पुलंनी जीवनाचा आनंद कसा लुटावा हे त्यांच्या साहित्यातून शिकवलं.
माझ्या प्रत्येक नैराश्याच्या क्षणी मला पुलंनी हसवलंय.
आजही त्यांची अनेक वाक्यं प्रसंगी चपखल बसतात.
पुलंना माझीही आदरांजली.
"पु.ल.देशपांडे" या नावाने चेहरे किती प्रसन्न होतात हे जर पाहायचे असेल तर आपल्या शहरात जर एखादा "वृध्दाश्रम" असेल तर तेथील आजा/आजोबांना कोणतेही त्यांचे एक पुस्तक भेट म्हणून घेवून जावा. मलाही अशाच एका प्रसंगी एकाने ही सूचना केली होती. १ जानेवारी २०१० रोजी "नूतन वर्षाच्या शुभेच्छा" देण्यानिमित्त आम्ही तीनचार मित्र पु.लं.ची पाच पुस्तके घेऊन येथील वृध्दाश्रमात गेलो व तेथील व्यवस्थापनाकडे "भेटी" ची रितसर नोंद केल्यानंतर त्यांच्याच अनुमतीने तेथे बाहेरच हिरवळीत सकाळचे उन अंगावर घेत असलेल्या वृध्दांच्या एका गटाकडे गेलो व त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर तो पुलं संच त्यांच्या हातात दिला. "व्वा, व्वा, पु.ल.देशपांडे घेऊन आलात, फार आनंद झाला, बरं का !" त्यांचे चेहरे प्रसन्न झाले आणि ही प्रसन्न्ता आणि तो आनंद पुस्तकांपेक्षा "पु.ल." या नावामुळे होता यात संदेह नाही.
'पु.ल.देशपांडे' हे नाव अमर आहे !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
पुलंना जाउन आज १० वर्ष झालीत हे खरच वाटत नाही.
आजही ते त्यांच्या अजरामर व्यतीचित्रांतुन त्यांच्या कथाकथनातुन नेहमीच साथ देतायत.
असा अष्टपैलु साहित्यिक पुन्हा होणे नाही.
_/\_
निखळ आनंद देणारे पु ल जाऊन १० वर्षे झाली हे अजून ही खरे वाटत नाही कारण त्यांची पुस्तके / साहीत्य अजून ही ताजे-तवाने आहे अगदी त्यांच्या सुंदर हास्या सारखे O:)
विनम्र आदरांजली
~ वाहीदा
१० वर्षे झाली पु.लं. ना जाऊन?? छे!!.. मुळीच नाही.. ते इथेच आहेत.. आपल्या सर्वांच्या ह्रुदयात..
आजही जेव्हा एकटेपणा वाटतो, तेव्हा पु.लं. चे एखादे कथाकथन ऐकू लागतो..
क्षणार्धात पु.लं.नी त्यांच्या लेखणीतून अक्षरश: जिवंत केलेली पात्रे सभोवताली वावरू लागतात.. मग काय!! धम्माल!!
कधी पु.लं. अगदी हात धरुन बटाटाच्या चाळीत घेऊन जातात.. तर कधी म्हशीच्या अपघातातून उमलणार्या गमती-जमती पाहण्यासाठी 'एश.टी.'मध्ये पण बसवतात..
कधी त्यांच्या शत्रूपक्षातील 'जालीम शत्रूं'कडून होणारी त्यांची 'पिळवणूक' ऐकताना हसून हसून पुरेवाट होते..
तर कधी, ''कशाला आला होता रे बेळगावात्त''.. ही रावसाहेबांची आर्त हाक ऐकून डोळे पाणावून जातात..
आपल्या सर्वांना 'हसू' शिकवणार्या पु.लं. ना.. विनम्र श्रध्दांजली..
======================
हसत रहा..
केवळ मराठी सारस्वतातीलच नव्हे तर एकंदरीत मराठी भावविश्वामधील एक मानाचं आणि महत्वाचं व्यक्तिमत्व. ते लाडकं वगैरे तर होतंच. त्यांचे समग्र लेखन वाचल्यावर आणि त्यांच्याबद्दल लिहिलं गेलेलं वाचल्यावर मोठेपणाची कल्पना येते... विनोदी, विडंबनं, वैचारिक, नाटकं, प्रवासवर्णनं, चित्रपट, संगीत, एकपात्री प्रयोग, दूरदर्शन असा कलेच्या प्रांतातील अथ पासून इति पर्यंतचा पूर्ण वर्णपट त्यांनी पादाक्रांत केला होता. त्यांचे काही लेखन एका विशिष्ट वर्गाला भावणारे असले तरी सगळेच लेखन तसे नव्हते. त्यांच्या वैचारिक लेखनाचे महत्वही खूपच आहे. त्याशिवाय, मराठी साहित्यातील नवनवीन प्रयोग, प्रवाह यांच्याबद्दल सखोल जाण आणि पाठिंबा हे त्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
बिपिन कार्यकर्ते
या निमित्ताने (आणि लेखाच्या शीर्षकातील 'दीपस्तंभा'वरून) पु.लं.नी मराठी भाषेस बहाल केलेल्या 'सारमेय-दीपस्तंभ न्याय'* या अतिशय कल्पक शब्दप्रयोगाचे स्मरण झाले. हा शब्दप्रयोग जोवर (माझ्या) स्मरणात आहे, तोवर पु.लं.ची स्मृती (निदान माझ्या तरी) स्मरणपटलावरून पुसली जाण्याची भीती नाही.
(*संदर्भ: नक्की आठवत नाही. पण बहुधा 'पूर्वरंग'. पुन्हा वाचून खात्री करून घ्यावी लागेल.)
- पंडित गागाभट्ट.
हा पंगा नको त्या ठिकाणी सूसू करतो.
असो, पण
त्यानिमित्ताने आदरणीय भाईकाकांच्या आधी येथील बरेचसे लोगां सुतकी चेहरे करून बसले होते, हे ऐकून अंमळ आनंद झाला.
माझ्यापुरते म्हणायचे तर, आम्ही भाईकाकांच्या आधीही हसत होतो, आणि आताही हसतच आहोत. त्यांनी आम्हाला हसायला शिकवले नाही. त्यांच्या सोकॉल्ड अनुयायांनी हसायची भरपूर संधी दिली, मात्र.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
नंद्या, अरे लिंक कुठाय ?
इथे सगळे "ग्यांग नही" म्हणून वर "आमचीच ग्यांग" हे एकाच पतिसादात (मिभो५१२) टाकतायत.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
नंद्या, साल्या, कुठे जायला लावतोस ?
एकवेळ भिकार्याच्या बाया परवडल्या, पण श्रीमंतांची पुरुष अंगवस्त्रे नकोत.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
४०/५० वर्षापुर्वी भारत सोडलेल्या लोकाना पु ल म्हणजेच मराठी वागन्मय होते. ५८/५९ च्य सुमारास मी colege म्ध्ये असताना सन्ध्याकाळी पैसे मिळवण्यासाठी एका pub मध्ये नोकरी करत असे. पु.ल त्या वेळी T.V. च्या शीक्षणासाठी येथे आले होते. अनेक सन्ध्याकाळी ते शेजारच्या स्टेशनवर उतरुन माझ्या pub मध्ये येत. pub मध्ये त्या काळी दोन भाग असत - एक काम करु लोकान्चा - public bar आणि एक वरच्या वर्गाचा - saloon bar. मी pub मध्ये काम करत असे. पु ल तेथे येउन बसत आणि माझ्यासारख्याशि गप्पा मारत. हा सुखद अनुभव मला ३/४ महिने मिळाला. ते आमच्या समोरच्या घरातच रहात होते त्यामुळे जाणे-येणे पण होते. बटाट्याच्या चाळीचि काहि प्रकरणे त्यान्च्या तोन्डुन तेथेच ऐकावयास मिळाली होती.नन्तर एका खाजगी कार्यक्रमात- ६०-७० मराठी लोकान्च्यत- ते म्हणाले- आज येथे श्री ------- आहेत. त्याना पुण्याचा अभिमान आहे म्हणुन खास त्यान्च्यासाठी-- असे म्हणुन त्यानी "सारे कसे शान्त शान्त" वाचले.
वयाच्या १८ व्या वर्ष्यापासुन बाहेर देशि राहिलेल्या मला त्यान्चा मोठेपणा फार नन्तर कळ ला. पण माझे सुद्देव कि त्यानन्तरच्या अनेक भारतभेटीत व येथिल भेटीत त्यानी ओळख ठेवली आणि खुपच आनन्द दीला.
त्यान्चा प्रथम स्म्रतिदीन मी येथे arrangeकेला होता - २-२५० लोक आले होते/ माझ्या क्रतज्ञतेचि थोडिशि परतफेड.
माझ्यासारखा भाग्यवान मीच!
पु.ल. गेले? शक्यच नाही...आमच्या मनात ते कायम असणारच...दैवत आहे ते ...प्रत्येक मराठी माणसाचं....अशी वल्ली परत होणे नाही.
(पुलकीत) शिल्पा
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी