Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धागा का उडाला ?

ट
टारझन
Wed, 06/09/2010 - 18:26
🗣 71 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5229 वाचन

💬 प्रतिसाद (71)
I
II विकास II Wed, 06/09/2010 - 18:31 नवीन
टारझनशी सहमत. तो धागा म्हणजे निखळ मनोरंजन होते. नेहमीच जड जड चर्चा वाचल्यावर उतारा म्हणुन ठिक होता. धागा उडवल्याचा बघुन वाईट वाटले. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
I
II विकास II गुरुवार, 06/10/2010 - 07:49 नवीन
मिसळपावच्या धोरणाप्रमाणे संपादक उत्तर देण्यास बांधील नाहीत मात्र त्यांची इच्छा असेल तर ते तसं करू शकतात त्याच सोबत ज्यांचे लेखन अप्रकाशित केले आहे त्यांना कारण माहिती करून घेण्याचा हक्कं आहेच. त्या करीता लवकरच स्वतंत्र दालन केले जाईल. मात्र तो पर्यंत व्य. नि. चा वापर करावा ही विनंती. सरपंचांना व्य. नि. केल्यास त्याची दखल घेतली जाईल. तसेच या लेखाच्या शेवटच्या दोन ओळी काढल्या आहेत. संपादकांना सदस्यांनी खुलासा मागणे अपेक्षीत आहे. जाब नाही ! लेखाला किंवा व्य.नि. ला दिले जाणारी उत्तरे तसेच सर्व संपादकांची कामे मिसळपावबद्दल आणि सदस्यांबद्दल उत्तरदायीत्व वाटतं म्हणून केलं जाणारं काम आहे. == सदस्यांचा हक्क मान्य झाला ही एक मोठी गोष्ट आहे. धन्यवाद मिसळपाववर जवळपास सर्वच एकमेकांना ओळखतात. त्यामुळे सौम्य शब्दांत सुध्दा आपले म्हणने मांडता येते. नव्हे तसेच अपेक्षीत आहे. सोबतच कुणी आपल्या लेखनाच्या बाबतीत खुलासा मागीतल्यास त्याला उत्तर मिळतेच. लवकरच स्वतंत्र दालन अश्या प्रकारच्या संपादकीय कामांसाठी केले जाईल तो पर्यंत कृपया संयमाने लेखन करावे. == +१ ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/17/2010 - 15:33 नवीन
काय गडबड आहे रे? नीलकांता.. माझं ऐक. चपला दाखव बिनधास्त! ;) अवांतर - आज हे सगळं वाचत असताना माझ्यावर आता कोणतीही जबाबदारी नाही याचं बरं वाटलं..:) स्वगत: कर्ज फिटल्यावर नवीन संस्थळ जेव्हा केव्हा काढेन तेव्हा "संस्थळाच्या धोरणांविषयी, संपादकीय/व्यवस्थापकीय कारवाईविषयी, धागे/प्रतिसाद उडवण्यासंबंधी इथे कोणतीही चर्चा करण्यास पूर्णतः बंदी आहे!" असं स्पष्ट धोरण राबवलं पाहिजे..! :) (माजी आणिबाणीचा शासनकर्ता) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
ट
टारझन गुरुवार, 06/17/2010 - 15:48 नवीन
काय तात्या ? बर्‍याच दिवसांनी ? बाकी तुमचा तो धागा कुठे गेला हो ? मुखपृष्ठावरचं तुमचं लिखाण काढुन फुटबॉल चं लिखाण टाकल्याबद्दल तुम्ही ज्यात आकांडतांडव केला होता ? मस्त लिहीलं होतं तुम्ही ... आता सापडत नाहीये :) (आजी माजी मालकांच्या बायको चा भाऊ ... पुढचं लिहायलाचं हवं का ? ) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सुधीर१३७ Wed, 06/09/2010 - 18:37 नवीन
धागा............. कच्चा असावा बहुधा, म्हणून तुट्ला असेल.............. .......जाऊ द्या ना टारझनराव............... कशाला एवढे मनाला लावून घेताय.............??????? .............परत एकदा टाका, एकदम पक्का धागा........... =)) 8} अरे हो, एक विसरलोच ...... ......तुमच्याशिवाय पण आणखी कोणाला तरी कर्तव्य असेल, उगाच स्पर्धा नको म्हणून उडवला असेल हो........ (शांत) सुधीर
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 06/09/2010 - 19:15 नवीन
.तुमच्याशिवाय पण आणखी कोणाला तरी कर्तव्य असेल, उगाच स्पर्धा नको म्हणून उडवला असेल हो........ आमच्या कर्तव्याचा धागा पण उडवला...आता टारझन मुली शोधतोय आणि मी मुलगे...त्यात स्पर्धा कशी आली? दोघे एकाच गोष्ट शोधात असते तर स्पर्धा (असं आम्हाला वाटतं). बाकी एखादी कॉमेंट टाकून "शांत" म्हणायच हे फार्फार आवडून गेलं. :-) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर१३७
श
शिल्पा ब Wed, 06/09/2010 - 19:06 नवीन
सहमत आहे. फारच वाटत होते तर धागा काढल्यावर लगेचच " मिपावर असे धागे काढायला मनाई आहे " असे सांगून काढायचा होता...इतक्या लोकांनी प्रतिसाद दिले, गम्मत आणि विरंगुळा म्हणून...ते तुम्ही काही कारण न देता उडवता हे फार झाले. जर कोणाला असे "उथळ " (अशा कॉमेंट देणार्या विद्वानांची समज आणि जाण वेळोवेळी दिसतेच हा भाग वेगळा) धागे बघायचे नसतील तर नका उघडू...काही अक्षेपार्ह्य उदा. अश्लील, व्यक्तिगत चिखलफेक असेल तर सूचना देऊन धागा काढावा अन्यथा नाही. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 06/10/2010 - 04:12 नवीन
सर्वप्रथम इतक्या उशीरा (रात्री ९:४० बॉस्टन वेळ, सकाळचे ७:०० भारतीय प्रमाण वेळ) प्रतिसाद देत असल्याबद्दल क्षमस्व. आज मी आत्तापर्यंत जालावर काही बघू शकलो नव्हतो... मधे एकदा घरून फोन आला होता पण घरी येई पर्यंत थांबावे लागले. असो. हा धागा मी जेंव्हा प्रकाशीत झाला तेंव्हाच वाचला. जरी खटकला तरी दुर्लक्ष करण्याइतकाच आणि तसेच केले. खटकायचे एक कारण हे स्वतःची खरेच चांगली असलेली मिष्कील प्रतिभा ह्याहूनही चांगल्या पद्धतीने वापरता आली असती तशी वापरली गेली नाही... त्याशिवाय मधे मिपावर जो काही प्रचंड गदारोळ झाला, त्याच्या पाठोपाठ मुखपृष्ठावरून पण गदारोळ झाला, त्याच सुमारास "सत्तांतर" झाले. त्यानंतर मिपाव्यवस्थापनाला पाठींबा देत सर्वांनी सहकार्य देण्याचे ठरवले. मिपाचा खमंगपणा न घालवता त्यात जर नको ते रस येत असतील तर ते आणायचे नाहीत हे कुठेतरी सर्वांना वाटत आहे असे वाटले. पण त्या सहकार्य देण्याला यातून छेद मिळेल असे वाटले. तरी पण दुर्लक्ष करून चालेल असे म्हणले आणि तसेच केले. मात्र माझ्या सकाळी जेंव्हा मी उठून परत पाहीले तर परत अजून एक तसाच धागा. कुठतरी असे वाटले की आपण घसरगुंडीवर बसलो की खालीच जाणार असे तर होत नाही ना? व्यक्तीगत, हे संपादनाचे हत्यार मी अतिशय मोजून वापरले आहे आणि तसेच इथल्या इतर संपादकांनी देखील मोजूनच वापरलेले आहे. म्हणून जे संपादकांचे अधिकार मी व्यक्तीगत अतिशय कमी वापरतो, ते तात्काळ वापरले. मला कल्पना होती की यातून गदारोळ होईल आणि काहीतरी "काथ्याकूट" होईल. तसा झालाही. मला नेमका उशीर झाल्याने या चर्चेत लवकर उडी मारता आली नाही... त्याव्यतिरीक्त माझा एक अंदाज चुकला असे आता मागाहून विचार करताना वाटते. हा काथ्याकूट एकंदरीतच केवळ माझे/आमचे धागेच का अप्रकाशीत केले यासंदर्भातच मर्यादीत राहीला आहे. ही चर्चा याहूनही अधिक होऊ शकली असती: यात नक्की बँडविड्थ कशाला वापरतोय, त्यातून क्रियाप्रतिक्रीया करताना काय धागे निघतात. संपादकांना काय बोलले जाते? अवांतर प्रतिक्रीया देताना लेखाची/काथ्याकुटाची खरडवही केली जाते, हे सगळे न करता देखील sense of humor वापरता येणार नाही का? दुसरा भाग आहे तो संपादकांनी सांगावे न सांगावे या संदर्भात. हा मुद्दा याच लेखाच्या संदर्भात न येता कायमच यावा आणि सर्वच संपादकांनी पुढे कशाचेही संपादन करताना पाळावा. आत्ता पर्यंत झाले नाही तरी यापुढे असे करता येईल. पण ते संपादक आपापसात ठरवतील. तरी देखील यात अमुक सांगावे, तमुक नाही, असभ्यपणा वगैरेचा सूर का? असे इतर संस्थळांवर चालते का? (आणिबाणीयुक्त) लोकशाहीच्या नावाखाली आपण निव्वळ हक्क मागत, जबाबदारीकडे दुर्लक्ष करण्याची सवय तर लावून घेतलेली नाही ना? इतकी मागणी स्वतःच्या नगरसेवका/आमदारा/खासदाराकडे तरी आपण करतो का? जो जनतेचा खर्‍याअर्थाने सेवक असतो, जनतेचे पैसे घेतो आणि वाटोळे देखील करतो? परत सांगतो की हे दोन्ही टिपी धागे अप्रकाशीत करताना कुठेतरी नक्की चर्चा अशी आशा होती. याचा अर्थ सर्व गंभिर, वातूळ हवे असा नक्कीच नाही. यात व्यक्तीगत काहीच नव्हते. (तसे मी आजपर्यंत या दोघांचाही कुठेच प्रतिसाद देखील उडवलेला नव्हता, धागा लांब राहूंदेत). जरी अशी चर्चा आत्तापर्यंत झाली नाही तरी त्यातून काही सक्रीय निष्पन्न झाले तरी मिळवले. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
स
सहज गुरुवार, 06/10/2010 - 05:17 नवीन
मिपावर लोक वेगवेगळ्या कारणाकरता येतात. त्यांची मते वेगवेगळी असतात. थट्टामस्करी, माहीती आदानप्रदान होत असते. मिपावर तुलनेत कमी संपादकीय बडगा असतो. बरेचदा प्रतिसादातुन "काय चाललेय सध्या मिपावर असा सूर" नियमीत वाचकांच्याकडून निघत असतो. एखादा धागा एका संपादकाला चालून जातो तर दुसर्‍या संपादकाला चालेलच असे नाही. पण संपादकाला अधिकार दिला आहे तर त्याला जाब विचारायचा हक्क खाजगी संस्थळाच्या मालकालाच आहे अन्य कोणाला नाही असे माझे मत. ह्या धाग्यातुन फक्त टारझन यांचा धागा कोणी व का उडवला ह्या पलीकडे, हे असे का? धाग्यांच्या पलीकडे.. सर्वांची जबाबदारी इ गोष्टींचा उहापोह व्हावा असे वाटत आहे. एका मर्यादेत तसा झालेला दिसतोय. पण एक आक्षेपार्ह बाब दिसली ती म्हणजे की संपादक कोणाला बांधील नाहीत हे जगजाहीर असुन संपादकात होणारी "तो मी नव्हेच" खुलासा द्यायची धडपड. ती कोणी केली व कोणी त्याची री ओढली हे ज्या त्या संपादकाची जाण वगैरे वगैरे.. असो किमान आपल्यात १०० विरुद्ध ५ म्हणणारे कौरवपांडव इतरांविरुद्ध आपण १०५ म्हणतं. इतके तरी यापुढे लक्षात ठेवलेत तरी बरे. याबाबत मला खरच उपक्रम आवडते टुकार धागे कृपया अनुल्लेखाने मारा. संयम बाळगा. संपादकांचा निर्णय मान्य करुन जस्ट गो ऑन. उगाच स्वताचा इगो कुरवाळत बसु नका. फारतर पुढच्यावेळी अजुन कल्पक धागा काढा / टिका करा. जाताजाता: टारू ग्रो अप. पुन्हा तक्रारसूर काढू नकोस. तुझे सामर्थ्य लक्षात घे. तुझ्या धाग्याचा टिआरपी जुन्या प्रस्थापीत राव, साहेबांपेक्षा जास्त आहे. तर आता फक्त क्वालीटी बघ. तुझे प्रत्येक अगदी रास्त आक्षेप मिपावर लगेचच्या लगेच प्रकट झालाच पाहीजे असे नाही. तुला वाटणार्‍या प्रत्येक टुकार धाग्या, मतावर जशास तसे केले पाहीजेच नाही. किमान तुझा आक्षेप आधीक प्रभावी पद्धतीने होइल असे बघ. तक्रारधागा त्यावर उपाय नक्किच नाही. संपादकांनी आपापसात संवाद ठेवावा. कोणी कुठला धागा उडवला तर किमान आपापसात सांगून उडवावा व धागालेखकाला एक पोच द्यावी. नियमावलीत धागा उडवला तर कळवू पण त्यावरुन जाहीर चर्चा, संपादकांना धमक्या, त्रास, खरडी इं ना मनाई आहे लिहावे. हे खाजगी स्थळ आहे व ह्या नियम, अटींवर सदस्यत्व स्वीकारत आहात हे सदस्यांना जाणवून द्यायची वेळ आली आहे. जसे सदस्य संस्थळांकडून अपेक्षा (हक्क असल्यासारखे) ठेवतात तसे संस्थळ व्यवस्थापनदेखील सदस्यांकडून अपेक्षा ठेवते हे पुन्हा अधोरेखीत करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
I
II विकास II गुरुवार, 06/10/2010 - 05:30 नवीन
एखादा धागा एका संपादकाला चालून जातो तर दुसर्‍या संपादकाला चालेलच असे नाही. पण संपादकाला अधिकार दिला आहे तर त्याला जाब विचारायचा हक्क खाजगी संस्थळाच्या मालकालाच आहे अन्य कोणाला नाही असे माझे मत. == असहमत, संकेतस्थळ म्हणजे मालक आणि एक सर्व्हरवर होस्ट केलेले डोमेन नसते. त्यात सदस्यांनी पण काही तरी योगदान दिलेले असते. संपादकाना जाब विचारण्याचा हक्क सदस्यांना नक्कीच आहे. फक्त तो योग्य मार्गाने विचारला जावा. नाहीतर संकेतस्थळ म्हणजे हुकूमशाही अंतर्गत लोकशाही आहे असे वाटु लागायला वेळ नाही लागत. आणि संपादक होण्यासाठी सुध्दा काहीतरी अर्हता असावी असे वाटते. आंतरजालिय राजकारणात सहभागी असलेल्या लोकांना संपाद्क नेमु नये असे वाटते. (ही मते माझी व्यक्तीगत आहे, कोणा संपादकाबद्दल नाहीत.) नियमावलीत धागा उडवला तर कळवू पण त्यावरुन जाहीर चर्चा, संपादकांना धमक्या, त्रास, खरडी इं ना मनाई आहे लिहावे. हे खाजगी स्थळ आहे व ह्या नियम, अटींवर सदस्यत्व स्वीकारत आहात हे सदस्यांना जाणवून द्यायची वेळ आली आहे. जसे सदस्य संस्थळांकडून अपेक्षा (हक्क असल्यासारखे) ठेवतात तसे संस्थळ व्यवस्थापनदेखील सदस्यांकडून अपेक्षा ठेवते हे पुन्हा अधोरेखीत करावे. == धागा उडवण्यापेक्षा त्या धाग्यावर प्रतिक्रिया देणे बंद करुन दुसर्‍या पानावर नेता येईल काय? ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मदनबाण गुरुवार, 06/10/2010 - 05:35 नवीन
मिपावर तुलनेत कमी संपादकीय बडगा असतो. १००% सहमत. याचाच गैरफायदा कोणीही घेऊ नये. पण संपादकाला अधिकार दिला आहे तर त्याला जाब विचारायचा हक्क खाजगी संस्थळाच्या मालकालाच आहे अन्य कोणाला नाही असे माझे मत. पुन्हा १००% सहमत. पण एक आक्षेपार्ह बाब दिसली ती म्हणजे की संपादक कोणाला बांधील नाहीत हे जगजाहीर असुन संपादकात होणारी "तो मी नव्हेच" खुलासा द्यायची धडपड. ती कोणी केली व कोणी त्याची री ओढली हे ज्या त्या संपादकाची जाण वगैरे वगैरे.. हो हे मात्र जाणवलं आणि समजल देखील !!! हा चक्क भित्रेपणा वाटला मला... असो. मागे एका संपादकाने या धाग्याच्या लेखकास मोकळीक दिल्याचे लिहले होते तेव्हा मला नवल वाटले होते, असो... टुकार धागे कृपया अनुल्लेखाने मारा. संयम बाळगा. संपादकांचा निर्णय मान्य करुन जस्ट गो ऑन. उगाच स्वताचा इगो कुरवाळत बसु नका. फारतर पुढच्यावेळी अजुन कल्पक धागा काढा / टिका करा. >>>अगदी माझ्या मनातले विचार... सर्व संपादकांना नम्र विनंती :--- आता हा धागा चघळला जातोच आहे म्हणुन ही विनंती... संपादक सोडुन कोणालाही लाल रंगात प्रतिक्रिया देण्यास मनाई असावी. तसेच बर्‍याच वेळी अश्लिल प्रतिक्रिया देण्यार्‍यावर करडी नजर ठेवावी म्हणजे अशा व्यक्तींना कधी श्लीलतेचे पांघरुण ओढता येणार नाही. (मिपा प्रेमी) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
श
शिल्पा ब गुरुवार, 06/10/2010 - 06:30 नवीन
तुमची मते पटली...आणि हेसुद्धा १००% मान्य आहे कि माझा कोणताही प्रतिसाद उडविला नाही...(एक उपप्रतिसाद होता पण तो उडण्यासारखाच होता..). असो. मी तो धागा केवळ एक गम्मत आणि खरतर एकाच विषयाचे ३-३ धागे निघत होते त्यामुळे साधारण भाषेत ज्याला खवटपणा म्हणतात त्या हेतूने काढला होता. फक्त माझे मत एवढेच कि जर तुम्हाला काही आक्षेपार्ह्य वाटले तर कृपया धागा लेखकाला/किला कमीतकमी एखादी खरड अथवा व्य.नि. ने सूचना द्यावी कि तुमचा अमुक अमुक धागा/ प्रतिक्रिया उडविली जात आहे....प्रत्येकाला ते काय लिहितात याची जाण असते असे मला वाटते, त्यामुळे जर खरोखरच उडण्यासारखे लिखाण असेल तर कोणी आक्षेप घेणार नाही पण त्यांचा मते नसेल तर ते त्याबाबत चे स्पष्टीकरण देऊ शकतील. कृपया या सूचनेचा विचार व्हावा. अवांतर: फक्त स्पष्ट करण्यासाठी, कि मी कोणालाही कधीही कसलीही धमकीवजा भाषा वापरली नाही. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
य
यशोधरा गुरुवार, 06/10/2010 - 07:54 नवीन
विकास, तुमचे उत्तर खूप आवडले. एकदम संयत भाषेत दिले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पिवळा डांबिस Wed, 06/09/2010 - 18:37 नवीन
टारझनशी मी ही सहमत आहे. आणि लेखकाला न कळवता असा परस्पर धागा नाहीसा करणं हे जास्त दुर्दैवी आणि असभ्य आहे असं मला वाटतं...
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 06/10/2010 - 08:18 नवीन
+१ सहमत आहे. अनेकदा खरोखर काहीही कारण नसतांना प्रतिक्रियाही अप्रकाशित केल्या जातात, संपादित केल्या जातात. लेखन न करण्याचा, प्रतिसाद न देण्याचा पर्याय असतो असे सुनावले जाईल, ऐकायची तयारी आहे. पण एकंदरीतच पक्षपातीपणा खुप आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. असो. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
I
II विकास II गुरुवार, 06/10/2010 - 08:20 नवीन
>>पण एकंदरीतच पक्षपातीपणा खुप आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. पक्षपातीपणा आहे पण तो खुप आहे असे अजुन तरी मत नाही. शक्य त्या ठिकाणी पारदर्शकता यावी ह्या मताचा मी आहे. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया गुरुवार, 06/10/2010 - 08:35 नवीन
>>>पक्षपातीपणा आहे पण तो खुप आहे असे अजुन तरी मत नाही. प्रत्येकाचे मत भिन्न असु शकते. कधीही कोणतेही लेखन न करणा-या व्यक्तीचे लेखन संपादित होणारच नाही, उडणार नाही. अशी व्यक्ती संपादकांना देव मानणे शक्य आहे. >>>शक्य त्या ठिकाणी पारदर्शकता यावी ह्या मताचा मी आहे. शक्य त्या ठिकाणी कशाला ? सर्वच ठिकाणी यावी. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
I
II विकास II गुरुवार, 06/10/2010 - 08:50 नवीन
शक्य त्या ठिकाणी कशाला ? सर्वच ठिकाणी यावी. == खाजगी संकेतस्थळावर सर्वच ठिकाणी पारदर्शकता येईल असे वाटत नाही. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया गुरुवार, 06/10/2010 - 08:53 नवीन
>>>खाजगी संकेतस्थळावर सर्वच ठिकाणी पारदर्शकता येईल असे वाटत नाही. तुम्ही संपादक, मालक किंवा व्यवस्थापकांचे प्रतिनिधी असल्याची कल्पना नव्हती. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
I
II विकास II गुरुवार, 06/10/2010 - 09:16 नवीन
तुम्ही संपादक, मालक किंवा व्यवस्थापकांचे प्रतिनिधी असल्याची कल्पना नव्हती. == ह्यापैकी आम्ही कोण आहोत म्हणुन तुम्ही गृहीत धरले आहे? ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया गुरुवार, 06/10/2010 - 09:19 नवीन
पुरे ! अवांतर गप्पा मारु नका. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
न
नितिन थत्ते Wed, 06/09/2010 - 18:39 नवीन
कदाचित लाल अक्षरांत (संपादकांनी लिहिला असेल असे वाटण्यासारखा) प्रतिसाद लिहिण्याचा वात्रटपणा चालला होता म्हणून (पॉवर दाखवायला) असेल? :? तो करणारे अन्य सदस्य (सध्या) धागे लिहीत नाहीत. टारझनने धागा लिहिला म्हणून तो उडवणे शक्य झाले असावे. स्पष्टीकरण केले जावे. कारण धाग्यात उडण्यासारखे काही नव्हते. महिला आयडींनी (सदस्यांनी नव्हे) सुद्धा तो खेळकरपणे घेतला होता असे वाटले. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 06/09/2010 - 18:46 नवीन
>>लेख उडवण्याचं नेमकं कारण जाहिर करावं. सहमत
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 06/09/2010 - 18:51 नवीन
धाग्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती कामाचा व्याप असल्याने . पण धागा अंमळ करमणूक करून गेला होता. मिपावर कित्येक वेळा चित्रकला, शिल्पकला नावाखाली अश्लिल चित्रे आलेली आहेत. त्यावेळी संपादकांनी कसा काय त्यावर आक्षेप घेतला नाही. लज्जागौरीच्या चित्राला तर कोण्या स्त्री सदस्याने देखील आक्षेप घेतला नव्ह्ता. मी जरा झगडल्यावर ते काढण्यात आले होते. काहीवेळेस संपादक मनमानी करतात हे दिसू लागले आहे. >>आणि लेखकाला न कळवता असा परस्पर धागा नाहीसा करणं हे जास्त दुर्दैवी आणि असभ्य आहे असं मला वाटतं... पिडांशी १०० % सहमत. नीलकांत नी मध्यंतरी काही सूचना मागवल्या होत्या त्यात एक सूचना कराविशी वाटत आहे - संपादकांचे नाव/ आय डी त्या त्या संपादनावर यावे. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
स
सुधीर१३७ Wed, 06/09/2010 - 18:42 नवीन
बहुधा संपादक झोपले असावेत, नाही तर हा पण धागा .....................
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 06/09/2010 - 18:42 नवीन
कालरात्रीपर्यंत तरी अचकट विचकट कमेंट्स नव्हत्या, नंतर आल्या असल्या तर तेवढ्याच काढून टाकता येतात. मलातरी काही आक्षेपार्ह वाटले नव्हते. धागा नेमका का उडाला हे समजत नाही. संपादक कोणाला उत्तर द्यायला बांधील नसले तरी मनमानीची वहिवाट (प्रेसेडेन्स ह्या अर्थी) पडते आहे असे वाटू लागले तर ते योग्य नाही. चतुरंग
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 06/09/2010 - 18:48 नवीन
संपादक कोणाला उत्तर द्यायला बांधील नसले तरी मनमानीची वहिवाट (प्रेसेडेन्स ह्या अर्थी) पडते आहे असे वाटू लागले तर ते योग्य नाही.
कट टु कट असेच म्हणायचे आहे . धन्यवाद चतुरंग !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मुक्तसुनीत Wed, 06/09/2010 - 19:21 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
आ
आंबोळी गुरुवार, 06/17/2010 - 12:54 नवीन
मलाही असेच म्हणायचे होते.... पण माझा धागा उडाला म्हणून येथे म्हणतो... आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्राजु Wed, 06/09/2010 - 20:18 नवीन
हेच म्हणते. काल पर्यंत तरी काही आक्षेपार्ह प्रतिसाद नव्हते. मग का केले असावे असे? आणि कोणी? - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
P
Pain Wed, 06/09/2010 - 18:45 नवीन
टारझनशी सहमत. कित्येक रटाळ, फालतू धागे चालु आहेत आणि हा निखळ मनोरंजनासाठी काढलेला मात्र उडवला.
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 06/09/2010 - 18:45 नवीन
काहीजणांकरता मिपा युद्धभूमी असेल काहींकरता तमाशा असेल. माझ्याकरता मस्त खेळाचं मैदान आहे. मी इथे लहान होऊन जाते, बागडते. मला विनोदी, हलके-फुलके धागे खूप आवडतात जसे वैचारीकदेखील आवडतात. हलक्या-फुलक्या धाग्यांवर मस्ती करता येते. वैचारीक धाग्यांवर बरेचदा जीभ रेटत नाही, मेंदू काम करत नाही. कृपया (प्लीज) सर्व प्रकारचे धागे ठेवा. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Wed, 06/09/2010 - 18:52 नवीन
सहमत आहे. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
पांथस्थ Wed, 06/09/2010 - 18:49 नवीन
१. कोणताही धागा प्रत्येकाला (इनफॅक्ट कोणालाच) आवडावा असा माझा कोणताही आग्रह नसतो, त्यामुळे कोणाच्या "धागा आवडला नाही !! " म्हणुन कमेंट आल्या , आणि धागा उडाला हे उचित वाटत नाही.
सहमत आहे.
२. सदर धाग्यात कोणत्याही मिपा आय.डी. वर डायरेक्ट वा इनडायरेक्ट चिखलफेक करण्यात आलेली नव्हती.
सहमत आहे.
३. लावले गेलेले फोटो पुर्णपणे श्लिलतेच्या व्याख्येत बसणारे होते. त्यात किमान लज्जागौरीची किंवा कसल्याश्या किळसवाण्या शिल्पकलेची चित्र नव्हती
श्लिल / अश्लिल / किळस ह्या व्याख्या व्यक्तिसापेक्ष आहेत. तरीपण धागा असभ्य नक्कीच नव्हता.
४. लेखाचा हेतु निखळ मनोरंजन इतकाच होता ...
सहमत आहे. कुणाचे मनोरंजन झाले असेल कुणाला उथळ वाटला असेल. सगळ्यांना सगळेच पटेल/झेपेल असे नाही.
५. लेख उडवण्याचं नेमकं कारण जाहिर करावं , जेणे करुन भविष्यात रणनिती आखता येईल .
मला असं वाटतं की एखादा लेख ऊडवला तर त्याच लेखाच्या जागी खुलासा करावा. जेणेकरुन संपादकांचे मत सगळ्यांना कळेल, पुन्हा असे धागे यायची शक्यता कमी होईल. आणि पारदर्शकता स्थापित होण्यास मदत होईल. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 06/09/2010 - 18:50 नवीन
धागे काढण्याची गरज नव्हती. धागे काढले जात असतील तर लेखकाला व्य. नि.तून खरडीतून कारणासहित सूचना देणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 06/09/2010 - 18:53 नवीन
टार्‍या, धागा जीमेलवर पाठव! (जीमेलवरचा संपादक) टिंग्या
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Wed, 06/09/2010 - 19:14 नवीन
च्यामारी, ह्या धाग्यावर टिचकी मारताक्षणीच बोटाला चटका बसला रे.. तू तर चांगलाच गरम झालेला दिसतोयस! असो.. तुझा धागा जरी इथून उडविला असला, तरी तो मनावर छान बिंबलाय की.. ;) दत्ताजी शिंदे ह्यांचे त्यांच्या तरवारीइतकेच धारदार शब्द विसरलास की काय.. 'बचेंगे तो और भी लडेंगे'!! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 06/09/2010 - 19:35 नवीन
धागा उडला हे आत्ताच कळले. मी बघे पर्यंत तरी धागा उडण्यासारखा नव्हता. नंतर माहित नाही. अर्थात धागा काही खूप चांगला नव्हता पण अगदीच अश्लिल वगैरे नव्हता म्हणून चलवून घेतला गेला. पण या निमित्ताने सर्वच सन्माननिय सदस्यांना एवढेच सुचित करावेसे वाटते की फालतुपणा / पांचटपणा वगैरे नेहमीच नको. चांगले लिहायची क्षमता असली तर कधी फालतुपणा कधी चांगले लेखन असे असले तर मजा येते, नाही तर तोच तोच पणा होतो आणि मग हसूही येत नाही. एखाद्य संपादकाने यालाच विटून धागा उडवला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सगळेच जबाबदारीने वागले तर असे प्रश्न वारंवार येणार नाहीत. प्रस्तुत सदस्याने प्रामाणिकपणे सांगावे की कधीच वावगे वागले गेले नाही. दोन दिले दोन घेतले अशी वृत्ती ठेवली की फार त्रास होत नाही. शुचिताईंचे म्हणणे विचार करण्याजोगे आहे. मागे एकदा मोडकांनी ओपन फोरमवरच्या घटना / अधिकार / स्वातंत्र्य वगैरे किती आणि कुठपर्यंत गंभीरतेने घ्यावे याबद्दल लिहिले आहे ते ही मननिय आहे. बाकी संपादन करताना संपादकांनी खुलेपणा ठेवावा या मताशी सहमत आहे. पण म्हणून जिथे तिथे संपादकांवर टीका करणे, चेष्टा करणे हे पण थांबावे. संपादकही शेवटी माणसेच आहेत आणि शक्य तेवढा वेळ देऊन, स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीला स्मरून काम करत असतात हा स्वानुभव आहे. प्रस्तुत धागा कितीही मोरली जस्टिफाईड असला तरी त्यातील आव्हानात्मक / धमकीवजा सूर नाही आवडला. धागालेखक एक चांगला / जवळच मित्र असल्याने तर अजूनच खेद वाटला. असो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 06/09/2010 - 19:47 नवीन
(मागे एकदा टारझनशी जालवरच्या मुक्तपणा/अभिव्यक्ती संदर्भात चर्चा झाली होती म्हणून पुनरुक्ती टाळली.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ट
टारझन Wed, 06/09/2010 - 20:06 नवीन
पण या निमित्ताने सर्वच सन्माननिय सदस्यांना एवढेच सुचित करावेसे वाटते की फालतुपणा / पांचटपणा वगैरे नेहमीच नको.
ठळक शब्द काळजाला भिडले. बाकी वातुळ लेखकांनाही हा नियम लागु व्हावा काय ? "पण या निमित्ताने सर्वच सन्माननिय सदस्यांना एवढेच सुचित करावेसे वाटते की वातुळपणा / वैचारिकपणा वगैरे नेहमीच नको. "
चांगले लेखन असे असले तर मजा येते, नाही तर तोच तोच पणा होतो आणि मग हसूही येत नाही.
अपेक्षाभंगाबद्दल खेद आहे मालक , कदाचित आमची लायकी एवढी ही नाही ;)
एखाद्य संपादकाने यालाच विटून धागा उडवला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
=)) आपल्याला उडवणारा कोण ? हे माहित आहे असे दिसते. असो .... बाकी पाठराखण करण्याची पद्धत एकदम छाण :)
प्रस्तुत सदस्याने प्रामाणिकपणे सांगावे की कधीच वावगे वागले गेले नाही. दोन दिले दोन घेतले अशी वृत्ती ठेवली की फार त्रास होत नाही.
उकलुन सांगा ,समजले नाही , धाग्यासंदर्भात बोलत असाल तर मी कोणाचे दोन धागे उडवलेत ? म्हणुन माझे दोन धागे उडवुन घेऊ ?
पण म्हणून जिथे तिथे संपादकांवर टीका करणे, चेष्टा करणे हे पण थांबावे
=)) माझा हा एकंच धागा जिथे तिथे आहे , हे पाहुन डोळे पाणावले ..
स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीला स्मरून काम करत असतात हा स्वानुभव आहे.
मी ऑफिस मधे मन लाऊन काम करतो म्हणजे संपुर्ण ऑफिसातले मन लाऊन कामं करतात असा माझा कयास होत आहे :)
प्रस्तुत धागा कितीही मोरली जस्टिफाईड असला तरी त्यातील आव्हानात्मक / धमकीवजा सूर नाही आवडला.
तुम्ही आहात म्हणुन सांगतो , मुद्दाम टाकलंय ते :)
धागालेखक एक चांगला / जवळच मित्र असल्याने तर अजूनच खेद वाटला.
आपल्या खेदाचा आदर आहे , नाही तर बाकीच्यांचे खेद आम्ही फाट्यावर मारतो हे बर्‍याचदा सांगितले आहे , आपल्या अपेक्षा पुर्ण करण्याचा "प्रामाणिक" प्रयत्न करिनंच !! वरिल प्रतिसादात केलेली "सरसकट" विधानं खटकली पण असो , तो तुमचा अधिकार (च्यायला हा हा म्हणता भला मोठा प्रतिसाद झाला की ... चला तर मी पण आता कधीतरी सिरियस झालो तर ;) आता कोणी म्हणायचं नाही हं, नुस्ताच चाठाळपणा करतो म्हणुन )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 06/09/2010 - 20:42 नवीन
सर्वप्रथम या वादाची छाया वैयक्तिक संबंधांवर पडू न दिल्यामुळे श्री. टारझन यांचे अभिनंदन. शिवाय श्री. टारझन यांनी या प्रतिसादात माझा अपेक्षाभंग न केल्याबद्दल धन्यवाद. असो. ठळक शब्द काळजाला भिडले. बाकी वातुळ लेखकांनाही हा नियम लागु व्हावा काय ? एक खुलासा: शब्द आपण ठळक केलेत. उगाच वाचकांचे गैरसमज नकोत. असो. बाकी आपल्या विधानाशी सहमत आहे. टू मच ऑफ एनिथिंग इज रिडिक्युलस असे आम्हाला नेहमीच वाटत आले आहे. एखाद्या सदस्याने जिथे तिथे, उठता बसता, काळवेळ न बघता नुसते गंभीर प्रतिसाद / धागे टाकले तर आम्हाला नक्कीच कंटाळा येईल आणि आम्ही आमच्या परीने (पावसाची नव्हे) त्याबद्दल उपाय करूच. मागे बरेच वेळा आपल्या एका आवडत्या सदस्याला जो अकाली प्रौढ होऊन बरेच काही वैचारिक लिहायचा प्रयत्न करत असे त्यालाही अंमळ माणसात आणायचा प्रयत्न आम्हीच केला होता हे आपण जाणताच. किंबहुना आपण आमचे कौतुकही (बहुधा तोंडदेखले नसावे) केले होते. "पण या निमित्ताने सर्वच सन्माननिय सदस्यांना एवढेच सुचित करावेसे वाटते की वातुळपणा / वैचारिकपणा वगैरे नेहमीच नको. " पूर्ण सहमत. किंव जालिय भाषेत, +१ / बाडिस / असेच म्हणतो वगैरे. अपेक्षाभंगाबद्दल खेद आहे मालक , कदाचित आमची लायकी एवढी ही नाही खेद नका वाटून घेऊ हो... जालिय घटना जालावरच ठेवा. बाकी तुमची लायकी तुम्हासही अजून पूर्ण कळली नाही हे आज परत एकदा प्रकर्षाने जाणवले आणि आमचा खेद रिन्यू झाला. आपल्याला उडवणारा कोण ? हे माहित आहे असे दिसते. असो .... बाकी पाठराखण करण्याची पद्धत एकदम छाण आपल्याला असा संशय येणे हे मी समजू शकतो, किंबहुना संशय येणे रास्तही असावे. पण संशयाला वास्तव समजून पुढचे निष्कर्ष काढणे हे जरा धाडसाचे वाटते. असो. आपण धाडसी आहात हे आम्ही जाणतोच. शिवाय विश्वास ठेवा की मला काही माहिती असल्यास कमीत कमी व्यनितून तरी आपल्याशी स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद साधला असता. आपण जाणताच. असो. उकलुन सांगा ,समजले नाही , धाग्यासंदर्भात बोलत असाल तर मी कोणाचे दोन धागे उडवलेत ? म्हणुन माझे दोन धागे उडवुन घेऊ ? दोन दिले दोन घेतले ही एक वृत्ती आहे, त्याला विविध लोक विविध नावाने ओळखतात. जसे की, 'खिलाडू वृत्ती' ... 'दिलदारपणा'... 'मॅच्युरिटी' वगैरे. इथे आपण अगदीच शब्दशः किंवा वस्तुतः अर्थ घेऊन धगे उडवण्याबद्दल अर्थ सिमित ठेवलात. मी असहमत आहे. माझे म्हणणे असे की असे अधिक उणे चालणारच, मुंबईच्या लोकलमधे गर्दीच्या वेळी जसा आपल्याला बाजूच्या माणसाच्या घामाचा वास येतो तसा त्यालाही आपल्या घामाचा वास येत असणार हे ओळखून जो शक्य तितक्या सहकार्याने वागतो त्याला लोकल प्रवासाचा त्रास झाला तरी तो सहन करण्याच्या मर्यादेतच राहतो. असो. माझा हा एकंच धागा जिथे तिथे आहे , हे पाहुन डोळे पाणावले .. माझे म्हणणे आपल्याशी व्यक्तिशः संबंधित नव्हते. एकंदरीतच सध्या चाललेल्या गोष्टींबद्दल आहे. बरेच वेळा आपले लेखन / प्रतिसाद खरंच चांगला होता की नाही हे न बघता 'उडलं लेखन बडव संपादकाला' या न्यायाला अनुसरणारे बरेच आहेत. (काही सन्माननिय अपवाद आहेत अर्थातच). आम्हाला हे ही मान्य आहे की संपादकांकडून उन्निस बीस होते, किंबहुना होतेच. पण म्हणून सरसकटीकरण करणे किती बरोबर आहे हे प्रत्येकाने आपापले मापदंड वापरून ठरवावे. अर्थात असे करताना वर उल्लेख केलेले गुण त्या व्यक्तिच्या अंगी असावेत असे गृहित आहेच. असो. मी ऑफिस मधे मन लाऊन काम करतो म्हणजे संपुर्ण ऑफिसातले मन लाऊन कामं करतात असा माझा कयास होत आहे मन चंगा तो कठौतीमे गंगा.... बोलो सियावर रामचंद्रकी ज्जय्य्य्य्य!!!! (आपण कयास हा शब्द वापरला तर शेवटी... है शाब्बास!!!) तुम्ही आहात म्हणुन सांगतो , मुद्दाम टाकलंय ते मी पण तुम्ही आहात म्हणून एवढं टंकतोय. (टंकनिका रजेवर असूनही). अन्यथा आपण माझा हा लेख वाचलाच असेल. असो. आपल्या खेदाचा आदर आहे , नाही तर बाकीच्यांचे खेद आम्ही फाट्यावर मारतो हे बर्‍याचदा सांगितले आहे , आपल्या अपेक्षा पुर्ण करण्याचा "प्रामाणिक" प्रयत्न करिनंच !! वरिल प्रतिसादात केलेली "सरसकट" विधानं खटकली पण असो , तो तुमचा अधिकार मी आपला आभारी आहे. आता त्याप्रमाणे कृतीही झाली तर मी शतशः आभारी होईन. आय मीन आभार वाढेल शतपटीने. असो. बिपिन कार्यकर्ते खुद के साथ बातां: च्यायला मला पण जमलं की वैचारिक लिहायला. नाही म्हणजे एवढा मोठा प्रतिसाद झालाय म्हणजे बराच वैचारिक असणार. बघूया... जगात विचारी लोकांच्यात भर पडते आहे का ते... नाही तर गंगार्पणमस्तु. वि.सू. : मी सध्या आवरते घेतो आहे. रात्र झाली, गीतापठण बंद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विनायक प्रभू Wed, 06/09/2010 - 20:50 नवीन
जादुगार आहेत. ते अकाली प्रौढाला परत बालक करतात. प्रौढत्वी बालक असलेल्याना पुन्हा प्रौढ करतात. लोकल मधील घामाच्या वासाच्या आठवणीने गदगद्लो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ट
टारझन Wed, 06/09/2010 - 20:52 नवीन
आपल्याला साष्टांग दंडवत !! किती बाण मारायचे ? अजुन काही बाकी राहिले असतील तर घ्या भडास काढुन @@ बाकी ,
रात्र झाली, गीतापठण बंद करतो.
म्हणजे दुसरे काहीतरी उघडणार , ह्याच न्यायाने मी तो धागा रात्री १:३९ वाजता टाकला होता... (तसा मी दिवसा गीतापठण करतो असा माझा दावा नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
शानबा५१२ Wed, 06/09/2010 - 19:47 नवीन
माझा प्रतिसाद देण्या आगोदर लेख उडाण्याची काही शक्य करण लिहतो......... १. संपादक कींवा त्यांचा कोणी जवळचा टारझन ने दीलेल्या फोटोतल्या बायांवर प्रमाणापेक्षा जास्त फीदा असेल म्हणून त्याला सहन नसेल झाल........ जस आम्हाला eva angelina pornstar असली तरी तिच्या बद्दल (more correctly तिच्या शरीराबद्दल,व्यवसायाबद्दल) काही घान लिहलेल खपत नाही.............पण तिच्याबद्दल सारख घान व अतिघानच वाचायला भेटत.........अपेक्षेप्रमाणे,म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करतो. संपादकांनी ही अशा आपल्या आवड्त्या स्त्री बद्दलच लिखाण दुर्ल़क्षीत करायाला हव होत............पण हातात आहे म्हणून संपादंकांनी ते उडवु नये. २.संपाद़क व लेखक ह्यांचे काही बिनसल असेल......... ३.सभ्यपणा आमच्या येथे ओसंडून वाहतो अस दाखवायच असेल........ .............मग त्या दीवशी 'गोलपीठ' नावाखाली काय रे होत ते??? आता 'ते' शब्द लिहु तर ही पतिक्रीयाही उडवली जाईल. ४.संपादकामधे अधिकारा मागोमाग पक्षपातीपणा आला असेल. आता इतर काही......... लेख आक्षेप घेण्यजोगा होता तर एवढ्या पतिक्रीया येइपर्यंत काय करत होते संपादक???? माझा लेख कसा उडवलात ५ मिनिटात?? तस ह्या लेखाच व्हायला हव होत...........पण तस न होता जर एवढ्या वेळाने लेख उडाला तर काय कारण समजायच????
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 06/09/2010 - 19:53 नवीन
वाट्टेल ते बरळू नका! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Wed, 06/09/2010 - 19:58 नवीन
अरे ह्यात काय लिहल बरगळण्यासारख????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????? हो मग प्रश्न पण तसाच मोठा पडला आहे. क्रुपया लवकर शंका दुर करा..........चतुरंग.............................काय होत ते????? eva angelina का?? की संपादकांबद्दलच????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 06/09/2010 - 20:16 नवीन
माननिय आदरणिय महनिय श्री. शानबा५१२जी, नमस्कार. आपले धागे प्रतिसाद उडतात याचे आपल्याला खूप दु:ख होते आहे हे समजू शकते. आपले धागे अप्रकाशित झाले असले तरी ते आपल्याला दिसतच असणार. आपण ते परत एकदा तपासून बघावेत आणि त्या काय वावगे अथवा उडण्यासारखे नव्हते ते इथे जाहिरपणे सांगावे. बरं ते जाऊ दे... आज त्या डंकर्क धाग्यावर आपण जे ८-९ प्रतिसाद दिले होते ते राहण्याच्या लायकीचे होते का ते पण सांगावे. हवे असल्यास ते सगळे प्रतिसाद परत प्रकाशित करतो. मग इतक्या सुंदर धाग्यावर असले लिहिण्याबद्दल आपले काय प्रिय इतरांनी करावे हे पण सांगा. मी सभ्यतेच्या मर्यादा शक्यतोवर न सोडण्याबद्दल आग्रही असल्याने खूपच संयतपणे आणि थोडक्यात माझ्या भावना मांडतो आहे. तुम्हाला काँपिटिशन देऊ शकत नाही त्याबद्दल क्षमस्व. कळावे. बिपिन कार्यकर्ते खुद के साथ बातां: येउद्या अजुन ......च्यायला आज घरी पन शांतता व एकटाचाहे........येउ द्या........................... आज पुर्ण भडास काढ्तो - कॉपीराईट आणि सौजन्य माननिय आदरणिय महनिय श्री. शानबा५१२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Wed, 06/09/2010 - 20:50 नवीन
=)) =)) मी चतुरंग ह्याच्यांशी ह्यासंदर्भात बोललो व त्यांना अस लिहण्या आगोदर विचार होइल वगैरे लिहल.मला हा प्रतिसाद ऊडावता आला नाही म्हणून असाच ठेवला होता.
- कॉपीराईट आणि सौजन्य माननिय आदरणिय महनिय श्री. शानबा५१२
अरेरे काय हे लावलत नावामागे!!!आम्ही असभ्य(like u say) हो.........त्या शब्दांची वाट का लावता??
आपण ते परत एकदा तपासून बघावेत आणि त्या काय वावगे अथवा उडण्यासारखे नव्हते ते इथे जाहिरपणे सांगावे.
---------मी कधी नाही म्हणालो की त्यात न उडवण्यासारख काही नव्हत म्हणुन...........पण मी त्यानंतर तसे लेख नाही लिहले(काही अपवाद वगळता).
मग इतक्या सुंदर धाग्यावर असले लिहिण्याबद्दल आपले काय प्रिय इतरांनी करावे हे पण सांगा.
----------नाही काही अपेक्षा नाही.तशी ठेवायला जागाही नाही........वरुन आपल्यासारख्या सभ्य्,सदगुणी(मी हे आपल्या माझ्या वाचण्यात आलेल्या लिखाणातुन लिहतोय...आपल्याप्रमाणे माझावर झालेल्या उपहासात्मक लिखाणाप्रमाणे नाही)...व्यक्तीबद्दल माझ्यासारख्या असभ्य(मवाली म्हणा हव तर) माणसांनी काही अपेक्षा न ठेवन बर!!
मी सभ्यतेच्या मर्यादा शक्यतोवर न सोडण्याबद्दल आग्रही असल्याने खूपच संयतपणे आणि थोडक्यात माझ्या भावना मांडतो आहे.
--------------- संयतपणे?????? नाही असे जड शब्द समजत!! चांगली सवय आहे.....
तुम्हाला काँपिटिशन देऊ शकत नाही त्याबद्दल क्षमस्व.
wise man should compete with wise man!! I am not wise or decent. अरे हो .........
येउद्या अजुन ......च्यायला आज घरी पन शांतता व एकटाचाहे........येउ द्या........................... आज पुर्ण भडास काढ्तो
ह्याचा वेगळा अर्थ असु शकतो अस मला उशीरा समजल.......माझा उद्देश तसा नव्हता.वेगळ्या प्रतिक्रींयेबद्दल बोलता येईल पण खरच माझ्या न कळत हा अर्थ लाभला त्या वाक्याला...... आपल्या सुचना विचारात घेइन अस वाटतय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मिसळभोक्ता Wed, 06/09/2010 - 21:55 नवीन
रंगा, अरे, शानबा प्रतिक्रिया देत नाहीत. "पतिक्रिया" देतात. (वर नीट बघ.) बरळणारच. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
शानबा५१२ गुरुवार, 06/10/2010 - 05:35 नवीन
हो जी क्रीया पति करतो ती करण म्हण्जे पतिक्रीया का?? हो मग ते करायला मी बरगळणारच!!! :)) उगीच नको तिथे नको ते लिहु नका काय बरगळालो ते लिहा जरा ............मी त्यांच्याशी व्ययक्तिक बोललो असताना आपल्याला पुन्हा री ओढायाची का गरज भासली????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा