Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुरुष , स्त्रिया आणि बाह्यसौंदर्य

श
शुचि
Mon, 06/28/2010 - 17:34
🗣 86 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
25020 वाचन

💬 प्रतिसाद (86)
श
शुचि Tue, 06/29/2010 - 16:53 नवीन
मला ४ बायका माहीत आहेत ज्या कमावतात आणि एच-१ वर आहेत आणि नवरे एच-४ वर आहेत जे कमवत नाहीत. ३ भारतीय, १ फिलीपाइन. भारतीय बायका नवर्‍याला अजीबात टोचत नाहीत. सुखानी नांदताहेत. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिषेक९
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 06/29/2010 - 17:53 नवीन
चार बायका या समाजाचं प्रतिनिधित्त्व करू शकत नाहीत आणि उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत नोकरी करणार्‍या तर नाहीच नाहीत. माझ्या आई-वडलांना ४० वर्षांपूर्वी जे कानावर आलं ते आज माझ्या आणि माझ्या नवर्‍याच्याही कानावर येतं ... बायको (नवर्‍यापेक्षा )जास्त शिकलेली आहे म्हणून तुला काँप्लेक्स येत नाही का, वगैरे वगैरे अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
प्रियाली Tue, 06/29/2010 - 17:55 नवीन
एच-१ आणि एच-४ यावरून शैक्षणिक पात्रता कशी ठरते? एच-४ वर राहणारे एच-१ मिळवण्यास पात्र नसतात असे तर नाही ना वाटत शुचितैंना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
वेताळ Wed, 06/30/2010 - 07:48 नवीन
एड्सच्या नव्या प्रजाती वाटल्या. वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
श
शिल्पा ब Tue, 06/29/2010 - 18:28 नवीन
+ १ *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ऋ
ऋषिकेश Tue, 06/29/2010 - 18:16 नवीन
प्रत्येकाने आपल्याला आपला जोडीदार का आवडला व तिला/त्याला आपण का आवडलो याचा (निदान मनातल्या मनात) विचार केला तरी लेखातील निष्कर्षाचा फोलपणा ध्यानात यावा. ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 06/29/2010 - 18:27 नवीन
फारच अवघड सांगतो ब्वॉ हा ऋष्या, अरे लेका नुस्ता विचार केला तर फोलपणा नाही लक्षात येणार? ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश Tue, 06/29/2010 - 22:42 नवीन
अरे तसं होत असतं तर हा काथ्याकुट निघाला असता का? ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Wed, 06/30/2010 - 08:02 नवीन
हॅ हॅ, काय पण अस्युम करतो हा ऋष्या ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
श
शिल्पा ब Tue, 06/29/2010 - 21:06 नवीन
लग्न करायला पुरुषाला चांगली दिसणारी (शक्यतो), खायला - प्यायला करता येणारी आणि घरदार सांभाळणारी बायको हवी असते आणि स्त्रीला चांगला कमावणारा, जरा बरा दिसणारा , हुशार आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त असा नवरा हवा असतो...बाकी सगळ्या गोष्टी सगळेजण जुळवून घेतात .... पटतंय तोपर्यंत एकमेकांबरोबर राहतात आणि शेवटी नको असलं तरी या वयात कुठे नवीन शोध म्हणून आहे त्यात समाधान मानतात....फारच वाटलं तर आजकाल वेगळे होतात...मी तर घटस्फोट घेऊन काही काळानी परत त्याच जोडप्याने एकमेकांशी लग्न केल्याचे पहिले आहे...चालायचेच....काय उगं काथ्याकुट करायचाय !!! *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 06/30/2010 - 09:05 नवीन
अहो असं कसं महत्वाचा विषय आहे. या विषयावर चर्चा व्हायला पाहीजे. म्हणजे असे अनेक विचारवंतांचं मत असतं. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
व
विंजिनेर Wed, 06/30/2010 - 09:19 नवीन
चालायचेच....काय उगं काथ्याकुट करायचाय !!!
वा! वा!.. अहो असं नाही केलं तर बुद्धीची खाज कशी जिरणार. घटोऽयं पटोऽयं पाहिजेच. शिवाय पोटातले विचारजंत, आपला(आणि आपल्या मैत्रिणींचा) व्हिसा स्टेटस, शैक्षणिक पातळ्या इ. खुबीने सांगायला फोरम नको का कुठला? (खवच्चट) विंजिनेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
I
II विकास II Wed, 06/30/2010 - 09:29 नवीन
घटोऽयं पटोऽयं पाहिजेच. शिवाय पोटातले विचारजंत, आपला(आणि आपल्या मैत्रिणींचा) व्हिसा स्टेटस, शैक्षणिक पातळ्या इ. खुबीने सांगायला फोरम नको का कुठला? >> अगदी अगदी जणु काही लोकांची मते पाहुन हे आपले विचार बदलणार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
P
Pain Fri, 07/02/2010 - 07:28 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/30/2010 - 09:21 नवीन
"काय उगं काथ्याकुट करायचाय !!!" लिहीण्याआधी चार ओळी लिहील्यात यातच कारण नाही का कळलं "उगं"चं? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 07/01/2010 - 05:50 नवीन
सर्वसाधारण विचार मांडला...जो लग्न करताना लोक करतात...आता या गोष्टी सगळीकडेच असल्याने काथ्याकूटायचा प्रश्न कशाला? वाटलं आता तरी पाल्हाळ थांबेल पण ??? बरं अजून येऊ द्यात... (खवचट) कधीतरी *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/01/2010 - 06:05 नवीन
तुम्ही चार ओळी लिहायच्या आणि इतरांनी 'क्ष' एवढ्या ओळी लिहील्या तर मात्र 'उगं' ... झेपलं नाही त्यातून तुम्हाला काथ्या कुटायचा नसेल तर नका कुटू ... मसंसंवर तो पर्याय नेहेमीच उपलब्ध असतो. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 07/01/2010 - 06:18 नवीन
आता आम्ही कुठे आग्रह धरलाय कि तुम्ही नकाच करू म्हणून... आता आम्ही पण एक " शेंबूड आल्यास काय कराल " याचा धागा काढणार आहोत...(हो कुणी म्हणायला नको झेपत नाही म्हणून..) १) शर्टाच्या बाहीला पुसाल २) रुमालाला पुसाल ३) फुर्कन आहात तिथेच शिन्क्राल ४) इतर काही असे पर्याय ठेवायचा विचार करीत आहोत...तुमचे मत मोलाचे आहे. (झेपवणारी) कुढीती * सगळ्याच बाबतीत काय भांडायचं काही कळत नाही?* *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/01/2010 - 06:23 नवीन
अय्या, एवढं छान छान, स्वीट स्वीट, क्यूट क्यूट लिहायला कसं हो सुचतं तुम्हाला शिल्पाताई! असो, हे आता फार व्यक्तीगत पातळीवर घसरत आहे, तेव्हा "दुर्बिटणेबै, आवरा"! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 07/01/2010 - 06:26 नवीन
ताई का एकदम...आम्ही एवढे काही मोठे नाही झालो अजून =)) =)) असो. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शानबा५१२ Fri, 07/02/2010 - 17:01 नवीन
लग्न करायला पुरुषाला चांगली दिसणारी (शक्यतो), खायला - प्यायला करता येणारी आणि घरदार सांभाळणारी बायको हवी असते आणि स्त्रीला चांगला कमावणारा, जरा बरा दिसणारा , हुशार आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त असा नवरा हवा असतो...बाकी सगळ्या गोष्टी सगळेजण जुळवून घेतात
अगदी हेच सांगायला प्रतिसाद लिहणार होतो पण आपला प्रतिसाद वाचला.१००००००००००००००००००% सहमत. अगदी योग्य विधान केलत(माझ्या प्रतिसादात लिहलय त्याबद्दल बोलतोय). आजच 'त्या' मॉडेलच्या आत्महत्या प्रकरणी 'अग्रलेखाच्या बादशहा'ने हेच लिहल होत. बाकी खालच्या प्रतिसादांना खुप शुभेच्छा! :D ________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Fri, 07/02/2010 - 17:04 नवीन
कुठली मॉडेल , कसली आत्महत्या? आम्ही अतिसामान्य लोकं ... ते बादशहाचे लेख कसे वाचणार? ते फक्त तुमच्यासाठीच. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Fri, 07/02/2010 - 17:25 नवीन
यु डोन्ट नो अग्रलेखाचा बादशहा? या या,नॉट फ्रोम महाराष्ट नो? 'विवेका बाबाजी'चे आत्महत्या प्रकरण........काही चगळत बसण्यासारख स्टोरीमधे काही नाही,पण आरोप-प्रत्यारोप चांगले चाललेत. इथे शेतकरी दीवसाला मरत आहेत्,त्याच्या बातम्या पण आता दुखी करत नाहीत्,ह्या बांडगुळाला मरण भेटल तर कसल दुख!!फक्त चर्चेचा विषय.............. आणि हो आता कामात असतो(तारापुर अणुशक्ती केंद्र) म्हणुन नाही प्रतिसाद टाकत्............रीझल्ट ५ तारखेला आहे. :D _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
म
मृगनयनी Sat, 07/03/2010 - 08:25 नवीन
शानबाजी, तुम्हाला आणि पर्यायाने 'तारापूर अणुशक्ती केन्द्रा'ला बेस्ट ऑफ लक! ;) ____________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! आपण "मौन" पाळता.... हे वाचून आनंदमिश्रित आश्चर्य वाटले!... :) कीप इट अप.... मौना'मुळे मानसिक शक्तीचा विकास होतो... हे खरे आहे.... युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Sat, 07/03/2010 - 18:30 नवीन
तुम्ही विचार करायचा त्रास नका घेउ,मेंदुला सवय नसलेल्या गोष्टी केल्यावर त्रास होतो,तेव्हा आपण व्यनी वाचा!! _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
P
Pain Sun, 07/04/2010 - 09:43 नवीन
"मौन मधे" नाही, मौनामध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
म
मृगनयनी Wed, 07/07/2010 - 06:19 नवीन
शानबा'जी आपला व्यनि वाचला.... आपल्याला सुधारणा करण्यासाठी बराच वाव असल्याचे प्रकर्षाने जाणवले!.... ;) ________________ जस्ट टेक इट ईझी.... आणि हो! 'हॅव अ नाईस डे' बरं का ? ;) ________________ तारापूर अणु शक्ती केन्द्राची शुभचिन्तक, - मृगनयनी परशुराम लिमये. :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
आ
आशु जोग Mon, 10/03/2011 - 22:16 नवीन
१०० % खरय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
प
प्रभाकर पेठकर Wed, 07/07/2010 - 08:39 नवीन
स्त्री-पुरुषाच्या आयुष्यात एक्मेकांचे महत्व, महात्म्य, आकर्षण वयपरत्वे बदलत जातं. काहीच शाश्वत नसतं. लहानपणी भेटलेल्या स्त्रीयांच्या स्वभावानुसार त्या बाल-पुरुषांना आवडतात किंवा नावडतात तर वयात येताच शारीरिक आकर्षण वाढू लागते (निसर्ग धर्म) स्त्रीयांनाही पुरुषांच्या बाबतीत असेच आकर्षण वाटते. 'तुमच्याशी लग्न केलं हे चुकलच माझं.''तरी ताईने-आईने वेळीच सावध केले होते.' वगैरे वाक्ये ४-५ वर्षांनंतर सुरु होतात. ह्या वयानंतर दोघांचेही शारीरिक आकर्षण (परस्त्री/परपुरुषाबद्दल) कमी होत जाऊन अंतरीक गुणाचे (परस्त्री/परपुरुषांच्या) आकर्षण वाढीस लागते. 'जीवनसाथीच्या निवडप्रकियेत आपण जरा घाई केली' हे स्वतःलाच पटायला लागते. कसा बसा संसार रेटला जातो. म्हातारपणाच्या आजारपणात, दुबळ्या बनत जाणार्‍या शरीरासोबत मनही अशक्त बनत जाते. एकमेकांचे गुण दिसू /जाणवू लागतात. 'नाही हो, माझ्या आजारपणात खूप कष्ट केले ह्यांनी.' किंवा 'तोंडाने भांडखोर असली तरी मनाने प्रेमळ आहे' अशी वाक्ये कानावर येतात. पुन्हा एकमेकांचे नाते घट्ट होऊ लागते. (वरवर भांडणे झाली तरी अंतरात ओलावा निर्माण झालेला असतो.) एकूण काय? तर वयपरत्वे, परिस्थितीनुरुप गरजा, आकर्षण बदलत जाते. ह्यावरून एक विनोद आठवला: एक सत्तरीतला म्हातारा आपल्या पत्नीला विचारतो,' काय ग! मी तरूण मुलींच्या मागे धावतो ते पाहून तुला राग नाही येत?' म्हातारी म्हणते,' अजिबात नाही. अहो, कारच्या मागेही कुत्रे धावतात पण म्हणून काय त्यांना कार चालवता येते?' ------------------------------------------------------ विवाहित पुरुषाने कितीही नोकर्‍या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 07/07/2010 - 11:05 नवीन
या विषयावर एक वेगळा फोरम चालू करावा लागेल की काय? कित्ती ही चर्चा? ...पुरुष वस्तुस्थिती मान्य का करत नाहीत??! जाउ दे... ============ माउ
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Mon, 10/03/2011 - 14:21 नवीन
<< या अशा जडणघडणीमागे नक्की काय कारण आहे याविषयी सूज्ञांची मतं जाणून घ्यायला आवडतील. >> तुमच्या या प्रश्नाचं खुलासेवार उत्तर तुम्हाला या पुस्तकात नक्कीच मिळेल. द फेमिनाईन पॉवर - मोअर डिमांड लेस सप्लाय लेखक - एस. के. वाधवा प्रकाशक - जयको बुक्स, मुंबई
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Mon, 10/03/2011 - 22:17 नवीन
जॉन अब्राहमला पाहून चित्कारणार्‍या तरुणींना काय म्हणावे !
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 10/03/2011 - 23:32 नवीन
त्या तरुणींना आशु जोग म्हणावे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग
आ
आशु जोग Wed, 10/05/2011 - 20:01 नवीन
कमाल झाली बुवा तुमची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 10/04/2011 - 09:06 नवीन
स्त्रीयांच्या बाह्य सौंदर्यास नक्किच महत्व आहे.. मुलगा जेंव्हा मुलगी पाहुन आलो असे मित्रांना सांगतो त्या वेळी मित्रांचा पहिला प्रष्ण असतो "कशी आहे दिसायला?" "तर मुली विचारता तो काय करतो?" स्त्रीयां चे सौंदर्य हेच त्यांचे साम्रर्थ्य आहे तर पुरुषाचे सामर्थ्य हेच त्यांचे सौंदर्य असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Wed, 10/05/2011 - 19:59 नवीन
जॉन अब्राहमच्या उल्लेखाने हळव्या झालात ना मुलींनो असो
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा