कलादालन

माझं (कोकणातील) घर आणि परिसर :)

Primary tabs

हे फोटोज आहेत माझ्या घराच्याइथले आणि माझ्या गावातले - मालघरमधले :) म्हणजेच कोकणातले.. चिपळूणपासून १३ km वर असलेलं माझं हे छोटंसं गाव चिपळूणहून गुहागरला जायच्या रस्त्यावर आहे. ही आमची नदी...तांबी नदी आणि धरण :) Image removed. Image removed. बागेत खूप फुलपाखरे असतात. चिपळूणमधील एक पक्षीनिरीक्षकांनी इथल्या फोटोंच प्रदर्शनही भरवलं होतं :) Image removed. कांचन Image removed. लालबूंद जास्वंद :) Image removed. हा आमच्या घरचा अननस..अस्सा गोड असतो म्हणून सांगू... :) Image removed. कापा फणस :) Image removed. बांधकाम चालू असलेलं गावातील राममंदिर Image removed. पेरणी / लावणीच्या प्रतीक्षेत असलेली भाताची शेतं Image removed. तांबी नदी...रामपूर डोंगराचा परिसर Image removed. - अस्मिता
वेताळ

एकदम झ्याक फोटो आणि तुमचा गाव आहे.

वेताळ

सहज

झ्याक फोटो आणि तुमचा गावही झ्याक आहे.

मेघवेडा

सुंदर सुंदर! चिपळूणपासून १३ किमी म्हणजे मार्गताम्हनेच्या बरंच अलिकडे झालं ना..?

अस्मी

बरोबर...रामपूरच्या अलीकडे
ए तुला मार्गताम्हने महितिये?

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

- अस्मिता

गणपा

धुंद करणारा परिसर आहे.
:)
अननस (झाडाला लागलेल) पहिल्यांदाच पाहिल.

स्वतन्त्र

मी हि अननस झाडाला लागलेला पहिल्यांचाच पहिला !
गाव मस्त आहे!

यशोधरा

शेवटून दुसरा आणि राममंदिराचा फोटो खूप आवडला.

मस्त कलंदर

मस्त आहे हो गांव नि परिसर दोन्हीही!!!
मी पण झाडाला लागलेलं अननस पहिल्यांदाच पाहिलं!!! :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

दत्ता काळे

मस्त आहे हो गांव नि परिसर दोन्हीही!!!
- मी ही असेच म्हणतो.

अस्मी

अननस (झाडाला लागलेल) पहिल्यांदाच पाहिल.

मी याचसाठी हा फोटो काढला होता...माझ्या मैत्रिणींना पण तेच बघायचं होतं.
हा अननस तयार होऊन कापल्यानंतर जे वरचं वाड (म्हणजे ती उभी पानं) आहे ते परत लावलं ना की नवीन झाड तयार होतं :)

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

- अस्मिता

श्रीराजे

मस्त परिसर आहे..
मी ही अननस झाडाला लागलेला पहिल्यांदाच पाहिला.

चतुरंग

खूप वर्षांनी अननस झाडाला लागलेला पुन्हा पाहिला! (आधी मला वाटते गोव्याला पाहिले होते.)

(खुद के साथ बाता: रंगा, "अननस सोलण्याची कला" असा एखादा लेख टाकावा का? :?)

चतुरंग

आशिष सुर्वे

मधुमती तै,
तुमी गाववाल्या निगालात वो!
म्या कडवईचा बर्र का.. चिपलून वरून ३५ कि.मी.
एन.एच. १७ वर 'तुरळ' गावच्या फाट्यावरून फकस्त २.५ कि.मी आत..

छान फ्वोटो तै.. निसर्ग बगूनश्यान डोले भरून पावले बर्र का.. एकदम गावाला गेल्यागत वाटलं!!

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

अस्मी

नक्की या.... :)

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

- अस्मिता

पाषाणभेद

अजून फोटो पाहिजे होते. मजा आली. बाकी झाडावरचा फणस बर्‍याचदा बघीतलेला आहे.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

शानबा५१२

बाकी झाडावरचा फणस बर्‍याचदा बघीतलेला आहे.

झाडावरचा फणस पाहीला आहे??आणी तो पण ब-याचदा?? फारच दांडगा अनुभव आहे हो तुमचा!! अजुन असेच काय काय पाहील आहे ते लिहा.......जस झाडावर पिकलेला आंबा वगैरे.

8}

लेखासंबंधीत :
मी चिपळुण पासुन ५-७ कीमीवर असलेल्या टेरवचा,पण आमच्या इथे नदी नावाच काही नाही.

आणि धरण

हे पाहण्यासाठी दुर्बिण वापरण अपेक्षित आहे का?
नाही,फोटोत कुठे दीसत नाहे म्हणुन विचारल.

शेवटुन दुसरा फोटो सर्वात छान!

अस्मी

पुढच्या वेळेस नक्की :)

- अस्मिता

धमाल मुलगा

साला, कोकणात कुठंही आडवाटेनं शिरावं आणि क्लिकक्लिकाट करावा..डोळे गारगार करणारे फोटो यायलाच पाहिजेत असा नियमच दिसतोय निसर्गाचा!

मस्तच फोटो! आणी गावही बहुतेक एकदम निवांत आणि शांत असणार! निसर्गच सांगतोय फोटोमधुन.

मस्त फोटो..
अवांतर : मी चिपळूणच्या ईशान्येला साधारण चार पाचशे किलोमीटरवर राहतो आणि झाडाला लागलेली जास्वन्दी फार दिवसांनी पहायला मिळाली आज :)

शानबा५१२

:D :D :D :D :D

झाड नाही,रोपट वाटत ते,

चुकी काढायची म्हटली तर ती कशातुन पण निघते बरोबर?

- भंडग(सांगलीची)कर मास्तर

मितभाषी

फोटु छान. :)

मी चिपळूणच्या ईशान्येला साधारण चार पाचशे किलोमीटरवर राहतो आणि झाडाला लागलेली जास्वन्दी फार दिवसांनी पहायला मिळाली आज.

>>>>>>
गुर्जी लै भारी टोला. =)) =))

अवांतर : झाडाला अननस न पाहणारे येडे कधी मिपा णि घर सोडुन गेलेले दिसत नाहीत. :D =))

chintamani1969

मस्त आले आहेत फोटू मला पण शेवटून दुसरा फोटू आवडला

रेवती

आईग्ग!!
मस्त फोटू!
छे, जायलाच हवं कोकणात!
कोकणरेल्वेमुळे कोणता फरक पडलाय?

रेवती

कोकणरेल्वेमुळे कोणता फरक पडलाय?
पूर्वीसारखं एष्टी थांबवून रानात जावं लागत नाय...
आता कोकणरेल्वेच्या डब्यातच बाथरूम असतेय!!!!
:)

शानबा५१२

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

लय डांबीस हाव बा तुम्ही!!

पूर्वीसारखं एष्टी थांबवून रानात जावं लागत नाय...
आता कोकणरेल्वेच्या डब्यातच बाथरूम असतेय!!

हे गाडीत बसताना,वेळ आली तर 'जायची' सोय आहे ना हेच् बघतात पहील्,म्हणून ह्यांना फक्त एकच बदल आठवला.......

लय भारी प्रतिसाद पि.डा.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!