ब्राझील फुटबॉल जत्रा

मागच्या आठवड्यात ब्राझील मधल्या फुटबॉल वेडा बद्दल मी दिलेला प्रतिसाद .. काल झालेला ब्राझील विरुद्ध आयव्हरीकोस्ट सामना, ब्राझीलीयन जनते बरोबर बघण्याचा योग आला त्याची ही क्षणचित्रे.. आयुष्यभर लक्षात राहिल असा हा अनुभव होता... सामना पाहण्यासाठी रस्त्या रस्त्यावर केलेली जय्यत तयारी Image removed. Image removed. सामना पाहण्यासाठी कोपाकबाना या जगप्रसिद्ध समुद्रकिनारी फिफा ने दोन महाकाय पडदे लावले आहेत.. Image removed. Image removed. Image removed. चला सामना सुरु होण्यासाठी १ तास बाकी आहे लवकर जाउन मोक्याची जागा धरूया.. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. काल ह्या ठीकाणी ९८,००० च्या आसपास लोक सामना पाहण्यास आले होते..(साखळी सामन्याला इतके तर बाद फेरीला किती.... :W ) Image removed. Image removed. Image removed. सामन्या दरम्यान कोकाकोलाचा लुफ्त घेणारे अस्मादिक... <:P Image removed. ३ गोल झाल्यावर सुरु झालेला जल्लोश पाहून आस्मादिकांनी तेथून पळ काढला.. ;) पुढचा ब्राझीलचा सामना कोपाकबानाला जाऊनच पाहायचा हा निर्धार केला आहे हे. वे. सा. न. ल.

धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड !!!

एकदाची केसुंची एंट्री आली!!!!!!!!!!!!!!!!!!!!! लै भारी फोटो... पण अजून काही तरी लिहायचं ना राव... थोडक्यात आटोपलंय. पण लिहिलं त्याबद्दल धन्यवाद. :)

बाकी नायजेरिया, जर्मनी वगैरेमधल्या लोकांनी घ्या मनावर...

बिपिन कार्यकर्ते

जबरा फोटुज :) शेवटचा फोटु तर लै बाळसेदार आलाय हो ;)

ब्राझिल च्या स्त्रीयांची आजची प्रतिमा कुठे न दिसल्यामुळे हिरमुसलो आहे :(

-(ब्राझिल प्रेमी) टारझन

व्वा: चांगलाच फुटबॉल फिव्हर चढलाय जनतेला... अगदी कुत्र्यांपर्यंत पोचलाय.. :)

संपादक, कुणीतरी हा धागा फिफाच्या भागात ट्रान्सफर करा ना!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

संपादक, कुणीतरी हा धागा फिफाच्या भागात ट्रान्सफर करा ना!!!

तेच बघत होतो... बहुधा नीलकांतलाच जमेल.

बिपिन कार्यकर्ते

वा!
मिपाच्या फिफा सेक्शनचं वार्तांकन थेट ब्राझिलमधून
मजा आली!!

बिका म्हणतात तसं इतर देशांतील मिपाकरांनो.. बघता काय? सामिल व्हा! ;)

ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

ब्राझीलSSSSSSSSS ला ला ला ला ला ला लाSSSSSSSSS
जबराच की हो केसुशेठ. शॉल्लेट मज्जा आली असणार.
साक्षात फुटबॉलच्या आळंदीत ब्रंहानंदी टाळी नाही लागली तरच नवल.
बाकी हे झाल धावतं समालोचन, पुढच्या सामन्याला विषेश पुरवणी येउंद्यात.

(जर्मन सपोर्टर )गणपा.