Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धागा का उडाला ?

ट
टारझन
Wed, 06/09/2010 - 18:26
🗣 71 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5229 वाचन

💬 प्रतिसाद (71)
प
प्रमोद देव Wed, 06/09/2010 - 19:56 नवीन
सगळेच जबाबदारीने वागले तर असे प्रश्न वारंवार येणार नाहीत. मी (संपादक असतांना/नसतांना) हे सुरुवातीपासूनच सांगतोय...पण त्याची खिल्ली उडवली गेली..... आता गंमत अशी की त्यावेळी माझे म्हणणे फारसे मनावर न घेणारे ...काही लोक आता संपादकाची जबाबदारी अंगावर पडल्यानंतर तोच राग आळवायला लागलेत...ह्यालाच म्हणतात काव्यात्म न्याय ! :) असो. तरीही माझे समर्थन कधीही जबाबदारीने आणि संयमाने वागण्यालाच होते,आहे आणि पुढेही असेल.
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज Wed, 06/09/2010 - 20:04 नवीन
निखळ मनोरंजन सुरू होते. धाग्यात आक्षेप घेण्याजोगेही काहीच नव्हते. - जय हिंद जय ब्राझील
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Wed, 06/09/2010 - 20:13 नवीन
टारझन ह्यांचा मुळ धागा का उडाला हे माहित नाही व तो धागा काय होता हे देखिल माहित नाहि. परंतु, ५. लेख अप्रकाशित करण्याचं नेमकं कारण जाहिर करावं , जेणे करुन भविष्यात रणनिती आखता येईल . इथे मनापासुन लेख लिहायचे आणि कोणी चुटकीसरशी बटण दाबुन ते अप्रकाशित करावे हे असहनिय आहे कोणत्या संपादकाने मालकगिरी करुन धागा अप्रकाशित केला ? , लवकरात लवकर उत्तर अपेक्षित आहे. संपादकाने जबाबदारी स्विकारुन "कारणासहित" जाहिर करावं , अन्यथा पुढे हजारो प्रतिक्रिया अप्रकाशित करत बसावे लागेल . कृपया तशी वेळ आणु नये हा धमकीयुक्त सुर निश्चितच आक्षेपार्ह आहे. असो, अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 06/09/2010 - 20:35 नवीन
वर लिहील्याप्रमाणे पुन्हा : ते मुद्दाम लिहीलंय , योग्य तो खुलासा झाल्यावर कारण जाहिर करेन्ंच ! -अनभिज्ञ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
श
श्रावण मोडक Wed, 06/09/2010 - 20:44 नवीन
>>संपादक कोणाला उत्तर द्यायला बांधील नसले तरी मनमानीची वहिवाट (प्रेसेडेन्स ह्या अर्थी) पडते आहे असे वाटू लागले तर ते योग्य नाही. हे चतुरंगांचं वाक्य आहे. संपादक कोणालाही उत्तरं द्यायला बांधील नाहीत याला तुम्ही संपादकच हरताळ का फासता आहात? बांधील नाही ना, मग काही बोलू नका. लेट अदर्स डू दॅट. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. वहिवाटीची चिंता करू नका. तुम्ही प्रामाणिक आहात ना? मग चिंता नको. कुणाला मनमानी वाटत असेल तर ते त्याचे-तिचे वैयक्तिक मत असेल. प्रत्येक वैयक्तिक मताचा विचार करणार असाल तर तसे जाहीर करा. प्रामाणिक निर्णयांची वहिवाट परवडली. अप्रामाणिक खोड्यांपेक्षा. ही नको तिथं लोकशाही कुठून अंगात येते तुमच्या? खरं तर, याला लोकशाही म्हणू शकत नाही मी. तशी कुणाची कल्पना असेल तर धन्य!!! (हे असं मी सहसा बोलत नाही. असं बोलतोय कारण हा खरोखरचा वैताग आहे.)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 06/09/2010 - 20:53 नवीन
बांधील नाही पण देऊच नये असेही नाही. कोणीही उठावे आणि संपादकांना झोडावे असे होते आहे की काय असे मलाही वाटू लागले आहे. शंभरात नव्व्याण्णव वेळा दुर्लक्षच केले जाते. पण कुठे तरी बोलणे आवश्यक वाटते... शेवटी संपादकही माणसं आहेत. त्यांना आपलं म्हणा रे, आपलं म्हणा!!! ;) आधी माणूस मग संपादक असलेला बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Wed, 06/09/2010 - 20:59 नवीन
कोणीही उठावे आणि संपादकांना झोडावे हे तुमचे वाक्य कोणीही उठावे आणि संपादकांना झोडावे असे वाचले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विनायक प्रभू Wed, 06/09/2010 - 21:00 नवीन
बटन शिवायला कमी पडत असेल.
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Wed, 06/09/2010 - 21:03 नवीन
अजुनही धागा कोणी व का अप्रकाशीत केला याचे उत्तर मिळालेच नाही. कृपया करून ते मिळेल का? बिपिन, डॉन्या, प्राडॉ, रामदास काका, निखिल देशपांडे, विकास, चित्रा, मुक्तसुनीत, चतुरंग, रेवती, प्राजु ... असे एकूण १३+३ संपादक आहेत. त्यापैकी कोणालाही माहित नाही? कि माहीत असून सांगत नाहीत (कृपया हे वैयक्तीक म्हणून घेऊ नका). परंतू असा धागा अप्रकाशीत करताना किमान लेखकाला कळवणे तरी आवश्यक होते असे मला वाटते. 'शिल्पा ब' यांच्या धाग्यासंबंधीही स्पष्टीकरण मिळावे ही अपेक्षा आहे... - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 06/09/2010 - 21:05 नवीन
१६ जण संपादक आहेत? नवीनच माहिती कळाली!
  • Log in or register to post comments
ट
टिउ Wed, 06/09/2010 - 21:31 नवीन
आमचा आतापर्यंत फक्त एकच प्रतिसाद उडाला इतक्या वर्षात तरी इतका संताप झाला होता काय सांगावं! तुमचे तर धागेच्या धागे उडतात तेव्हा तुमचा संताप समजण्यासारखाच आहे... धागा उडवण्यासारखं काही होतं असं वाटलं नाही. पण निदान लेखकाला कल्पना द्यायला हवी, प्रतिसाद संपादित केला तर संपादकानी तिथे स्वतःचं नाव तरी लिहावं असं मी पुर्वी एकदा म्हणालोही होतो...पण काही उपयोग झाला नाही!
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Wed, 06/09/2010 - 21:59 नवीन
निषेध आपल्या सर्वांचे आवडते लेखक, श्री टारझन यांचा 'आमचं यंदा कर्तव्य आहे ' हा निखळ मनोरंजन करणारा, करमणूक प्रधान धागा उडविल्या बद्दल मी इंटरनेटप्रेमी तीव्र निषेध नोंदवतो. -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 06/10/2010 - 00:14 नवीन
जे धागे उघडण्या-न-उघडण्याचे स्वातंत्र्य होते, ते उडालेले दिसतात. जे पान आपोआप डोळ्यांसमोर येते, न-उघडण्याचे स्वातंत्र्य नाही, ते मात्र जसेच्यातसे. यमनाचा खजिना आहे, कोळंबी आहे, पण सर्वांना भकास करून जाणारे व्याकूळ भुकेले खाकी डोळे आहेत.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/10/2010 - 00:18 नवीन
धन्याशेठचे प्रतिक्रियासंधान मात्र एकदम अचूक, नावाला जागणारे! :) जास्त ठोसेबिसे न मारता एकच खण्ण्ण्ण्ण्णकन लावून देतो की समोरचा गाल चोळतच बसला पाहिजे! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
N
Nile गुरुवार, 06/10/2010 - 00:47 नवीन
धागा का उडाला यापेक्षा 'माझा(च) धागा का उडाला' असा सुर मला वाटतो आहे. अजुन एक मुद्दा असा दिसतो आहे की, इतर वातुळ धागे मात्र उडवले जात नाहीत तर माझाच का? हे आरोप संपादकांवर नेहमीच झाले आहेत आणि होत राहतील, (नवे संपादक विरुद्ध जुने संपादक अशी फळी उभी राहु नये हीच मिपाच्या भल्या करता आशा, अशी फळी आहे असे म्हणत नाही पण भविष्यात असु नये हे मात्र म्हणतो), मुळात इतर लोक वातुळ धागे काढत असतील तर संपादकांना जागे करण्याकरता तसाच वातुळ धागा काढणे हा एक मार्ग असला तरीसुद्धा तसे न करता अश्या वातुळ धाग्यांना निषेधात्मक प्रतिसाद देणे जास्त चांगले असे माझे वैयक्तीक मत आहे. विशेषतः जुन्या, रोजच्या लोकांनीतरी असे धागे काढु नयेत, काही संपादक त्याने जागे झाले तरीसुद्धा नव्या वातुळ लोकांना याने वाव मिळतो. त्याशिवाय, 'इतर वातुळ धागे उडवले' तर त्या लोकांना सुद्धा पुन्हा 'माझा धागा का उडाला' असे धागे काढायची संधी मिळते. धागा अप्रकाशित करता येतो, त्यामुळे ज्याचा धागा उडाला आहे त्यास संपादकांनी व्यनी केला तर सोय होईल ह्या मताशी सहमत आहे. अन्यथा सदर धागालेखकाने संपादकांशी व्यनिने संपर्क साधणेही अवघड नाही. -Nile
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 06/10/2010 - 02:55 नवीन
धागा का उडाला यापेक्षा 'माझा(च) धागा का उडाला' असा सुर मला वाटतो आहे. असं असेलही आणि त्यात काही वावगं आहे असं वाटत नाही. राजरोसपणे त्याच त्या प्रकारचे धागे येत असताना त्यातले २च धागे उडावेत या बद्दल आश्चर्य वाटलं. ज्या संपादकाने "यंदा कर्तव्य..."चे धागे उडवले त्यांच्याकडे अजून ५ मिनीटे नव्हती बाकीचे वातुळ धागे उडवायला? कोकण भ्रमंती चा पुपेंचा धागा अजूनही तसाच आहे. पुपेंबद्दल वैयक्तीक रोष नाही पण तो धागा निव्वळ चर्चेकरता रहावा याचं नवल वाटलं. खरंतर टारझनने हा धागा काढला म्हणून एवढे प्रतिसाद आलेत आणि बर्‍याच संपादकांनीही उत्तरे दिलीत, जी ते दुसर्‍यांच्या अश्या प्रश्नांवर फार कमी वेळा देताना दिसतात. संपादक उत्तरे देण्यासाठी बांधील नाहीत असे असताना जवळजवळ सगळ्याच संपादकांनी मी धागा उडवला नाही असे सांगणे जरा मनोरंजक वाटले. माझ्यापुरतं असे धागे किंवा प्रतिसाद उडण्याबद्दल बोलायचं झालं तर त्याचं फार वाईट वाटून घेऊ नये. थोडावेळ मनोरंजनासाठी येतो आपण इथें, तेव्हा धागा/प्रतिसाद उडाला काय किंवा राहिला काय, काय फरक पडतो? -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
उ
उपाशी बोका गुरुवार, 06/10/2010 - 00:52 नवीन
टारझनशी सहमत. लेखात मलातरी काही वावगे वाटले न्हवते. पूर्वसूचना न देता लेख अप्रकाशित करू नये, असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 06/10/2010 - 01:58 नवीन
काही म्हणा , बाकी हे मात्र चुकलेच...आमचाच धागा का उडवला असा सूर काही ठीक नाही....एकंदरीत सगळ्याच उडालेल्या धाग्यांबाबत आणि प्रतिक्रियांबाबत बोलायला पाहिजे....जुन्या लोकांनी वातूळपणा सोडला पाहिजे....नाहीतर निषेधात्मक प्रतिक्रिया देणारा सामर्थ्यवान गट कसा वाढीला लागणार? ...हे नवीन लोक उगाचच धागे काढत राहायचे...आता एखाद्याचा धागा आणि प्रतिक्रिया उडविण्याचे सामर्थ्य असलेल्या व्यक्तीने पोचही देऊ नये हा कॉमन सेन्स त्यांना नाही त्याला कोण काय करणार...त्याबद्दल आमची हि निषेधात्मक प्रतिक्रिया...अर्थात आता आम्हि वातुळपणा सोडला म्हणायचे का? आता यावरही एक धागा काढावा का? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 06/10/2010 - 02:14 नवीन
मला तो धागा आवडला नव्हाता पण मी नाही केला अप्रकाशित! मला तर आत्ता कळतय असं झाल्याचं! रेवती
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 06/10/2010 - 03:57 नवीन
मी धागा उडवलेला नाही. पण उडवल्याचे दु:खही नाही. टारझन यांचा धागा उडला याबद्दल मात्र खेद वाटला. खालची मते माझी आहेत.. तुम्हाला यावरून चर्चा व्हावीशी वाटत असल्यास जरूर करावी. लग्न करायला कोण बरी/बरा असे धागे सवंग पद्धतीने लिहीण्याची इच्छा मात्र टाळायला हवी होती. शिल्पा ब यांचाही धागा वरील धाग्याला प्रत्युत्तर म्हणून अशाच पद्धतीची चित्रे देऊन झाला. आता हे चालते म्हणून उद्या यापुढे जाऊन कोणी चुंबनदृष्ये, आलिंगनदृष्ये, का अजून काही दिल्यास चालेल का? आणि असे कोणी करणार नाही, असे जरी एकवेळ समजून चाललो तरी कोणी या संकेतस्थळाचा वापर पोर्न किंवा स्वतःचीच अशी काहीशी उत्तान आणि "आव्हानात्मक" चित्रे देण्यास करू लागला तर तेही चालू द्यावे का? माझा विरोध पूर्ण वाढ झालेल्या स्त्री-पुरूषांनी अंगे उघडी टाकण्यास आणि इतरांनी ती बघण्यास नाही. पण ते स्वतःच्या घरी करावे, इतरांना सामील करून घ्यायचे असल्यास असे इतर फोरम खूप असतील की. आपण एकदा घसरण सुरू केली की ती कुठवर करणार आहोत, याची चर्चा यानिमित्ताने करू या. या संदर्भात वर कोणीतरी लज्जागौरीचा फोटो म्हटला आहे. अजून कोणी चिंजंचा लेटेस्ट लेख उर्धृत केला आहे. खरे आहे, पण शिल्पे वेगळी आणि आव्हानात्मक कातडी/डोळे/रंग/रूप असलेली हाडामासाची माणसे यांचे फोटो देणे आणि उगाच अवखळ, अल्लड अशा नावांखाली काहीही चालवून घ्यायचे हे मला पटत नाही. बाकी टारझन यांच्या लेखात आधी म्हटल्याप्रमाणे मला त्यांच्या लेखनात ओरिजिनॅलिटी दिसते. मात्र पूर्वीच्या धाग्यात त्यांनी दुसरीच कसलीतरी टोपी घातलेली दिसली.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 06/10/2010 - 04:54 नवीन
टार्‍याने ही इष्टापत्ती समजावी असे भाकीत वर्तवत आहे. त्यामुळे धागा उडवला गेला यामुळे जी प्रसिद्धी मिळाली ती प्रत्यक्ष धाग्यामुळे सुद्धा मिळाली नसती. गृहपाठ- माणुस काय प्रसिद्धी साठीच लिहितो काय? प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा