 नवीन
जरी दोन्ही मुद्दे ग्राह्य धरले तरी हा नवा पुरावा मला अचंबीत तर करतोच शिवाय पुन्हा एकदा माझ्या मतावर विचार करायला भाग पाडतोय. याबद्दल शंकानिरसन करण्यासाठी मी त्या वेबसाईटवर दिलेल्या पत्त्यावर इमेल केला आहे. बघु काय प्रतिसाद येतो ते. तो पर्यंत ह्या पुराव्यामुळे मी तुर्तास माझे जुने मत सोडून तटस्थते पर्यंत येत आहे. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
आ
आनंद गुरुवार, 06/03/2010 - 20:52 नवीन
श्री कल्याणम् ८८ वर्षाचे असुन अजुन एक्टीव आहेत.(मार्च २०१० पर्यंतचा रेफ.) त्याच्यांशी संपर्क साधता येतोय का ते बघतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा