Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उधवणीची चिवनी (पावसाळ्यातील मच्छी)

ज
जागु
Fri, 06/18/2010 - 10:34

प्रतिक्रिया द्या
13144 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ज
जागु Fri, 06/18/2010 - 10:35 नवीन
फोटो का अपलोड होत नाहीत ? कुणाला येत असतील तर प्लिज करा.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 06/18/2010 - 10:51 नवीन
ही आहेत चिवनी Image removed. ================================= ही साफ केलेली चिवनी Image removed. ================================= हे आहे चिवनीचे कालवण Image removed.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 06/18/2010 - 10:57 नवीन
सही. गाभोळी तळून पण्(कढी+भात) चांगली लागते. P = NP
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 06/18/2010 - 10:58 नवीन
आरे आधी त्या पावसाळी भाज्या आणि आता हे मासे. ठार मेलो......................
  • Log in or register to post comments
स
स्मिता_१३ Fri, 06/18/2010 - 11:03 नवीन
सहमत !! =P~ =P~ =P~ स्मिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
श
शुचि Fri, 06/18/2010 - 16:39 नवीन
=)) =)) =)) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
इ
इरसाल Fri, 06/18/2010 - 11:03 नवीन
हे शिंगटे तर नाहीत ना ?
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 06/18/2010 - 11:18 नवीन
एक शंका : शिंगाडा म्हणतात तो मासा पण असाच बु़ळबुळीत आणि वर एक टणक काटा असलेला असतो. ही चिवनी म्हणजेच शिंगाडा का?
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Fri, 06/18/2010 - 11:37 नवीन
जागुराव, तुम्ही आणि गणपा अगदी अंत बघताय आमचा आज. एक काम करा दोघेजण ठरवून एका दिवशी एकच पाकृ टाकत चला.... दोघे एकदम टाकू नका.... आंबोळी
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 06/18/2010 - 12:26 नवीन
कालवण मस्तच!!! बाकी अंड्याची सॅक एखादी बरी नंतर तशी किंचीत कडवटच लागते ना?
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 06/18/2010 - 12:31 नवीन
नाही हो सहजराव गाभोळी एनी टाईम क्लासच लागते. (तळलेली असेल तर खासच). ती नीट साफ करावी लागते. त्या गाभोळीच्या आसपास एक काळा पडदा असतो तो काढुन टाकायचा. त्या पडद्यामुळे कडवटपणा जाणवतो :) बाकी अस्सल खवय्ये सांगतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ज
जागु Fri, 06/18/2010 - 13:07 नवीन
भेण्डीबाजार, गणपा, स्मिता, इरसाल, आंबोळी, सहज धन्यवाद. इरसाल, गणपा, जसे गाव तसे नाव पण बदलते. त्याप्रमाणे ह्यांना शिंगटे किंवा शिंगाडा म्हणतात की नाही ते मलाही माहीत नाही. आमच्याइथे ह्यांना चिवनीच म्हणतात. आबोंळी जागुराव नाही जागुताई. सहज माश्याचे पोट साफ केले की नाही कडवट लागत.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 06/18/2010 - 15:04 नवीन
आमच्याइथे ह्यांना चिवनीच म्हणतात.
वरच्या कालवणाला आमच्या इथे ;) आंबट-तिखट असे म्हणतात. बोंबलाचे आंबट-तिखट हा माझा जीव की प्राण. ;) * आमच्या इथे म्हणजे वसई-विरार-अर्नाळा भाग. तुमचे "आमच्या इथे" नेमके कुठे आहे?
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 06/18/2010 - 15:27 नवीन
पावसाळ्याच्या या सुरुवातीच्या काळाला वलगण म्हणतात.हे मासे वलगणीचे मासे .गाबुळी साठी खास जाळी घेऊन ही मासळी पकडली जायची. वलगण संपली की चिंबोर्‍यांच्या मागे लागायचं. तोपर्यंत श्रावण आला म्हणून आधी गटारी अमावस्येला अंगठा चेपून जे मिळेल ते खायचं . आठ दिवसानी आपल्याला नाही जमत बॉ श्रावण पाळायला अशी कबुली देऊन परत खायला सुरुवात.!!!! या काळाच्या अगोदरचा काळ म्हणजे आगोटीचा .या वेळी पावसाळ्याची तयारी केली जायची.या तयारीत म्हत्वाची म्हणजे सुक्या मासळीची बेगमी करून ठेवायची. लावणीच्या वेळी गडी माणसांना जेवण द्यायचे असायचे म्हणून खास तयारी.शहापूर्च्या जवळ कुठेतरी सुक्या मासळीचा घाऊक बाजार असायचा एव्हढं आठवतं आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 06/18/2010 - 15:34 नवीन
या काळाच्या अगोदरचा काळ म्हणजे आगोटीचा .या वेळी पावसाळ्याची तयारी केली जायची.या तयारीत म्हत्वाची म्हणजे सुक्या मासळीची बेगमी करून ठेवायची. लावणीच्या वेळी गडी माणसांना जेवण द्यायचे असायचे म्हणून खास तयारी
काका कसली आठवण काढलीत हो. आवणीच्या (लावणीच्या)वेळी हमखास सुक्या माश्यांच जेवण असायच. गेला बाजार चुलीत भाजलेला सुकाबोंबील किंवा केळीच्या पानात बांधुन चुलीत भाजलेल खार तोंडी लावायला असायचच आसायच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
श
शुचि Fri, 06/18/2010 - 16:25 नवीन
ती गाभोळी काय सुरेख दिसतेय . मस्त!!! आम्ही बगड (माशाचं डोकं) करतो. खूपच, फारच, अतिच, भयंकरच चविष्ट लागतं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Fri, 06/18/2010 - 16:36 नवीन
विचारल्याशिवाय राहवत नाही म्हणुन लिहतोय... ज्या एका बोटा एवढी सरासरी लांबी असलेल्या सुकवलेल्या माश्याला चिवणी बोलतात तो तर ह्या माश्यासारखा नसतो! Botany मधे family बोलतात तसल्या एकाच family चे आहेत की काय?
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 06/18/2010 - 18:09 नवीन
फोटोतील रंगावरुन हे रेड मिट म्हणता येइल का ? फाअयनल कालवण खल्लास जमलय . काय रंग आलाय हो रश्याला जबरदस्त =P~ =P~ =P~ =D> =D> =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
प
प्रभो Fri, 06/18/2010 - 18:15 नवीन
मासे व्हाईट मीट मधे येतात रे दाद्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
J
jaypal Fri, 06/18/2010 - 18:25 नवीन
लालेलाल रक्त दिसत आहे म्हणुन विचारल. पापलेट बोंबिल ई. माश्यात अस आणि येवढ लाल रक्त दिसत नाही. *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
श
शुचि Fri, 06/18/2010 - 18:28 नवीन
माशाचा कल्ला उचलून लाल रंग बघून मासा घ्यावा. ताजा असतो. मटण मात्र गुलाबी घ्यावं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
ज
जागु Sat, 06/19/2010 - 07:31 नवीन
जयपाल, वरील फोटोतिल मासे ताजे आहेत. आणि त्यांचे बाजुचे पर लाल असतात. ह्याचा रंग साधारण गोल्डन असतो. त्यामुळे ते लाल दिसतात. शुची तुमची टिप बरोबर आहे. तसेच बघतात ताजे मासे. शानबा आमच्याइथे ह्याला चिवनीच म्हणतात. कदाचीत तुमच्याइथे ही सुकवुन ठेवत असतील. आणी सुकवल्यावर ती आळुन छोटी होणारच.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा