Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाकिस्तान भारतीय ध्वज बर्‍याचदा उलटा लावते त्याविषयी

ह
हुप्प्या
Mon, 06/28/2010 - 22:05
🗣 58 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10655 वाचन

💬 प्रतिसाद (58)
श
शुचि Mon, 06/28/2010 - 22:20 नवीन
पाकीस्तान्ला चिथवण्याखेरीज दुसरे धंदे नाही आहेत. मूर्खांच्या नादी कोण लागणार. दुर्लक्ष करायचं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 06/28/2010 - 22:28 नवीन
तिरंग्याचा केक कापला .. अपमान !! तिरंग्याचा शर्ट घातला ... अपमान !!! १५ऑ/२६जा सोडुन तिरंगा फडकवला .. अपमान !! तिरंग्यातल्या चक्रातल्या कांड्या कमी जास्त झाल्या .. अपमान !! ह्या तिरंग्याचा अपमान व्हायला काही कारण लागतं का हो ? ;) (सहित काही लिहीलं तरी तिरंग्याचा अपमान होऊ शकतो , म्हणुन सहि डिस्कार्डेड) - टारंगा
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 06/28/2010 - 22:47 नवीन
Image removed. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Tue, 06/29/2010 - 05:53 नवीन
हॅहॅहॅ ... हे तर काहीच नाही ;) अमेरिकेत तर चड्ड्या पण मिळतात त्यांच्या झेंड्याचा !! पण अमेरिकण्स हुषार आहेत ... हे झेंड्याचा घडीघडी अपमान होतोय म्हणुन गळे काढण्यापेक्षा प्रगतीवर त्यांचा भर आहे :) आणि आपल्याकडे एग्झॅक्टली उलटं आहे :) संभाळत बसा लेको मानापमान .. आणि रहा जागेवरंच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
परिकथेतील राजकुमार Tue, 06/29/2010 - 08:51 नवीन
अमेरिकेत तर चड्ड्या पण मिळतात त्यांच्या झेंड्याचा !!
कोणीतरी आमच्या अ‍ॅडी जोशींना बोलवा. प्लिज प्लिज प्लिज.... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सुनील Tue, 06/29/2010 - 15:16 नवीन
अमेरिकेत तर चड्ड्या पण मिळतात त्यांच्या झेंड्याचा हो, पण तो फोटो टाकला तर प्रतिसाद राहील काय इथे? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
वाचक Wed, 06/30/2010 - 03:41 नवीन
भारतात फ्लॅग प्रोटोकॉल आहे, इतरही बर्‍याच देशात आहे वेगवेगळ्या नियमांनी बनलेला. हा दुवा पहावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विजुभाऊ Tue, 06/29/2010 - 06:50 नवीन
ते तसच काहीसे कोर्टाचे देखील असतं रे.... कोर्टाचा अवमान कशामुळे होईल हे कोर्टाला देखील साम्गता येणार नाही ( अर्र या मुळे सुद्धा अवमान होउ शकतो म्हणे ) एकदा पुलंनी विचारले होते " समजा एखादे कोर्ट ( जज्ज) जर बसच्या रांगेत मधेच घुसत असेल अन त्या वेळेस कोणी त्याच्या कानाखाली हाणली तर तो कोर्टाचा अवमान म्हणायचा का? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ह
हुप्प्या Tue, 06/29/2010 - 08:33 नवीन
विषयांतरः पूर्वी सोवळ्या ओवळ्याच्या नावाखाली खुळचटपणा चालत असे त्याची आठवण आली. भारतीय झेंड्याचेही असेच अतिरेकी सोवळे ओवळे आहे. खास दिवस सोडून सामान्य लोकांना अन्य दिवशी हा झेंडा फडकवायला बंदी म्हणजे जरा जास्तच जाचक वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
आ
आळश्यांचा राजा Tue, 06/29/2010 - 12:01 नवीन
खास दिवस सोडून सामान्य लोकांना अन्य दिवशी हा झेंडा फडकवायला बंदी म्हणजे जरा जास्तच जाचक वाटते
अशी बंदी पूर्वी होती. आता नाही. आता आपण सर्व दिवशी (तसेच सर्व रात्री) आपला तिरंगा फडकावू शकता. जिज्ञासूंनी 'नवीन जिंदल' या नावाने गुगलून पहावे.
पूर्वी सोवळ्या ओवळ्याच्या नावाखाली खुळचटपणा चालत असे त्याची आठवण आली.
अगदी योग्य उपमा. सोवळ्याचेच लॉजिक लाऊन हे निर्बंध होते. अजूनही निर्बंध अर्थातच आहेत. हा खुळचटपणा की कसे हे आपापले मत झाले. हे निर्बंध नसते तर मात्र नियम बनवणार्‍यांवर सगळे तुटून पडले असते अशीही शक्यता नाकारता येत नाही. आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
र
राजेश घासकडवी Tue, 06/29/2010 - 11:25 नवीन
ह्या तिरंग्याचा अपमान व्हायला काही कारण लागतं का हो ?
भावनेशी सहमत आहे. राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी काही मर्यादा घालणं ठीक आहे, पण सर्वसामान्यांना तो इतर दिवशी अभिमानाने फडकवू द्यायचा नाही हे टोकाचं वाटतं. बाकी लेखात पाकिस्तान्यांनी मुद्दाम शक्कल लढवून तो उलटा टांगला असा तर्क केला आहे. भारतीय असो की पाकिस्तानी, सरकारच्या उत्स्फुर्त कल्पनाशक्तीपेक्षा ढिसाळपणावर माझा अधिक विश्वास आहे. त्यामुळे ते अनाहुतपणे होण्याचे शक्यता किती तरी अधिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
आ
आंबोळी Tue, 06/29/2010 - 11:46 नवीन
सर्वसामान्यांना तो इतर दिवशी अभिमानाने फडकवू द्यायचा नाही हे टोकाचं वाटतं आरे मग पब्लिक मॅचच्या वेळी कसे हातात घेउन फडकवते? यावरून एका अनऑफिशिअल भारत - पाक मॅचच्यावेळी अ‍ॅबी कुरुविला नामक एक खेळाडू दणादण बॅटींग करून मॅच जिंकत आणली असताना पाकी प्रेक्षकांनी दंगा करून मॅच बंद पाडली आणि आपली लोकं फडकवत असलेला झेंडा जाळला होता ते आठवलं.... आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
पंगा Tue, 06/29/2010 - 18:32 नवीन
भारतीय असो की पाकिस्तानी, सरकारच्या उत्स्फुर्त कल्पनाशक्तीपेक्षा ढिसाळपणावर माझा अधिक विश्वास आहे.
हे थोडे हॅन्लनच्या वस्तर्‍यासारखे वाटते, नाही का? "Never attribute to malice that which can be adequately explained by stupidity"... फक्त इथे stupidityऐवजी incompetence म्हणता येईल कदाचित. अवांतरः पु.लं.च्या 'पूर्वरंग'मध्ये कोठेतरी कोठल्याशा भारतीय दूतावासाने कधीतरी तिरंगा उलटा फडकावल्याचा दाखला आहे. खुद्द भारतीय दूतावास जेथे अशी "चूक" स्वतःच्याच झेंड्याबाबत करू शकतो, तेथे पाकिस्तानी सरकारास थोडा 'बेनेफिट ऑफ डाउट' देणे अगदीच अशक्य आहे का? अतिअवांतरः
त्यामुळे ते अनाहुतपणे होण्याचे शक्यता किती तरी अधिक आहे.
'अनाहूतपणे' नव्हे. 'अभावितपणे'. 'अनाहूतपणे' म्हणजे 'बोलवले नसता'. (न बोलवता उपटणार्‍या पाहुण्याच्या संदर्भात हा शब्दप्रयोग अनेकदा वापरला जातो.) 'अभावितपणे' म्हणजे 'जाणूनबुजून नव्हे'. (जित्याची खोड.) - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ह
हुप्प्या गुरुवार, 07/01/2010 - 03:42 नवीन
पाकिस्तान भारतापेक्षा कदाचित कांकणभर जास्त भ्रष्ट असले तरी पाकी लोकांची इस्लामनिष्टा जास्त आहे असा माझा समज आहे. तिथे कायदाही इस्लामचा अनादर करणार्‍यांना शिक्षा देतो. तेव्हा जेव्हा इस्लामचा मान राखण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्या कृत्याला ढिसाळपणा म्हणणे अवघड जाते. हिरवा रंग वरती आणि भगवा खालती हा इस्लामला उच्च स्थान देण्यासारखे आहे. कुण्या भारतीय वकिलातीने भारताचा झेंडा उलटा फडकवला. आता ह्या वकिलातीने वरचेवर असे केल्याचे रेकॉर्ड आहे का? एखादी चूक ही ढिसाळपणा वा निष्काळजीपणा म्हणता येईल. पण वारंवार एकच व्यक्ती वा गट तीच चूक करत असेल तर ती एक विचारपूर्वक केलेली कृतीच म्हटली पाहिजे. माझ्या माहितीत पाककडून ही चूक अनेकदा झाली आहे. तेव्हा संशयाचा फायदा देणे तितकेसे पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
अ
अडगळ Mon, 06/28/2010 - 22:30 नवीन
झेंडा उलटा लावला म्हणुन बदलायचा ? उद्या कोण नकटं म्हणालं तर नाक कापून घ्याल की.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 06/28/2010 - 22:41 नवीन
हा त्यांचा टारगटपणा असू शकतो. झेंडा उलटा लावणे वगैरे चुका होता कामा नयेत. पण आता त्यांच्याकडे जर अशी जबाबदारीची कामं करायला सक्षम स्टाफ नसेल तर करणार?;) भारताकडून समज दिली गेली पाहिजे. रेवती
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 06/28/2010 - 22:47 नवीन
सरळ टॉयलेट पेपर्स काढा भारतात पाकड्यांच्या झेंड्याचं प्रिंट असलेले. =)) =)) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
न
नेत्रेश Mon, 06/28/2010 - 23:45 नवीन
त्याने काय साध्य होणार? जगात भारताच्या Immaturity साठी बदनामी आणी भारतात दंगली. शीवाय पाकीस्तान सुद्धा भारताच्या झेंड्याबाबत हे करु शकते. त्यांनी चिथावले की आपण चीडण्यात अर्थ नाही. त्यांचा हेतु साध्य होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
र
रेवती Mon, 06/28/2010 - 23:55 नवीन
सरळ टॉयलेट पेपर्स काढा छे! हे तर अगदीच नको. दंगल झाली तर आपलेच लोक अडकायचे. नंतर यांचे अतिरेकी येणार्......इथे बॉम्ब टाक तिथे बॉम्ब करत. समजावायला कोणाला जावे? ज्यांना आधीची थोडी...... जाऊ दे! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
क
कानडाऊ योगेशु Tue, 06/29/2010 - 08:35 नवीन
सरळ टॉयलेट पेपर्स काढा भारतात पाकड्यांच्या झेंड्याचं प्रिंट असलेले पाकिस्तानचा झेंडा हा इस्लाम धर्माचाच झेंडा आहे.(चंद्रकोर,चांदणी आणि हिरवा रंग).त्यामुळे उद्या वरील प्रकार केलाच तर भारतातील यच्चयावत सगळेच मुस्लिम बोंब मारतील. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
N
Nile Tue, 06/29/2010 - 08:47 नवीन
बोंबलायला भारतात टॉयलेट पेपर वापरतात कीती लोक? :D -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 06/29/2010 - 15:34 नवीन
सहमत. त्यापेक्षा पाकीस्तानी झेंडा छापलेली टम्रेले काढावीत. गेला बाजार बिसलेरी, डालडा यांना त्यांच्या डबे - बाटल्यांवर पाकीस्तानी झेंडा छापायला सांगावा. कसे? ;) (कै च्या कै) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
श
शिल्पा ब Tue, 06/29/2010 - 18:20 नवीन
<<<पाकीस्तानी झेंडा छापलेली टम्रेले काढावीत =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
व
विजुभाऊ Wed, 06/30/2010 - 08:28 नवीन
पुण्याचे पेशवे यांच्या अभ्यासू सूचनेचा विचार करावा यासाठी शनिवारवाड्या समोर चक्री उपोषण करायला कोणालातरी उद्यूक्त करायला उद्यूक्त करायला हवे . अवांतर : स. पेठेत " आमचे येथे वटसावित्रीचे उपोषण करून मिळेल " हा बोर्ड कुठे लागला ते कोणी सांगेल का? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 06/30/2010 - 09:38 नवीन
विजुभाऊ हा मान तुमचाच. काजु पुरवायची जबाबदारी आमची. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
पंगा Tue, 06/29/2010 - 17:45 नवीन
भारतात बनवलेला टॉयलेट पेपर, त्यावर छपाईसाठी भारतातलीच शाई... शाईच्या पक्केपणाची ग्यारंटी देऊ शकाल? उगाच नको तिथे नको तो छाप मिरवत जाण्याची पाळी येईल! चालेल तुम्हाला? (अवांतरः मग आमच्या अमेरिकनांच्याच नावाने लोक शंख का करतात, नको तिथे नको ते टॅटू मिरवतात म्हणून?) उगाच मनाला येईल ते बोलू नका, विचार केल्याशिवाय. 'पाप परिणामांची जबाबदारी नाकारण्यात आहे', असे कायसेसे मिसळपावाच्या पारावरचे स्थानिक दैवत भाईकाका यांच्या 'तुझे आहे तुजपाशी' या धर्मग्रंथात कुठेशी पक्क्या शाईत छापलेले आहे, ते विसरलात? - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
I
II विकास II Wed, 06/30/2010 - 04:39 नवीन
>>भारतात बनवलेला टॉयलेट पेपर, त्यावर छपाईसाठी भारतातलीच शाई... शाईच्या पक्केपणाची ग्यारंटी देऊ शकाल? नाडीपट्टी ज्या शाईने लिहीली आहे, ती शाई वापरण्यात यावी. >>उगाच नको तिथे नको तो छाप मिरवत जाण्याची पाळी येईल! चालेल तुम्हाला? अरे, कोणाला समजणार आहे??? मग कोणी डायलाक पण मारु शकेल, हम अपने दोस्ते का नाम दिल पे रखते हैं। दुश्मनोंका **पर. ये देखो। ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
न
नितिन थत्ते Tue, 06/29/2010 - 04:16 नवीन
पाकिस्तानला समज देणे आवश्यक. खरे म्हणजे प्रत्येक पाकिस्तान्याच्या मनात आपल्या शत्रूचा ध्वज कसा आहे तो बिंबलेला पाहिजे. चूक होताच कामा नये. ;) (उसका चेहरा मैं कभी भूल नही सकता टाईप डायलॉगच्या धर्तीवर). नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
प
पंगा Tue, 06/29/2010 - 17:32 नवीन
...काहीशी अशीच आहे, नाही? (तपशील विसरलो.) - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
आ
आशिष सुर्वे Tue, 06/29/2010 - 06:34 नवीन
उलट्या डोसक्याच्या पाकडयांकडून अजून काय अपेक्षा ठेवणार आपण!! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments
D
Dipankar Tue, 06/29/2010 - 06:44 नवीन
झेंडा उलटा लावला म्हणुन भडकायचे असेल तर बाकी कारवायांनवर काय करावे? बोंबाबोंब करण्यापेक्षा एकतर दुर्लक्ष करा वा त्यांच्या झेंड्याबाबत सुद्धा आपण जाणुन बुजुन चुक करा
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 06/29/2010 - 15:35 नवीन
+१ जशास तसे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dipankar
म
मितभाषी Tue, 06/29/2010 - 07:05 नवीन
रंगांचे पट्टे आडव्या ऐवजी उभे करा. म्हणजे कुणी इच्छा असुनही उलटा फडकवु शकणार नाहीत. हा. का. ना. का. भावश्या
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Tue, 06/29/2010 - 08:39 नवीन
हिरवा रंग काढूनच टाकला तर? म्हणजे इस्लामला दुय्यम वा तिय्यम स्थान द्यायची भानगडच नको. असो. वस्तुस्थितीकडे बघता, भारतीय सरकार हा झेंडा बदलणार नाही आणि जेव्हा जेव्हा पाकला हा झेंडा फडकावयाची पाळी येईल तेव्हा ही तथाकथित किरकोळ चूक होणारच. कारण त्यामागचे कारण हे खास जिव्हाळ्याचे आहे. जसे पाक अतिरेकी कारवाया करतच राहणार आणि आपण कडक निषेधाचे खलिते पाठवणार तसेच हेही होतच रहाणार. आपल्याला अशीच किरकोळ चूक करून उट्टे फेडायचे असेल तर आपण त्यांच्या झेंड्यावर चांदतार्‍याऐवजी डुक्कर काढावे. हिसाब बराबर. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
D
Dipankar Tue, 06/29/2010 - 09:02 नवीन
झेंडा गोलाकार करा मग बघु कोणाला उलटा फडकावता येतो
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Tue, 06/29/2010 - 09:11 नवीन
झेंडा गोलाकार करा मग बघु कोणाला उलटा फडकावता येतो झेंडा गोल करून उपयोग नाही... जो पर्यन्त पट्टे आहेत तो पर्यन्त तो उलटा फडकवता येईल... पट्ट्यांच्या ऐवजी वर्तूळ (आयला.. या नावाचे विडंबन पाडायचे राहिले राव...) केले तर उलटा नाहि करता येणार.... पण अर्थातच कुणी तरी म्हणाल्याप्रमाणे हे असेच चालत राहणार.... आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dipankar
प
पंगा Tue, 06/29/2010 - 17:53 नवीन
भारतीय तिरंग्याचे आहेत ते रंग तसेच ठेवून त्याला गोलाकार करणे हे खोडसाळ कृत्य आहे, असा दावा पाकिस्तानने केल्यास त्याचे खंडनार्थ समर्पक प्रतिदावा आहे आपल्याकडे? (पाकिस्तानलाच कशाला, असा आक्षेप रास्तपणे घेण्यास अनेकांना भरपूर जागा सापडण्यासारखी आहे. युअर्स ट्रूली इन्क्लूडेड.) - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dipankar
अ
अभिषेक९ Tue, 06/29/2010 - 09:23 नवीन
झेंडा गोलाकार करा मग बघु कोणाला उलटा फडकावता येतो अहो मग सुलटा तरी कसा फडकावणार?
  • Log in or register to post comments
प
पंगा Tue, 06/29/2010 - 17:52 नवीन
प्रतिसाद योग्य ठिकाणी हलवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिषेक९
व
विसोबा खेचर Tue, 06/29/2010 - 10:04 नवीन
भारताने ध्वज बदलला तरच ह्यावर उपाय निघेल.
आणि आपण बहुधा तेच करू..! कारण पाकड्यांना सज्जड समज देण्यास आपण असमर्थ आहोत..आणि ही बाब त्यांना माहीत आहे.. म्हणूनच आपल्या ध्वजाचा अपमान, भारतातले बॉम्बस्फोट वगैरे गोष्टी ते छातीठोकपणे करू शकतात.. त्यांनी ट्रेन्ड केलेले केवळ १५-२० अतिरेकी मुंबैवर हल्ला करून मुंबैसारखं शहर चार दिवस दावणीला बांधू शकतात! तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 06/29/2010 - 11:19 नवीन
त्यांनी ट्रेन्ड केलेले केवळ १५-२० अतिरेकी मुंबैवर
येथे फक्त "ट्रेन" असा शब्द हवा. ट्रेन चा भुतकाळ म्हणजेच ट्रेन्ड जर वापरावयाचा असेल तर "पाकिस्तानात ट्रेन्ड १५-२० अतिरेकी........." ह्या प्रकारची वाक्य रचना करता येऊ शकेल . कारण "केलेले" हे क्रियापद ऑलरेडी भुतकाळ दाखवते. त्यात पुन्हा ट्रेन्ड हा भुतकाळदर्शक शब्द अनाठायी वाटतो , उपरोक्त वाटतो , निरुपयोगी वाटतो पक्षी चुकीचाच वाटतो. मराठी व्याकरण चालवताना मधे असा पुर्ण भुतकाळ वापरण्याची काही नियमावली आहे की नाही हे एकदा दुरुस्त करायला हवे. - जातोकाराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
न
नितिन थत्ते Tue, 06/29/2010 - 12:12 नवीन
बॉ बॉ बॉ एवढंच पहायचं राहिलं होतं मिपावर. टार्‍या विसोबांना व्याकरण शिकवतोय. (पुढे तात्या खाली मान घालून हात पुढे करून टारझनकडून पट्ट्या खातायत असं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं) आता मी रिटायर (की रिटायर्ड?) होऊ शकतो. टारझन आयडी हॅक झाला वाटते :? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विसोबा खेचर Tue, 06/29/2010 - 15:38 नवीन
त्यात पुन्हा ट्रेन्ड हा भुतकाळदर्शक शब्द अनाठायी वाटतो , उपरोक्त वाटतो , निरुपयोगी वाटतो पक्षी चुकीचाच वाटतो.
आपल्या मताचा आदर आहे, परंतु मी जे लिहिले आहे ते माझ्या मते व्याकरणदृष्ट्या बरोबरच आहे!
मराठी व्याकरण चालवताना मधे असा पुर्ण भुतकाळ वापरण्याची काही नियमावली आहे की नाही हे एकदा दुरुस्त करायला हवे.
गरजूंनी अवश्य अश्या विषयात लक्ष घालावे.. शुभेच्छा आणि धन्यवाद.. तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 06/29/2010 - 15:47 नवीन
छान , संयत प्रतिसाद. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
कापूसकोन्ड्या Wed, 06/30/2010 - 16:59 नवीन
(१) trained हे विशेषण असेल तर भूतकाळाचा संबंध कुठे येतो? (२-अ)"अनाठायी वाटतो , उपरोक्त वाटतो , निरुपयोगी वाटतो पक्षी चुकीचाच वाटतो." चुकीचा वाटतो की चुकीचा आहे? ' वाटतो ' शब्द संदिग्धता दाखवितो. (२ब) उपरोक्त? या शब्दाचा अर्थ 'वर सांगितल्या प्रमाणे ' असा आहे. मा. जातोकारावाना उपरा म्हणायचे आहे का? (३)मराठी व्याकरण चालवताना मधे असा पुर्ण भुतकाळ वापरण्याची काही नियमावली आहे की नाही हे एकदा दुरुस्त करायला हवे. खरं म्हणजे हे एकदा तपासायला हवे आणि चुकीचे असेल तरच दुरुस्त करायचे ना? दुरूस्त हा शब्द अनाठायी आणि म्हणूनच अयोग्य आहे. कृपया याचे विनाविलंब स्पष्टीकरण द्यावे. नाही तर ण्ण ची बाराखडी १५-२० वेळा कॉपी पेस्ट करून नविन धागा काढीन. --येतोकीराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Wed, 06/30/2010 - 17:07 नवीन
लागला शेवटी गळाला मासा लागला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या
क
कापूसकोन्ड्या Wed, 06/30/2010 - 17:33 नवीन
व्वा वा मस्त. आपण सध्या माशा मारता हे माहीत होते. मासे पण मारते की काय! पण उद्योग आवडला !! सही रे! ब्याट्री चार्ज झाली. अशीच गंमत असेल तर मग गळ लावणारा आणि गळ घालणारा आवडेलच की ! (गळाला लागलेला) मासा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
क
कापूसकोन्ड्या Wed, 06/30/2010 - 17:06 नवीन
(१) trained हे विशेषण असेल तर भूतकाळाचा संबंध कुठे येतो? (२-अ)"अनाठायी वाटतो , उपरोक्त वाटतो , निरुपयोगी वाटतो पक्षी चुकीचाच वाटतो." चुकीचा वाटतो की चुकीचा आहे? ' वाटतो ' शब्द संदिग्धता दाखवितो. (२ब) उपरोक्त? या शब्दाचा अर्थ 'वर सांगितल्या प्रमाणे ' असा आहे. मा. जातोकारावाना उपरा म्हणायचे आहे का? (३)मराठी व्याकरण चालवताना मधे असा पुर्ण भुतकाळ वापरण्याची काही नियमावली आहे की नाही हे एकदा दुरुस्त करायला हवे. खरं म्हणजे हे एकदा तपासायला हवे आणि चुकीचे असेल तरच दुरुस्त करायचे ना? दुरूस्त हा शब्द अनाठायी आणि म्हणूनच अयोग्य आहे. कृपया याचे विनाविलंब स्पष्टीकरण द्यावे. नाही तर ण्ण ची बाराखडी १५-२० वेळा कॉपी पेस्ट करून नविन धागा काढीन. --येतोकीराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
D
Dipankar Tue, 06/29/2010 - 10:14 नवीन
Image removed. याला उलटा करुन दाखवा
  • Log in or register to post comments
म
मिलिंद Tue, 06/29/2010 - 17:32 नवीन
>> याला उलटा करुन दाखवा. हा घ्या. अहो खोडसाळाला काय त्याचे. आणी पाकिस्तान आहे तरी काय खोडसाळच ना! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dipankar
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा