वादळ वळवाचे
💬 प्रतिसाद
(18)
प
पाषाणभेद
Mon, 07/05/2010 - 15:54
नवीन
मधली अवस्था छान टिपलीय. अजून एखादे कडवे हवे होते. (एखादे म्हणजे दोन चरण)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Mon, 07/05/2010 - 16:06
नवीन
किंवा अधिक अल्पाक्षरी हवे. असे बघूया :
ना धड वाकले
वळवेमुळे झाड
ना धड मोडले
(रचना हायकूच्या धर्तीची आहे.)
- Log in or register to post comments
र
रामदास
Mon, 07/05/2010 - 16:21
नवीन
वादळ वळवाचे
ना धड पोसते
नासते
झाड झोडलेले
ना धड वाकले
मोडले
असेही चालेल का ?
- - - - -
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/05/2010 - 16:21
नवीन
न पोसणारे आणि न नासणारे 'वळवाचे वादळ' आणि न वाकलेले, ना धड मोडलेले असे ते 'झोडलेले झाड' समजून घ्यावे लागेल. तर कवितेचा आनंद घेता येईल.
तो पर्यंत ही केवळ पोच...!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट
Mon, 07/05/2010 - 16:29
नवीन
हायकूसदृश कविता आवडली. चांगलीच आहे.
- Log in or register to post comments
S
sur_nair
Mon, 07/05/2010 - 16:47
नवीन
सुंदर!
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Mon, 07/05/2010 - 19:48
नवीन
छान. धनंजयांच्या कविता वाचणे हा नेहमी वेगळा अनुभव असतो.
धनंजय नुसते प्रयोगशील नाहीत तर त्यांच्या कविता कैकवेळेस भावनाप्रधानही असल्याचे मला भासते.
कविता वाचतांना रिडिंग बिटिविन द लाईन्स हे अपेक्षितच असते, पण दर वाचनाला नविनच लाईन गवसणे, अशी कविता विरळच.
- Log in or register to post comments
च
चित्रा
Tue, 07/06/2010 - 15:14
नवीन
असेच म्हणते.
आठवणीत राहील अशी कविता.
- Log in or register to post comments
न
नंदू
Tue, 07/06/2010 - 01:32
नवीन
कविता आवडली.
दुसर्या कडव्याच्या सुरुवातिला "नि" का बरं आहे?
नसला तरी अर्थात फरक पडला नसता असं वाटलं.
नंदू
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Tue, 07/06/2010 - 07:45
नवीन
याला हायकू म्हणायचे का?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.अय
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Tue, 07/06/2010 - 13:53
नवीन
हायकूच्या धर्तीची रचना आहे.
त्यातल्या त्यात दुसरे कडवे (वेगळे काढून) असे लिहिल्यास (कडक नियमबद्ध) हायकू म्हणता येईल :
.
न वाके
वळिवीं वृक्ष
न मोडे
.
(५-७-५ मात्रा. मात्र मराठीत हायकू लिहिताना ओळी त्यापेक्षा थोड्या लांब घेतात. वरील कवितेतल्या इतकी लांबी चालेल. दोन कडवी स्वतंत्र हवीत. दुसर्या कडव्याच्या सुरुवातीचा 'नि' काढून टाकावा लागेल.)
- Log in or register to post comments
स
सहज
Tue, 07/06/2010 - 13:56
नवीन
कमीत कमी शब्दात पूर्ण अर्थवाही हायकू मस्तच!
नशिबाचा फटका हा अर्थ छान लागला मुळ कवितेमधे!
- Log in or register to post comments
प
पहाटवारा
Tue, 07/06/2010 - 08:08
नवीन
मोडले ना वाकले
झाड झोडलेले |
नासते ना पोसते
वादळ वळवाचे ||
वळव की वळिव ?
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Tue, 07/06/2010 - 13:38
नवीन
वळीव/वळव हे वैकल्पिक प्रथमांत रूप, त्यातल्या त्यात "वळीव" म्हणायला सोपे
वळवाचा/वळिवाचा असे वैकल्पिक सामान्यरूप, त्यातल्या त्यात "वळवाचा" म्हणायला सोपे. (अशी उदाहरणे मराठीत खूप दिसतात. उडीद/उडद -> उडदाचा/उडिदाचा ; अधोरेखित रूपे अधिक प्रचलित आहेत.)
शब्दांचा क्रम बदलल्यामुळे वेगळाच - तोही सुंदर - अर्थ प्रकाशित होतो आहे!
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Tue, 07/06/2010 - 08:12
नवीन
चांगली रचना. असे आणखी प्रयोग वाचायला आवडतील.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 07/06/2010 - 12:01
नवीन
असेच म्हणते. :)
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Tue, 07/06/2010 - 20:54
नवीन
आवडली.
क्रान्ति
अग्निसखा
- Log in or register to post comments
प
पॅपिलॉन
Sun, 08/08/2010 - 20:14
नवीन
न घरका न घाटका किंवा त्रिशंकू म्हणता येईल अशी अवस्था दर्शविणर्या ह्या हायकू सदृश ओळी आवडल्या. स्वतः कवीने तसेच इतरांनी सुचवलेल्या सुधारणाही चांगल्या आहेत.
- Log in or register to post comments