Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बीज...

श — शैलेन्द्र, Sat, 07/03/2010 - 10:17

प्रतिक्रिया द्या
3335 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ट
टारझन Sat, 07/03/2010 - 20:54 नवीन
अलिकडे मिपावर येणार्‍या बोजड, निरर्थक,कुंथुन कुंथुन पाडलेल्या संदेशपर कवितांपेक्षा तुमची कविता सोपी सहज आणि सुंदर वाटली . - सैलधरं
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 07/04/2010 - 14:20 नवीन
तु अहो जाहो करायला लागलास? असो, धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sun, 07/04/2010 - 15:13 नवीन
आमच्या दृष्टीनं चांगलं लेखन करणार्‍याला आम्ही नेहमीच आदर देतो सायेब :) बाकी आमच्या डोक्याला शॉट लागला की तो शॉट प्रतिक्रीयेत येतो :) अर्थात आमचा डोक्याला लागलेला शॉट दिसत नाही लोकांना(वाचक,लेखक,संपादक) दिसतो तो फक्त प्रतिसाद ..दिसतो तो फक्त प्रतिसाद ... दिसतो तो फक्त प्रतिसाद आणि फक्त प्रतिसाद !! (हे वाक्य बोलताना ,पुर्ण मंचावर काळोख आणि फक्त माझ्यावर प्रकाशझोत राहिल ह्याची नेपथ्यकाराने काळजी घ्यावी) -(कल्लाकार) टारझन दामले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र Sun, 07/04/2010 - 19:33 नवीन
"आमच्या दृष्टीनं " हे महत्वाचं, आम्ही काळजी घेवु..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
च
चतुरंग Tue, 07/06/2010 - 21:44 नवीन
प्रकाशयोजना प्रकाशयोजना!! असो. तरीही उजेड पडेल ह्याची काय खात्री म्हणा!! ;) (फिरता रंगमंच)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Tue, 07/06/2010 - 22:04 नवीन
इष्टेज वरच्या लायटी चालुबन करणारा ज्यो आसंल त्यानं काळजी घेणे ...
तरीही उजेड पडेल ह्याची काय खात्री म्हणा!!
=)) =)) =)) =)) =)) का ? आम्ही एवढा उजेड पाडल्यावरही असे उद्गार का ? मन उद्विग्न झालं आहे !! कोणी धीर देता का धीर ? ( नाही नाही सुधीर नको .. =)) ) साला प्रतिसाद लिहीता लिहीता क्वालेजातल्या णाटक प्र्याक्टिस षेशन मधे पोचलो :) (हालता देखावा) रावण आणि सुर्पणखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
वेताळ Sun, 07/04/2010 - 14:33 नवीन
मनोगत व उपक्रमावर शिकवणी लावल्याचे कानावर आले आहे. असो. कविता छान आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 07/04/2010 - 14:43 नवीन
थोड्याच कालावधित त्या साईट सुधारुन जातील, माझा विश्वास आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
र
राजेश घासकडवी Sun, 07/04/2010 - 15:10 नवीन
बीजाच्या दुर्दम्य आशा, आकांक्षा, व त्याचं मनोगत आवडलं.
मिळणार रुप मजला, जे जगवि़ख्यात आहे.
छान. कवितेला एक गजलेचा बाज आहे, अर्थातच आकारबंध वेगळा आहे. वृत्ताच्या दृष्टीने थोडा प्रयत्न केला तर कविता एका नवीन पातळीला पोचेल. अवांतर : टार्‍याची काळजी मनाला भिडली, तेव्हा लवकरच त्यालाही कळेल अशी एखादी कविता लिहिण्याचा इरादा आहे.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 07/04/2010 - 15:27 नवीन
तुम्हाला उद्देशुन काही नव्हतं तरी तुम्हालाच मनाला का बॉ झोंबलं भिडलं , तुम्हाला कळली तरी पुरे आहे तुमच्या II लेव्हल II ला =)) II मनभिडवी II आम्ही लोकान्ला कळत नाय म्हणुन मठ्ठ मठ्ठ म्हणतो आणि नंतर ते स्वतः उडवुन हुशार्‍या दाखवतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
श
शैलेन्द्र Sun, 07/04/2010 - 19:37 नवीन
ह्म्म, तुम्ही म्हणताय ते खरयं, पण मग मला गजल वृत्ताचा आणि पर्यायाने शुद्धलेखनाचा/ व्याकरणाचा अभ्यास करावा लागेल... बघुया, कसं जमत ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
रामदास Sun, 07/04/2010 - 16:59 नवीन
नक्षत्र ते मृगाचे, मी जपले अंतरात आहे. ही ओळ फार आवडली. आवळीन मी तयांना , जीव मनगटात आहे. असे हवे होते का ? येऊ द्या आणखी कविता. तळटीप : टारझन मनमिळवी अशी सही वाचायची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 07/04/2010 - 19:31 नवीन
धन्यवाद, "आवळीन मी तयांना , जीव मनगटात आहे. असे हवे होते का ?" तसेही चालेल, पण हस्तरेषांचा जीव, स्वता:ची मुठ आवळल्यावर गुदमरतो, आणी ते करायचे सामर्थ्य मनगटात आहे, अशी कल्पना होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
न
निरन्जन वहालेकर Mon, 07/05/2010 - 04:11 नवीन
" जाळो कितीक मजला, हे वणव्यातले निखारे, अन देवो कितीक नियती, रक्तातले इषारे, नक्षत्र ते मृगाचे, मी जपले अंतरात आहे." व्वा ! क्या बात है ! अतिशय सुरेख !
  • Log in or register to post comments
S
sur_nair Mon, 07/05/2010 - 17:15 नवीन
"या आजच्या उन्हाचे, मज तकदीर ज्ञात आहे". वा क्या बात है. पण शेवटच्या कडव्यातले "अन जाणतो खुणा मी, सुकल्या या नदीच्या, मिळणार रुप मजला, जे जगवि़ख्यात आहे" याचा नीटसा सदर्भ लागत नाही असे वाटले.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 07/05/2010 - 18:46 नवीन
धन्यवाद "पण शेवटच्या कडव्यातले "अन जाणतो खुणा मी, सुकल्या या नदीच्या, मिळणार रुप मजला, जे जगवि़ख्यात आहे" याचा नीटसा सदर्भ लागत नाही असे वाटले." बीज जेथे पडले आहे ती खडकाळ वैराण जमीन आहे, पण एका सुकलेल्या नदीच्या खुणा तिथे आसपास आहेत, पावसाळ्यात ही नदी परत वाहु लागेल व बीज रुजेल, आणी ते एका महावृक्षाचे बीज असल्याने, त्या वृक्षाचे जगविख्यात रुप त्याल मिळेल अशी कल्पणा आहे. मुळात ही कविता बीज हे रुपक वापरुन लिहीली आहे, बर्‍याचदा, आपण खुप प्रयत्न करुनही हाती काही लागत नाही कारण परिस्थीती प्रतिकुल असते(खडकाळ वैराण जमीन) पण जवळच कुठेतरी भविष्यातली संधी लपलेली असते, जर आपण चिकाटीने वाट पाहीली तर यश रुजायला वेळ लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sur_nair
ध
धनंजय Tue, 07/06/2010 - 00:12 नवीन
छान कल्पना. वृत्त-लयीची पकड आहे, पण कुठेकुठे हात सैल पडला आहे. मनगटाच्या जोराने या फितुर काव्यरेषा आवळल्या तर कवितेत कुठल्या कुठे पोचण्याचे सामर्थ्य आहे. *(छिद्रान्वेशाबद्दल माफी मागतो. पण :- ?वक्रीच आज छाया? मला क्लिष्ट उपमा क्लेशकारक वाटतात. शिवाय वृत्तपूर्तीसाठी घातलेली भरीची अक्षरे टोचतात - उदाहरणार्थ "या आजच्या उन्हाचे", "नक्षत्र ते मृगाचे", "स्वप्नात त्या उद्याच्या", "सुकल्या या नदीच्या". इतके "हे/ते, या/त्या" निर्देश कृत्रिम वाटतात. "अंगुलिनिर्देश" हा अर्थ कमी, वृत्तपूर्ती अधिक वाटते. असला ढगळपणा टाळण्याचे कौशल्य कवीपाशी निश्चितच आहे.)*
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 07/06/2010 - 04:21 नवीन
पांढरी शाई वाचुन पांढरा फट्ट पडलो आहे , कोणीतरी रमोल अँब्युलंस सर्विस ला फोन लावुन उचला रे मला ! (रिड हर्ट) पतन विजयसुर्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
न
नंदू Tue, 07/06/2010 - 01:26 नवीन
अन झाल्या फितुर दैवा, माझ्याच हस्तरेषा, आवळीन मी तयांचा, जीव मनगटात आहे व्वा क्या बात हैं !
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 07/06/2010 - 21:20 नवीन
धन्यवाद, आणी आपल्या सुचनांकडे नक्किच लक्ष देइल...
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Tue, 07/06/2010 - 22:35 नवीन
बीजाचा दुर्दम्य आशावाद, कुठेतरी पाय रोऊन भव्य दिव्य करुन दाखविण्याची जिद्द!! त्यासाठी अनंत अडचणींच्या वणव्यात जळण्याची तयारी, स्वतःला गाडुन घेण्याची मानसिकता ह्यातुनच एखादा शिवाजी, एखादा बाजीप्रभु, एखादा संभाजी, एखादा बाजीराव, एखादा भगतसिंग आणि असे अनेक कार्याचे वटवृक्ष उभे राहतात. त्या जिद्दीवरच आज माणुस मंगळावर घर बांधण्याची, चंद्रावर पाणी शोधण्याची शर्थ करीत आहे!! त्या जिद्दीला लाखो सलाम!! कविता अप्रतिम हे. वे. सां. न ल. दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 07/07/2010 - 16:50 नवीन
धन्स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा