कलादालन
कोरीगड
Primary tabs
नमस्कार मंडळी,
थोडा का होइना, पाऊस झाल्यामुळे आम्ही कोरीगड किंवा कोराईगड येथे नुकतेच जाऊन आलो.
तिथली काही छायाचित्रे येथे डकवत आहे.
लोणावळ्याच्या पुढे अॅंबी व्हॅलीला जो रस्ता जातो त्या रस्त्याने जात राहिले की पेठ शहापूर हे गाव लागते. तेच पायथ्याचे गाव आहे.गड चढायला अगदीच किरकोळ आहे. आम्ही २० मिनिटात वर पोचलो देखील...
जाताना कणीस पाहिलं आणि राहवतंय काय?
गडाचा दरवाजा
तग धरुन राहिलेली तटबंदी
हिरवाई...
गवताळ उतार..
वळसेदार तटबंदी
असाच एक फोटो..
स्वर्गसुख...
एकटेच निष्पर्ण झाड...
उत्साह...
अंतर्मुख करणारे काही क्षण...अशा क्षणांसाठी भटकायला हवंच...नाही का?

सुंदर!
शेवटचा फोटो खूपच आवडला.
५ वा व शेवटचा फोटो विशेष भावला..
शेवटचे २ फोटो खुपच सुंदर
असेच म्हणतो. :)
शॉल्लिट!
सर्व छायाचित्रे उत्कृष्ट आहेत.... मी एकदा सहारा अँबी व्हॅलीला भेट दीली होती, त्यावेळेस येथे देखिल गेलो होतो खुपच छान आहे......
आज का डोळ्यात माझ्या, पाणी पुन्हा दाटले होते...

कासाविस या व्याकुळ आत्म्यात, आभाळ भरून साठले होते...
पण... पंख पिंजर्यातच अडकलेले होते..........
सुरेख आहेत फोटो.
सुंदर फोटो. सुंदर निसर्ग
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
एक लंबर रे भावा!!
निसर्गाचे पावसाळी रूप, गवताचा हिरवागार रंग, दाटून आलेले आभाळ.... सगळेच छान! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
खल्लास!
संपलो रे.....
हे लाव्हारसाचे कठीण कातळ आणी त्यावरची नाजुक हिरवाई....सालं आपलं तर काळीजच गहाण पडलंय उभ्या सह्याद्रीच्या पायाशी!
कविता बरं ही धम्या...
हे लाव्हारसाचे कठीण कातळ
त्यावर नाजुक हिरवाई....
गहाण पडलंय काळीज आपलं
सह्यकड्यांच्या पायाशी!
या कवितेबद्दल तुला अमृतासमान सुधारसाची वाटी बक्षीस
आता मला मानसशास्त्राच्या प्राध्यापिकाबाईंकडे समुपदेशनाला जावं लागणार असं दिसतंय!
>>या कवितेबद्दल तुला अमृतासमान सुधारसाची वाटी बक्षीस
ठ्ठ्ठो!!!!! बेक्कार फुटलो... (आणि जल्ला ती सुधारसाची वाटी सांडली ना...)
सगळे फोटो भारी आहेत पण ह्या लाईनीने जीव घेतला. ;-)
उत्कृष्ट फोटो. मस्तच होत की वातावरण.
अवांतर :- भडकमकर गुर्जी ही कविता पूर्ण असेल तर द्या की !
मस्त फोटोज,
--टुकुल
लई झ्याक फोटू. २० मिनिटांत चढलास म्हणजे एकदमच "रेंज" मधला आहे रे! जायलाच पाहिजे.
(सिंहगड चढायला ८० मिनिटं घेणारा)
जे पी
मस्तच.