Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम कि कॉन्हेंन्ट

श
श्रीराजे
Mon, 06/14/2010 - 11:50
🗣 26 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10000 वाचन

💬 प्रतिसाद (26)
य
युयुत्सु Mon, 06/14/2010 - 14:34 नवीन
CBSE चा अभ्यास्क्रम SSC पेक्षा निश्चितच दर्जेदार आहे पण अंमलबजावणीत शाळेशाळेत फरक पडतो. जेथे शिक्षक टिकतात त्या शाळेचा विचार करावा. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.शअ
  • Log in or register to post comments
श
श्रीराजे Mon, 06/14/2010 - 14:52 नवीन
सेंट विन्संट हि शाळा चांगली आहे असे कळाले...! पण तिथे अ‍ॅडमिशन मिळणे कठिण आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Mon, 06/14/2010 - 17:28 नवीन
लहान मुलांना शाळा घराजवळच हवी. आइच्या भाषेत शिकणे खुप महत्वाचे आहे. विकास (म्हणजे फक्त परिक्षेतील मार्कस नव्हे.) मुले फक्त शाळेतच शिकतात असे नाही.लहान मुलाना कमीतकमी प्राथमिक शिक्षण तरी आइच्या भाषेतच असावे. नंतर काय ते कुठल्याही भाषेतसुध्दा शिकू शकतात. डॉ.अनिल अवचट यांचे विचार वाचावे. त्यांच्या दोनीही मुलींचे शिक्षण म.न.पा. शाळेत झाले दोघीही डॉक्टर आहेत. अमेरिकेत यावर खुप संशोधन झालेले आहे. (नक्की संदर्भ आत्ता सांगता येत नाहीत) पण सुमारे १७-१८ वर्षापूर्वी माझ्या मुलाच्या बाबतीत खुप अभ्यास करून नंतर मराठी शाळेत घातले. आम्हाला तरी कोणताही पश्चाताप होत नाही. cognitive learning theory/ and reinforcement या विषयावर अभ्यास करावा. जाता जाता भावे स्कुल ते भावे स्कुल. तुम्ही पुण्यात आहात काळजी नसावी.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 06/24/2010 - 09:10 नवीन
जाता जाता भावे स्कुल ते भावे स्कुल.
जाने कहा गये वो दिन :) भावेस्कुलची संपुर्ण वाट लागली आहे आता. शाळेच्या आवारात हिंडताना देखील घाबरणारी मुले आता सर्रास तिथे चाकु सुरे घेउन मारामार्‍या करायला लागली आहेत. सेंट भावेजचा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या
श
शुचि Mon, 06/14/2010 - 17:40 नवीन
लहान मुलांना शाळा घराजवळच हवी. +१०००० मुलं कशी जाणार? रीक्षा? कार? बस? बसमधे अतिशय वाईट लोक देखील असतात. तुम्ही सुजाण आहातच. बाकी मला काही म्हणायचं नाही. इंग्रजी अथवा मरठी ज्याला जायचं तो पुढे जातो. तुम्ही मुलांना पंख आणि जीवनमूल्य द्यालच. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 06/14/2010 - 17:50 नवीन
मुलांना शाळेत/शाळेतून सोडता/आणता आले तर उत्तमच. अन्यथा हल्ली रिक्षाचा पर्याय सोयीचा असतो. शाळेला मैदान असले तर आणखीन छान, मुलांना खेळायला भरपूर मिळावे हे महत्त्वाचे. (बाकी बोर्डाबद्दल सध्यातरी ताजी माहिती नाही.) चतुरंग
  • Log in or register to post comments
र
रश्मि१२३ Mon, 06/14/2010 - 18:08 नवीन
माझ्या मते सि बि एस सि हा बोर्ड एस एस सि हुन नक्किच चांगला आहे. मला खरंच नाहि माहित की मराठि शाळेत टाकावे की इंग्रजी. पण खास बोर्ड साठि म्हणुन तरि इंग्रजी शाळा असु देत. मी स्वत: एस एस सि बोर्डातुन शिकलेले असुन, आता मी इंटर्नशनल शाळेत शिकवते आहे. पण त्या साठि खुप मेहनत करावि लागली. खास करुन. का मला नाहि माहित पण मला असे वाटते कि इंग्रजि शळेतल्या मुलांना जास्त आत्मविश्वस असतो. बाकी शाळे चे घरापसुन चे अंतर अर्धा तसा पेक्षा जास्त नको . आणि शाळेत शिकवण्या चि कोणति पध्द्त वापरतात हे हि तपसण्या सारखि गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 06/14/2010 - 18:48 नवीन
माझ्या मते MBBS ला घालावे. :)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 06/14/2010 - 18:58 नवीन
__/\_ टार्‍या.
  • Log in or register to post comments
म
मिहिर Mon, 06/14/2010 - 19:28 नवीन
मराठी. इंग्रजी समजते नंतर. cbse चा अभ्यास पोरे नंतर स्वतः करू शकतात. कॉन्व्हेंटची अनेक मुले ओव्हर कॉन्फिडंट वाटतात.
  • Log in or register to post comments
प
प्रमेय Mon, 06/14/2010 - 22:30 नवीन
मला वाटते की १-४ मराठी माध्यम चांगले! नंतर convent पेक्षा semi-eng OR English चांगले! शेवटी मुलाला/मुलीला काय हवे आहे याच पण विचार केला पहिजे!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 06/14/2010 - 22:35 नवीन
शेवटी मुलाला/मुलीला काय हवे आहे याच पण विचार केला पहिजे!
समहत आहे, आमच्या शेजारचे त्यांच्या २ वर्षाच्या मुलाला विचारल्या शिवाय शेयरमार्केट मधे पैसे सुद्धा आडकवत नाहीत, त्यांनी घरी त्याच्यासाठी घेतलेल्या संगणकाचं कॉन्फिगरेशन सुद्धा मुलानेच डिसाईड केलं होतं - व्यत्यास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमेय
प
पंगा Mon, 06/14/2010 - 22:40 नवीन
- व्यत्यास
आवडले! - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
शिल्पा ब Mon, 06/14/2010 - 22:59 नवीन
कुठे हवं तिथं घाला!!! शाळेत हो...आम्ही आधी खेड्यात,मग मुंबईत असे मराठी शाळेत शिकलो म्हणून आम्ही बोललेले इंग्रजी कालेजातल्या सौथ इंडिअन लोकांना कळायचे नाही...मग हळूहळू कळायला लागले आणि "आपल्याला इंग्रजी येते" हे कळुस्तवहर अमेरिकेत आले...मग काय इथल्या लोकांना आमचे इंग्रजी कळायचे नाही आम्हाला त्यांचे...एकूण काय आनंदच... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 06/14/2010 - 23:14 नवीन
कुठे हवं तिथं घाला!!! शाळेत हो...
भावुक झालो !! - (भावनाप्रधान) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
स
सुखदा राव Wed, 06/23/2010 - 10:43 नवीन
मुलानी आपल्या मात्रुभाशेत शिकाव अस माझ मत आहे. (नवर्याचही हेच मत असल्याने हा प्रश्न आम्हाला पडणार नाहिये.) १. त्यामुळे त्याच विशयान्च आकलन चान्गल्या प्रकारे होत. माझ्या इन्ग्लिश मिडियम मध्ये शिकणार्या भाच्याबाबतचा आमचा अनुभव याबाबतित अनेक पालकाना उपयोगी ठरेल. त्याला वास सन्गितल नाकाने घ्यायचा वास की कुन्डी हेच कळत नाही. शिवाय मम्मी म्हणून सान्गितल्या शिवाय त्याला आई हे कळत नाही. (हा पालकान्चा दोश असू शकतो, मतितार्थ लक्षात घ्यावा.) २.घरात १ आणि शाळेत १ अशा २ भाशा मुल एकदम शिकू शकत नाही. ते त्याच्यासाठी कठीण असत. ३.इन्ग्लिश शाळान्ची फी जास्त असते. शिवाय इतर खर्चही जास्त असतात. पर्यायाने मुलान्वर अपेक्षान्च ओझ लादल जात. ('आम्ही तुझ्या शिक्षणावर एवढा खर्च करतो अन तुला मात्र निट अभ्यास करुन मार्कही मिळवता येत नाही' वगैरे वगैरे). त्याचप्रमाणे कालान्तराने त्याला घरी शिकवण कठीण होत, त्यामुळे शिकवणीचा खर्च इतर मिडियमपेक्षा लवकर सुरु होतो. ४.लहानपणा पासुन एकदम इन्ग्लिश बोलायला लागल्याने इन्ग्लिश व्याकरणात मुल कच्ची राहतात. आणि इन्ग्लिश शाळेमुळे अवान्तर मराठी वाचन होत नाही. थोडक्यात '१ ना धड भाराभार चिन्ध्या' अशी अवस्था होते. ५.इन्ग्लिश मिडियम मध्ये आपल्यापेक्षा काही पटीने जास्त अभ्यास असतो. मुल त्या ओझ्याखाली इतक दबून जात की खेळ, छन्द याला वेळच उरत नाही. (त्या अभ्यासाच टेन्शन पालक, त्यातही आई जास्त, घेतात. आणि त्यातुन इतरही अनेक प्रश्ण उद्भवतात) एसेस्सी बोर्ड माझ्या मते चान्गले. १.त्याच्या शाळा सगळ्यात जास्त आहेत. प्रवेश मिळायला त्रास होत नाही. सिबिएस्सी हे नॅशनल लेव्हल बोर्ड असल्याने आपल्याकडे त्याच्या शाळा कमी असतात. आणी त्याची सध्या क्रेझ असल्याने प्रवेश मिळण खुप कठिण होउन बसलय. २.सिबिएस्सी शाळान्मध्ये शिकवणार्या शिक्षकान्चा दर्जा तपासायची पद्धत आपल्याला माहित नसते. त्यामुळे शन्केला वाव राहतो. ३.आयसिएस्सी हे इन्टरनॅशनल बोर्ड असत. पण ते कुठल्या विद्यापीठाला जोडलेल आहे, मुल कुठली परीक्षा पास होउन बाहेर पडेल, त्यानन्तर त्याला आपल्या कॉलेजमध्ये कुठल्या मार्कान्च्या आधारे प्रवेश मिळेल या बाबतित खात्रीशिर माहिती काढण गरजेच असत. ४.विनाअनुदानित शाळान्मध्ये शिक्षकान्च नोकरी सोडून जान्याच प्रमाण जास्त असत. सिबिएस्सी आणि आयसिएस्सी या शाळा विनाअनुदानित असतात, त्यामुळे तिथे हा प्रश्ण नेहमीच येतो. ( अनुदान नसल्यामुळेच त्यान्ची फी पण जास्त असते. पण याच कारणामुळे मराठी किन्वा इन्ग्लिश शाळान्ची फी पण जास्त असु शकते हे लक्षात घ्यावे) ५.आयसिएस्सी शाळेत शिकवणार्या शिक्षकान्च्याही दर्जाबाबत शाश्वती नसू शकते. आम्ही दोघे तसेच आमच्या घरचे मराठी माध्यमात शिकलो पण आम्ही सगळे आज चान्गल्या पदान्वर काम करत आहोत. कदाचित तुमचाही हाच अनुभव असेल. त्यानुसार योग्य निर्णय घ्या. कारण हा मुलाच्या आयुश्याचा १ महत्त्वाचा निर्णय असतो.
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 06/23/2010 - 21:33 नवीन
>>त्याला वास सन्गितल नाकाने घ्यायचा तर वास की कुन्डी हेच कळत नाही. अहो तो शब्द वास नव्हे (vase) वेस आहे. वास हा उच्चारच मुळात चुकीचा आहे. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखदा राव
घ
घाटावरचे भट Wed, 06/23/2010 - 22:44 नवीन
vase = वास्/वाज् आणि वेस हे दोन्ही बरोबर आहे. 'वास' हा आपल्यावर राज्य केलेल्या गोर्‍या सायबाच्या देशातला उच्चार आहे. 'वेस' हा हिरव्या नोटावाल्या देशातल्या गोर्‍या सायबाचा उच्चार आहे. असो. आम्ही सरळ 'फ्लावरपॉट' म्हणून मोकळे होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
प
पक्या गुरुवार, 06/24/2010 - 10:49 नवीन
http://www.merriam-webster.com/dictionary/vase येथे उचार ऐकता येतात. त्यात वेस , वेज आणि वाज हे ३ उचार सांगितलेले आहेत पण वास मात्र नाहिये. इतरत्र पण शोधल्यावर वास हा उच्चार सापडला नाही . पण वाज मात्र आहे. ( एकदा वेस ऐकल्यावर वाज हा उचार नक्कीच वास नाहिये हे कानांना कळते) जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 06/24/2010 - 09:07 नवीन
ब्रिटनची राणीसुद्धा एवढ्या छातीठोकपणे अमुक उच्चार चुकीचा आहे असं सांगेल का नाही याची शंका आहे. बाकी मिपावर अशी प्रतिक्रिया पाहून अंमळ मौज वाटली. बाकी भटाने उत्तर दिलेले आहेच. व्ही (v) चा उच्चार साधारण व्ह आणि व च्या मधे होतो, हे माझं कर्णज्ञान! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
स
सहज गुरुवार, 06/24/2010 - 03:34 नवीन
>२.घरात १ आणि शाळेत १ अशा २ भाशा मुल एकदम शिकू शकत नाही. ते त्याच्यासाठी कठीण असत. हे काही पटले नाही. उलट लहान मुलांना तर ते अगदी सोपे जाते. दुवा तसेच प्रत्यक्ष अनुभव. हा शाळेत बायलॉजी व घरी जीवशास्त्र शिकवत असतील तर बहुदा गडबड होईल. पण फक्त भाषा (हिंदी, मराठी, इंग्लीश) शिकणे उद्देश ठेवला तर मुलांना एकाच वेळी चार-पाच भाषा देखील शिकणे फार कठीण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखदा राव
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/24/2010 - 03:41 नवीन
>>>फक्त भाषा (हिंदी, मराठी, इंग्लीश) शिकणे उद्देश ठेवला तर मुलांना एकाच वेळी चार-पाच भाषा देखील शिकणे फार कठीण नाही. अगदी अगदी...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
श
श्रीराजे गुरुवार, 06/24/2010 - 10:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखदा राव
क
कशिद Wed, 06/23/2010 - 20:51 नवीन
ssc बोर्ड चांगला आहे काही प्रॉब्लम होता नाही मुलाना cbsc and icse board जय पलाकाना देशानत्रगत बादल्या होतात त्यांचा साठी आहेत ..icsc or cbsc ह्या बोर्ड कहे मुले ११ वि साठी hsc बोर्ड साठी लाइन लावतात, मग तय साठी 90;10 कोटा best of five सारख्या गोष्टी येतात अणि पालकांचा डोक्याला ताप करतात.. नंतर medical किंवा enginering साठी जायचे असल्यास ms cet चे marks count होतात हे लक्षात घ्या अणि तो अभ्यासक्रम HSC चा असतो
  • Log in or register to post comments
स
सुखदा राव गुरुवार, 06/24/2010 - 08:56 नवीन
मुल एकदम २ भाशा शिकू शकत नाही अस म्हणण्याचा अर्थ हा होता की काही गोश्टी एकदम २ भाशान्मधुन शिकू शकत नाही. भाशा हा शब्द चुकला माझा, मला माध्यम म्हणायच होत.पण तज्ज्ञान्च या बाबतित सन्शोधन असेल तर ते मी अनुभवाअन्ती मान्य करेन नक्कीच. तो उच्चार वास आहे तसाच वेस ही आहे. पण जर तो फक्त वेस असेल तर परत इन्ग्लिश मिडियम मध्ये शिकवणार्या शिक्षकान्च्या उच्चाराच्या ज्ञानाबद्दल शन्काच उपस्थित होइल.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 06/24/2010 - 11:41 नवीन
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=21354:2009-11-06-13-34-33&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194 पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा