रानभाजी ११) कोरांटी
Primary tabs

लागणारे साहित्य :
कोरांटीची भाजी स्वच्छ धुवुन चिरुन
२ कांदे
४-५ लसूण पाकळ्या
२-३ मिरच्या
हिंग
हळद
पाव चमचा साखर
चविपुरते मिठ
पाव वाटी ओल खोबर किसुन
पाककृती:
प्रथम कढईत तेलात लसणाची फोडणी द्यावी मग त्यातवर मिरची, हिंग, हळद घालून थोडे परतून चिरलेली कोरांटीची भाजी घाला. वर झाकण ठेउन थोड्या वेळाने परता. आता त्यात मिठ व साखर घालून थोडावेळ वाफेवर ठेवा. मग त्यात ओल खोबर घालून थोड परतुन गॅस बंद करा.
अधिक टिपा:
* कोणतीही रानभाजी ओळख पटल्याशिवाय घेउ नका.
ही कोरांटी ओसाड जमिनीत येते. ही मोठी झाल्यावर ह्याला काटे येउन निळी फुले येतात. बर्याच जणांनी पाहीली असेल. मोठी होउन फुले आली की परत मी फोटो टाकेन.
ही भाजी अजुन विकायला आलेली पाहीली नाही. पण ही भाजी माझ्या माहेरी परंपरेप्रमाणे खातात. ही भाजी कंबरदुखीसाठी गुणकारी असते असे म्हणतात म्हणून माझी आई न चुकता ही भाजी दरवर्षी करते. आता मी पण करते.
ही भाजी पावसाळयाच्या सुरवातीलाच येते. म्हणजे जी जुनी झाड असतात त्याला बोके येतात आणि काही बिया रुजुन झुडपे आलेली असतात. पण ही कोवळी असतानाच काढायला लागते कारण नंतर त्याला काटे येतात.
हम्म.. आता हा फोटो परत थोडा छोटा करावा लागेल.
अभिनंदन फोटो करता :-)
भाजीची औषधी माहीती व टीप आवडली.
भाजीची औषधी माहीती व टीप आवडली.
+ १
असेच म्हणते.
तुझे आहे तुझपाशी मधी 'कोरांटी सारखी वाढले' ची आठवण झाली म्हणुन धागा उघडला, नाहीतर 'हिरव्याचे' प्रेम आम्हास नाहीच. ;)
चमचमीत
-Nile
नेहमी प्रमाणे आवर्जुन धागा उघडला.
अजुन एका नवीन भाजीची आणि तिच्या औषधी गुणाची ओळख झाली.
कोरांटीची भाजी करतात, हे माहित नव्हते. तुमच्यामुळे नवीन भाज्यांची ओळख होत्ये,त्याबद्दल तुम्हांला धन्यवाद!
कोरांटीची भाजी पण करतात, हे माहित नव्हते. मी फक्त फुलंच पाहिली आहे.
पण अतिशय उपयोगी माहिती.
कोरांटीची भाजी पण करतात, हे माहित नव्हते. मी फक्त फुलंच पाहिली आहे.
मी पण ... घरच्या बागेत निळी आणि गुलाबी अश्या दोन्ही कोरांट्या आहेत.. पण याची भाजी करतात हेच माहीत नव्हते....
टाकळ्याची पण भाजी करतात हे जागुतैंमुळेच कळाले... पावसाळ्यात लहानपणी पिवळी फुलपाखरे पकडायला खुप टाकळा तुडवलाय.... त्याच्या काहिश्या कडवट वासामुळे मला टाकळा विषारी वाटायचा...
म्हशींनी टाकळा खाल्ला की दुध कडवट होते....
यांची खरच भाजी करतात की खेचताय तुम्ही आमची?
उद्या कोयनेल, काँग्रेस गवत, डिडोनिया वगैरेची पण भाजी येईल असे वाटते... ;)
आंबोळी
सहज, निल, गणपा, रसराज, किट्टू धन्यवाद.
हायला, काय सही शब्द आहे. बोके! वा!
कोरांटीची भाजीही करतात हे माहित नव्हते.
त्या झाडाला काटेकोरांटी म्हणताना ऐकले आहे.
त्याची फुले पाहिलेली आठवतात.
नविन माहिती दिलीस जागु!
रेवती
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशीतरी
मधु मागशी माझ्या सख्या परी..
ती कोरांटी हीच काय?
छान माहिती! आतापर्यंत कोरांटी ही तिच्या सुरेख फुलांसाठी आणि भरगच्च गजर्यांसाठी माहिती होती! जागू, तुझ्यामुळे नवी माहिती कळली. धन्स! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
mastach..! :)
लहान पणी गावाला हि फुले पाहिलि आहेत....पण मि गुलबि रन्गचि बघितलि आहेत...तिला काटी कोरांटी म्हणायचे.....त्याचि भाजि करतात हे महिति नव्ह्ते...
तुम्ही सगळे समजताय ती ही कोरांटी नाही ती कोरंटी. वरील चित्रातील पाने बघा. लांबट आहेत. पण ती केशरी फुले येणार्या आणि गजर्याची कोरंटीची पाने गोलाकर लांबट असतात मी हिवाळ्यात जेंव्हा फुल येतील तेंव्हा त्याचा फोटो टाकेन.
आंबोळी ही झाडे बागेत लावत नाहीत. उलट जर बागेत आली तर काढुन टाकतात. कारण ही मोठी झाल्यावर हिला मोठे मोठे जवळ जवळ १ इंचाचे टणक काटे येतात.