Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टारूशेठ कुठे गेले?

स
सविता
Sat, 07/10/2010 - 08:09
🗣 29 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5662 वाचन

💬 प्रतिसाद (29)
अ
अवलिया Sat, 07/10/2010 - 08:12 नवीन
"रोचक" धागा.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Sat, 07/10/2010 - 08:14 नवीन
मनापासुन विचार करायला लावणारा धागा. P = NP
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 07/10/2010 - 08:21 नवीन
धागा ला भिडला... हे आणी असे बरेच वाक्यप्रचार ही टारुची अंतरजालाला देणगी आहे... तो लवकरात लवकर परत येवो, भले दुसर्‍या कोणत्या आय डीने येवो...
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 07/10/2010 - 08:21 नवीन
खुपच आनंद झाला हा धागा वाचुन. नाना व टार्‍याचा फॅन क्लब मिपावर सुरु करावा लागणार लवकर. वेताळ
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 07/10/2010 - 08:24 नवीन
नाना व टार्‍याचा फॅन क्लब मिपावर सुरु करावा लागणार लवकर.
चला म्हणजे नान्याचा आयडी उडणार हि बातमी खरी आहे तर. आता दुषीत वातावरण निवळणार म्हणायचे =)) नान्याचा चौपाटी आणि चपटी वाला मित्र ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
म
मितभाषी Sat, 07/10/2010 - 08:23 नवीन
हां!! मी पण हाच विचार करत होतो आमचे आवडते लेखक टारुशेठ अखेर गेले कुठे??????? आता कळले त्यांचा आयडी ब्लॉक केल्या गेला आहे. असतं एखादं पोरगं खट्याळ म्हणुन काय त्याला घरातुन हाकलुन द्यायचे?????????????????? निषेध! निषेध!! निषेध!!! भावश्या.
  • Log in or register to post comments
स
संपादक मंडळ Sat, 07/10/2010 - 08:29 नवीन
नमस्कार, संपादक मंडळास कळवण्यास खेद होतो की मंडळातर्फे वारंवार सूचना देऊन आणि विनंती केल्यानंतरही अवांतर आणि अनावश्यक प्रतिसाद लिहिणे, इतर सदस्यांवर व्यक्तिगत रोखाचे लेखन करणे, संपादक आणि संकेतस्थळ चालकांविषयी अनाठायी नाराजी प्रकट करणे आणि संकेतस्थळाचे वातावरण बिघडवणे अशा अनेक गोष्टींना आळा न बसल्याने 'टारझन' आणि '||विकास||' या सदस्यांचे सदस्याधिकार आज काढून घेण्यात आले आहेत. अशाच प्रकारचे लेखन न करण्याची विनंती आणि सूचना इतर काही सदस्यांनाही करण्यात आली आहे. त्यांच्या वर्तणूकीत सुधारणा होईल अशी आशा संपादक मंडळाला वाटते. मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख लिहणारे सदस्यांना तसे न करण्याची विनंती करण्यात येत आहे. सदर प्रकार वारंवार आढळल्यास इथे जाहिर केल्याप्रमाणे कारवाई करण्याचा अधिकार संपादक मंडळाला राहिल. सदस्यांकडुन सहकार्याची अपेक्षा आहे .... वारंवार सूचना/ ताकीद देऊनही एखाद्या सदस्याचा खोडसाळपणा दिसून येत असेल तर विशिष्ट कालावधीसाठी व्य.नि. आणि खरडवहीची सुविधा काढून घेण्याचे अधिकार संपादक मंडळाला आहेत. या उपायानंतरही सदस्याच्या वागणूकीत सुधारणा नसल्यास सदस्याचे खाते बंद होऊ शकते ह्याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद, संपादक मंडळ
  • Log in or register to post comments
आ
आण्णा चिंबोरी Sat, 07/10/2010 - 09:40 नवीन
मला मिपावर नुकतेच एक वर्ष आणि एक आठवडा पूर्ण झाला. या कालावधीत मला खरडवही किंवा व्यनिची सुविधा का दिली नाही याचे स्पष्टीकरण या निमित्ताने संपादक मंडळाकडून अपेक्षित आहे. अनेक जण माझ्या खरडवहीत येऊन काहीही लिहून जातात पण मला तसे प्रत्युत्तर त्यांना देता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपादक मंडळ
आ
आण्णा चिंबोरी Sat, 07/10/2010 - 11:55 नवीन
श्री. विजुभाऊ यांनी माझ्या खरडवहीत 'ओरडता कशाला' असे लिहिले आहे. मात्र त्यांच्या खरडवहीत प्रतिसाद देण्याची मला परवानगी नाही असे दिसते. या तांत्रिक अडचणीबाबत मी लिहिले होते. संपादक मंडळ झोपले काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आण्णा चिंबोरी
म
मितभाषी Sat, 07/10/2010 - 09:42 नवीन
तुमचे कायदे कानुन सगळे आम्हाला मान्य आहे. काड्याघालुंच्या नाड्या आवळल्या त्याच्याशी आम्हाला काही देने घेने नाही. पण टार्‍याला योग्य समज देवुन सन्मानाने बोलावले पाहीजे असे मला वाटते. (कुठल्याही कंपुत नसलेला )अलिप्त भावश्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपादक मंडळ
आ
आळश्यांचा राजा Sat, 07/10/2010 - 08:47 नवीन
संबंधितांची ओळख नाही. खरडवही नसल्यामुळे काही संपर्कही नाही. पण वाईट वाटले. टारझन कोण आहे माहीत नाही. त्यामुळे त्याचं कुणाशी भांडण वगैरे आहे की कसे याबद्दलही माहीत नाही. त्याचा स्वभाव कसा आहे माहीत नाही. त्यामुळे मी यावर टिप्पणी करणे योग्य नाही. पण लेखनावरून आणि प्रतिसाद वगैरेंवरून मला तरी असं वाटतं की तो एक मनमौजी मनमोकळा तरुण आहे. थोडा लहान आहे, आणि मला वाटतं तो स्वतःदेखील हे मान्य करत असावा, त्यालादेखील (अकाली) प्रौढ व्हायची हौस नसावी. तो माझा तर मनोमन मित्रच झाला आहे. चेष्टा करायची आवड आहे त्याला. करुदे की. कुठे विखार मला तरी दिसलेला नाही. त्यानं संपादक मंडळाची जी काही चेष्टा केलेली आहे, त्याने मी तरी भरपूर हसलेलो आहे. माझ्या मनातून कुणी संपादक टारझन किंवा अवलिया यांच्या चेष्टेमुळे उतरलेला नाही. हे कंटेम्प्ट वगैरे कन्सेप्ट वारंवार वापरुन आजकाल न्यायालयं स्वतःचं हसू करुन घ्यायला लागलेली आहेत. त्या धर्तीवरचा हा निर्णय वाटला. या माझ्या टिप्पणीतही काही ''कंटेम्प्ट ऑफ संपादक मंडळ'' वाटला तर (फक्त) खेद आहे. आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments
म
मनिष Sat, 07/10/2010 - 08:53 नवीन
लेखनावरून आणि प्रतिसाद वगैरेंवरून मला तरी असं वाटतं की तो एक मनमौजी मनमोकळा तरुण आहे. थोडा लहान आहे, आणि मला वाटतं तो स्वतःदेखील हे मान्य करत असावा, त्यालादेखील (अकाली) प्रौढ व्हायची हौस नसावी. तो माझा तर मनोमन मित्रच झाला आहे. चेष्टा करायची आवड आहे त्याला. करुदे की. कुठे विखार मला तरी दिसलेला नाही. त्यानं संपादक मंडळाची जी काही चेष्टा केलेली आहे, त्याने मी तरी भरपूर हसलेलो आहे. माझ्या मनातून कुणी संपादक टारझन किंवा अवलिया यांच्या चेष्टेमुळे उतरलेला नाही. हे कंटेम्प्ट वगैरे कन्सेप्ट वारंवार वापरुन आजकाल न्यायालयं स्वतःचं हसू करुन घ्यायला लागलेली आहेत. त्या धर्तीवरचा हा निर्णय वाटला.
या माझ्या टिप्पणीतही काही ''कंटेम्प्ट ऑफ संपादक मंडळ'' वाटला तर (फक्त) खेद आहे. शब्दशः सहमत! फक्त मी टारझन ला ओळखतो आणि तो माझा मित्र आहे. बाकी दुसर्‍या सदस्याबाबत 'नो कॉमेंटस"!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
य
यशोधरा Sat, 07/10/2010 - 10:43 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
स
स्मिता चावरे Sat, 07/10/2010 - 08:49 नवीन
असेच वाटते. आळश्यांचा राजा यांच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/10/2010 - 09:17 नवीन
वरच्या यादीत माझंही नाव पाहून आश्चर्य आणि आनंद झाला. सविताताई, आपण कोणीही २४ तास मिपावर असतोच असं नाही. अनेकदा संपादकांनी संपादन करून झाल्यावरच आपण धागे उघडतो. त्यामुळे कोणी चिमटे घेतले आहेत आणि कोणी हाणामारी केली आहे हे प्रत्येक वेळेस आपल्याला कळेलच असं नाही. काहीवेळा काही, विशेषत: संपादकांच्या, खरडवह्या उघडल्या की अनेक तक्रारीही दिसतात. हे प्रतिसाद मुख्य धाग्यांवरून गायब झालेले दिसतात. मला व्यक्तीशः असे प्रतिसाद उडाल्याचा आनंद होतो आणि कोणीतरी असं काही लिहील्याचं वाईटही वाटतं. हे असे हीन पातळीवरचे प्रतिसाद आणि लेखन न आलेलंच बरं; पण असं होताना दिसत नाही. संपादकांना वारंवार एकाच माणसाचे, आयडीचे प्रतिसाद वारंवार उडवावे, संपादित करावे लागणं संपादक आणि संकेतस्थळाच्या दृष्टीने कितपत योग्य आहे? खट्याळपणा, चिमटे काढणे हे प्रकार अजूनही सुरू आहेत आणि सुरू रहातील याची मला खात्री आहे. पण त्याचं हाणामारीत रूपांतर होऊ न देणं हे आपल्याच हातात असतं. खोडकरपणा आणि खोड्या काढणं यातला फरक समजला नाही तर संपादकांना छडी हातात घ्यावीच लागणार आणि ती वेळ त्यांच्यावर येऊ न देणं ही सदस्य म्हणून आपलीच जबाबदारी आहे. अनेक संपादकांना आणि टार्‍यालाही मी व्यक्तीश: ओळखते. संपादकांच्या समजूतदारपणा आणि सहनशक्तीवर माझा संपूर्ण विश्वास आहे. आणि ही टोकाची गोष्ट संपादकांनी संपूर्ण संवाद आणि विचारांती केली असेल याची मला खात्री आहे. टार्‍या चांगलं लिहू शकतो, त्याची तेवढी कुवत आहे आणि त्याने चांगलं लिहीत रहावं. आंतरजालाच्याच भाषेतच तो स्वतःचा खोडकरपणा न विसरता लवकर "मोठा होऊन" पुन्हा मिपावर दिसेल अशी अपेक्षा. अदिती (हे सर्व माझे स्वतःचे विचार आहेत, मिपाचे धोरण नाही.)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 07/10/2010 - 09:24 नवीन
टार्‍या चांगलं लिहू शकतो, त्याची तेवढी कुवत आहे आणि त्याने चांगलं लिहीत रहावं. आंतरजालाच्याच भाषेतच तो स्वतःचा खोडकरपणा न विसरता लवकर "मोठा होऊन" पुन्हा मिपावर दिसेल अशी अपेक्षा.
शब्दाशब्दाशी सहमत. पुढे जाउन असे म्हणीन की संपादक मंडळाने मोठ्या भावाप्रमाणे न्याय करुन लहान टारु भावाला अजुन एक संधी पुन्हा द्यावी. बर्‍याचदा टार्‍या थोडेसे दुखावणारे / खटकणारे लिहितो, हे अगदी मान्य आहे. पण त्याला प्रत्येक गोष्ट अथवा त्याच्याशी संबंधीत प्रतिक्रीया सहजपणे विनोदाने घ्यायची सवय आहे, तशीच सवय इतरांना सुद्धा असतेच असे नाही आणि टार्‍या थोडासा इथेच चुकतो. त्याच्या सगळ्याच प्रतिक्रीया विनोदाने घेतल्या जात नाहीत आणि मग टार्‍या युद्धाला उतरतो ;) पण एकदा मान्यवर सदस्यांनी टार्‍याचे 'बौद्धीक' घ्यावे व त्याला मिपावर पुन्हा प्रवेश द्यावा अशी विनंती. टार्‍या-पर्‍या आघाडीवाला ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
परिकथेतील राजकुमार Sat, 07/10/2010 - 09:25 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
नावातकायआहे Sat, 07/10/2010 - 09:23 नवीन
मिसळ पावात्लि तर्रि आन कान्दा गेला तर काय नुस्ता फरसान आन पाव खायचा का काय? ~X(
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 07/10/2010 - 09:26 नवीन
अरेरे वाईट वाटलं. तत्कालिक कारण कळलं नाहि. असो, संस्थळ सार्वजनिक नाहि ते खासगी आहे तेव्हा चालु द्या ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
  • Log in or register to post comments
आ
आण्णा चिंबोरी Sat, 07/10/2010 - 09:42 नवीन
वाईट वाटले. या निमित्ताने जेम्स लेन प्रकरणाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 07/10/2010 - 10:33 नवीन
संपादक मंडळाने हा निर्णय विचारपुर्वकच घेतला असेल याची मला खात्री आहे. संपादकांचा असा निर्णय घेण्याचा अधिकार पुर्ण पणे मान्य असुन सुध्दा त्यांना एक विनंती करावीशी वाटते "टार्‍याला परत आणा" टार्‍याच्या खोडसाळ पणा मुळे अनेकांची मने कदाचीत दुखावली गेली असतील. पण आपल्या घरातल्या व्रात्य मुलाला आपण काही घरा बाहेर काढत नाही. फारतर त्याच्या पाठीत एखादा धपाटा घालतो. फार तर थोडावेळ घराबाहेर उभा करतो आणि परत घरात घेतोच. संपादक मंडळींना विनंती आहे की टार्‍या साठी मिपाचे दरवाजे कायमचे बंद करु नयेत. आमचा मित्र नाठाळ असला तरी मनाचा फार चांगला आहे. तरुणाईच्या जोशात तो जर काही वेडा वाकडा वागला असेल तरी संपादक मंडळाने वडीलकीच्या नात्याने त्याला माफ करावे अशी कळकळीची विनंती. पैजारबुवा, _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Sat, 07/10/2010 - 10:38 नवीन
असेच म्हणतो. . . . . भावश्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
भ
भोचक Sat, 07/10/2010 - 11:57 नवीन
सहमत. टार्‍या गमती जमती करतो, क्वचित प्रसंगी त्या 'टोचतातही'. पण तरीही मनाने तो काही 'विखारी' नाही. संपादकांनी योग्य तो निर्णय घेतला असला तरी शिक्षा टोकाची होऊ नये. 'सुबह का भुला शाम को घर आए तो उसे भुला नहीं कहते' या थाटात त्याला 'घरात घ्यावे'. (भोचक) जाणे अज मी अजर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सागर Sat, 07/10/2010 - 13:53 नवीन
मी ही वैयक्तिकरित्या टार्‍याला ओळखत नाही. पण माझेही मत इतर सर्व टारझनप्रेमींसारखेच आहे. त्याला माफ करुन सदस्यत्व बहाल करण्यात यावे. मिसळपावच्या तर्रीला चव बहाल करणार्‍या सदस्यांवर बंदी घालणे वगैरे प्रकार वापरले जाऊ नयेत. आज टार्‍या उद्या नाना..असे व्हायला लागले तर कसे होणार? अनेकांनी वर प्रतिसाद दिले आहेत की मिसळपाव वर येण्याच्या मागे टार्‍याचे लेखन हे देखील आहे. बंदी हा काही उपाय नाही. त्यापेक्षा संपादक समितीला विनंती की त्यांनी आक्षेपार्ह गोष्टी कोणत्या ते टार्‍याला नीट सांगावे. (मिसळपावप्रेमी) - सागर (अवांतर खुलासा : नानांचे नाव वर एकदा आले असल्यामुळे मी फक्त उदाहरणादाखल घेतले आहे. संपादक समितीबद्दलचा आदर राखून एक हितचिंतक म्हणून मी हे लिहिले आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक
ह
हापुस आम्बा Sat, 07/10/2010 - 12:58 नवीन
नमस्कार मराथित बरोबर लिहिता येत नाहि ............ प्लिज तार्झनला परत बोलवा....... तार्झन्शिवाय मिसलिचि मज्जा न्हाइ.........
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Sat, 07/10/2010 - 13:12 नवीन
मीप्ण हापुसाम्ब्याशी श्म्त अह. तार्झनशिवाय मिस्ल्पाव अल्नी आह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हापुस आम्बा
अ
अर्धवट Sat, 07/10/2010 - 13:24 नवीन
आयला.. बोलवा रे परत एकदा त्याला.. (हे लिहुन आम्ही भविष्यातील एखाद्या टसलपाव कींवा टारबोली वरचं संपादकपद पदरात पाडुन घेतलं आहे.. नोंद असावी..) (चाणाक्ष) अर्धवट
  • Log in or register to post comments
क
कवटी Sat, 07/10/2010 - 13:53 नवीन
इतक्या लोकानी टार्‍याला प्रथम पसंतीचे मत दिले आहे... त्याला दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त मते मिळत असल्याने मी अता माझे प्रतम पसंतीचे मत ||विकास|| यांच्या पारड्यात टाकत आहे. त्यांची मिपा विषयीची कळकळ बर्‍याच लोकाना लिहिलेल्या खरडीत जाणवते. त्यामुळे ||विकास|| ला परत आणाच. आणि निदान इथून पुढेतरी सर्वांना समान नियम लावा. एकाने लिहिले तर तिकडे काणाडोळा आणि दुसर्‍याच्या पाठीत बडगा असे नको.... शिवाय होतय अस की आयडी ब्लोक झाल्याची बोम्बाबोम्ब करायची... ब्लॉकझालेल्याने फुकटात भरपूर प्रसिद्धी मिळवायची आणि मग काही दिवसाने विजयी वीरासारखे परतायचे. इथल्या चेल्यांनी वेलकमबॅक चे होर्डिंग सगळी कडे लावायचे .... आणि परत काही दिवसातच येरे मझ्या मागल्या..... अर्थात हे टारू आणि विकास संदर्भात नाही. त्यांच्या बाबतीत संपादक मंडळ योग्य तोच निर्णय घेतील या विषयी खात्री वाटते. कवटी
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 07/10/2010 - 14:55 नवीन
टारगट आणि ||विकास|| यांना परत आणावे. कारण? कारण सामाजीक आहे. बहिष्कार घालून व्यक्ती सुधरत नाहीत तर शिक्षेने, सल्ल्याने, प्रेमाने सुधरतात. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा