Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मसाला मसूर

क
केशवसुमार
Fri, 07/09/2010 - 01:59

प्रतिक्रिया द्या
11945 वाचन

💬 प्रतिसाद (34)
म
मुक्तसुनीत Fri, 07/09/2010 - 03:51 नवीन
केसु क्या बात ! वीकांताला करून सांगतो !
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 07/09/2010 - 04:31 नवीन
पाककृती मस्त (कारण मसूर आवडतात). आमच्या देशात मिळणारे मसूर काळपट (पक्षी= गडद रंगाचे असतात). हे फोटोतले फिक्कट रंगाचे मसूर कुठचे? की त्या तुरी आहेत? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 07/09/2010 - 17:16 नवीन
अख्खी तुरी पुर्वी कधी बघीतली नाही.. त्यामुळे सांगता येणार नाही.. (तुरी निरक्षर)केशवसुमार इथल्या सुपरमार्केट मध्ये दिसायला मसूरासारखे वाटले म्हणून आणले होते.. चवीला पण मसूरा गत आहे.. (अंदाजपंचे)केशवसुमार प्रतिसादा बद्दल धन्यवाद.. (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
प
प्रकाश घाटपांडे Fri, 07/09/2010 - 05:34 नवीन
खाना खजाना आमचा प्रांत नाही. पण आपली पाकृ आवडली. मुख्य म्हणजे कुठलाही प्रांत वर्ज्य नाही ही बाब विशेष आवडली. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
प
पहाटवारा Fri, 07/09/2010 - 06:15 नवीन
साला पदार्थ खुसखुशीत नसला म्हणुन काय झाले , कृती तर खुसखुशीत आहे ना! वाह !
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 07/09/2010 - 06:28 नवीन
फायनल प्रिपरेशनचा फोटो तर झकासच! एकदम तोंडाला पाणी सुटलं!! 'तिकडे' कच्चा माल नसेल तेंव्हा जरूर येत चला पाककृती विभागात! You definitely qualify!
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 07/09/2010 - 06:32 नवीन
बाकी मस्तच अख्खा मसुर केला आहे. कांदा व इतर तेलात तळताना त्यात भरपुर टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरी घातली तर मसुर एकदम झक्कास होतो.त्याला तिखट/गोडसर चव येते. गुर्जी मिरच्या न वापरता त्यात मिरचीची पावडर वापरा एकदम लाल रंग येतो मसुर ला. :D फक्त अख्खा मसुर असला तर आपल्याला आमटी किंवा इतर कोणतीही भाजी नसली तरी चालते. वेताळ
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/09/2010 - 06:35 नवीन
व्वा! मसूराची अशी पाकृ आवडली ... बघायला! पण फार कष्ट आहेत हो यात ... एका (आळशी) माणसासाठी मसूराची आणखी एक पौष्टीक पाकृ: तुम्हाला हवे तेवढे मसूर (रात्री खाण्यासाठी) सकाळी भिजत घाला. संध्याकाळी घरी आल्यावर त्यात फारसं पाणी राहिलं नाही, आणि मसूर नीट भिजले आहेत याची खात्री करून घ्या. अंदाज चुकला तर मला विचारू नये; आमच्यात अंदाज चुकण्याची पद्धत नाही. अंदाज चुकलाच तर त्याला नवीन पाकृ म्हणतात. जेवणाच्या आधी मिपावर भरपूर टी.पी. करा. पोटात कावळे कोकलायला लागले की लगबगीने कुकर उघडा. त्यात अंदाजपंचे, हवा तेवढा दलिया घाला, भिजवलेले मसूर त्यात घाला. हवं असल्यास अंदाजाने त्यात पाणी घाला. वरून थोडं मीठ, थोडा चाट मसाला, थोडी हळद घाला आणि कुकरचं झाकण लावून, कुकर गॅसवर ठेवून, गॅसची तीच शेगडी सुरू करा. मधल्या वेळात फ्रीजमधून गाजर, काकडी वगैरे प्रकार काढा आणि कुकर आवाज काढेपर्यंत या गोष्टींचा फडशा पाडा. मधल्या काळात डान्राव, निदे, मुसु इत्यादींना (मुद्दामच संपादकांची नावं टाकली, म्हणजे प्रतिसाद उडणार नाही!) खरडी टाकून थोड्या काड्या टाका! तेवढ्या वेळात कुकरच्या शिटीचा आवाज होऊ लागेल, गॅस मंद करा आणि आणखी एक जळजळीत प्रतिसाद टाकून गॅस बंद करा. मग पुन्हा थोड्या वेळाने पोटातून चित्रविचित्र आवाज येतील आणि ते पोटातल्या पोकळीमुळे घुमतील. तेव्हा धावत जाऊन कुकर उघडा. ताटली, वाडगा जे काही हाताला लागेल त्यात दलिया-मसूर वाढून घ्या. पाणी कमी पडून कोरडं वाटत असल्यास दही घ्या! आधी गणपा, स्वातीताई, पांथस्थ अशा गरीबांच्या संजीव कपूर, तरला दलाल इत्यांदींची आठवण काढा... आणि मग ... वरपा! टीपः प्रचंड भूक लागलेली असतानाच असं जेवण घशाखाली उतरू शकतं, त्यामुळे पाकृतल्या महत्त्वाच्या पायर्‍या, उदा: टी.पी. करणे, 'तुंगाट' खरडी टाकणे, "बेळगाव कोणाचं" वगैरे धाग्यांवर "अय्या, कित्ती स्वीट" वगैरे प्रतिसाद लिहीणे, विसरू नये. अदिती
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 07/09/2010 - 18:26 नवीन
अदितीताई..अजीबात कष्ट आणि वेळ लागत नाही.. मसूर भिजवून तयार असतील तर ८-१० मिनिटामध्ये चम्चमीत मसाला मसूर तयार होतात.. (झटपट)केशवसुमार एकदा मसाला मसूरची चव घेउनच बघा परत दलियामसूरच नाव काढणार नाही.. (विपणक)केशवसुमार हा आता मध्ये मध्ये करायच्या पायर्‍या चवी पेक्षा महत्वाच्या असतील तर तुम्ही दिलेल्या कृतीला तोड नाही (टी.पी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/10/2010 - 11:18 नवीन
:-) अर्थात, हे असं जेवण सलग तीन_चौदा दिवस जेवलं की त्याचा कंटाळा येतोच. मग चूपचाप वेळेत हापिसातून बाहेर पडायचं, व्यवस्थित भाजीपाला, टोमॅटो, कोथिंबीर असे प्रकार आणायचे आणि फ्रीज भरून टाकायचा. "एकटीसाठी कुठे एवढे कष्ट" असं वाटलं तर दोन-चार लोकांना आपल्या घरी जेवायला बोलवायचं, म्हणजे कांदा-टोमॅटो कोण चिरणार, कोथिंबीर कोण निवडणार असे प्रश्न चुटकीसरशी सुटतात! ही वेळ लवकरच माझ्यावर येईल; तेव्हा गुरूदक्षिणा म्हणून 'मसाला मसूर'चा फोटो काढून तुम्हाला दाखवतेच. (कडधान्यप्रेमी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
प
परिकथेतील राजकुमार Fri, 07/09/2010 - 07:27 नवीन
चला आमच्या गणपाशी फाईटला कोणितरी उतरले तर ;) पा.कृ. बेष्टच हो एकदम. फक्त लिखाणात 'प्राण्यांची प्रेते घात नसल्यामुळे' असे पडले आहे ते 'खात' असे हवे आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 07/09/2010 - 08:13 नवीन
वा खुप टेस्टी दिसतायत मसाला मसुर.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 07/09/2010 - 08:19 नवीन
एकदम क आणि ड आणि क. एकदम जबर्‍या पाकृ आहे शेठ. घरापासुन दुर राहणार्‍या व बाहेरचे खाऊन कंटाळणार्‍या आमच्यासारख्या उंडग्यांसाठी एकदम बेश्ट ! करुन पाहु कधीतरी ;) बाकी आम्हीही पुर्वी कधीतरी '... उर्फ डॉन्याचा सल्ला ! ' नावाची पाकृ लेखमाला चालु केली होती पण काही कारणांमुळे आम्हाला त्याचा गाशा गुंडाळावा लागला. आता तिच्यात नवे प्राण फुंकावे म्हणतो ;) ------ (बंडखोर स्वैपाकी) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 07/09/2010 - 08:46 नवीन
छान. खर तर नुस्ती वाटीत घेउन खाण्यासारखी (कोरडी व किंचीत गोडसर) वन डीश मील म्हणुन देखील मला मसुर उसळ आवडते.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 07/09/2010 - 08:32 नवीन
गुर्जी आपल्याला कंचाच विभाग असाध्य नाही हे आज परत सप्रमाण सिध्ध केलत. समस्त कवी-नवकवींना जाहिर इनंती लवकारात लवकर आपापली काव्ये प्रसवावी. गुर्जी आमच्या पोटावर पाय द्यायला लागलेत. आधी विडंबणार | मग गद्य ही प्रसवणार | आता पाकसिद्धी ही करणार| मेजवानी निश्चित||
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 07/09/2010 - 08:33 नवीन
मस्त रे... पूर्वी मनोगती असताना संजोपच्या पिरंगुटच्या बंगल्यावर एकदा कट्टा भरला होता तेव्हा तुझ्या हातची चव चाखली आहे रे.. :) Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 07/09/2010 - 08:54 नवीन
काय दिवस आलेत? ;) मसूर बाकी छानच.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 07/09/2010 - 08:56 नवीन
हातातल्या कात्र्या जावुन तिथे स्वयंपाकाची उपकरणे आली. बदल आवडला.
  • Log in or register to post comments
स
सुप्रिया Fri, 07/09/2010 - 09:01 नवीन
तयार मसूरांचा फोटो टेम्टींग वाटतोय. करून बघायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Fri, 07/09/2010 - 12:59 नवीन
पाकृ विभागात केसुंना पाहून भीत भीतच धागा उघडला.... चुरचुरीत निवेदनासोबतचे आख्खे मसूर आवडले... मी कडधान्यांच्या सहसा जात नाही, आता मात्र जावे असे वाटायला लागले आहे. @ डॉनः तुझ्या पाकृ लैच वेळखाऊ असतात.... आठव, ती साबुदाण्याची थालीपीठे... मला लेख वाचताना शेवटी शेवटी तर नक्की ती बनली असतील की नाही असेच वाटायला लागले होते. @ अदिती: असला प्रकार माझ्या नरड्याच्या खाली उतरेल असे वाटत नाही... :( केसु, आणखी पाकृ येऊ देत.. रोज रोज गणपाला प्रत्येक पाकृचे व्हेज व्हर्जन टाक म्हणून सांगायला नको.... ;) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 07/09/2010 - 13:26 नवीन
चांगली पाकृ! फोटो छान चकचकीत आले आहेत, एकदम क्लीन!;) एका फोटूत तर फक्त प्लेटच दिसतीये चा. पु. सा. केलेली. ;) तुमचा जालिय वावर चांगलाच वाढलाय याचे अजून एक उदाहरण! रेवती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 07/09/2010 - 13:32 नवीन
असं वाटून धागा भीतभीतच उघडला पण नव्हे हे विडंबन नव्हे हे लक्षात आल्यावर हायसे वाटले! ;) गुर्जी पाकृ एकदम जोरदार झाली आहे. अधेमधे खुसखुशीत शाब्दिक पेरणी सुद्धा झकास. मूग सुद्धा अशा पद्धतीने मस्त लागतील असे वाटते. (खुद के साथ बाता : रंगा, गुर्जींनी रोल बदलला तुझं काय? :?) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 07/09/2010 - 14:26 नवीन
मस्त मस्त मस्त!!! फ्राफुत आपण केलेल्या अनेक पाकृ आठवल्या, येऊदेत त्या एकेक.. एक तर अगदी आत्ताच सांगते, केसु स्पेशल मटकीची उसळ ती लवकर येऊ दे. आणि लवकरच ब्राझील मधून जर्मनीला यायचं बघा,:) स्वाती
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 07/09/2010 - 17:58 नवीन
धन्यवाद. ज्वारीच्या भाकरीच्या उल्लेखाबद्दल निषेध. माझी ही ३ वेळा फसली. (थापताना भेगा गेल्या, तव्याला तुकडे-तुकडे होऊन चिकटली.) पुन्हा प्रयत्न करणार नाही.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 07/09/2010 - 18:34 नवीन
पिठ किती जुन आहे आणि कसे आणि किती मळलेले (तिंबलेले) आहे ह्यावर सगळा भाकरीचा खेळ अवलंबून असतो.. मी ही शक्यत त्या वाटेला जात नाही.. (अनुभवाने शहाणा)केशवसुमार पिटा ब्रेड झिंदाबाद.. (पर्यायी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
म
मिसळभोक्ता Fri, 07/09/2010 - 18:32 नवीन
केसुषेठ, ब्राझिलातून भारतात परतताना, व्हाया मार्गे सॅन फ्रान्सिस्को जावे ही विनंती. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 07/10/2010 - 03:16 नवीन
प्रस्तुत लेखाचे शीर्षक सारखे सारखे डोक्यात घोळत होते. दोन नावे सतत कानात घुमत होती : "द मिस्टिक मस्युर" आणि "मेरिलिन मॅन्सन". डॅम यू केसु. =))
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Sat, 07/10/2010 - 03:46 नवीन
पाककृती आवडली. मसूर माझ्या आवडीचा. मसुराची उसळ आणि गरमागरम बासमती भात (तूप आणि मीठ - जमल्यास मेतकूटही) हे एक कैवल्यस्वरुपी आनंदाचे साधन. नुसती घट्ट मसुराची उसळ आणि त्यावर पेरले फरसाण, बारीक कच्चा कांदा व कोथिंबीर हे 'सुख जाले हो साजणी' म्हणायला लावणारे दुसरे देशस्थी साधन. एकूणच कडधान्ये हे ईश्वराचे मानावाला दिलेले द्विदलदेणे आहे हेच खरे. सन्जोप राव होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है
  • Log in or register to post comments
R
ramjya Sat, 07/10/2010 - 16:23 नवीन
पुणे ला 'सिटीप्राईड' -सातारा रोड वर ...'जगातभारी कोल्हापुरी' होटेल आहे....खास अख्खा मसूर साथी प्रसिद्ध आहे.....मला अख्खा मसूर आणी सोलेकढी कशी बनवत्तात याची माहीती पाहीजे.....आभारी आहे
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 07/10/2010 - 21:06 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
S
sur_nair Tue, 07/13/2010 - 05:53 नवीन
आम्ही मसूर कुकर मध्ये शिजवून करतो. पण त्याचा लगदा होतो. बाकी मसाला तुम्ही सांगितला तोच बराचसा. आता भिजत घातलेत. करून बघतो तुमच्या पद्धतीने
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/13/2010 - 06:15 नवीन
कुकरमधे शिजवतानाही जर शिट्टी व्हायच्या जऽऽस्ट आधी गॅस बंद केलात तर लगदा होणार नाही. आणि आता धागा वर आला आहेच तर माझी गुरूदक्षिणा इथेही देते.* Image removed. *विसू: डान्रावांनी हा प्रतिसाद पाहू नये. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sur_nair
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 07/13/2010 - 07:34 नवीन
अय्या, कढई किती छान आहे गं तुझी कुठनं घेतलीस? (टीपी) पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
S
sur_nair Wed, 07/14/2010 - 04:28 नवीन
एकदम मस्त झाली म्हणून मुद्दाम धन्यवाद पुन्हा एकदा. यात फरसाण टाकून चकणा म्हणून खायला छान लागेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sur_nair
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा