Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इराण, इस्लाम आणि दगडाने ठेचून मारण्याची कायदेशीर शिक्षा

ह
हुप्प्या
Fri, 07/09/2010 - 15:09
🗣 67 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
13162 वाचन

💬 प्रतिसाद (67)
ह
हुप्प्या Sat, 07/10/2010 - 01:00 नवीन
नक्की उच्चार माहित नाही. पण हदीथ हेही इस्लाममधे आदरणीय मानले जातात ना? त्यातील अनेक दगडाने ठेचून मारण्याची शिफारस करतात. हे बघा http://www.faithfreedom.org/op-ed/hadiths-on-stoning-in-islam/ आता ही उदाहरणे चुकीची आहेत का? त्यातले कित्येक खुद्द महंमद वा आयेषाच्या तोंडची वाक्ये उद्धृत करतात ज्यात ह्या दंडाचा स्वच्छ उल्लेख आहे.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 07/10/2010 - 04:39 नवीन
मक्केस पण असे दगड मारायची प्रथा आहे..सैतानाला दगड मारतात..असे वाचल्याचे स्मरते..
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 07/10/2010 - 06:43 नवीन
गुन्हेगारांना जरब रहावी यासाठी कडक शिक्षा आणि त्या शिक्षा अमलात आणणारा प्रभावी व्यवस्था आस्तित्वात असावी. अर्थात गुन्ह्यची व्याख्या ही सापेक्ष असते. एका देशाचा शहीद हा दुसर्‍या देशासाठी अतीरेकी असू शकतो. स्वातन्त्र्यसैनीक आणि नक्षलवादी हे दोघेही एका अर्थाने सारखे असू शकतात अर्थात खली जिब्रान म्हणतो त्याप्रमाणे... एकासाठी न्याय हा दुसर्‍यासाठी अन्याय होत असतो. वकीलांना कायद्यातील पळवाटा शोधून कायदा निष्प्रभ कसा होईल यातच अत्यानन्द मिळत असतो. Image removed.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 07/10/2010 - 07:38 नवीन
'व्याभिचार' य शब्दाचा अर्थ मल अजुन तरी कळला नहिये? हा डीफाईन कसा करतात, आणी कोण करतात? आणी त्याबद्दल 'शिक्शा' वगरै करण्याचा अधिकार कोणालाही कसा काय मिळतो? कोणीही (+१८) व्यक्तिगत पातळीवर काय करायचे, ह्यात आपण फार नाक खुपसू नये... हे 'सभ्यपणाचे' लक्षण नाही. माझ्या मते एखाद्यानी नुसती चोरी जरी केली, तरी त्याला तिथले सरकार आणी अक्खा समाज जबाबदार आहे, ...कारण तो समाज त्या 'चोराला' अन्न/ वस्तू/ संस्कार हे काहीही पुरवू शकला नाही! शिवाय कुठल्याही गुन्ह्याला 'जीव घेणे' ही शिक्शा योग्य नाही असे मला वाटते.... अवांतरः च्यायला, खरा 'क्श' कसा लिहायचा, कुणीतरी सांगा हो! ============ ( स्वातंत्र्यप्रिय) माउ
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 07/10/2010 - 07:50 नवीन
तुला क्श ल्ह्यायचाय की क्ष.... x = क्ष आणि k+s+h = क्श Image removed.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 07/10/2010 - 08:05 नवीन
लक्ष लक्ष धन्यवाद! 'क्षोप्पच' आहे क्ष लिहिणे! मी जीमेलवरुन लिहित होते एकीकडे...म्हणून गोंधळ होतोय टंकायचा.. ============ माउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
आ
आण्णा चिंबोरी Sat, 07/10/2010 - 08:39 नवीन
या दोघा अतिरेक्यांना गळ्याभोवती फास बांधून श्वासावरोध करुन मारण्याची क्रूर कायदेशीर शिक्षा देण्याबाबत मिपाकरांचे आणि हुप्प्याचे मत वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Sat, 07/10/2010 - 08:57 नवीन
परक्या देशात लपून छपून शिरून बेछूट गोळीबार करून अनेक निरपराध, ओळख पाळख नसलेल्या, लोकांना यमसदनी पाठवणे, कित्येकांची आयुष्ये उध्वस्त करणे आणि उभय संमतीने केलेला तथाकथित व्यभिचार यांना एकाच पारड्यात तोलण्यामागे काय गहन विचार आहे हे जाणून घ्यायला आवडेल. १४०० वर्षापूर्वी लिहिलेल्या पुस्तकातील (ज्यात काडीचाही बदल सहन केला जात नाही) वचनांना प्रमाण मानून तशी शिक्षा देणे आणि आधुनिक काळात, आधुनिक मूल्यांचा विचार करून अभ्यासपूर्वक लिहिलेल्या भारतीय कायद्याप्रमाणे (ज्यात लोकमताने बदल होऊ शकतात) ठरवलेली शिक्षा देणे याची तुलना होऊ शकते असे का वाटते याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुरुंगात, प्रशिक्षित डोम्बाने फासावर लटकवणे आणि जाहीरपणे तमाम प्रजेला कुठल्या तरी आरोपीला मरेपर्यंत दगड मारायला उद्युक्त करणे, त्यांच्या संवेदना बधीर करणे हे एकाच मापाने मोजण्यामागे काय तर्कट आहे ह्याची कारणमीमांसा जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आण्णा चिंबोरी
आ
आण्णा चिंबोरी Sat, 07/10/2010 - 09:35 नवीन
तुझ्या चर्चाप्रस्तावात केवळ शिक्षेबाबत टिप्पणी आहे. गुन्ह्यांच्या वेगवेगळ्या स्वरुपांचे तौलनिक विवेचन त्यात नाही. त्यामुळे आयुष्ये उद्ध्वस्त करणे आणि व्यभिचार हा नवा पैलू चर्चेत आणायचे कारण नाही. तुझ्या मूळ चर्चाप्रस्तावातले वाक्य खालीलप्रमाणे आहे.
ह्या रानटी, कालबाह्य, क्रूर शिक्षेला कुठला सुसंस्कृत देश थारा देणार नाही. पण अस्सल इस्लमी कायदा जिथे लागू असतो तिथे हा प्रकार राजेरोस होतो. कुराणात ह्या प्रकारच्या "गुन्ह्याला" (इथे उभयता प्रगल्भ होते का, हे संबंध उभयतांच्या संमतीने झाले का वगैरे गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत) ही शिक्षा असल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे. (चूभूद्याघ्या). त्यामुळे ते चुकीचे वगैरे म्हणणेही पाप आहे.
उद्या तमाम प्रजेपैकी काही जणांना डोंबासारखे, दगड मारण्यात प्रशिक्षित करुन, या प्रजेपैकीच काही जणांनी दगड मारुन शिक्षेची अंमलबजावणी करावी हे कमी क्रूर आहे असे तुला वाटते का? एखाद्या गुन्ह्यासाठी जीव घेणे ही शिक्षा क्रूर आहे का? तशी शिक्षा देणारे भारत, अमेरिका हे देश इराणच्या तुलनेत सुसंस्कृत कसे ठरतात? अमेरिकेने सद्दाम हुसेनच्या देहांत प्रायश्चित्ताचे प्रक्षेपणही करवले होते. दगडाने ठेचल्यास जास्त वेदना होतात व फाशीच्या दोराने कमी वेदना होतात हे कोणी ठरवले? प्रशिक्षित डोंबाच्या संवेदना बधीर केल्या जातात की नाही याबाबत मला काही माहिती नाही. ती माहिती तुला आहे का? जर एखाद्या गुन्ह्यासाठी जीव घेणे ही शिक्षा योग्य आहे असे तुझे मत असेल तर हा जीव कसा घेतला जातो याच्याशी देणेघेणे असण्याचे काय कारण आहे? उगाच कुराण, हदीथ वगैरे शब्द आणून मुसलमानांविरोधात काहीही बरळू नकोस. बाय द वे. वारंवार मुसलमानांविरोधी भावना भडकावण्याचे तुझे मिपावरील चर्चाप्रस्ताव सुपरिचित आहे. तुझ्यासारख्यांच्या विचारसरणीशी मी परिचित आहे. त्यातीलच काही जण इराण, इराकमध्ये कसाब/किंवा गुरु प्रकरण घडले असते तर त्यांना दगडाने ठेचून तत्काळ शिक्षा झाली असती असे समर्थन करतात याची या चर्चाप्रस्तावाच्या अनुषंगाने गंमत वाटली. मिपावर जातीधर्मामध्ये विद्वेष पसरवणारे लिखाण चालत नाही असे ऐकिवात होते. हुप्प्याचे चर्चाप्रस्ताव कसे चालवून घेतले जातात हे समजत नाही. हुप्प्या संपादक मंडळींपैकी कोणाशी संबंधित आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
व
वेताळ Sat, 07/10/2010 - 08:46 नवीन
तुझे विवेचन वाचणे आवडेल आपल्याला. वेताळ
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 07/12/2010 - 08:39 नवीन
कुराणाबद्दल / विरोधात काहीही बोलले तर ते 'मुसलमानांविरुद्ध ' कसे काय होते बरे?? 'माणुसकी' विरुद्ध असलेल्या कोणत्याही गोष्टी कुठल्याही धर्माच्या/ देवाच्या नावाखाली खपवल्या जाउ नयेत, असे मला वाटते.. लेखाचा उद्द्येश देखिल तोच असावा असे मला वाटतय. सध्या जगात धर्माच्या नावाखली सर्वात जास्त गळ्चेपी होत असलेला समाज, तोच आहे. विशेषत। स्त्रिया.... मला वाटते विषय स्त्रीपुरुष संबंध, समाजमान्यता, धर्मिक अनुष्ठान आणी देशाचे कायदे याबद्दल आहे. हे 'जातीधर्मामध्ये विद्वेष पसरवणारे लिखाण'' नाही. .============ माउ
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 07/12/2010 - 10:36 नवीन
शिक्षा क्रुर आहे नक्की. आणि अपराधाच्या मानाने कठोर आहे हे पण नक्की (अपराध असलाच तर. मला तर मुळात अपराधच वाटत नाही). पण मुळात हा त्यांचा कायदा आहे. कित्येक देशात मुळात म्रुत्युदंडच क्रुर मानतात. आपल्या देशात ते क्रुर मानत नाही आपण. त्यामुळे शिक्षा क्रुर आहे की नाही हे आपण ठरवु शकत नाही. आपल्याकडे बलात्कारासाठी फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणील जोर आहे आणि त्याला आपली समाजरचना आणि आपली विशिष्ट विचार संस्क्रुति कारणिभूत आहे. परदेशात (म्हणजे युरोप अमेरिका) तसे नाही. त्यांच्यामते बलात्कार हा खुप मोठा गुन्हाच नाही. त्या लोकांच्या मते आपण फाशीच्या शिक्षेचा पुरस्कार करतो म्हणजे आपण रानटी असु शकतो. दगडाने ठेचुन मारणे ही शिक्षा क्रुर असु शकेल - आपल्या मते. पण तरीही कसाब ला काय शिक्षा व्हावी असे तुम्हाला वाटते. भर चौकात दगडाने ठेचुन मारा त्याला असेच म्हणतो ना आपण? आपण फक्त म्हणतो - इच्छा करतो, ते प्रत्यक्षात आणतात एवढाच फरक आहे.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Mon, 07/12/2010 - 18:56 नवीन
परदेशात (म्हणजे युरोप अमेरिका) तसे नाही. त्यांच्यामते बलात्कार हा खुप मोठा गुन्हाच नाही. काही पुरावा आहे का या statement ला? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पुष्करिणी Mon, 07/12/2010 - 19:27 नवीन
+१ युरोपात खून केला / केले तरी देहदंडाची शिक्षा नाही. पण बलात्काराला मोठा गुन्हा मानत नाहीत हे नविनच ऐकतेय. काही संदर्भ असल्यास देता का? पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
म
मृत्युन्जय गुरुवार, 07/15/2010 - 08:40 नवीन
कदाचित मी माझे म्हणणे व्यवस्थत मांडले नाही. आपल्याकडे सामाजिक - सांस्कृतिक दबावामुळे, समाजभावनेमुळे बलात्कार हा खुप मोठा अपराध मानला गेला आहे. तिकडे तो वैयक्तिक स्वातंत्रावर घाला म्हणुन गुन्हा मानला जातो. कारण वेगळे असले तरीही थोड्याफार फरकाने गुन्ह्याची तीव्रता मान्य केली जाते. फरक असा आहे की. आपण हा गुन्हा खुपच जास्त सेन्सिटिवली घेतो. त्यामुळे बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी वाढते आहे (जरी अजुन कायदा तसा नसला तरी) आणि ती बर्‍याच जणांनी उचलुन धरली आहे. अमेरिकेत मात्र आता या गुन्ह्यासाठी फाशी होत नाही. पुर्वी व्हायची. म्हणजे त्यांच्या द्रुष्टीने या गुन्ह्याची तीव्रता आता पुर्वीसारखी उरली नाही. आपल्यासाठी मात्र हा गुन्हा पुर्वीपेक्षा जास्त तीव्र होत चालला आहे. मुळात फाशीची शिक्षाच अमेरिकेच्या बर्‍याच राज्यांमध्ये क्रुर मानली जाते. अगदी "दुर्मिळात दुर्मिळ" अपराधांसाठी पण ती काही राज्यांमध्ये बर्‍याच वर्षात दिली गेलेली नाही. माझे मत कायद्याने दिली जाणारी शिक्षा या निकषावर आधारित होते.
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी गुरुवार, 07/15/2010 - 09:58 नवीन
काही आकडेवारी १९७६ नंतर अमेरिकेत देहांताची शिक्षेची अंमलबजावणी : १२१९ सध्या देहदंडाची शिक्षा सुनावलेले गुन्हेगार, अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत : ३२०० + १९४७ नंतर भारतातील देहांताची शिक्षेची अंमलबजावणी : ५२ सध्या देहदंडाची शिक्षा सुनावलेले गुन्हेगार, अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत : २९ माझ्यामते देहांताची शिक्षा ही अमेरिकेत तितकी 'रेअरेस्ट ऑफ रेअर ' वाटत नाहीये... पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 07/15/2010 - 10:49 नवीन
आकडेवारी बद्दल धन्यवाद. संपुर्ण अमेरिकेत अजुन म्रुत्युदंड हद्दपार झालेला नाही हे नक्कीच. परंतु काही राज्यांमध्ये म्रुत्युदंड अयोग्य मानला गेलेला आहे. तिकडे प्रत्येक राज्याचा या बाबतित वेगळा कायदा असतो. त्याप्रमाणे काही राज्यांमध्ये हि शिक्षा नाही. इतर ठिकाणी आहे आणी पुर्विदेखील होती. काही राज्यांमध्ये पुर्वी बलात्कारासाठी सुद्धा म्रुत्युदंड देण्यात आला आहे. आता तो काढुन टाकला आहे किंवा दिला जात नाही. आपण मात्र त्यासाठी फाशीची मागणी करत आहोत. थोडक्यात जे आपल्यासाठी क्रुर आहे ते इतरांसाठी असेलच असे नाही आणि जे इतरांना क्रुर वाटते ते आपल्याला वाटेलच असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा