कलादालन

काही सुन्दर आणि चवदार प्राणि

Primary tabs

Image removed. Image removed. Image removed.
शुचि

हिरवं आणि खोबरं परतून केलेलं वाट्ण घालून केलेला रस्सा मला खूप आवडतो. मला नेहेमी लाखेचे खेकडे (प्रेग्नंट खे़कडीण बाया) येतात. खूप खूप आवडते लाख.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पंगा

तसे असेल तर क्रुर प्रकार आहे...

(हा प्रकार खाऊन बघितलेला नाही, एकंदरीतच खेकडे खाण्याबाबतीत फारशी गती नाही, पण...)

खेकडीण आणि तिची अंडी वेगवेगळी करून खाण्यापेक्षा हे नेमके कसे वेगळे आहे ते कळले नाही. त्यामुळे नेमका आक्षेप कळला नाही.

(खेकडिणीची अंडी खाणे हा क्रूर प्रकार आहे का? प्रेग्नंट नसलेली खेकडीण खाणे हा क्रूर प्रकार आहे का? खेकडिणीने अंडी घातल्यानंतर ती अंडी आणि आता प्रेग्नंट न राहिलेली ती खेकडीण वेगवेगळी खाणे हा क्रूर प्रकार आहे का? यात आणि खेकडिणीने अंडी घालण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदर तिला अंड्यांसकट खाण्यात नेमका काय फरक आहे? दहा मिनिटे अगोदर? दोन दिवस अगोदर? यातला नेमका कोणता भाग क्रूर आहे? नेमक्या कोणत्या क्षणापूर्वी तो क्रूर नसतो? नेमक्या कोणत्या क्षणी तो क्रूर होऊ लागतो? नेमक्या कोणत्या क्षणानंतर तो हळूहळू पुन्हा क्रूर होईनासा होतो?)

- पंडित गागाभट्ट.

असं म्हणूया की त्या खेकडीणीचं डोहाळजेवण झालं असेल तर तिला मारणं हा क्रूरपणा आहे अन्यथा नाही.

पंगा

...गर्भाधान?

'आयुष्याची सुरुवात नेमकी कधी होते' या प्रश्नाशी याचा निकटचा संबंध आहे.

- ('चॉइस'वादी) पंडित गागाभट्ट.

धमाल मुलगा

हे गल्ली चुक्कलं काय वो???

ओ मामा... उपक्रम तिकडं हाय..पल्याडल्या विंडोत.. =))

एक

अगदी हेच म्हणणार होतो..

तिकडे फक्त चर्चेत रस असणारे रिकामडेकडे बरेच आहेत..

शिल्पा ब

आणि इकडे फक्त कंपूबाज, भोपळा बियासाहित खाणारे क्रूर लोक आहेत....(असं तुम्हाला म्हणायचं आहे का?)

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा

.

शुचि

माशाची, खेकड्याची लाख मस्त लागते. क्रूर काय त्यात? तू नाही खाल्लीस? :? :) .... खा के देख एक बार ;)
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शिल्पा ब

गर्भार बाईला त्रास देणे, हल्ला करणे किंवा मारणे या इतकेच कोणत्याही गर्भार प्राण्याला मारून खाणे क्रूर असे माझे मत...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा

खूप खूप आवडते लाख.

लाख बोले तो? 'खेकडा कॅवियार'??? :? ;)

- पंडित गागाभट्ट.

मीली

फोटो भारी आहे खेकड्याचा! डेंजर दिसतो म्हणून खावासा वाटत नाही.
बाकी कॅनॉन का जवाब नाही ! :)

मीली

चतुरंग

अतिशय शार्प फोकस! वा, दिलखूष!! :)

चतुरंग

शुचि

पहीला गुटगुटीत खेकडा पाहून तोंडाला फक्त चळचळून पाणी सुटतय. २रा खेकडा ठीक आहे. ३ रा " बुवा कूSSक" करतोय

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

टारझन

पहीला गुटगुटीत खेकडा पाहून तोंडाला फक्त चळचळून पाणी सुटतय.

अच्छा ... हे वाक्य वाचुन सगळ्या गुटगुटीत प्राण्यांचे डोळे पाणावले असतील =))

- (मुक्त)किडकिडीत

सहज

खाल्ला पाहीजे लवकर :-)

टारझन

अश्लिल .... अश्लिल .... असं मी नाय तो चड्डीवाला टिंग्या ओरडत होता , आयच्यान ..

- मतिस मुंग्या

दत्ता काळे

विषय ( शिर्षक ) अगोदर वाचलेला असल्याने, फोटोतले हे सुंदर प्राणी खरं कां खावेत ? असा मनात सहज प्रश्न निर्माण झाला. पण त्याला काही इलाज नाही.

गुलाबाची सुंदर रसरशीत गुलाबी फुले रोपांवर तशीच न ठेवता खुडून त्याचे गुलकंद करुन खावे हा व्यवहारी विचार कधी कधी पटंत नाही.

आमच्या एका शीख मित्राने मोर मारून खाल्ल्याचे वर्णन केले होते. ऐटदार, पिसारेबाज मोर पार पिसे उपटून, सोलून, उघडा-वाघडा करून खाल्ला, ह्याचे रसभरीत वर्णन ऐकल्यावर जरावेळ वाईट वाटले होते.

जिन्क्स

आमच्या एका मित्राने बर का, भोपळा..हा असा सुन्दर गोल मटोल भोपळा...असा क्रुरतेने शेतातुन उपसुन कढला. त्याला कराकरा कापला आणि खाउन ही टाकला ओ...काय म्हणु मी ह्या क्रुरतेला...डोळे पाणावले माझे

शुचि

काय सांगता??? भोपळा?? अरेरे ....... फार सुंदर दिसतो तांबडा भोपळा : ( ...... वाईट झालं. कसा कापवतो कराकरा? अमानुषतेचा परमावधी.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पंगा

तांबडा भोपळा नुसता कराकरा चिरला तर ती क्रूरता नव्हे. तांबडा भोपळा कराकरा चिरून त्यातील बियांसहित शिजवून खाल्ला, तर ती क्रूरता.

- (क्रूर) पंडित गागाभट्ट.

पांथस्थ

तांबडा भोपळा कराकरा चिरून त्यातील बियांसहित शिजवून खाल्ला

बिया नीट शिजल्या तर ठिक नाहि तर यायच्या तश्याच बाहेर =))

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

पंगा

तरीही ती क्रूरताच. स्वतःवर.

- पंडित गागाभट्ट.

नाना बेरके

आमच्या एका शीख मित्राने मोर मारून खाल्ल्याचे वर्णन केले होते. ऐटदार, पिसारेबाज मोर पार पिसे उपटून, सोलून, उघडा-वाघडा करून खाल्ला, ह्याचे रसभरीत वर्णन ऐकल्यावर जरावेळ वाईट वाटले होते. .. बाकी आमचेही डोळे पाणावले. हल्ली डोळ्याची साथ आहे म्हणे. एकामागोमाग एक . . . . . .मग आमचे डोळे कसे सुटतील त्याच्यातून ..?

चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके

धमाल मुलगा

_/\_
काय अँगल लावलाय...काय मॅक्रो सेट केलाय, काय ती नजर है बाप्पा!
ओ किल्लेदारसाहेब,
कधी येऊ बोला जेवायला? :D

अवांतरः हे फोटो तुम्ही काढले आहेत? ज ह ब ह र्‍ह्या आले आहेत सायबा. :)

कधी येऊ बोला जेवायला?
न्या न्या आमच्या धम्याला जेवायला हल्ली अंमळ कृश झालाय तो सारख सारख हाटेलातल खावुन जरा पौष्टीक घरचे पदार्थ तरी खाईल तो ;) ;)
______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम

मंग या आमच्या गरिबाच्या राजमहाली गावठी कोंबड॑ कापु तुर्‍यावाल
कस्स?
मस्त रस्सा आणि सुक चिकन करु या

______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम

विकास

फोटो आणि फोकस एकदम मस्त आहे!

मी कधी हा प्रकार खाल्लेला नाही जरी त्याचा लांबचा/जवळचा भाऊ (आणि आमच्या बाजूच्या राज्यातील स्पेशल खाणे) खाल्लेले असले तरी:

बाकी शिर्षक आणि थोडीफार "चर्चा" वाचल्यावर खालील विनोद आठवला:

एकदा एका अरण्यातील टोळी/जमावामधे काम करणारा एक मिशनरी/पाद्री मरतो. ते कळल्यावर पोप एका नवीन पाद्र्याला त्याचा प्रतिनिधी म्हणून तेथे पाठवतो. त्याचे त्या जमावातील म्होरके स्वागत करतात आणि टोळीप्रमुखाकडे घेऊन जातात.

त्या प्रमुखाला हा पाद्री, पोपने दिलेल्या भेटवस्तू भेट म्हणून देतो. त्याचा स्विकार वगैरे झाल्यावर, हा पाद्री काही तरी संवाद चालू करायला म्हणून विचारतो, "माझा आधीचा बांधव (पाद्री/मिशनरी) कसा होता?" त्याला तात्काळ उत्तर मिळते, "चवदार" :O

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

शुचि

रात्री दारू पिऊन झिंगलेला खेकडा गुपचूप येऊन झोपतो. सकाळी खेकडीण म्हणते "झेपत नसेल तर येवढी प्यावी कशाला म्हणते मी... काल रात्री सरळ चालत घरात शिरलात" [(

एक

खेकडा हा प्रकार एकदाच खाल्ला. अगदी अस्सल सिकेपी रेसेपी चा खाल्ला..

भयंकर आवडला..पण..

तिकडेच गोची झाली..जीभ सोडून बाकी सगळ्या शरिराला अ‍ॅलर्जी आली आणि इथे खाजवू का तिथे खाजवू असे ७ दिवस तळमळत काढले..

काही काही गोष्टी नशिबातच असाव्या लागतात!!

आशिष सुर्वे

किल्लेदार भाऊ.. अगदी 'खिंडीत गाठून' फोटू काढल्यागत् वाटतोय.. झ्याक!!
तुमच्या 'कॅनन' समोर एकदम स्तब्ध झाल्यागत वाटतोय खेकडा लेकाचा!!

हा प्राणी मी कधी खाल्ला नाही पण खेकड्याचे कालवण खाऊन सर्दी पळवता येते असे गावाला ऐकले होते ब्वा!

धम्या, सर्दी झाली तर्र कोकणातल्या आमच्या गावी ये बर्र का.. मस्त चुलीवर बनवलेलं गरमागरम 'खेकड्याच कालवन' भुरकायला देऊ.. बरोबर मस्त तांदळाची भाकर*.. आणि भाजून तिखट-मीठ लावलेला कोलीम!!

काय? पाणी सुटलं का? (नाका)तोंडातून.. :)

*आजीची जाम आठवण आली बघ..
======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

किल्लेदार

मी Canon 450D (18-55mm आणि 50mm 1.8 lenses) वापरतो.
100 mm Macro घ्यायला आवडेल. कोणाकडे आहे का हे लेन्स ? :)