[हिंदू विवाह कायदा] उशीरा का होईना अक्क्ल आली
💬 प्रतिसाद
(59)
ट
टारझन
Sat, 06/12/2010 - 20:35
नवीन
शी बै .. काहीही घाण घाण लिहीतो हा शाणबा =)) =))
- गेणबा९९९
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Mon, 06/14/2010 - 08:24
नवीन
अहो,
तुम्ही माझ्यावर का चिडलात काहीच समजले नाही . :T
मला फक्त माझ्या मैत्रिणीची काळजी वाटली म्हणून प्रतिसाद टाकले होते पण तुम्ही ज्यांना प्रतिसाद दिला त्या मैडमनी उगाचच खोडसाळ वृतीने मला डिवचण्याचा प्रयत्न केला होता त्याचे मी फक्त उत्तर दिले
~ वाहीदा
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Fri, 06/11/2010 - 16:35
नवीन
धाग्याचे केवळ नावच वाचून आम्ही अंदाज (नाडी न बघता) केला होता की हा तुमचाच धागा असेल. अन ते भाकित खरे ठरले.
बाकी तुम्ही पेशालिश्ट झालात हं.
बाकी पेढे मस्तच
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Fri, 06/11/2010 - 20:47
नवीन
१०००००००००००००% शयमत!!
पाषाणभेद तुम्ही ह्याच्या निषेधात गावातल्या भाषेत ह्याचा समाचार घ्या मजा येईल.
काय लेख लिहतुया,
काय शोभेना तूझ्या असल्या कुरती!
अस उगाच काहीतरी मनात घालुनी,
का उगा आसं बोलतुया!
अस काही तरी...... :D
पाषाणभेद बाबा की जय हो!!!!!!!!!
- Log in or register to post comments
आ
आळश्यांचा राजा
Fri, 06/11/2010 - 20:19
नवीन
अशी काही 'चळवळ' आहे का? कोण चालवतं? काय भानगड आहे? आणि कुणापासून - कशापासून मुक्ती हवी आहे? खुलासा झाला तर माहितीमध्ये भर पडेल.
(पुरूषांना मुक्ती नको असते असा एक समज एका गाण्याने पसरवला होता त्याची आठवण झाली - ....कैद मांगी थी रिहाई तो नही मांगी थी!)
असो. घटस्फोट लवकर मिळावा हा या निर्णयामागचा हेतू नसून लांबत जाणार्या कज्जेकचेरीतून सर्वांचीच ( पक्षकार, वकील - स्त्री, पुरूष, आणि न्यायासनावर बसलेले स्त्री-पुरूष) 'मुक्ती' व्हावी असा व्यापक हेतू असावा असे वाटते!
आळश्यांचा राजा
- Log in or register to post comments
अ
अरुंधती
Sat, 06/12/2010 - 02:27
नवीन
<<
पती-पत्नी सामोपचाराने घटस्फोट घेण्यास तयार असतील आणि त्यांचा विवाह टिकण्याची शक्यता नसेल किंवा दोघांपैकी एकाने घटस्फोटासाठी अर्ज केला असेल; मात्र दुसरी व्यक्ती न्यायालयात उपस्थित न राहता न्यायालयीन प्रक्रिया लांबवून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा प्रकरणांमध्ये अडकलेल्यांना या तरतुदीचा फायदा होणार आहे. न्यायालयांमध्ये घटस्फोटांबाबतच्या प्रलंबित प्रकरणांचा ताण कमी होण्याच्या दृष्टीने या तरतुदीचा लाभ होणार असला, तरी यामुळे अनेक समस्याही उद्भवण्याची शक्यता असल्याने ही तरतूद वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. >>
बातमीतील ह्या मजकुरानेच कायद्यातील ही सुधारणा घटस्फोट इच्छिणार्या स्त्री व पुरुष, दोघांसाठीही कटकट कमी करणारी ठरणार आहे हे सुस्पष्ट केले आहे! त्यामुळे कोणत्याही मुक्तीवाद्यांनी आताच जयघोषास सुरुवात करण्याची काय गरज?
शिवाय ''अनेक समस्या उद्भवण्याची'' जी शक्यता बातमीत वर्तवली आहे (पण नक्की कोणत्या समस्या ते सांगितले नाही) ते बघता जरा धीर धरावा आणि सर्व शक्याशक्यता पडताळून मगच आनंद व्यक्त करायचा किंवा नाही ते ठरवावे!
बाकी, या तरतुदीमुळे विसंवादी-विवाहित व घटस्फोटेच्छुक स्त्री-पुरुषांवर येणारा आर्थिक-मानसिक-भावनिक-व्यावहारिक ताण संपून जर ते नव्या आयुष्याला सुरुवात करायला मोकळे होत असतील तर ते चांगलेच आहे! कोर्टावरचाही अतिरिक्त ताण आवाक्यात येईल. मुलांचा प्रश्न मात्र असणार! पण मग समुपदेशक मंडळी आहेतच! आणि वर्षानुवर्षे आईवडीलांची भांडणे, विसंवाद, तणाव वगैरे पाहण्यापेक्षा सत्य परिस्थितीला सामोरे जाणे एका परीने मुलांसाठी फायद्याचेच ठरेल असे वाटते!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Sat, 06/12/2010 - 07:52
नवीन
separated couples ची मुलं साधारणतः आई कडेच असतात. त्यामुळे आई सहसा नव्या आयुष्याची सुरवात दुसर्या लग्नाने करेलच असे नाही
वडील मात्र आर्थिक-मानसिक-भावनिक व्यवहार संपवून आयुष्याची नविन घडि बसवायला सुसज्य असताना दिसतात .
या निर्णयामुळे जर दोघांच्या आयुष्याला नविन वळण लागले तर स्वागतार्ह्य आहे.
~ वाहीदा
- Log in or register to post comments
श
शुचि
Sat, 06/12/2010 - 02:38
नवीन
बातमी स्वागतार्ह आहे. =D> =D>
घासकडवी आणि अरुंधती यांचे प्रतिसाद आवडले.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Sat, 06/12/2010 - 09:52
नवीन
छान झाले... जोडणे सोपे, तोडणे अवघड हे खरे.... पण जोडताही येत नाही आणि तरीही तोडताही येत नाही, अशा सिचुएशनमध्ये हा कायदा नक्कीच मदत करेल....
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2