कलादालन

उल्हास दरी...

Primary tabs

कुणे धबधबा Image removed. कुणे धबधबा (पहिला टप्पा) Image removed. कुणे धबधबा (दुसरा टप्पा) Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. (चला डुंबायला... मी) Image removed. Image removed. विमुक्त
मनिष

मी या धाग्यावर आलोच नसल्यामुळे प्रतिसाद देत नाहिये! ;)
जळजळ होण्याचा तर प्रश्नच नाही...

दिपक

बरं झालं मीही ते सरड्याचे, धबधब्याचे आणि फुलाचे फोटो पाहिले नाही.. नाहीतर जीव जळाला असता. ;)

महेश हतोळकर

तुम्हा लोकांना काय कामंधंदे नाहीत का रे? ऊठसूट फिरत बसतात आणि फोटो टाकून आम्हाला जळवतात. [(

आता याबद्दल तुला शिक्षा एकच! गेलेल्या स्थळाबद्दलची सगळी माहीती वैशिष्ठ्ये, कसा गेलास, कधी गेलास, जाण्याचे वेगवेगळे मार्ग कोणते, जाण्यासाठी चांगला ऋतु कोणता, सगळ सगळ लिहायचं. याच नव्हे सगळ्याच लेखांमध्ये.

प्रचेतस

उल्हास दरी जबरदस्तच आहे. खंडाळ्याच्या थोडे पुढे जाउन एका छोट्या घळीतून खाली उतरता येते. उतरल्यावर एकदम काश्मीरचा फील येतो. दोन्ही बाजूंना उंच कडे व मध्ये खळखळत वाहत असलेले उल्हास नदीचे पात्र व पात्रातील अनेक लहान मोठे दगडगोटे. अप्रतिम असाच अनुभव आहे तो. पावसाळ्यात हिच नदी एकदम रौद्र रूप धारण करते. तिचे उगमस्थान म्हणजेच कुणे धबधबा जो बाराही महिने वाहत असतो.

-----------------------
(उल्हास दरीत यापुर्वी उतरलेला) वल्ली

गणपा

हे काय आज लिहायचा कंटाळा आला की काय?
नुसतेच फोटो टाकलेस.
प्रवास वर्णन /अनुभव कथन कुठाय ?

ए भीडु आश्या पाट्या नाय हा टाकायच्या :)
चल घे, उचल तो कळफलक आणि लाग बडवायला लगेच :)

आवांतर : फोटु नेहमी प्रमाणेच जळवणारे;)

मदनबाण

हेच म्हणतो... :)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

मी_ओंकार

अगदी बरोबर. फोटो काय कुणीही टाकतात. कोकणापासून कॅलिफोर्निया पर्यंत. वर्णन लिही.

- ओंकार.

satish kulkarni

खुपच छान फोटो...

- गेलेल्या स्थळाबद्दलची सगळी माहीती वैशिष्ठ्ये, कसा गेलास, कधी गेलास, जाण्याचे वेगवेगळे मार्ग कोणते, जाण्यासाठी चांगला ऋतु कोणता, सगळ सगळ लिहायचं. याच नव्हे सगळ्याच लेखांमध्ये.

माझ पण हेच मत आहे.....

satish kulkarni

विमुक्ताचे सगळे धागे वाचनखुण म्हणुन साठवायचे आहेत.... कसे करणार?

टारझन

सतिश मागतो एक डोळा ... गणपा-महेश देतात दोन डोळे ;)

मस्त आहे रे फोटू विमुक्ता !! :)

- विरक्त

शिल्पा ब

फोटो छान आहेत...सरडा आणि फुलाचा तर मस्तच...बाकी बाराही महिने वाहणारा धबधबा म्हणजे पर्वणीच.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

रामदास

एकसे बढकर एक !!
आता पावसाळा सुरु झाला की कॅमेरा सज्ज ठेवा. आणखी भारी भारी फोटो टाका.
अवांतर : धबधब्याचे फोटो असूनही त्यावर वॉटर मार्क नाही हे कसे केलंत बॉ ?