Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गर्लफ्रेन्ड सोबत एक रोमँटिक दिवस: काही सुचतंय?

स
सोम्यागोम्या
गुरुवार, 06/17/2010 - 00:46
🗣 82 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
23319 वाचन

💬 प्रतिसाद (82)
म
मितभाषी गुरुवार, 06/17/2010 - 11:09 नवीन
एक कमरें मे बंद हो, और चाबी खो जाए >>>>> अहो निळे कि नाइल, असं जरी झालं तरी सोम्यागोम्या चावी कशी शोधावी? असा धागा काढील किंवा चावी सापडत नाही म्ह्टल्यावर आता पुढे काय करु असा ठणाणा करीत बसेल. :D
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 06/17/2010 - 11:12 नवीन
तेव्हाचं तेव्हा पाहुन घेउ. फारच अडचण असेल तर तुम्हाला वैयक्तीक रित्या समस्या सोडवण्यास धाडु. -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
म
मितभाषी गुरुवार, 06/17/2010 - 11:16 नवीन
नक्को नक्को कशाला उगीच. ;) भावश्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/17/2010 - 11:47 नवीन
नागाव, किहिम वगैरे अलिबागच्या आसपास पाहा.. किंवा दिवेआगार वगैरे. छान निसर्ग... निवांतपणा.. नुकत्याच शाळा-पाऊस सुरू झाल्यामुळे सध्या शिजनपण नाही, त्यामुळे गर्दी कमी..आणि माफक खर्चात राहणे-खाणे-पिणे.. समुद्रकिना-यावर निवांत भटका... हॉटेलवजा भाड्याच्या खोल्या भेटतात. मस्त मजा मस्ती करा..गेम वाजवा.. हॅप्पी मान्सून.. :) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
न
नील_गंधार गुरुवार, 06/17/2010 - 12:42 नवीन
बरेच अनुभवी दिसताय! ;) समुद्रकिना-यावर निवांत भटका... हॉटेलवजा भाड्याच्या खोल्या भेटतात. मस्त मजा मस्ती करा..गेम वाजवा.. हे बाकी खासच. नील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सोम्यागोम्या Fri, 06/18/2010 - 17:29 नवीन
तात्या, ठिकाणांच्या माहिती बद्दल आभारी आहे. प्रतिसाद छान होता शेवटचे अनाहूत सल्ल्याचे वाक्य रुचले नाही. असो. प्रतिसादाबद्दल आभार. ~
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 06/18/2010 - 17:37 नवीन
प्रतिसाद छान होता शेवटचे अनाहूत सल्ल्याचे वाक्य रुचले नाही.
मला वाटले होते की आपण हलके घ्याल, म्हणून बेधडकपणे लिहिले होते.. परंतु ते वाक्य आपणास रुचले नाही त्यावरून ते लिहायला नको होते असे आता वाटते.. तरीही मनापासून क्षमस्व.. तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या
स
सोम्यागोम्या Fri, 06/18/2010 - 17:42 नवीन
तात्या, चालायचेच हो. आता हलकेच घेतले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ज
जागु गुरुवार, 06/17/2010 - 11:56 नवीन
लोणावळा चांगला आहे पण १ ते २ दिवसांकरीता ठिक आहे. महाबळेश्वरही चांगल आहे. रत्नागिरीत आंबोली घाट आहे.
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 06/17/2010 - 12:00 नवीन
अलीबागला गेलात तर मुरूडचा समुद्र किनाराही चांगला आहे. समुद्र किनार्‍याला लागुनच लॉजींग आहेत. सकाळी तेथे ताजी ताडीही मिळते. तसेच तिथल्या पाटील खानावळीत चांगल्या मच्छीचे प्रकार मिळतात.
  • Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या Fri, 06/18/2010 - 17:32 नवीन
जागु, धन्यवाद. पाटील खानावळीसकट माहिती दिल्याबद्दल धन्स ! ताडी प्यालो तर ती मला ताडील !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
म
माउली गुरुवार, 06/17/2010 - 13:17 नवीन
पवना... लोनावळा पासुन १० किमी आहे. फारच एकांत आहे.
  • Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या Fri, 06/18/2010 - 17:30 नवीन
माऊली आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माउली
ध
धमाल मुलगा गुरुवार, 06/17/2010 - 13:25 नवीन
:) प्रत्येक गर्लफ्रेंडचा स्वभाव+आवडीनिवडी ह्याप्रमाणे जाण्याची ठिकाणॅ आणि भेटवस्तु बदलतात... ;) जोक्स अपार्ट, मला एक सांगा, तुम्हाला एखादं विविक्षित ठिकाणच हवं आहे असं आहे का? तसं नसेल तर खालील रेसिपी कशी वाटते सांगा. ;) तयारी: १ बाईक, टाकीभर पेट्रोल, क्लच,ब्रेक्स मेंटेनन्स पुर्ण :) बॅकपॅकमध्ये तिच्या आवडीचे चॉकलेट्स, प्रवासात काहीच मिळालं नाही तर गोंधळ नको म्हणुन बॅकअप प्लॅनसाठी सँडविचेस. गिफ्ट: मैत्रिणीचा स्वभाव कसा आहे? ---ती 'च्चो च्विट' वगैरे म्हणणार्‍यांमधली असेल तर आधी एखादं छोटं टेडी वगैरे आणि नंतर पेन्डन्ट्/इयर रिंग्ज/ (दोघांचीही हरकत नसल्यास) अंगठी :) {तनिष्कचं ऑनलाईन स्टोअर चेक करा, लै भारी कलेक्षन आहे. :D बजेट वाढवणार असाल तर अस्मि किंवा दिदमासचा पर्यायही लै लै बेष्टातला आहे.} आणि जास्तच रोम्यांटिकपणे गिफ्ट द्यायचं असेल तर, एक रेड रिबन सोबत ठेवा...डोळे मिटायला लाऊन स्वतःभोवती गिफ्टरॅप करतात तशी बांधून समोर उभे रहाण्याकरता :) -- नॉन-'च्चो च्विट' कॅटेगरी असेल तर : ते टेडी क्यान्सल करा. :D बाकी सर्व वरच्याप्रमाणेच. --Adventurous क्याटेगरी असेल तर :: मामला थोडा मुश्किल है भाई.. एखादं नॉटी गिफ्ट चालुन जाऊ शकेल. आता भटकंती:: अहो, आधी गाडीला किक मारुन मुंबईबाहेर पडा...जिकडे मन मानेल (किंवा ती म्हणेल :) ) त्या दिशेने निघा. मुंबई पाठीमागे टाकली की मोकळे रस्ते, छान पाऊस, आजुबाजुला असलेला हिरवाईचा चमत्कार पहात एखादा स्पॉट आवडेपर्यंत मनमुराद भटका. दोघांनाही जिथे थांबावसं वाटेल तिथे गाडी थांबवा... कोसळणारा पाऊस पहा..मस्त भिजा...व्हॉटएव्हर यु वॉन्ट! आणि अशा स्पॉटवर गिफ्ट द्या :D -->पर्याय दुसरा: Adventurous क्याटेगरी असेल तर सरळ एखादा फंटाश्टिक ट्रेक करुन टाका एक दिवसाचा! रात्री परत येताना एखाद्या 'कोझी लाँज'मध्ये डिनर आणि पार्सल घरी ड्रॉप! :) बॉस...आय मे साउंड टू इंन्स्ट्रक्टिव्ह...चेक इट आउट मॅन! दिज आर द बेस्ट लेड प्लॅन्स विथ अ‍ॅश्शुअर्ड सक्सेस! ;) (आता माझ्या सक्सेस श्टोर्‍या नका विचारु... माझं लग्न टिकवायचंय मला. )
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर गुरुवार, 06/17/2010 - 18:17 नवीन
सकाळपासून तुझ्याच प्रतिक्रियेची वाट पाहात होते.. ;) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Fri, 06/18/2010 - 11:48 नवीन
=)) =)) अच्रत बव्ल्त! मी काय 'How to...' छापाची पुस्तकं लिहिणारा वाटलो काय? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
I
II विकास II Fri, 06/18/2010 - 11:55 नवीन
मी काय 'How to...' छापाची पुस्तकं लिहिणारा वाटलो काय? =)) =)) लिही रे. म्हणजे काही दिवसांनी जास्त प्रश्न विचारले कि 'पुस्तक विकत घ्या' असे सांगशील. कल्पना करुनच जाम हसु आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
सोम्यागोम्या Fri, 06/18/2010 - 18:06 नवीन
धम्या, एवढा वेळ काढून अनुभवाचे ज्ञानामृत मज नवशिक्यास पाजल्याबद्दल आभारी आहे ! >>मला एक सांगा, तुम्हाला एखादं विविक्षित ठिकाणच हवं आहे असं आहे का? मस्त वाटावं इतकंच. हेच ठिकाण पाहिजे असं काही नाही. >>गिफ्ट: मैत्रिणीचा स्वभाव कसा आहे? चो च्वीट आणि चो क्यूट असाच आहे ! अस्मिची साईट छान आहे तनिष्क सगळ्यात बेस्ट वाटतेय ! पण तिला घेऊन गेलेलेच बरे. अंगठी नाही आवडली तर चा प्रश्न आहे. >>अहो, आधी गाडीला किक मारुन मुंबईबाहेर पडा... नक्कीच हा खूपच सही प्लान आहे ! असेच काहीसं करेन म्हणतो. >>दिज आर द बेस्ट लेड प्लॅन्स विथ अ‍ॅश्शुअर्ड सक्सेस नक्कीच एवढ्या मस्त कल्पना आहेत या. मस्तच. धमी एकदम लकी आहे ! पुन्हा एकदा धन्यवाद. ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Fri, 06/18/2010 - 18:19 नवीन
>>एवढा वेळ काढून अनुभवाचे ज्ञानामृत मज नवशिक्यास पाजल्याबद्दल आभारी आहे ! _/\_ मारा मारा! >>पण तिला घेऊन गेलेलेच बरे. अंगठी नाही आवडली तर चा प्रश्न आहे. फिकीर नॉट! तुला काय वाटलं? शोरुम्समध्ये त्या सेल्सगर्ल्स काय शोपीस म्हणुन रिक्रुट करतात? एकदा चक्कर मारुन पहा..दे आर द ग्रेटेस्ट हेल्प इन सच केस! :) जनरल आवडीनिवडी विचारतात त्या आणि पर्फेक्ट आवडेल अशीच वस्तु काढून समोर ठेवतात. >>नक्कीच हा खूपच सही प्लान आहे ! असेच काहीसं करेन म्हणतो. :) >>नक्कीच एवढ्या मस्त कल्पना आहेत या. मस्तच. धमी एकदम लकी आहे ! :\ हा हा हा! लाजलो मी लाजलो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या
स
सोम्यागोम्या Fri, 06/18/2010 - 18:29 नवीन
>>शोरुम्समध्ये त्या सेल्सगर्ल्स...दे आर द ग्रेटेस्ट हेल्प इन सच केस! हां डोक्यात नाही आलं हे ! पण अडचण अशी आहे की मी येणार रात्री उशीरा अणि हिला सकाळी सकाळी भेटायचे आहे. तनिष्कात जायला वेळ नाही होणार. आणि ऑनलाईन खरेदी मध्ये सेल्स गर्ल्स ची मदत होणार नाही. जसे जमेल तसे आणि दिवस शक्य तितका चांगला बनवण्यासाठी प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
संदीप चित्रे गुरुवार, 06/17/2010 - 17:07 नवीन
पावसाळयातला लोणावळा - खंडाळा, ते ही बाईकवरून आणि सोबतीला प्रेयसी ! ऊप्फ ... रोमान्स रोमान्स काय म्हणतात तो आपसूकच रोमारोमातून सळसळायला लागेल :) एक सावधगिरीची सूचना -- एकांतवगैरे मिळावा म्हणून उगाच कायच्याकायच आडबाजूला वगैरे जाऊ नका. हाकेच्या आणि नजरेच्या टप्प्यात लोक असणं कधीही चांगलं अन्यथा पावसाळ्यात लोणावळ्याला आधीच बेवडे चेकाळलेले असतात त्यात कुणाला आयती संधी द्यायला नको :( --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 06/17/2010 - 17:16 नवीन
अग्गदी हेच ! आपल्या अंगात रग असेल तर फुकट हाफमर्डरची केस आणि नसेल तर भलताच व्याप! अगदी निर्जन ठिकाणंही टाळलेलीच बरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
ट
टारझन गुरुवार, 06/17/2010 - 17:20 नवीन
बरोबर बोलतोय धम्या आणि चित्रेसाब !!! म्हणुनंच कोणीतरी बरोबर कुत्रा न्यावा , हा पर्याय सुचवला असेल काय ? =)) कुत्रा तसा बरा पडेल , कोणाचा वास आला की भुंकेल तरी ... =)) बाकी दुसर्‍या कुत्र्यामागे गुपचुप निघुन नाही गेला म्हणजे मिळवली !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
सोम्यागोम्या Fri, 06/18/2010 - 17:35 नवीन
लोणावळा खंडाळा ऑप्शन छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
न
नावातकायआहे गुरुवार, 06/17/2010 - 19:13 नवीन
>>अलीबागला गेलात तर मुरूडचा समुद्र किनाराही चांगला आहे. समुद्र किनार्‍याला लागुनच लॉजींग आहेत. सकाळी तेथे ताजी ताडीही मिळते. =)) =)) =)) बाकी काग्दांबरुबर 'परमिट' बी ठेवा बरोबर...
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 06/17/2010 - 20:37 नवीन
मला काय वाटतं - बी युअरसेल्फ. नाहीतर तिच्या अपेक्षा (रोमँटीकपणाच्या) वाढून बसायच्या आणि तुम्ही नंतर पुरे पडणार नाही आणि तिचा विरस होईल. तेव्हा तुम्हाला जे रुचेल, मनाला येईल ते करा. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या Fri, 06/18/2010 - 17:39 नवीन
शुचि, खरंच तुमचं एका अर्थी पण एकदा तरी भन्नाट काही तरी करायला मस्त वाटेल मला. अपेक्षा वाढतील पण ठीकय ! लेट्स सी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
क
कवितानागेश Fri, 06/18/2010 - 07:35 नवीन
प्रवसत वेळ 'वाया' घालवायचा नसेल तर नेरळपर्यन्त ठिक आहे. खाली चौकशी करा. http://www.sagunabaug.com/about_us.htm Saguna Baug, Village Malegaon, P.O. Neral, Dist. Raigad Pin:410101 Phone No. : 02148-238438 / 238338 / 650349 Email: contact@sagunabaug.com Please Note: Booking procedure is to inquire and confirm on phone ============ माउ
  • Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या Fri, 06/18/2010 - 18:12 नवीन
माउ, अशा प्रतिसादांसाठीच हा धागा काढला होता. मस्त पर्याय आहे हा ! पॉंड हाऊस खूपच झकास आहे. टु गुड. ह्या धाग्यातले सगळे पर्यात ट्राय करण्यासारखे आहेत ! हे सगळं केलं तर आयुक्षात रोमान्स भरभरून वाहील ! प्रतिक्रियेबद्दल आभार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
न
नम्रता राणे Fri, 06/18/2010 - 08:24 नवीन
एवढ्या प्रतिक्रिया वाचुन निर्णय घेईपर्यंत ती गर्लफ्रेन्ड दुसराच कोणतरी 'सोम्यागोंम्या 'पकडेल... तेव्हा .... सावध. म्हणतात ना ‍ 'ऐकावे जनाचे पण करावे मनाचे'. लवकर निर्णय घे.. पावसाळाही सुरु झाला आहे..सुहाना मौसम है...
  • Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या Fri, 06/18/2010 - 17:51 नवीन
सुहाना मौसम आहे म्हणूनच मजा आहे ! मी जुलै मधेच येणार आहे भारतात तेव्हा निर्णय घ्यायला अवकाश आहे ! >>दुसराच कोणतरी 'सोम्यागोंम्या ' हा हा ! तिला झेलणारा हा एकमेव सोम्यागोम्या या भूतलावर अस्तित्वात आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नम्रता राणे
ट
टारझन Fri, 06/18/2010 - 18:35 नवीन
हा हा ! तिला झेलणारा हा एकमेव सोम्यागोम्या या भूतलावर अस्तित्वात आहे !
नाही नाही .. पुढचं वाक्य मी बिल्कुल बोलणार नाहीये .. "असे तुला वाटते"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा