Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लावणी: सोन्याची अंगठी मजला आणुन द्या

प — पाषाणभेद, Sat, 06/19/2010 - 17:57

प्रतिक्रिया द्या
2522 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
मदनबाण Sat, 06/19/2010 - 18:21 नवीन
शृंगारीक लावणी आवडली... :) मदनबाण..... "Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep." Carl Sandburg
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 06/19/2010 - 18:35 नवीन
राव पाटिल बाजीराव आहात तुम्ही कशाला कधी केलं नाही कमी घाटदार पाच तोळे चोख वजनी अंगठी साखरपुड्याला घेवूनी भेटा सगळ्यांसमोर तेव्हा, आता जावूद्या क्या बात है झकास..पेशवाइत गेल्यासा सारखे वाटले
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sat, 06/19/2010 - 18:47 नवीन
साडी चोळी आहे मजला नको दुसरे काही
हा विरोधाभास नाही वाटत का? म्हणजे अस पण बोलते व अरुन अंगठी पण मागते. आपल्या ध्यानात नाही राहील का हे? तुमच्या(तुझ्या रे! वय माझ्यापेक्षा थोडच कमी जास्त असेल अस वाटत) गावरान भाषेतल्या कविता खुप आवडतात मला,तशाच लिहा. &************************************************** दील दो दील दो,या तो इंटरनेट का बिल दो!
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sun, 06/20/2010 - 03:30 नवीन
आणि साधीसुधी नाही पाच तोळ्याची अंगठी हवीय (जरा जास्तंच वजन आहे, नाही?)... आजमितीला हि अंगठी लाखाच्या घरात जाईल... खि खि खि. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Sun, 06/20/2010 - 07:57 नवीन
पाच तोळ्याची अंगठी बनवली त ती अंगठा वाटेल व बांगडी बनवली तर बांगडा वाटेल.भलतीच आगाउ आहे ही कवितेतली बाई............ओ पाषाणभेद आवरा तिला आमच्या निष्पाप मनावर नको ते परीणाम नको........ असे विरोधाभास टाळा आता.................दगड फोडताना काही डोक्याला लागल की काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
प
पाषाणभेद Sun, 06/20/2010 - 08:08 नवीन
काही हरकत नाही. अंगठा झाला तर आपण तिला अकराबोटी म्हणू अन बांगडा झाला तर तळून खाईल ती! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
प
पाषाणभेद Sun, 06/20/2010 - 07:11 नवीन
"अंगठी साखरपुड्याला बोटात घालणे" म्हणजे वाड् निश्चय करणे. या सामाजिक रिवाजात नाते पक्के करणे हा भाव असतो. आपली हिरॉईन फार फार चोखंदळ आहे. हलवून खुंटा ती बळकट करू पाहत आहे. अशाने तीचे नाते पक्के तर होईलच पण एक मौल्यवान वस्तूही तिच्या बोटात येईल. अन पाच तोळ्याची अंगठी घालणारीण पण काही साध्यासुध्या अंगकाठीची नाही. ती काही शहरातली फॅशनेबल स्त्री नाही. ती खेड्यातली गावराण स्त्री आहे - अगावू नाही. स्पष्टपणा, रोखटोखपणा तीच्या अंगात मुरलेला आहे. पाच तोळ्याच्या अंगठीकडे ती 'गुंतवणूकीच्या' माध्यमाकडून बघत आहे. म्हणूनच ती पुचाट साडीचोळी न मागता पाच तोळ्याची अंगठी मागते आहे, भले ती एकदाच बोटात घालेल पण कायमची गुंतवणूक होईल. (तरीही मला पाच तोळे म्हणजे जरा मोठीच वाटते आहे. संपादन करून तीन तोळे करावी वाटते आहे.) @ शानबा: अरे शानबा मला तू एकेरीतच बोलाव रे. मस्त वाटते. एकदम मित्रासारखे. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sun, 06/20/2010 - 08:11 नवीन
हत च्यायला हे अस आहे काय? मग कवितेच्या आधी लिहायच होत ना!
अन पाच तोळ्याची अंगठी घालणारीण पण काही साध्यासुध्या अंगकाठीची नाही
अरे काय Yokozuna आहे की काय??
स्पष्टपणा, रोखटोखपणा तीच्या अंगात मुरलेला आहे
बायको म्हणुन मागतेय तर ठीक आहे,पण अशी अरदांड 'नवरी' नको रे बाबा!
पाच तोळ्याच्या अंगठीकडे ती 'गुंतवणूकीच्या' माध्यमाकडून बघत आहे. म्हणूनच ती पुचाट साडीचोळी न मागता पाच तोळ्याची अंगठी मागते आहे, भले ती एकदाच बोटात घालेल पण कायमची गुंतवणूक होईल.
पाच तोळ्याची अंगठी करणारा खेड्याच्या माणसांशी संबंध ठेवेल का? आणि गुंतवणुकीबाबतीत बरी ती पुढारली आहे! तेव्हा आम्ही असले कवितेतले विरोधाभास मानणार नाही,कवीने योग्य खुलासे करावेत.आपण आपले चुकले नाही हे सांगायला कायच्या काय परीस्थीती बनवता आहात अस वाटत. आपल्याकडुन खुप चांगल्या लिखाणाची अपेक्षा आहे,हे असले विरोधाभास टाळा म्हणजे झाल! जीन्स'च्या वर' पण काहीतरी लिहा की..........!!
चाल सुरू: पिकल्या आंब्याला दाबून पाहू नका घ्यायचा आसलं तर घ्या, नाय तर नका ||धृ||
wow!!! Grazie!!grazie for this!! (पुर्ण कविता मस्त आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
पाषाणभेद Sun, 06/20/2010 - 08:16 नवीन
जावूद्याहो शानबा. असले हलकेफुलके नाही वाचायचे तर मग काय दररोजचा पेपर वाचायचा का? अहो हे 'जे न देखे रवी ' आहे. अन तुम्हाला तुमच्या पिक्चरमध्ये हे गाणे टाकायचे असेल तर "घाटदार अर्धा ग्रॅम चोख वजनी" असला बदल आपण करू, मग तर झाले? (तरी मी म्हणतो आपल्या 'मराठी ' पिक्चरचे बजेट वाढवा. पण नाही. नंतर तुम्हीच म्हणता असं तसं. अहो दाजीबा असं हे वागणं बरं नव्ह!) अवांतर: खेड्यात पैसा भरपूर आहे म्हटलं. मी रोखीने (कॅश पेमेंट करून) मोठ्या मोठ्या चारचाकी गाड्या शोरूम मधून काढणारी मंडळी पाहीली आहेत खेड्यातून. आपल्यासारखी उगाचच पेमेंट स्लीप नको, जामीनदार नको!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Sun, 06/20/2010 - 08:19 नवीन
टारझन नंतर आता तुमचा ब्लॉग bookmark केला आहे.
आंबा माझा रायवळ, नाही हापूस की पायरी रस जरा चाखून बघा, म्हणाल नमून्याची चव बरी
अरे हे काय लिहतोस?? पायरी व रायवळपेक्षा हापुसच सरस मानतात!! आंब्यांची माहीती तरी मिळवायचीस!
तुम्ही आंबं इथंतिथं दाबीता, हात इथंतिथं लावता पाटीत आंबं रचलेत निट, का उगा खाली हात घालता निसंतं बघायचं बघता, आन येळ घालवीता फुका पिकल्या आंब्याला दाबूनी पाहू नका ||४||
मला 'कुअर्थ' अपेक्षित नाही,पण हे जाम आवडल.आम्ही आपल्या कवितचे फॅन आहोत हे लिहुन मी तसुभरही चुक केली नाही अस वाटत. हो पण मी चुका असतील तर काढतच राहणार!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 06/20/2010 - 08:43 नवीन
ब्लॉगबद्दल धन्यवाद! >>> आंबा माझा रायवळ, नाही हापूस की पायरी... मला हापुस सरस असतो हे माहित होते. पण मी हे वरचे जाणूनबुजून लिहीले होते. "तुम्ही हापुस जरी चाखला असेल तरी माझा हा गावठी आंबाच श्रेष्ठ आहे " असे हिरवीनीला आपेक्षीत होते. अन ती त्याचे मार्केटींग करते आहे. बाकी कुअर्थ असेल तर तो मलाही समजून द्या. उगाच आपल्या घरंदाज स्त्रीला बोल लावता बघा तुम्ही शहाणी सुरती माणसं. चुका काढू नका हे मी कधी म्हटलेय का? त्या मुळे का होईना तुम्ही कविता बारकाईने वाचतात ते समजते! :-) अवांतर: तुमच्या झाडावरचे रायवळीचे आंबे आम्ही खाली पडूच दिले नसते बरं!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा