Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयच्या गावात कटकट !!!

ट
टारझन
Wed, 06/23/2010 - 06:45
🗣 50 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
15016 वाचन

💬 प्रतिसाद (50)
र
रामदास Wed, 06/23/2010 - 06:56 नवीन
डिलीट करु नका ... नाही तर अभद्र होईल.. हा बॅनर वापरायला सुरुवात कर आता.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 06/23/2010 - 07:04 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मदनबाण..... "Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once." Lillian Dickson
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/23/2010 - 07:04 नवीन
>> बाकी अशा बल्क फॉरवर्ड मेल आल्या की मी सरळ रिप्लाय टु ऑल करतो , आणि मैत्रीचे संबंध क्षणभर बाजुला ठेऊन स्पष्ट शब्दांत तासतो. हेतु एकंच की असला पाण्चटपणा आमच्या मेलबॉक्स मधे नको << असाच पण फक्त व्यक्तीगत प्रतिसाद आम्ही आमचे एकेकाळचे सुहृद श्री. **** यांना दिला होता; तेव्हा त्यांनी शहाजोगपणे "एक इमेल डिलीट करायला तुला किती वेळ लागतो? मिपाचं पान तर तू मिनीटातून दोनदा रेफ्रेश करतेस ना!" असं उत्तर दिलं होतं. अर्थातच मी त्यांना जीमेलवरून ब्लॉक केलं तर म्हणे हे पैलवान बराच काळ डिप्रेस होऊन रा.रा. कार्यकर्ते यांच्यासमोर रडत होते. असो. कधी कधी बाळंही थोडी(तरी) मोठी होतात तर! अदिती पांचट फॉर्वर्ड **** करणार। भक्कम बँडविड्थचा त्याला आधार। मला त्याचा राग येणार। भडका उडणार निश्चित॥ ॥ इति इमेलयुजर महावाक्यम्॥
  • Log in or register to post comments
I
II विकास II Wed, 06/23/2010 - 10:56 नवीन
>>अर्थातच मी त्यांना जीमेलवरून ब्लॉक केलं तर म्हणे हे पैलवान बराच काळ डिप्रेस होऊन रा.रा. कार्यकर्ते यांच्यासमोर रडत होते. सहाजिकच आहे. जो माणुस असले इ-मेल पाठवुन नशीव सुधरायची आशा करतो, तो दिप्रेस होउन रडेलच ना. असो. कधी कधी बाळंही थोडी(तरी) मोठी होतात तर! == हे वाक्य जास्त महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ट
टारझन Wed, 06/23/2010 - 09:38 नवीन
हा हा हा !! भारी किस्सा !! असाच एक किस्सा माझ्या सोबत घडला होता. आमचा पण एके काळचा मित्र होता (ए कोण केकलला रे मैत्रिण म्हणुन ? मित्रंच होता ... ) हा मित्र बाकी वेळी आम्हाला फार ग्रांटेड घ्यायचा .. अगदी "** ** " वगैरे पासुन सोज्वळ शब्दांचा आम्ही अगदी आपुलकीने स्विकार करायचो .. मैत्रीत चलता है म्हणुन :) एकदा काय झालं , आमच्या ल्यापटॉपात व्हायरस आला , आणि एके दिवशी माझ्या टोटल काँटॅक्ट्स ना स्पॅम फॉरवर्ड झाल्या .... बर्‍याच जणांनी मला विचारलं काय रे हे ? म्हंटलं लेकांनो ... चुकुन झालंय ते ... व्हायरस आहे ल्यापटॉपात ... बाकी सगळ्या मित्रांना हे कळलं .. पण एक मित्र काय अचानक हायपर झाला ... (तसा तो सदान कदा हायपर असायचा म्हणा) त्याला समजावला ठिक भाषेत , तरी चालुच .. ज्यामायला .. मग म्हंटलं .. दिवसभर फुकाचा पगार घेउन खुर्च्या उबवतंच असतोस की ... एखाद डिलीट चं बटण दाब की .. मी काय तुला स्वःता मेल फॉरवर्ड केलीये का ? =)) ह्यावेळी चांगल्याच मिर्‍या झोंबल्या त्याला =)) म्हणतो कसा ... "मी तुला ब्लॉक करिन " म्हंटलं "गो अहेड " हुषार्‍या कोणाला बॉ ? =)) नंतर मी सुद्धा बिकांना झाला प्रकार सांगितला होता , हा योगायोग , आणि हो ... लै जोरात (आणंदात) रडलो मी त्या दिवशी ... बाकी देवानं त्या मित्राला "श्याणं" केलेलं दिसत नाही ..येडंचे ते अजुन .. त्याला फॉरवर्डेड मेल्स आणि ऑटोजनरेटेड मेल्स मधला किमान फरक कळण्याची बुद्धी येवो हिच प्रार्थणा :) एखाद दिवशी चुकुन मेल फॉरवर्ड केल्यामुळे असा चमत्कार झाला तर खरंच खुप मज्जा येईल न? असो ... आपल्या प्रतिसादामुळे आठवणी जाग्या झाल्या , धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
राजेश घासकडवी Wed, 06/23/2010 - 10:09 नवीन
एकंदरीत टारझन व अदितीचे किस्से वाचून दोघांनाही आपापले नको असलेले मित्र गमवायची संधी मिळाली हे दिसलं. तीसुद्धा या इमेली फॉरवर्ड केल्यापासून काही दिवसात! म्हणजे चांगले अनुभव येण्याचं भाकीत खरं ठरतं तर!
आणि हो ... लै जोरात (आणंदात) रडलो मी त्या दिवशी ...
हे कोल्हापुरी 'आणि हो' की नुसतंच? पुरुष रडत नाहीत असं कोणीतरी नुकतंच म्हटल्याचं आठवतं... नाव आठवत नाही, पण काही वेदना घेऊन सतत (न रडता!) वावरत असावेत असं काहीसं स्मरतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/23/2010 - 11:07 नवीन
राजेश, फरक आहे; नको असलेले मित्र कधीच नसतात. लिस्टमधे असलेले काही नकोसे का होतात त्याचा किस्सा मी लिहीलेला आहे. असो. अदिती (अधिक माहितीसाठी रा.रा.कार्यकर्तेंना इमेल करा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Wed, 06/23/2010 - 10:40 नवीन
टारझन यांचा वरील प्रतिसाद संपादित होऊन बदललेला आहे. एका त्याज्य शब्दप्रयोगाच्या जागी "** **" आलेलं आहे. माझ्या मते ते योग्य संपादन असलं तरी ते कोणी केलं व का केलं याची नोंद यावी. हे स्वसंपादन असलं तरी तसं लिहिलं जावं. प्रक्रियेत पारदर्शकता हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
आ
आंबोळी Wed, 06/23/2010 - 10:46 नवीन
ते कोणी केलं व का केलं याची नोंद यावी सहमत. आम्हीही आमच्या नुकत्याच उडालेल्या धाग्याच्या नोंदीच्या प्रतिक्षेत आहे. आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
I
II विकास II Wed, 06/23/2010 - 10:54 नवीन
"** **" एक चांदणी जास्त झाली त्याचे पण स्प्ष्टीकरण यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
स
सहज Wed, 06/23/2010 - 07:05 नवीन
टारझनशी सहमत आहे. पण याचे अजुन एक रुप असे आहे की हा तुझा लेख देखील जसाच्या तसा दणादणा फॉर्वर्ड होउ लागेल की तुम्हाला कधी असे विरोप आले तर असे असे उत्तर द्या. एकंदर फॉर्वर्ड तसेच मास इमेलला कडक नियम केले पाहीजेत!
  • Log in or register to post comments
श
शेखर Wed, 06/23/2010 - 07:28 नवीन
बहुतेक तु साईबाबांच्या मेल डिलीट करतोस की काय त्यामुळे तुझे प्रतिसाद डिलीट होत असावेत अशी एक शंका आली. :)
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Wed, 06/23/2010 - 07:51 नवीन
काही कांरणांमुळे मीच प्रकाटाआ. ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे
  • Log in or register to post comments
I
II विकास II Wed, 06/23/2010 - 07:42 नवीन
ते इ-मेल डिलिट करण्या ऐवजी मिपावर टाक, म्हणजे जिततके जास्त लोक वाचतील तितके पुण्य तुला मिळेल. आणि जर लेख उडवला गेला तर पाप पण दुसर्‍याला लागेल. :D
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Wed, 06/23/2010 - 07:52 नवीन
खरच लै डोकं फिरत असले मेल बघुन.... पण पब्लिक पण लै घाबरट असतं लक च्या नावाखाली कशालाही घाबरत. यावरून एक होस्टेलवरचा किस्सा आठवला.... होस्टेलमधे आमच्या मजल्यावर तेलगू पब्लिकचा लै भरणा होता... हे पब्लिक लक खराब होइल वगैरे प्रकारला लै घाबरत... तर होस्टेलच्या बाथरूम मधे आम्ही एका मासिकात आलेला एक उत्तान फोटो चिकटवला होता.... परिक्षेच्याकाळात पहिल्या पेपरच्या दिवशी माझा रुमपार्टन गमतीने त्यातल्या २-३ तेलगू पबलिकला म्हणाला ,"बाथरुममे जाके आशीर्वाद लिया क्या? नही तो पेपर खराब जायेगा..." लगेच १-२ जण जाऊन नमस्कार करून आले. एकाने माज केला... आणि नेमका त्याला पहिला पेपर घुसला.... दुसर्‍या दिवसापासून पेपरच्या आधी त्या बाथरुम बाहेर रांगा लागायला लागल्या..... आंबोळी
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Wed, 06/23/2010 - 07:53 नवीन
गुडलक वगैरे ठीकच आहे, पूर्वी अमेरिकेत पत्रं यायची - या खालच्या यादितल्यांना एकेक डॉलर पाठवा, तुमचं नाव यादीत घाला आणि वीस लोकांना पाठवा...कोण असल्या स्कीम्सना फसायचं कोण जाणे. रामदासांची प्रतिक्रिया आवडली. :D
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 06/23/2010 - 08:01 नवीन
हा हा हा टार्‍या तुझ्या वैतागावरुन खुप वर्षापुर्वी आलेल्या एका इ-मेलची आठवण झाली. A Mail from a frustrated victim of chain mails: I wanted to thank all my friends and family who have forwarded chain letters to me in 2003, 2004, 2005, 2006, 2007 and 2008 and continuing it in 2009 also. Because of your kindness: * I stopped drinking Coca Cola after I found out that it's good for removing toilet stains. * I stopped going to the movies for fear of sitting on a needle infected with AIDS. * I smell like a wet dog since I stopped using deodorants because they cause cancer... * I don't leave my car in the parking lot or any other place and sometimes. I even have to walk about 7 blocks for fear that someone will drug me with a perfume sample and try to rob me. * I also stopped answering the phone for fear that they may ask me to dial a stupid number and then I get a phone bill with calls to Uganda , Singapore and Tokyo .. * I also stopped drinking anything out of a can for fear that I will get sick from the rat faeces and urine. * When I go to parties, I don't look at any girl, no matter how hot she is, for fear that she will take me to a hotel, drug me, then take my kidneys and leave me taking a nap in a bathtub full of ice. * I also donated all my savings to the Amy Bruce account. A sick girl that was about to die in the hospital about 7,000 times.. (Poor girl! She's been 7 since 1993...) * Still open to help some from Bulgaria who wants to use my account to transfer his uncle's property of some hundred millions $. * Made some Hundred wishes before forwarding those Ganesh , Tirupathi Balaji, Jesus, pics etc. Now most of those 'Wishes' are already married (to someone else) IMPORTANT NOTE: If you do not send this e-mail to at least 11,246 people in the next 10 seconds, a bird will SH** on your head today at 6:30pm ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
I
II विकास II Wed, 06/23/2010 - 12:46 नवीन
>>If you do not send this e-mail to at least 11,246 people in the next 10 seconds, a bird will SH** on your head today at 6:30pm हे कसे शक्य आहे? जीमेलची मर्यादा दिवसाला ५०० ची आहे ना. असल्या इ-मेल साठी इ-मेल सर्वर घ्यायचा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अर्धवट Wed, 06/23/2010 - 09:38 नवीन
असाच एकदा सक्काळ सक्काळी मि वैतागुन रीप्लाय ऑल केला होता एकीला.. कोणती तरी बाय होती फटुत.. तो रीप्लाय तसाच्या तसा डकवतोय Hi, I am deleting it immediately after this reply. I am proclaiming its all rubbish, And challenging this email god to do whatsoever is threatened about in this email. I will definitely inform you if i die in next 20 days.. Wait for the update.. Warm regards,
  • Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन Wed, 06/23/2010 - 10:28 नवीन
रिप्लाय ऑल मेलचा फॉरमॅट दिल्याबद्दल धन्यवाद ! एक टेंप्लेटच बनवून टाकतो. एरवी आपण अश्या मेल्सकडे ढुंकुन पाहात नाही. पण आता नक्की बघीन ;) जे पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
I
II विकास II Wed, 06/23/2010 - 10:46 नवीन
I will definitely inform you if i die in next 20 days from the hell/heaven.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन
म
मेघवेडा Wed, 06/23/2010 - 13:25 नवीन
स्वत:बद्दल आत्मविश्वास असावा माणसाला ;) एक काय ते नक्की सांगा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
N
Nile Wed, 06/23/2010 - 13:30 नवीन
पण तुला काय माहित नाही का रे मेवे? कुणाला विश्वास असो वा नसो. :) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 06/23/2010 - 13:30 नवीन
अहो, आत्मविश्वास आहेच म्हणून संदिग्ध बोलावे लागले असेल. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
इ
इंटरनेटस्नेही Wed, 06/23/2010 - 10:51 नवीन
छान आहे. -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Wed, 06/23/2010 - 11:44 नवीन
लोकांना तासुन तुझा वेळ आणि शक्ति वाया घालवणे, अश्या विषयावर काथ्याकुट काढुन मिपाची सर्व्हर स्पेस वाया घालविणे यापरिस चुपचाप डीलिट करणे सोपे नाही का? दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 06/23/2010 - 11:48 नवीन
टारुपंतांनी ग्यानबाची शिकवणी लावली की काय? ;) -Nile
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 06/23/2010 - 12:39 नवीन
टारुपंतांनी ग्यानबाची शिकवणी लावली की काय?
काय बोल्तो ?? टार्‍याला अनावृत्त पत्र लिहायला घेउ का मग ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
अ
अवलिया Wed, 06/23/2010 - 14:26 नवीन
मस्त रे टा-या.... --अवलिया
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 06/23/2010 - 14:29 नवीन
खरोखरच काही आपत्ती यायची रे बाबा!! सावध रहा!!! :W चतुरंग
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 06/23/2010 - 14:47 नवीन
हेतु एकंच की असला पाण्चटपणा आमच्या मेलबॉक्स मधे नको हे मात्र बरोबर बोललास (लिहिलस) बघ! अरे, कुणाला कश्यात पांचटपणा वाटेल ते सांगता येत नाही. तुझ्या मेल्स पाहून इतरांना तोही पांचटपणा वाटू शकतो. मित्रानं अशी मेल पाठवली ती जशी तुला आवडली नाही तसेच इतरांना तुझ्या मेल्स (व्य. नि.) न आवडण्याची शक्यता असतेच!;) जशी तुझी बाजू तुला बरोबर वाटते तशी त्यांची बाजूही त्यांना बरोबर वाटत असतेच कि! रेवती
  • Log in or register to post comments
I
II विकास II Wed, 06/23/2010 - 18:56 नवीन
संपादक मंडळ हा प्रकारच मी पहील्यांदा मिपावर पहात आहे. त्यापेक्षा, ज्या संपादकाला प्रतिसाद उडवावा असे वाटत असेल किंवा स्पष्टीकरण हवे असेल तर त्याने स्वतःचे नाव टाकावे म्हणजे संपर्क साधता येईल. सगळ्यांनाच सोपे होइल. मिपावर बरेच संपादक आहेत, काहींची नावे ही आठवत नाहीत. प्रत्येकाला तुम्ही व्यनी, खरडी टाकणे व्यवहारीक होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
स
संपादक मंडळ Wed, 06/23/2010 - 19:19 नवीन
नमस्कार, विविध संपादकांना व्य. नि. किंवा खरडी पाठवण्याचा सदस्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून संपादक मंडळ ही नवी ओळख तयार करण्यात आली आहे. आपल्या तक्रारी, शंका आणि इतर प्रश्न यापुढे या ओळखीला विचारावे. मंडळाला योग्य वाटणार्‍या शंकांचे निरसन केले जाईल. सदर चर्चेतील काही अनावश्यक प्रतिसाद काढले आहेत. धाग्याशी संबंधित नसणार्‍या शंका उपस्थित करून धागा भरकटणार नाही याची काळजी घ्यावी. कृपया सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद, संपादक मंडळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
I
II विकास II Wed, 06/23/2010 - 19:22 नवीन
संपादक मंडळाचा दुवा मुखपृष्ठावर द्या म्हणजे संपर्क साधणे सोपे जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपादक मंडळ
प
प्रभो Wed, 06/23/2010 - 15:05 नवीन
हाहाहा... =)) भारी रे टार्‍या...... :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 06/23/2010 - 16:59 नवीन
व्हायाग्रा, बोअरड हाऊस वाईफस, लेट अस मीट टुनाईट, सिंगल्स इन युअर एरीया या काही मेल्स त्या प्रकारात मोडणार्‍याच. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
प
पंगा Wed, 06/23/2010 - 18:49 नवीन
व्हायाग्रा, बोअरड हाऊस वाईफस, लेट अस मीट टुनाईट, सिंगल्स इन युअर एरीया या काही मेल्स त्या प्रकारात मोडणार्‍याच.
अशा विपत्रांच्या शेवटी "हे विपत्र आणखी दहा जणांना पुढे पाठवा. पाठवलेत तर तुमचे कल्याण होईल; नाही पाठवलेत तर..." अशा छापाचा "वैधानिक इशारा" आजवर तरी पाहिलेला नाही. (कोण जाणे, पुढेमागे दिसेलसुद्धा.) - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Wed, 06/23/2010 - 18:52 नवीन
=)) नाही नाही मला म्हणायचं होतं - स्पॅम (अ‍ॅनॉयिंग मेल्स) मधे मोडणार्‍या मेल्स. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
ट
टारझन Wed, 06/23/2010 - 19:00 नवीन
आजकालचे मेल सर्व्हर्स बर्‍यापैकी स्मार्ट झालेत , तेंव्हा अशा मेल्स ऑटोमॅटिक स्पॅमबॉक्स मधे जातात. त्यामुळे तो विषय नाही. विषय आहे , आपल्यातलेच कार्टुण्स ह्या देवादिकांचे बावळट मेल्स का फॉरवर्ड करतात ? ह्यामागे णक्की कोणता लॉजिकल विचार असतो ? की उगाच रिस्क णको म्हणुन गाढवासारखे मेल फॉरवर्ड करायच्या ? :) ह्या मेल्स चुकुन नाही तर पुर्ण शुद्धित फॉरवर्ड होतात. असो , लेखाचं प्रयोजन आणि शब्दन शब्द समजला असेल अशी आषा करतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
म
मुक्तसुनीत Wed, 06/23/2010 - 18:54 नवीन
"लेट अस मीट टुनाईट " अशा प्रकारच्या विपत्रात "आणखी दहा जणांना पुढे पाठवा. पाठवलेत तर तुमचे कल्याण होईल " अशा स्वरूपाचा मजकूर आला तर बहुदा " समस्त लोकांनी आरेस्व्हीपी अमुक वेळेपर्यंत कळवा/ ब्रिंग युअर ओन बीयर " असेदेखील काय काय पाठवावे लागेल ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
प
पंगा Wed, 06/23/2010 - 19:00 नवीन
ब्रिंग युअर ओन बीयर
बियर?????? #o - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Wed, 06/23/2010 - 19:02 नवीन
http://acronyms.thefreedictionary.com/BYOB
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
श
शुचि Wed, 06/23/2010 - 19:05 नवीन
लै भारी. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मेघवेडा Wed, 06/23/2010 - 19:28 नवीन
BYOB तल्या दुसर्‍या B च्या या मांदियाळीत आपल्याकडे 'Biwi' सुद्धा अ‍ॅड करायला लागेल! ;) किंवा करता येईल म्हणूया! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/23/2010 - 19:43 नवीन
काका लोकांकडून आलेला प्रतिसाद पहाता "Bring Your Own Babe" ऐवजी " Bring Your Own Biwi"च म्हणावं लागेल! काय मुसुकाका? ;-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मुक्तसुनीत Wed, 06/23/2010 - 19:56 नवीन
उपरोक्त प्रतिसादात अनेकविध बाबी विचारात घ्यायला हव्या : १. मला "काका" म्हण्टल्याबद्दल तीव्र निषेध. आजोबा, मामा, पणजोबा काहीही चालेल. तेव्हढे काका नको . २. बीवायोबी : आमचे आपले बीयर व्हर्जन आहे ते बराय. बेब, बिवी, वगैरे वगैरे न झेपणार्‍या गोष्टी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
पार्टनर Wed, 06/23/2010 - 20:57 नवीन
मित्र वगैरे तरी पण ठीक, न ओळखणारे लोकंही त्याच त्याच ई-मेल्स ना रिप्लाय टू ऑल करून तीच तीच, किंवा अजून दुसरी वर्षानुवर्षाची जुनी ई-मेल्स पाठवत राहतात. (तीच मायक्रोसॉफ्टची लॉटरी, तीच हरवलेली चेन्नईची मुलगी, तोच कॅन्सर झालेला नवरा. दरवर्षी.) तेव्हा मीही एकदा धीर करून रिप्लाय टू ऑल करून (आणि काही नावे उडवून) असाच एक अजून फॉरवर्ड आलेला ई-मेल उत्तर म्हणून पाठवला होता : फॉन्ट : कॉमिक सान्स. फॉन्ट साइज् : शक्य तेव्हढा मोठा. ४०. फॉन्ट कलर : लाल. Hi, My name is Tillu. Three days ago I lost my new Rubber waala pencil (Red Colour). ICICI Bank is going to pay me 1 paisa for each email sent. Please forward to as many people as you can. Otherwise my mumma will scold me :( - Tillu. Junior KG Div B. Adarsh Vidya Mandir. मला तर याचा अनुभवही आलाय. तुम्ही सुद्धा पाठवून बघा काय चमत्कार होतोय तो. -- पार्टनर
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 06/24/2010 - 07:11 नवीन
=)) =)) =)) भारी. फुटलो नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पार्टनर
श
शिल्पा ब गुरुवार, 06/24/2010 - 08:35 नवीन
हे असलं काही होऊ नये म्हणून आम्ही लोकांना जरा लांबच ठेवतो...अन स्वतःला माणूसघाणे म्हणवून घेतो.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पंगा गुरुवार, 06/24/2010 - 16:36 नवीन
(वेळ कोणावर सांगून येत नाही. :() - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा