कलादालन
कांदा,मुळा,भाजी...
Primary tabs
पूर्वी लहान असताना परीक्षा आणि अभ्यास या मुळे नको वाटणार्या मार्चची मी इथे आल्यापासून आतुरतेने वाट बघते. मार्च उजाडला की गार्डन सेंटर च्या फेर्या सुरू होतात. टॉप सॉईल, कंपोस्ट, बियाणं सगळ्याची खरेदी होते. छोटी-मोठी अवजार बाहेर येतात. भरपूर ऊन येणार्या खिडक्यांसमोर सीड स्टार्टर चे ट्रे मांडले जातात. हळू हळू त्यात छोटी रोपं तयार होतात. काही जगतात, काही कोमेजून जातात. बाहेर जमीनीची मशागत केली जाते. तिथेही बी पेरले जाते. तयार केलेली रोप जमिनीत लावली जातात. हळू हळू माझा वेजी पॅच आकाराला येतो. मुख्य म्हणजे या सगळ्यात नवरा उत्साहाने सामिल होतो.
तर मंडळी हे आहेत माझ्या भाजीच्या वाफ्याचे काही फोटो.
पालक
बेसिल
मेथी
स्वीस चार्ड
Yellow Squash
चेरी टोमॅटो
मी आत्ताच बागेतल्या दोन भोपळ्या मिरच्या खुडल्या. :)
मी ही भाज्या लावते.
या वेळेस, टॉमेटो, भोपळी मिरची, वांगी, दुधी भोपळा आणि इंग्लीश काकडी (ही साध्या काकडीपेक्षा महाग असते म्हणून या वेळेस स्वतःच उगवावी असे ठरवले.)
मीही काहीबाही लावत असते पण यावर्षी अजिबात मूड नव्हता!
मागच्या वर्षी छोटे लाल मुळे, टोमॅटो, कोथिंबीर लावले होते.
तरी सध्या बेसिल लावले आहे. तुमच्या बागेचे फोटो छान आलेत.
यलो स्क्वाश आणि पालक जास्त आवडले. मेथीचा फोटू दिसत नाहिये पण सगळ्यांची आवडती भाजी.
रेवती
प्रियाली, तुम्हाला दुधीचं बी कुठे मिळालं?
रेवती, दुरुस्ती केलेय. धन्यवाद. माझा कोथिंबीर आणि ब्रोकोलीचा प्रयोग फसला.
दुधी, कारली, शिराळी यांच्या बिया भारतातून मागवाव्या लागतात. मी मागवल्या नव्हत्या. एका मित्रांनी मला त्या दिल्या. ;)
मी कारली आणि शिराळी लावली नाहीत. सर्वांच्याच वेली होतात आणि भयंकर फोफावत जातात म्हणून या वर्षी दुधी आणि काकडीच लावली.
इंडियानाच्या मातीत कोथिंबीर धड उगवत नाही असा माझाही अनुभव आहे.
बिया वगैरे विमानातुन आणायची परवानगी नसते ना?
-Nile
मी तरी बिया आणलेल्या नाहीत पण ज्यांनी मला दिल्या त्यांच्याकडे इथे मिळतात तशीच बियांची पाकीटे होती. त्यांनी सांगितले की ते स्वतः आणतात आणि मागवतातही.
पाकीटबंद बिया वगैरे चालतात का याची विशेष माहिती नाही.
मीपण टॉमेटो, भोपळी मिरची, भेंडी, मिरची, काकडी लावलेत. पालकासाठी काय लावलस? बी असत का ग?
पालकाचं बी असतं. मी बेबी स्पिनॅच लावते.
मेथीचं बी कुठे मिळालं? मी मागे एकदा पालक लावला होता पण कीड लागली त्याला :-(
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
मस्त मस्त मस्त..
मी आत्ताच बीटाचं पीक ( १० -१२ ) काढलं....स्ट्रॉबेरी संपल्या. आता टोमॅटो, सफरचंद आणि भोपळ्याची वाट पहातेय.....
पुष्करिणी
स्वाती मस्तच ग. खुप छान दिसताहेत भाज्या. मीही आमच्याकडे भेंडी, गवार, शिराळी, घोसाळि, लालमाठ, काकडी लावली आहे.
स्वाती ताईच्या फार्म(व्हीले)चे फोटो जबरा!!!!!!!
महीला शेतकरी संघटना आहे की इथे :-)
फटु मस्तच. एक बागकाम/ शेती विभाग निघणार मिपावर लवकरच!
ताजीताजी भाजी काय मस्त दिसतेय! B)
(सावता)चतुरंग
मस्तं. मला खरोखरची शेती करायची ईच्छा आहे. पण जमिनीचे भाव आभाळाला भिडलेत आणि शेतकरी पण शेतीसाठी जमिन विकण्यापेक्षा काम्प्लेक (रेसिडेंशियल कॉम्प्लेक्स) साठी जमिनी विकण्याला प्राधान्य देत आहेत. :(
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
सह्ही!!! खरंच खूप छान दिसतायत फोटो...मस्त आहे फार्म
मेथी आणि टोमॅटोचे तर मस्तच :)
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
- अस्मिता
फोटो मस्तच आहेत. पण हे 'स्वीस चार्ड' काय असतं, त्याची एखादी पाकृ टाकाल का?
अदिती
@शिल्पा ब
ग्रोसरी स्टोअर मधे मिळते तेच मेथीचे दाणे विंडो बॉक्स मधे पेरले.
@अदिती
स्वीस चार्डची आपल्या लाल माठासारखी भाजी होते. कढईत लसूण-मिरची फोडणीत टाकायची आणि भाजी परतून घ्यायची. एक वाफ आली की मीठ घालायचे. बस्स.
@प्रियाली,लवंगी,पुष्करणी, जागू
फोटू टाका ग सख्यानो
क्या केहेने...!
एक दिस या धाग्याचे मुखपृष्ठ नक्कीच बनणार..
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी..
चित्रसौजन्य या धाग्याचे, आणि निरुपक अर्थातच तात्या अभ्यंकर असतील.. :)
फारच सुरेख चित्र..!
तात्या.