बायका असतात थोड्या चक्रम
खात्री आहे व्हाल सहमत
अता माझी शेजारीण घ्याना
तुम्हीच ऐकुन म्हणाल 'अलबत'
ताजा चविष्ट उंदीर दिला
मस्त रात्रीच्या डिनरला
झीट येउन पडली दारात
आणि चेहरा पांढरा पडला
वारा घालून शुद्धीवर आणता
कसे वाटतेय? विचारले
"हाड! मेल्या वात्रट कावळ्या "
बोंबलून मला हाकलले.
केवढा अपमान वाटला मला
तुम्हालाही वाटेल ना?
मग मीही बोलणे टाकले
पुढच्या दोन आठवड्याना
मैत्रीखातर परत गेलो
डोळ्यावर विश्वास न बसला
टिचभर कुत्रा तिच्याभोवती
लाळ घोटताना एक दिसला
किमान देखणा प्राणी पाळावा
असे बुवा वाटले मला
दोन दिवस टोचा मारुन
त्याला मी पळवून लावला
एकटी बिचारी पुन्हा शेजारीण
म्हणून गेलो गप्पांसाठी
शूऽ शूऽ करुन परत हाकले
काय म्हणू ह्या वागण्याला?
माफ किया, हम है दिलवाले!
दुसर्या दिवशी गेलो परत
तर एका पिंजर्यामधे दिसला
बंद करून ठेवलेला पोपट
रोडावलेला, रडका पोपट
दया बिचार्याची मज आली
न हलता बसण्याची पाळी
या वयी त्या का आली?
मोकळा केला दु:खामधून
उघडुन त्याचा दरवाजा
उडू दिले त्याला आकाशी
जरा न करता गाजावाजा
म्हणलो "भई वा! काले कौए"
खुद के साथ करता बाता
आजच्या पुण्यकामाचा तू
नक्की केलास पुरा कोटा
पुन्हा बाई उदास एकाकी
म्हणुन पुसाया गेलो खुशालि
शेजार्याने शेजार्याची
करावीच ना देखभाली
पेपर वाचीत बसल्या बाई
मीही बसलो खुर्चीवर
वाचनात त्या इतक्या दंग कि
घेईतच ना माझी खबर
"सुप्रभात" मी वदलो हासत
"मस्त दिवस आहे नै आज"
पेपर मजवर भिरकावून त्या
देऊ लागल्या पुन्हा हाकुन!
स्थितप्रज्ञाच्या मख्खपणाने
जागुन कोडगेपणाला
शांतपणे मी पेपर उचलून
टेबलावरी ठेवुन दिधला
"हलकट कावळ्या" जरी म्हणाली
दिला हसुन पण पाव नि मस्का
रागासोबत मीही गिळला
मनात बिल्कुल इच्छा नसता
असाच जातो तिच्याकडे मी
शिष्टाचारा, अधुन मधुन
सभ्यपणाने तीही बोलते
खट्याळ थोडे कधी हसून
ऐकुन अमुच्या मैत्रीची या
'बायकांचि या तर्हा निराळी'
असेल तुमची खात्री पटली
गोष्ट कशाला सांगु वेगळी.
माझ्यावाणी क्षुद्र कावळ्या
असा भयंकर अनुभव येतो
काय जाहले असते जर मी
मानव पुरुष खरोखर असतो?
मूळ कविता आवडली. ती केवळ मुलांकरताच आहे असे वाटले नाही. मोठ्यांकरता सुद्धा त्यात थोडेसे , लाईट-हार्टेड फ्लर्टींग आहे की.
एकंदर हा प्रकार आवडला. या निमित्ताने इंग्रजी लिखाणातल्या आवडत्या गोष्टी - मग त्या छोट्या छोट्या का असेनात - लोकांनी लिहाव्यात.
सहजराव, प्रकार आवडला. तुमचे भाषांतरसुद्धा मी एंजॉय केले. पदार्थ जमला आहे :-)
छान जमलंय.
ठेक्यात म्हणायचं झालं तर कडव्याला एक पालुपद जोडावं.
उदा:
हट,चावट मेला .!!
उड हलकट काळ्या !!
आता एव्हढी लिबर्टी घ्यायची की नाही ते तुम्ही ठरवा .
सुधारणा आम्ही काय सुचवणार ? तरीपण थोडं ट्रिमींग करा .
फ्लर्टींग सूचक असावं म्हणून.
ताजा चविष्ट उंदीर दिला
रविवार रात्री डिनरला
चक्कर येउन पडली पहा
चेहरा पांढरा पडलेला. ॥पालुपद॥
मूळ कविता मस्तच आहे, आणि भाषांतरही जमलं आहे. सहजराव, कीबोर्डाला थोडी तकलीफ देत जा अधूनमधून!
( पहिल्या कडव्यानंतर मला आमची पांढरू मांजर आठवली. आमची जेवायची वेळ बदलली तरी हिला बरोब्बर समजायचं, जिथे असेल तिथून लगबगीनं यायची. एक दिवस, खरंतर रात्री, दीड-दोनला मी अभ्यास करत बसले होते; कारण अर्थातच दुसर्या दिवशी माझी परीक्षा होती. ही बया आली आणि तोंडातून काहीतरी चित्रविचित्र आवाज काढत होती. पाहिलं तर तोंडात काहीतरी होतं ... एक भलामोठा उंदीर! बराच वेळ उंदीर आणि मी या दोन टोकांमधे फेर्या मारल्या आणि तोंडातून आणखी चित्रविचित्र आवाज काढले. बराच वेळ ही सर्कस झाल्यावर माझ्या लक्षात आलं, ही बया मला उंदीर शेयर करण्यासाठी बोलावत होती. ज्जाम क्यूट वाटली ती मला तेव्हा! )
अदिती
यांचे अजुन एक छान बालगीत आहे.
Every Boy's Prayer
Dear God,
There is a small suggestion
That I would like to make.
It concerns the nature
Of chocolate-walnut cake.
This cake has a habit
Of disappearing fast.
It gets eaten much too quickly
It really doesn't last!
The same sad thing is true
Of ice cream
And cola too!
People pray
That you may
Make them live
On and on and on.
I only wish
A tasty dish
Would not so quick be gone!
I think there is
No sadder fate
Than sitting before
An empty plate!
I don't want to bother you
I know you must be busy.
But if...you can...do something
I'll thank you till I'm dizzy!
Thankyouthankyouthankyouthankyou........
इंग्रजी कावळ्याला फक्त ब्रेड भेटला आणि मराठी कावळ्याला 'पाव व मस्का'!! =)) =)) =)) =))
का हा पक्षपातीपणा??
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
कविता मजेशीर. अनुवादही चांगला जमलाय. रामदासांची सुधारणा अधिक पालुपद आवडले.
एव्हरी बॉय्ज प्लेयरचाही अनुवाद येउद्यात!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मूळ कविता आणि तितकाच छान अनुवाद!
वरील Every Boy's Prayer पण एकदम आवडली.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी