कलादालन

चला सिंहगडावर...

Primary tabs

मिपाकरहो... पावसाळा सुरु झाला पण अजुन कोणी सिंहगडला गेलेले दिसत नाही... तोपर्यंत...या फोटोंवरच समाधान मानुया... १. उकलेल्या शेंगा... Image removed. २. मस्त काकडी... Image removed. ३. गरम-गरम भजी.... Image removed. ४. फक्कड पीठल भाकरी... Image removed. ५. उबदार शेकोटी... Image removed. ६. आल घातलेला गरम चहा... Image removed. ७. भाजलेलं कणीस... Image removed. ८. गार गार मडक्यातलं दही... Image removed. Image removed. ९. कैरी... Image removed. Image removed. ता.क. - वरिल फोटो मी काढलेले नाहीत...पण आस्वाद घेऊ शकता :) -- श्रीराजे --
mamuvinod

फोटो दिसत नाहित

मामु

सहज

हे बेस्ट! खाद्ययात्रा आवडली.

आंबोळी

पण अजुन कोणी सिंहगडला गेलेले दिसत नाही...
मिपाकरानी सिंहगडावर जाणे सोडून दिलय.... उगा कोण कशाला नडग्या फोडून घेईल?

अवांतर : फोटो क्लासच

आंबोळी

गणपा

हे खाऊ का ते खाऊ अस झालय =P~

कॉलेजात असताना निरनिराळ्या मोसमात (उन्हाळा, पावसाळा, हिवाळा) निरनिराळ्या वेळात (भल्या पहाटे, टळटळीत दुपारी, संध्याकाळी, ऐन मध्यरात्री) निरनिराळ्या पद्धतीनी (गाडीवर, सायकलवर, गाडीतून, चढत) आणि निरनिराळ्या लोकांबरोबर (प्रसंगानुरूप) अक्षरश: डझनावारी केलेल्या सिंहगड वार्‍या आठवल्या.... उद्या शनिवार सकाळ.... ६ चा गजर लावून ठेवतो !

जे पी

मी ऋचा

चळचळा पाणी सुटलं ना तोंडाला!!
=P~ =P~

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

विकास

फोटो मस्तच. सिंहगडावरील ते पदार्थ एकदम चविष्ट असतात हे स्वानुभवाने माहीत आहे. मात्र सिंहगड म्हणल्यावर केवळ तिथले पिठलं-भाकरीच लक्षात राहू नये इतकेच वाटते. नाहीतर स्वर्गात तानाजी, "हेची फळ काय मम तपाला?", असे म्हणत बसेल. :-)

असे वाटायचे अजून एक व्यक्तीगत कारण म्हणजे, एकदा एका महाराष्ट्रातील कॅथलीक शाळेत शिकलेल्या अस्सल मराठमोळ्या मराठी मुलासमोर (जवळचा मित्र), जेंव्हा सिंहगड हा शब्द आला, तेंव्हा तो लगेच म्हणाला, "हा तोच गड ना, ज्याचा शेप सिंहासारखा आहे?" ... :(

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

टारझन

जेंव्हा सिंहगड हा शब्द आला, तेंव्हा तो लगेच म्हणाला, "हा तोच गड ना, ज्याचा शेप सिंहासारखा आहे?"

=)) =)) =)) =)) =)) अवघड आहे !! बाकी ताणाजी मालुसर्‍याच्या आणि घोरपडीच्या कथा वारंवार उगळण्यामुळेच सिंहगडाचे महत्व अबाधित राहिले , असे काही आहे असे वाटत नाही असा माझा कयास आहे .

खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा ... ते दिलं सोडुन न ऐतिहासिक चर्चा (जी किमान इथे सर्वांना माहित्ये (गृहित धरु का रे मुलांनो ? ) ) मधे आणायचं कारण बाकी खरंच कळलं नाही :)

अवांतर : फोटू झकास आहेत ... कॉलेजात असतांना जेंव्हा जायचो तेंव्हा खिषात पैसे नसत , मग आपलं कणिस किंवा पिठलं भाकरी ह्यावर आणंद मानुन घ्यायचो , अलिकडे एकही पदार्थ चापायचा सोडत नाही .. जे जे वाटेत येईल ते सरळ हादडत सुटतो. गड चढताना मात्र वाटेत सरबत किंवा ताक विकणारे बसतात, त्यांच्या ग्लासांचा तो मळकट वास एकदाच घेतला नंतर तोंड लावण्याची डेरिंग नाही बा झाली. ;)

सिंहगड अप्रतिम सौंदर्याने नटलेला किल्ला आहे. वर गेलं की काही जास्त पौराणिक खाणाखुणा दिसत नाहीत :)

- टाराजी मालुसरे

विकास

पुरेसे मी स्पष्ट लिहीले नाही. पण माझा रोख चर्चा करण्यावर नव्हता. तर सिंहगडाचे म्हणून देखील फोटो टाकता आले तर बघा याकडे होता.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

टारझन

मात्र सिंहगड म्हणल्यावर केवळ तिथले पिठलं-भाकरीच लक्षात राहू नये इतकेच वाटते. नाहीतर स्वर्गात तानाजी, "हेची फळ काय मम तपाला?", असे म्हणत बसेल.

ह्यातुन वरचा अर्थ प्रतित न झाल्यामुळे माझा गोंधळ उडाला , सॉरी शक्तिमान ;)

मीनल

सर्व छान आहे. विशेष म्हणजे `बाटली `नाही आस्वाद घ्यायला .ते मस्त.
काहींना त्याशिवाय मजाच नाही हो येत ट्रीप मधे.
निदान सिंहगडावर तरी असले प्रकार नको असे वाटते.

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

हर्षद आनंदी

नुकतेच गडावर जाऊन आलो, भरपूर काही हादडलं ..
पण च्यामारी फोटु आणि खायच्या पदार्थाचे.. छ्या!! नको तिथे मेमेरी वाया नाही घालवत राव..
फोटु काढायला बर्रेच लोकेशन्स आनी सीन्स असतात की

असे काही आले समोर की उरकायचे, कशाला ते फोटु आणि नंतर आठवणी.. छे नकोच ते!

पण गडावरच्या भज्या आणि कांद्याची चटणी लाजबाब..

ऐतिहासिक म्हणाल तर.. गडावर आता तानाजींच्या पुतळ्यापाशी किंवा परीसरात पादत्राणे न घालता जावे असा एका अलिखित संदेश आहे! वीस एक वर्षापासुन गडावर जातोय कधी असे काही ऐकले नाही
(हे सांगणार्‍या व्यक्तिला, तानाजीने सर केलेला कडा मात्र दाखवता आला नाही याचा खेद वाटला)

असो, कालाय तस्मै नमः !! जाग्रुती आहे म्हणायची

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

दिपक

च्च्च्च्च्च्च्च्च तुफान खादाड्या.. पिठले भाकरी तर लाजवाब... :-)