भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत.. हिंदू धर्मातील अडगळ..
💬 प्रतिसाद
(56)
अ
अविनाशकुलकर्णी
Wed, 07/14/2010 - 17:09
नवीन
'कृष्ण हा सामान्य ड्रायव्हर होता
तो श्री नेमादे यांच्या कडे काम करीत होता
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 07/14/2010 - 18:28
नवीन
हे नेमाडे प्रकरण काय आहे मला माहित नाहि. पण एक गोष्ट राहुन राहुन खटकते... आपलेच दात आपल्याच ओठांना का चावताहेत ?? भारत स्वतंत्र होउन ६० + वर्षे झालित. आपल्या हाति सत्ता आलि. पण अजुनहि मूळ समस्या तिच. आपल्याच धर्मबांधवांमध्ये हा बेबनाव का?? किंबहुना इतर धर्मबांधवांशी देखिल वैर का ? अखील भारतीय स्तरावर ज्या समस्या आहेत, त्या धर्म, जात, प्रदेश न विचारता सर्वांना समान त्रास देताहेत. हे ढळ्ढळीत सत्य सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसत असताना तिकडे अक्षम्य डोळेझाक का होतेय ? कृष्ण ड्रायव्हर होता कि राम विष्णूअवतार होता, शिवाजीचा गुरू कोण होता, फुल्यांचा ब्राह्मण्द्वेष किती ग्राह्य आहे, आर्य बाहेरुन आले कि तेच मूळ भारतीय होते... हे ज्याचे त्याचे संशोधन त्याने करावे... कोणाला पटत नसेल तर त्याने मुद्दे खोडुन काढावेत... आणि दोघांनी मिळून शेती-संगणक-कारखाने चालवावेत. द्वेष, नींदा, राग डोक्यात घालुन आपण आपलाच वेळ आणि शक्ती वाया घालवतोय... सामाजीक शांती बिघडवुन कोणिच सुखी होणार नाहि हि साधी कॉमनसेन्सची गोष्ट का लक्षात येत नाहि आपल्या ?? (कि हेच उत्तर आहे या प्रश्नाच ?? कॉमन सेन्स इज नॉट दॅट कॉमन...)
(सचींत) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 07/15/2010 - 07:09
नवीन
हे सगळे 'काळे इंग्रज' आहेत,
आपापसात भांडणे लावून सत्ता गाजवणारे.
इतिहास काहिही असो, अत्ता या क्षणी 'आपण सगळे भारतीय आहोत' , ही भावना हर्वून गेली आहे.
सगळे राज्कारणी सतत जातीचे/ धर्माचे राजकारण करतात आणी आपण 'सामान्य' असल्यामुळे बळी पडतो!
लेखकांचे नुसतेच लेखक होउन भागत नाही, त्यान 'विचार्वंत. संशोधक' वगरै व्हायचे असते, मिडीयावाल्याना सन्सनाटी हवी असते, राज्कारण्याना मसिहा व्हायाचे असते,
...आपण त्यान्च्या सर्व इच्छा भांडून भांडून पूर्ण करतो!
आता ही कुरापत काढण्यामागचा नेमाड्यांचा उद्देश अजून तरी कळला नाही.
============
माउ
- Log in or register to post comments
उ
उल्हास
गुरुवार, 07/15/2010 - 06:19
नवीन
????
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Fri, 08/26/2011 - 10:15
नवीन
भालचंद्र नेमाडेंची कोसला, बिढार, जरीला, झूल ही पुस्तके वेगवेगळ्या वयात अनेकदा वाचली, दर वेळी आवडली.
टीकास्वयंवरही आवडले.
येणार येणार म्हणून अनेक वर्षे गाजत असलेली 'हिंदु' - जगण्याची समृद्ध अडगळ - प्रसिद्ध झाल्याचे समजले, पण दिल्लीत रहात असल्याने मिळण्याची शक्यता नव्हती. पण अचानक दिसले, घेतले आणि पाच-सात दिवसात सलगपणे वाचून काढले.
का कुणास ठाऊक, पहिली पन्नासेक पाने जरा कंटाळवाणी वाटली, पण नंतर मात्र अगदी अखंड आवडले.
'एक समृद्ध अडगळ' यातील 'समृद्ध' कडे दुर्लक्ष करून 'अडगळ' वरच या धाग्यात रोख का, हे समजले नाही.
समग्र ग्रंथ पाहिल्याविण (वाचल्याविण)
उगाच ठेवी जो दूषण
मनुष्य नव्हे पाषाण
मनुष्यवेषे ... असं समर्थ सांगून गेलेत.
थोडक्यात, आधी स्वतः पूर्ण वाचावे, मग बरे वाईट काय ते बोलावे, हे बरे. वाचल्यावर आवडावे अथवा नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मामला.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 08/26/2011 - 21:50
नवीन
.
अर्धवटराव
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2