टंकेल वीडंबक जैं न काहीं
💬 प्रतिसाद
(27)
म
मिसळभोक्ता
Fri, 07/09/2010 - 18:39
नवीन
मुख्य म्हणजे वृत्त चपखल ! सर्वच तांत्रिक बाबी चोख !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 07/09/2010 - 18:59
नवीन
विडंबन धनंजयनी केले म्हणजे हे सर्व आलेच.
असो. केसूंनी योग्यवेळी लाईन बदलली हे बरे.
नितिन थत्ते
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 07/09/2010 - 19:21
नवीन
+२. विशेषतः केसूंनी योग्यवेळी लाईन बदलली हे बरे, हे वाक्य! :)
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Fri, 07/09/2010 - 19:32
नवीन
मस्त विडंबन..
(वाचक)केशवसुमार
श्रामो,
ही सगळी पॉल ऑक्टोपसची कमाल..;)
ऑक्टोपस भविष्य सांगायला लागल्या पासून पोपट गाण्याचे कार्यक्रम करायला लागले आहेत असे ऐकीवात येते आहे..
(विस्थापीत)केशवसुमार
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 07/09/2010 - 19:59
नवीन
खतरा... ऑक्टोपस ते पोपट हा प्रवास भारीच मांडलात. ;)
- Log in or register to post comments
क
क्रेमर
Fri, 07/09/2010 - 20:13
नवीन
पोपटांचा धंदा अगदीच काही बंद झालेला नाही.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/09/2010 - 20:16
नवीन
हाहाह्हा ...
विडंबनही खतरनाक!
अदिती
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Fri, 07/09/2010 - 21:14
नवीन
मजा आली.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 07/10/2010 - 08:03
नवीन
आता कुठे लाईन मारतात ते ?
स्वगतः- तरिच काल मला कॅफेचा पत्ता विचारत होते तर...
उत्सुक
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 07/09/2010 - 19:23
नवीन
(अजून लाईन न बदललेला)चतुरंग
- Log in or register to post comments
स
सहज
Sat, 07/10/2010 - 03:43
नवीन
>वा! धन्याशेठचे विडंबन एकदम मस्त!
सहमत.
कृपया लाईन बदलु नका, तुमच्या इतकी दर्जेदार व मुख्य म्हणजे वैविध्यपूर्ण विडंबने अजुन तरी इथे पहाण्यात नाहीत हो. :-)
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 07/09/2010 - 19:29
नवीन
विडंबन छान, हसू आणणारे
मात्रा, वृत मला कळत नाही त्यामुळे जास्त काही बोलणे नाही.;)
रेवती
- Log in or register to post comments
क
क्रेमर
Fri, 07/09/2010 - 20:14
नवीन
विशेष आवडले.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Fri, 07/09/2010 - 20:17
नवीन
म्हणूनच दोन्ही डगरींवर पाय असलेला पैं बरां..
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Fri, 07/09/2010 - 21:29
नवीन
कुंथेल वैचारिक जैं न काहीं,
तैं चीवडाया मिळणार नाहीं.
कोठून धागे मिळतील ठोक?
शिमग्या नि पोळ्यासि मुकतील लोक. ॥१॥
.
विचार लोकांत जरी विकें ना,
खाज्रेपणी खूप रुची जनांना.
करावया माज कोणी न लाजो,
छद्मीपणाचा सुकाळ राहो! ॥२॥
.
त्या-त्याच चोथा चर्चा फिरून,
प्रश्नावली तीच फिकी विरून,
स्वस्तात आस्वाद तैं नष्ट सारा,
रुसेल वीचारवान् जैं बिचारा! ॥३॥
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 07/09/2010 - 21:38
नवीन
हायला, मास्तर आजकाल काय घेताय? म्हणजे खाणं वगैरे म्हणतोय मी... ;)
भारीच प्रकरण केलंत हे...
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sat, 07/10/2010 - 03:04
नवीन
भारी म्हणजे काय? एकदम भारीच की हो... शिवाय ऑलखीचं वाटतंय ते वेगळंच. वा!!! मुसुशेठ, वा!!! चांगलीच माहिती दिलीत हो. :D
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Sat, 07/10/2010 - 03:52
नवीन
मुसुषेठ एकदम पेटेश! ;)
लै भारी!!
चतुरंग
- Log in or register to post comments
स
सहज
Sat, 07/10/2010 - 04:04
नवीन
हा हा
क ड क माल मुसुशेठ!
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 07/10/2010 - 10:55
नवीन
ऐं ल्ला, मज्जा आली.
अदिती
- Log in or register to post comments
N
Nile
Fri, 07/09/2010 - 21:42
नवीन
वा, मजा आली.
*ऐं वृत्तात बसावे म्हणुन का?
-Nile
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
Fri, 07/09/2010 - 22:40
नवीन
वा वा!! मस्तच...
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sat, 07/10/2010 - 03:03
नवीन
जबरा!!!
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sat, 07/10/2010 - 07:19
नवीन
धनंजय आणि मुसुशेठ,
लै भारी विडंबन!
मुसुशेठ ने दिलेला 'खाज्रे'पणा थेट भिडला ;)
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Sat, 07/10/2010 - 07:39
नवीन
धनंजय आणि मुसु,
दोन्ही विडंबने मस्त..
स्वाती
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sat, 07/10/2010 - 08:05
नवीन
छान !
--अवलिया
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Sat, 07/10/2010 - 22:10
नवीन
माझ्या विडंबनाच्या प्रयत्नाचा दिलेल्या प्रोत्साहनाबाबत सर्वांचे आभार.
मध्ये "(वर्तूळ)", "{वाघूळ}" "|वातूळ|" वगैरे "गारगोट्यूळांचे वादळ हल्लीहल्लीच एके दिवशी झाले. आठवतच असेल. माझ्यासारख्याच या हौशी विडंबकांबद्दल टीका करता येत नाही. भाईकाकांनी स्वतःच्या लेखणीने आम्हा ऐर्यागैर्यांसाठी ज्ञानोबा माउलीने दिलेले पर्मिट पोचवलेले आहे :
माउलीने राजहंसाला मात्र बेडौल चालण्याचे पर्मिट दिलेले नाही. ज्या विडंबकांना लीलया यमके-वृत्त सांभाळता येते, त्यांचा माल आपण वेगळ्या तराजूवरती तोलतो.
कोणाला वाटेल की येथे "विडंबन हे परप्रकाशित आहे" वगैरे, विडंबनविरोधी टीका मी करणार आहे. मुळीच नाही. परप्रकाशित असले तरी विडंबनात स्वयंप्रतिभ कला असावी लागते, असे मी मांडणार आहे.
विडंबनाची तुलना करावी अजायबघरातील शीशमहालाशी. तिथल्या आरशांत आपला चेहरा बघितला की तो इतका गमतीदार दिसतो, की पुन्हापुन्हा हसावेसे वाटते. पण मग कुठल्याही मोडक्या-तोडक्या आरशात तोंड बघायला आपण तिकिटाचे पैसे देतो का? नाही. असा आरसा स्वस्तातसुद्धा विकत घेत नाही. अजायबघरातला शीशा "उगाच कसाही" वेडावाकडा नसतो. तो बनवायला कारागीर लागतो. प्रतिबिंब कसे वाकडे होणार, त्याची योजना कारागिराने आखलेली असते. प्रतिबिंबात मूळ वस्तूची ओळख सहज पटेल, अशा प्रकारेच बदल होतात. मात्र झालेल्या बदलाने व्यंग्यपूर्ण आकार प्रतिबिंबात येतो. तो बदल बघणार्याला अगदी नाविन्यपूर्ण हवा. काही अ-पूर्व, विलक्षण बघून आनंदाने हसू फुटावे.
मूळ आकार ओळखीचा ठेवणे आणि अनोळखी-विलक्षण बनवणे या विरुद्ध प्रक्रियांमध्ये तोल साधायची कसरतच असते. ही उत्तम विडंबकाकडून आम्हा आस्वादकांना अपेक्षित असते.
१. मूळ कविता निवडण्यात नेमकेपणा वाचकाला जाणवावा. विडंबकांना याची चांगली कल्पना असते - म्हणून स्फूर्तिस्थानाचा निर्देश "अमक्यातमक्याची अप्रतिम गझल" वगैरे शब्दांनी करतात. मात्र कित्येकदा कच्चा मालच रटाळ असतो. विडंबनात मुळातल्या कवितेची आकृती शोधण्यात वाचकाला मजा वाटली पाहिजे. मुळातली कविता इतका तरी ठसा उमटवू शकली पाहिजे.
२. मूळ कवितेत कमीतकमी शब्दबदल करून अर्थ जास्तीतजास्त वेगळा हवा. तर मजा येते. कमीतकमी बदल केल्यामुळे मुळातली आकृती स्मरत राहाते. अर्थात फरक खूप असल्यामुळे नव्या-जुन्या अर्थांची विसंगती गुदगुल्या करत राहाते. नवीन अर्थ ती लुटुपुटूची लढत जिंकण्याइतका स्वतंत्र आणि समर्थ हवा. हा अर्थ एकजिनसी असला, तरच परप्रकाशित आकृतीच्या वरती विडंबकाची प्रतिभा लखलखते.
३. विडंबनांचे विडंबन करायच्या भानगडीत अव्वल विडंबक क्वचितच पडत असावेत. तसे केल्यास "कुठली आकृती स्मृतीत यावी?" याचा भलताच गोंधळ वाचकाला होऊ शकतो. भोज्या ठरलेला नसला तर अर्थांच्या लपंडावाचा खेळ गमतीचा राहूच शकत नाही.
उदाहरण बघूया :
रामदासस्वामींचा श्लोक
त्याचे पु. ल. देशपांड्यांनी केलेले उत्तम विडंबन येथील वाचकांना ठाऊक असेलच :
याचे झेरॉक्सचे-झेरॉक्स काढल्यासारखे काळेबेद्रे विडंबन निकृष्ट असते?
येथे कुठली मूळ आकृती ठसवून मग त्याच्या विकृतीची गंमत अनुभवायची, तेच कळत नाही.
करायचेच तर मुळातल्या श्लोकाचे नव्याने विडंबन करायला घ्यावे.
...
(अर्थात ही सुद्धा उच्च दर्जाची रचना नाही. पण वरील डबल-झेरॉक्सपेक्षा हीत थोडा अधिक दम आहे, हे मान्य केले पाहिजे.)
- - -
मिसळपावावरचे वाचक मला, किंवा अन्य कविकिरडूंना "मस्त", "+१", "अप्रतिम" वगैरे प्रोत्साहन देतात. भोळ्या सांबासारखा हा त्यांचा आशीर्वाद देण्यास तत्पर स्वभाव आहे. मोठी तपश्चर्या केलेल्या विडंबन-ऋषींनी मात्र एवढ्यावर समाधान मानू नये. दयाळू मिसळपावकर तोषतील अशी विडंबने ते दिवसाला दोन-चार रचू शकतात. त्यांनी स्वतःच्या वेगळ्या "कडक" निकषांवर विडंबन घासून बघावे : "रचना आपल्या कौशल्याला साजेशी आहे का?" कित्येकदा विडंबन वाचून पुन्हापुन्हा खात्री करून घ्यावी लागते - "छे छे! आपल्या याने हे रचले!"
आणि खरे तर मिसळपावकर रसिकांनीही दुहेरी निकष वापरायला काय हरकत आहे? गल्लीत टेनिस बॉल क्रिकेट खेळणार्यांना आपण सहजासहजी शाबासकी देतो. म्हणून काय आपण मुंबई संघाकडून तितक्याच टाकटूक कौशल्याची अपेक्षा करतो का? नव्हे. खूप अधिक अपेक्षा करतो. मला तेंडुलकरासारखी बॅट फिरवता येत नाही, म्हणून गल्लीतल्या माझ्यापेक्षा बर्या पोरांना संघात पाठवू देऊ काय? आपल्या हातात कौशल्य नसले, तरी फार-फार उच्च कौशल्य दिसू शकतील असे डोळे आपल्यापाशी आहेत.
- Log in or register to post comments