Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जेम्स लेनच्या निमित्ताने उघडी पडणारी मराठी वैचारिक दिवाळखोरी

च
चिंतातुर जंतू
Wed, 07/14/2010 - 22:27
🗣 83 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
52393 वाचन

💬 प्रतिसाद (83)
अ
अनिवासि Wed, 07/14/2010 - 22:46 नवीन
अतीशय विचारपुर्वक लेख. सहमत. satanic verses वर झालेल्या प्रतिक्रियेच्या वेळी त्या समाजाला अतीरेकी/अशिक्षीत म्हणुन नावे ठेवली आणि आता आपणही तेच करत आहोत असे मला वाटत होते. ह्या मुद्देसुत लेखाने बराच प्रकाश पडला. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 07/16/2010 - 12:59 नवीन
सर्वप्रथम , एक डिस्क्लेमर : माझा हा प्रतिसाद अनिवासी यांना उद्देशून नाही. मला दुसर्‍यापानावर जायला आवडत नाही म्हणून येथे लिहितो आहे. प्रस्तुत धाग्याच्या निमित्ताने अभिव्यक्तीस्वातंत्र्य, कलावंत/लेखकांना मोकळा श्वास मिळण्याकरताचे वातावरण आदि गोष्टींचा परामर्श घेतला जातो आहे हे उत्तमच. मात्र या निमित्ताने, ज्या लोकांची प्रतिमा गोलायाथ विरुद्ध उभ्या असलेल्या डेव्हिड्ची असते त्यांच्यातले काही मानवी गुणदोषही जाणून घेणे उद्बोधक ठरू शकते. जेम्स लेनच्या प्रकरणी त्यांनी मजकूर काढून घेतला, त्याच्या प्रकाशनानेही ही तयारी दाखवली हे सारे एकवेळ समजून घेण्यासारखेच आहे. शेवटी जीव वाचवायला हे करणे आवश्यक ठरते. (सॉक्रेटीसच्या वीरमरणाचे दाखले देऊन आजकालच्या साहित्यिकांना भ्याड ठरवणे अर्थातच शक्य आहे. ) मात्र काही व्यक्तींच्या संदर्भात हे प्रश्न निश्चितच जास्त गुंतागुंतीचे होतात. एका व्यक्तीचे उदाहरण घेऊन हे स्पष्ट करता येईल. ही व्यक्ती कार्यरत आहे , मुख्य म्हणजे अशा व्यवसायात आहे ज्यात अब्रूनुकसानीचे दावे ही क्षुल्लक बाब ठरावी ; त्यामुळे नाव न घेताच (भ्याडपणे) लिहितो. ऐंशीच्या उत्तरार्धात , नव्वदीच्या दशकात ही व्यक्ती तिच्या सायंदैनिकामुळे प्रकाशात आली. महाराष्ट्रातल्या उजव्या शक्तींच्या विधानसभेपर्यंतच्या घोडदौडीच्या यशाचा काळ. आता सत्तेबाहेर पडलेल्या आणि जनाधार हरवलेल्या या उजव्या शक्ती त्यावेळी जोरात होत्या. या काळात त्या शक्तींविरुद्ध दंड थोपटून त्यांच्या गल्लीमधे त्यांना आवाज देण्याची हिंमत दाखवल्याने , प्रस्तुत सायंदैनिकचालक सार्‍या प्रागतिक लोकांच्या आदराचे स्थान बनले होते. आजचे सत्य असे आहे की हे सायंदैनिक काही कोटींना विकले गेले आहे. विकत घेणारा घटक त्याच उजव्या शक्तींपैकी एकाची फिनान्शिअल विंग. सायंदैनिक संपलेलेच आहे. पण त्याबरोबरच या नव्वद-दशक-कालीन प्रकाशमान व्यक्तीचे रेप्युटेशनही. गेल्या दशकभरात वृत्तपत्रीय वर्तुळात या व्यक्तीच्या (गैरहजर असलेल्या ) अर्थशुचितेबद्दल उघडउघड चर्चा आहे. मुद्दा इतकाच आहे, की वेगळा विचार मांडणार्‍या , प्रसंगी एस्टॅब्लिशमेंट शी दोन हात करणार्‍या घटकांनाही शेवटी मानवी बाजूही असतेच. अंगणात गोलायाथ समोर उभा असलेला डेव्हिड परसात " दिज आर द हॉलो मेन, दिज आर द स्टफ्ड मेन" चे उदाहरण ठरू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिवासि
स
सुनील Fri, 07/16/2010 - 13:17 नवीन
वागळे की दुनिया! चालायचच!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
क
क्रेमर Fri, 07/16/2010 - 13:29 नवीन
दीर्घकाळानंतर ठामपणे घेतलेल्या भुमिकांमधील चूका ध्यानात येतात. लोक बदलतात. हा लेनची माफी व अभ्यासकांचा भ्याडपणा या (अल्पकालीन) गोष्टींपेक्षा वेगळा मुद्दा आहे. _________________ बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Fri, 07/16/2010 - 13:33 नवीन
क्रेमर यांच्या विधानाशी असहमती. माझ्या पोस्ट मधे मी दोन्ही बाबतीत या संदर्भात साम्य आहे असे म्हण्टलेले नाही. "एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध दोन हात करणार्‍यांची मानवी बाजू" या संदर्भात दोन्ही गोष्टींकडे पाहण्याचा प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
क
क्रेमर Fri, 07/16/2010 - 13:36 नवीन
माझ्या पोस्ट मधे मी दोन्ही बाबतीत या संदर्भात साम्य आहे असे म्हण्टलेले नाही.
तसे असल्यास प्रस्तुत चर्चेत 'एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध दोन हात करणार्‍यांची मानवी बाजू' याविषयीचे भाष्य अप्रस्तुत आहे. _________________ बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Fri, 07/16/2010 - 13:38 नवीन
जरूर सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
क
क्रेमर Fri, 07/16/2010 - 13:44 नवीन
येथे लेन्सचे पुस्तक, उडालेला धुरळा, महापुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाचा सांगोपांग अभ्यास, त्याचे सामाजिक परिणाम, धुरळ्यामागील राजकारण, सजाण नागरिकांनी वैचारिक दमनास विरोध करण्याची गरज याबाबत आहे. एका व्यक्तिने त्याच्या/ तिच्या जीवनात भुमिकाबदल करण्याबद्दल नाही. _________________ बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Fri, 07/16/2010 - 13:47 नवीन
म्हणजे अवांतर म्हणून घेतलेल्या बँडविड्थ चा नवा शब्द अप्रस्तुत आहे तर ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
क
क्रेमर Fri, 07/16/2010 - 21:34 नवीन
हे जे कोण डाव्या बाजूचे पत्रकार होते यांच्यावर आधी (शारिरिक) हल्ला करणारी माकडे अजुनही त्यांच्यावर हल्ला करत असतात हे खरे आहे काय? (पत्रकाराचे नाव स्पष्टपणे लिहिलेले नसल्यामुळे संदिग्धता आहे.) तसे असल्यास या पत्रकाराचे उदाहरण देणे अप्रस्तुत नाही. वैचारीक दडपशाहीवरून समाजाची परिपक्वता जोखणार्‍या धाग्यावर मिपावर पुर्वी झालेल्या या चर्चेला लिंकवण्याचा मोह आवरत नाही. यासंदर्भात आणखी एक उद्बोधक चर्चा. _________________ बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
आ
आमोद शिंदे Tue, 07/20/2010 - 22:30 नवीन
दोन्ही लिंक्स एकच चर्चा दाखवत आहेत. दुसरी चर्चा कोणती ते कळेल काय? आमोद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
क
क्रेमर Tue, 07/20/2010 - 22:56 नवीन
धन्यवाद. दुसर्‍या चर्चेचा दुवा धागा वर आलाच आहे तर ही घ्या आणखी एक तशीच चर्चा. _________________ बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
आ
आमोद शिंदे Tue, 07/20/2010 - 23:00 नवीन
आभारी आहे. आता दुसरी चर्चाही वाचतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
व
वेताळ Fri, 07/16/2010 - 13:50 नवीन
वरील आपल्या लेखात आपण सुशिक्षित लोक विचार करत नाहीत. त्याची विचार करण्याची शक्ती संपली आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न प्रमाणापेक्षा जास्त यशस्वी झाला आहे. आपल्याला हवे ते विचार,निष्कर्ष लोकाच्या गळी उतरवण्यात आपण यशस्वी झाला आहात.जेवढे मुद्दे तुम्हाला सोपस्कार वाटतात तेव्हढ्याचा परामर्श तुम्ही घेतलात व जे मुद्दे विचारात घ्यायला हवे होते त्या कडे पुर्णपणे डोळेझाक केली आहे. पहिला मुद्दा रामायण किंवा शंकुतला-दुष्यत ही भारतातील दंतकथा आहेत. पण शिवाजी महाराज व त्याचा इतिहास ही दंतकथा नसुन ते एक सत्य आहे.ज्याचे पुरावे आज ही उपलब्द आहेत. पुढे तुम्ही म्हणता कि अशा प्रकारे कालसापेक्ष, समाजसापेक्ष विश्लेषण करण्यासाठी लोककथांचा वापर करणं ही इतिहास संशोधनातली एक रूढ पद्धत आहे. हीच पध्दत लेन शिवाजीच्या आजूबाजूला निर्माण झालेल्या मिथकांना लावतो. माझे आतापर्यतचे आयुष्य महाराष्ट्रात गेले,माझे वडील त्याचे वडील अश्या कितीतरी पिढ्या इथे महाराष्ट्रात आहेत किंवा होवुन गेल्या. परंतु लेन किंवा त्याचे समर्थन करणारे जी लोककथा किंवा ईनोद आमच्या कोणत्याच पिढीने कधी एकला किंवा वाचला नव्हता मग अचानक लेन सारख्या माणसाला तो पुण्यात वास्तव्यास असताना कसा काय बर वाचता किंवा एकता आला?का तो फक्त त्यालाच सांगण्यासाठी बनवला गेला? ह्यावर तुम्ही का प्रकाश टाकत नाही.मग असले बिनबुडाचे लिखाण कशाबद्दल खपवुन घ्यायचे?जी कधीच दंतकथा किंवा लोककथा म्हणुन महाराष्ट्रात कधी सांगितली गेली नाही ती कशाबद्दल खपुन घ्यावी? व खोटी गोष्ट स्विकारली म्हणजे वैचारिक उन्नती कोणाची होणार आहे? एका ठिकाणी तर तुम्ही खरे गुन्हेगार कोण आहात हे सांगत असताना त्याना त्याची शिक्षा न मिळता उलट त्याचा जयजयकार करण्यास सांगत आहात. पण पुण्यात ब्राह्मणी वातावरणात वाढलेल्या लोकांना कधीतरी असं काहीतरी कानावर येतं. उदा: दत्तो वामन पोतदार यांच्या हे (म्हणजे शिवाजीच्या पितृत्वाविषयीची कथित बाब) लक्षात आलं पण त्यांनी त्याची जाहीर वाच्यता कधी केली नाही असं माझ्या स्वत:च्या कानावर आलं होतं. मग हे सगळ पुण्यात घडले असे सांगता. मग लेनला ह्या सर्व मिथकाची माहिती पुण्यात व ज्याठिकाणी तो संदर्भ घेत होता त्या संस्थेतच माहित झाला असावा. मग हे सगळे त्याला सांगणारे कोण लोक ह्याचा शोध खरतर घेतला गेला पाहिजे. मुळातच लेनच्या लिखाणाला कुठेही लिखित किंवा दंतकथेचा आधार नाही. ही गोष्ट अगदी जाणिवपुर्वक बनवुन ती लेन कडुन लिहुन घेतली आहे.कारण महाराष्ट्रात एका राजाच्या पंतप्रधान घराबद्दल दंतकथा प्रसिध्द आहे. त्याचा रोष महाराजांवर दंतकथा पसरवुन तरी कोणी घेत नाही का ह्याचा शोध घेतला गेला पाहिजे. अशी जर एकादी दंतकथा असती तर तिच्याबद्दल लिखाण इतरत्र तरी झाले असते.मुघल किंवा इतर मुस्लिम शासक महाराजाचे मोट्ठे शत्रु होते त्याच्या लिखाणात तरी अशी गोष्ट आली पाहिजे होती.किंवा एकाद्या बखरीत किंवा इतिहासकालीन पत्रात तसा उल्लेख हवा होता. म.फुले देखिल एक इतिहास संशोधक होते त्याच्या लिखाणात देखिल असा उल्लेख नाही. मग एकाएकी ५०/६० पुर्वी हे पुण्यात कसे काय बरे लोकाना कळाले? बाकी संभाजी ब्रिग्रेट किंवा तत्सम संघटना काय ह्या पावसाळ्यातील कुत्र्यांच्या छत्री प्रमाणे आहेत. जरा पोषक वातावरण मिळाले कि फोफावायला सुरुवात करतात.पण त्याची खेळी अजुनतरी यशस्वी ठरली नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या. त्याचा अजुन एक ही नेता जनतेने स्विकारला नाही आहे.त्यात कोणीही निवडुन येण्याच्या पात्रतेचा नाही आहे.लोकाच्यात रोष आहे तो महारांजावर जी चिखलफेक केली त्याला व ती करण्यात ज्यानी चिखल पुरविला त्या साहित्यिक म्हणुन मिरवणार्या भ्याड षंढाविषयी. काही ठिकाणी तुम्ही ओढुन ताणुन वेगवेगळ्या लोकांचे हितसंबध ह्या प्रकरणात गुंतल्याचे दाखवुन मुळ प्रकरण तुम्ही विसरवण्याचा प्रयत्न केला आहे.वैचारिक दिवाळखोरी मराठी माणसाची तुम्ही एका परदेशी लेखकाचे पुस्तक स्विकारणे किंवा त्याचा विरोध करणे ह्यावरुन कसे काय ठरवु शकता? लेन कुणी आतंरराष्ट्रीय ख्यातीचा इतिहास संशोधक किंवा लेखक नाही आहे.तो जी चिखलफेक करतो त्यावर लोक चिढतात किंवा वेगवेगळ्या मार्गाने आपला विरोध व्यक्त करतात म्हणजे तो समाज वैचारिक दिवाळखोरीत निघाला असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? मग त्याच समाजाचे तुम्ही एक घटक आहात.लेन ने खरोखर जर संशोधन करुन ते पुस्तक प्रसिध्द केले असते तर ते प्रकाशन निव्वळ महाराष्ट्रात विरोध होतो म्हणुन मागे घेतले गेले नसते. वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
श
श्रावण मोडक Fri, 07/16/2010 - 14:17 नवीन
उशीरा वाचला हा प्रतिसाद. सायंदैनिक संपले, अर्थशुचितेविषयी चर्चा झाली. त्यापुढे इतरही बरंच काही झालं. काही तथ्यं, काही त्याभोवतीची आवरणं... मानवी बाजू वगैरे ठीक. पण ती ध्यानी न घेता याच व्यक्ती जेव्हा समाजाला अक्कल शिकवू जातात तेव्हा पंचाईत होते. चालायचेच. :) हा प्रतिसाद मुद्याला धरून असला तरी अवांतर ठरू शकेल. तसे वाटल्यास बिनदिक्कत उडवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Sat, 07/17/2010 - 03:41 नवीन
या विषयावरचा , प्रस्तुत लेखातल्या विचारांशी साधर्म्य दाखवणारा एक अभ्यासपूर्ण लेख. http://thinkmaharashtra.com/think1/index.php?option=com_content&view=article&id=269:2010-07-16-04-55-35&catid=51:2010-05-07-07-52-17&Itemid=47
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
क
क्रेमर Sat, 07/17/2010 - 16:04 नवीन
अशा लेखांतील सुलभीकरण वापरुन मला एक समांतर-गंमतीदार विश्लेषण सूचते. शतकानुशतके ब्राह्मण समाजाने ब्राह्मणेतरांना ज्ञानापासून दूर ठेवले. ज्ञानशाखांवरील मक्तेदारी मागील शतकांत संपुष्टात येत आहे असे त्यांच्या ध्यानी आले. ब्राह्मणेतरांवरचा ब्राह्मणांचा प्रभाव कमी होऊ लागला. ब्राह्मणांचे खच्चीकरण टाळण्यासाठी काही लोकांना ब्राह्मणांची एकजूट करावीशी वाटली. त्या डावपेचाचा भाग म्हणून लेनला हा विनोद असल्याचे काही लोकांनी खोटे-खोटेच सांगितले. जेणेकरून शिवाजीच्या चाहत्या समाजातील लोक ब्राह्मणांवर हल्ले करतील व ब्राह्मण या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी एकत्र येतील. _________________ बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Wed, 07/14/2010 - 22:59 नवीन
लेख आवडला. कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाकडे संयत दृष्टीने वेध घेण्याच्या , त्या प्रश्नांचे स्वरूप समजून घेण्याच्या प्रवृत्तीला जेथे "विचारजंत" असे हिणवले जाते त्या प्रस्तुत संकेतस्थळावर हा लेख टाकण्याकरता लागणारे धैर्य दाखवल्याबद्दल अभिनंदन. महाराष्ट्राच्या बदलणार्‍या सांस्कृतिक पोताबद्दलची निरीक्षणे मार्मिक आहेत. वारकरी परंपरा, प्रबोधनाची , वैचारिक चळवळींची पार्श्वभूमी , आंबेडकरी चळवळींचे माहेरघर ही बिरुदे मिरवणार्‍या महाराष्ट्रात फोफावलेली ही असहिष्णुतेची विषवल्ली ही खरोखरच चिंतेची बाब आहे.
  • Log in or register to post comments
म
मनिष गुरुवार, 07/15/2010 - 08:02 नवीन
शब्दा-शब्दाशी सहमत. पण विचारांना आवहन करणे, विचार मांडणे आणि ते पटवून देणे हे अवघड काम आहे आणि भावना भडकावणे सोपे..तेच राजकारणी करतात. संभाजी ब्रिगेड किंवा सनातन प्रभात - अतिशय भडक आहेत, त्यांच्यावर खरच बंदीची गरज आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
स
सुनील Wed, 07/14/2010 - 23:09 नवीन
चांगला लेख. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 07/14/2010 - 23:12 नवीन
आवडला.
  • Log in or register to post comments
अ
अडगळ Wed, 07/14/2010 - 23:33 नवीन
माणसाचा देव केला की त्याला बासनात गुंडाळून ठेवणे सोपे जाते. आणि मग पारायणाचा धंदा पण जोरात करता येतो. जाणुनबुजून वा अपघाताने केलेले/झालेले मूर्तिभंजन सुध्दा म्हणूनच कधीकधी महत्त्वाचे ठरते.एरवी न दिसणार्‍या अनेक बाजू या मंथनातून दिसुन येतात.
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 07/14/2010 - 23:43 नवीन
सदर प्रकरणाचा लेखाजोखा आवडला. जास्तीत जास्त लोक (पेपरे, वाहिन्या आणि इतर जातीयवादी माध्यमांनी निर्माण केलेल्या) पुर्वग्रहदुषित भावनेला दोन मिनीटे दुरु करुन हे वाचतील तर बरे होइल.
अशी वदंता खरंच अस्तित्वात आहे का? तर नक्कीच आहे.
+१. मी सुद्धा लेनप्रकरणा आधी ऐकले होते. -Nile
  • Log in or register to post comments
क
क्रेमर गुरुवार, 07/15/2010 - 02:10 नवीन
पुस्तकामागची ऐतिहासिक भुमिका, वदंतेचा वापर करून व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा अभ्यास यांचे महत्त्व विषद करून जेम्स लेनच्या पुस्तकाबाबत होत असलेल्या गदारोळाचा आढावा घेण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. या पुस्तकावर बंदी घातली जाऊ नये, पुस्तक दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असावे याबाबत नीरक्षीर विवेकाने विचार करणार्‍या कुठल्याही व्यक्तिला काही आक्षेप नसावा. याआधी झालेल्या गदारोळात भांडारकर प्राच्यसंस्थेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणे आवश्यक आहे. अशा वृत्तींना परिपक्व समाजात थारा नसावा. हे सर्व मान्य होण्यासारखेच आहे. परंतु आपल्याकडे अशा घटनांची कमतरता नाही. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतच असतात. प्रसिद्धी माध्यमांत याविषयी चर्चा झडतच असतात. याबाबत वेळोवेळी डोळ्यात खूपणारी गोष्ट म्हणजे तथाकथित विचारवंत मात्र ठामपणे दबावाला बळी न पडता आपली मते मांडत नाहीत. माफी मागून, पुस्तक मागे घेऊन पळपुटेपणा दाखवतात. आपल्या लिखाणाने, कलाकृतीने उडालेल्या धुरळ्याची जाबाबदारी टाळण्याची कातडीबचाऊ भुमिका घेतली जाते. जेम्स लेनच्या प्रकरणात काय दिसून येते? त्याने लिहिलेल्या पुस्तकातील विश्लेषणाविषयी अभ्यासक वाद घालू शकतील. त्या लेखनाच्या पात्रतेविषयी मत मतांतरे असतील. पण पुस्तकातील आक्षेप घेण्यात आलेल्या मजकुरात काहीही गैर नाही. त्या वाक्याबाबत पुअर जजमेंट हा एकमेव आक्षेप घेता येऊ शकेल. म्हणजे महाराष्ट्रात काही काळ घालवल्यानंतर, इथल्या अभ्यासकांशी बोलल्यानंतर लेनला या विधानाचा विपर्यास करून कशा प्रकारचा जनक्षोभ माजू शकेल याची कल्पना यावयास हवी होती. (त्याआधी प्रस्तावनेत आभार मानलेल्या जयंत लेले यांच्या पुस्तकावरही अशा स्वरुपाच्या विधानामुळे बंदी घातली गेल्याचे विकीपिडियावरून कळते.) हा एक भाग सोडल्यास जेम्स लेनची चुकी काय हे कळत नाही. या भागाबाबतही अभ्यासक म्हणून मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्याला त्या वदंतेविषयी लिहिणे आवश्यक वाटले असणे शक्य आहे. असे असतांना झुंडशाहीला बळी पडून जेम्स लेनने माफी मागण्याची आवश्यकता होती काय? तसेच पुस्तकात आभार मानलेल्या एकातरी व्यक्तिने* ही वदंता ऐकली असल्याची कबुली दिली काय? (याउलट काहींनी ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसकडे पुस्तक मागे घेण्याची मागणी केली.) विचारवंतांच्या अशा कणाहीन, भ्याड भुमिकेमुळे मुठभर लोकांची झुंडशाही यशस्वी ठरते. या विचारवंतांचे 'अक्षम्य परंपरेच्या पायवाटेला हमरस्ता बनवणाऱ्या प्रवाहातील' योगदान विचारात घेणे गरजेचे आहे. लेखात चिंतातुरजंतु यांनी या महत्त्वाच्या घटकाल वगळलेले आहे. लेखाच्या उत्तरार्धात केलेल्या राजकिय विश्लेषणाशी असहमत आहे. या विश्लेषणात मराठा वोट बँकेला आपल्याकडे वळवून घेण्यासाठी रचलेले कारस्थान असा काहीसा सूर आहे. माझ्या मते हे सुलभीकरण आहे. सर्वप्रथम जातींचा राजकारणासाठी वापर हा नव्वदच्या दशकात लागलेला शोध नसून त्याच्या कितीतरी आधीपासूनच असा वापर महाराष्ट्रात सुरू आहे. आपल्या समाजात जातीयवाद खोलवर रुजलेला आहे. अशा प्रकरणांतून ही जातीय अस्मिता उफाळून येते एवढेच. 'मराठा समाजाला भडकवता' यावे असा मराठा समाज एकजिनसी नाही. अशा फुटकळ प्रकरणांतून कुठल्या राजकिय पक्षाला (हिंदुत्वाप्रमाणे किंवा प्रांतिक मुद्द्यांप्रमाणे) फायदा झाल्याची काही ठोस उदाहरणे नाहीत. प्रस्तुत प्रकरणात सर्वच राजकिय पक्ष सामील झालेले दिसतात. (संभाजी ब्रिगेडचे खेडकर यांच्या पत्नी भाजपत असल्याचे ऐकले होते.) या मुद्द्याचा वापर करून निवडणुका जिंकता येतील असे कुठलेच मतांचे गणित दिसत नाही. महाराष्ट्रात मराठा, वंजारी, धनगर, माळी या जातींमध्ये सत्तेसाठी चढाओढ आहे. ब्राह्मणांविरुद्ध जमवाजमव करून कुठल्याच पक्षाला फारसे यश मिळण्याची शक्यता नाही. तेव्हा लेखाच्या उत्तरार्धातील राजकिय विश्लेषण अगदीच तकलादू आहे. तसेच कमीतकमी जालावरील चर्चांतून फक्त मराठा जातीतल्याच लोकांचा संताप झाला आहे असे दिसत नाही. सर्वच मराठी लोकांच्यात संताप जाणवतो - फक्त एका विशिष्ट जातीच्या लोकांत नाही. लेखकाचा तसा हेतू नसेलही पण उत्तरार्धातले विश्लेषण शिवाजीची पॅन मराठी ओळख नाकारते असा माझा समज झाला आहे. *In India, my scholarly home has been the Bhandarkar Oriental Research Institute in Pune, and there I profited from the advice and assistance of the senior librarian, V. L. Manjul. I read texts and learned informally a great deal about Marathi literature and Maharashtrian culture from S. S. Bahulkar, Sucheta Paranjpe, Y. B. Damle, Rekha Damle, Bhaskar Chandavarkar, and Meena Chandavarkar. Thanks to the American Institute of Indian Studies and Madhav Bhandare, I was able to spend three productive periods of research in Pune. (या दुव्यावरून) तसेच I thank especially Anne Feldhaus, Meera Kosambi, Jim Masselos, Irina Glushkova, A. R. Kulkarni, Rajendra Vora, Narendra Wagle, Jayant Lele, Dilip Chitre, Eleanor Zelliot, Lynn Zastoupil, Stewart Gordon, and Lee Schlesinger. (येथून)
  • Log in or register to post comments
प
पंगा गुरुवार, 07/15/2010 - 02:28 नवीन
तसेच कमीतकमी जालावरील चर्चांतून फक्त मराठा जातीतल्याच लोकांचा संताप झाला आहे असे दिसत नाही. सर्वच मराठी लोकांच्यात संताप जाणवतो - फक्त एका विशिष्ट जातीच्या लोकांत नाही. लेखकाचा तसा हेतू नसेलही पण उत्तरार्धातले विश्लेषण शिवाजीची पॅन मराठी ओळख नाकारते असा माझा समज झाला आहे.
अधोरेखिताबद्दल थोडा साशंक आहे. (संताप होणे हे योग्य की अयोग्य या वादात न पडता) ज्याप्रमाणे फक्त मराठा जातीतल्याच लोकांचा संताप झालेला आहे असे दिसत नाही, त्याचप्रमाणे फक्त एका विशिष्ट जातीच्या (कोणत्याही एका विशिष्ट जातीच्या) लोकांत संताप झालेला नाही, असेही जाणवत नाही. आपला तसा हेतू नसेलही, पण त्या वाक्यातल्या उत्तरार्धातले विश्लेषण एका विशिष्ट जातीची पॅन मराठी ओळख नाकारते असा माझा समज झाला आहे. धन्यवाद. (अवांतरः ही 'विशिष्ट जात' कोणती असावी बरे?) - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
क
क्रेमर गुरुवार, 07/15/2010 - 02:52 नवीन
सर्वच मराठी लोकांच्यात संताप जाणवतो - फक्त एका विशिष्ट जातीच्या लोकांत नाही.
'फक्त एका विशिष्ट जातीच्या लोकांतच नाही तर सर्व मराठी लोकांच्यात (सर्व जातीतील मराठी लोकांत) संताप जाणवतो' या अर्थाने वाक्य वापरले आहे. त्या वाक्याप्रमाणेच पुढचे वाक्य पहा. ओबामाला अमेरिकेतील सर्व वंशातील लोकांनी मते दिली - फक्त एका विशिष्ट वर्णाच्या लोकांनी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
प
पंगा गुरुवार, 07/15/2010 - 03:04 नवीन
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. आपण दिलेली पर्यायी वाक्यरचना नि:संदिग्ध आहे; उलटपक्षी मूळ वाक्यरचनेतून अनपेक्षित (आणि भलताच, अभिप्रेत अर्थाच्या काहीसा विरुद्धार्थी) अर्थ वाचकापर्यंत पोहोचून गैरसमज होण्यास (माझा झाला तसा) भरपूर जागा आहे, एवढेच या निमित्ताने नमूद करू इच्छितो. बाकी आपलेही विश्लेषण विचार करण्यासारखे आहे. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
क
क्रेमर गुरुवार, 07/15/2010 - 03:54 नवीन
अभिप्रेत, अनपेक्षित, विरुद्ध सर्व अर्थ लावण्याचा वाचकाचा अधिकार अबाधित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
प
पंगा गुरुवार, 07/15/2010 - 06:33 नवीन
प्रश्न वाचकाचा अधिकार अबाधित असण्याचा नाही. (तो अधिकार तर अबाधित आहेच.) मात्र, लेखकास अभिप्रेत असलेला अर्थ सोडून इतर भलताच कोणतातरी अर्थ वाचकास प्रतीत होणे हे लेखकाकरिता अन्याय्य (unfair अशा अर्थी) आहे की नाही हे मला माहीत नाही (मला वाटते असावे), पण वाचकाकरिता (लेखकास समजून घेण्याच्या दृष्टीने) निश्चितच अन्याय्य (पुन्हा, unfair) आहे असे वाटले, म्हणून हा प्रपंच. असो. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 07/15/2010 - 08:41 नवीन
सर्वच मराठी लोकांच्यात संताप जाणवतो - फक्त एका विशिष्ट जातीच्या लोकांत नाही.
हा संताप कोणाल आणि नक्की कोणाविषयी जाणवत आहे, हे अजुनही माझ्या लक्षात येउ शकलेले नाही. उदा. ऑर्कुट सारख्या सोशल वेबसाईटसवरील हे स्टेटस बघा :- "ब्राह्मण जिवंत राहणे हा बहुजनांचा अपमान" MARATHYANNO Shivrayanchi badnami karnarya BAMNANA dhada shikva.James Laine hastak asun BAMNANCHE mastak ahe.Te mastakach thecha. ''आई जिजाऊ यांच्या चारित्र्य हनानाचा बदला पृथ्वी निब्राम्हन करूनच वसूल केला पाहिजे'' " करा तलवारीला धार आन बामणावर वार" कदाचीत हि फेक प्रोफाईल्स देखील असु शकतील. पण मुद्दा हा आहे की संताप हा असा देखील असु शकतो ? आणि हा संताप नक्की लेनवरच अथवा त्याच्या पुस्तकावर आहे का ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
म
मृगनयनी गुरुवार, 07/15/2010 - 13:01 नवीन
संभाजी ब्रिगेडचे खेडकर यांच्या पत्नी भाजपत असल्याचे ऐकले होते.) रेखा पुरुषोत्तम खेडेकर... बुलढाण्याच्या आमदार होत्या. १९९० सलापासून बीड, बुलढाणा येथे "संभाजी ब्रिगेड" या अतिरेकी संघटनेचा उगम झाला... असे विश्वासनीय सूत्रांकडून समजते. :| "ब्राह्मण जिवंत राहणे हा बहुजनांचा अपमान" MARATHYANNO Shivrayanchi badnami karnarya BAMNANA dhada shikva.James Laine hastak asun BAMNANCHE mastak ahe.Te mastakach thecha. ''आई जिजाऊ यांच्या चारित्र्य हनानाचा बदला पृथ्वी निब्राम्हन करूनच वसूल केला पाहिजे'' " करा तलवारीला धार आन बामणावर वार" प.रा..... या अशा वाक्यांवर काही प्रतिक्रिया देण्याचं किन्वा atleast ही वाक्ये खरोखर चुकीची आहेत... यामुळे समाजात जातीयवाद जास्त बोकाळतो.... हे समजून घेऊन इथे उघडरीत्या मांडायचं धारिष्ट्य खूप कमी मिपाकरांकडे आहे. "संभाजी ब्रिगेड'वाल्यांना (अर्थात दुर्जनांना)मुक्ती मिळू देत" या वाक्यामुळे अतिदु:खी होऊन प्रतिक्रिया देणारे "मिपाकर" आता मूग गिळून का बरं बसले आहेत.... हे ज्याचे त्यानेच समजून घ्यावे! ;) तथाकथित आया-बहिणींच्या अर्थात मायावती'च्या उल्लेखाने कळवळणारे "महापुरुष" आता कुठे गेले बरं! :-? _____________ त्या ब्रिगेडवाल्यांनी किन्वा महासन्घवाल्यांनी किन्वा ब्राह्मणद्वेष्ट्यांनी ब्राह्मणंविरूद्ध कितीही गरळ ओकली.. वाट्टेल ते लिहिले, बोलले तरी सत्ताधीश राजकारणी मात्र सोयीस्कररीत्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात... हेच तर खरे दुर्दैव! :| || जय परशुराम || युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
वेताळ Fri, 07/16/2010 - 14:11 नवीन
थोडे शब्द इकडचे तिकडे केले तर तोच अर्थ होतो. संभाजी ब्रिग्रेड किंवा तत्सम संघटना काय लायकीच्या आहेत हे सर्वाना ठाउक आहेच. पण वरील चितावणीखोर वाक्ये कोणाची आहेत हे कळाल्याशिवार त्यावर तरी कसे भाष्य करणार? आपले विचार जर कोणी मान्य करीत नसेल तर त्याची हत्या करावी ह्या विचारसरणीचाच मी तिरस्कारच करतो.दुर्जनाचा नाश करायला भारतात कायदा अस्तित्वात आहे. तसेच स्त्रींयाच्यावर शस्त्र उगारणे किंवा त्याची हत्या करणे ह्याला देखिल माझा विरोध आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
क
क्रेमर गुरुवार, 07/15/2010 - 13:15 नवीन
हा संताप कोणाल आणि नक्की कोणाविषयी जाणवत आहे, हे अजुनही माझ्या लक्षात येउ शकलेले नाही.
वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टीविषयी संताप जाणवत आहे. संभाजी ब्रिगेड किंवा तत्सम जातीयवादी लोकांना ब्राह्मणांविषयी संताप जाणवत आहे. इतरांना लेनविषयी तसेच पाश्चात्य इतिहासलेखकांविषयी संताप जाणवत आहे. आणखी काही इतरांना लेनच्या पुस्तकावर घातलेली बंदी चुकीची आहे असे म्हणणार्‍या लोकांविषयी संताप जाणवत आहे. हा संताप निरनिराळ्या लोकांविषयी जाणवत आहे हे खरे असले तरी या संतापाचे मूळ एकाच गोष्टीत आहे. ते म्हणजे आपल्या समाजाचा अपरिपक्वपणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अडगळ गुरुवार, 07/15/2010 - 03:02 नवीन
जो एकजिनसी नाही आहे त्याला या निमित्ताने कळपात आणण्याचा प्रयत्न करणे (अनेक डावपैकी अजून एक डाव म्हणून )आणि मताच्या राजकारणाचा खेळ मांडणे असा डाव असावा.हा प्रयत्न किती योग्य आहे वा कितपत यशस्वी झाला हा भाग वेगळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
क
क्रेमर गुरुवार, 07/15/2010 - 04:00 नवीन
जो एकजिनसी नाही आहे त्याला या निमित्ताने कळपात आणण्याचा प्रयत्न करणे (अनेक डावपैकी अजून एक डाव म्हणून )आणि मताच्या राजकारणाचा खेळ मांडणे असा डाव असावा.
असू शकेल. समाजातील प्रत्येक दुर्गुणासाठी राजकारणास वेठीस धरणे, हे मला सुलभीकरण वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
प
प्रियाली गुरुवार, 07/15/2010 - 02:20 नवीन
लेन प्रकरण आणि महाराष्ट्रातील राजकारणाचा घेतलेला परामर्ष आवडला. लेखाची मांडणीही आवडली.
या पुस्तकात भावना भडकवणारं लिखाण आहे म्हणून त्यावर बंदी घालणं योग्य आहे असं एक मत दिसतं. वरचे मुद्दे वाचून हे मत पोकळ आहे असं समंजस लोकांना वाटेल अशी अशा आहे.
अशी आशा करू.
  • Log in or register to post comments
प
पंगा गुरुवार, 07/15/2010 - 02:38 नवीन
तूर्तास एवढेच. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/15/2010 - 03:10 नवीन
लेख आवडला. पण मला वाटते प्रश्न जेम्स लेन व त्या पुस्तकातील काही संदर्भांचा नाही आहे. तर प्रचलित नियम, कायदे या संदर्भात किती लागू अथवा गैरलागू असणार आहेत व किती काळ हे असे चालणार आहे? कधी एम एफ हुसेन यांनी काढलेले चित्र, कधी जेम्स लेन, कधी बाबासाहेबांच्या रिडल्स वरुन, कधी कुठल्या सिनेमात, नाटकात वापरलेले काही शब्द, व्यक्तिरेखा. दरवेळी राजकीय पक्षांनी केलेली झुंडशाही किती दिवस चालणार आहे? राजकीय पक्षांनी यासंदर्भात असलेले कायदे, त्यातील त्रुटी यासंदर्भात एकत्र येउन काही काम करुन पाहीले पाहीजे व जे नियमबाह्य आहे त्यावर बंदी, अटी इ उपाय करावेत. उगाच लोकांच्या भावना भडकावून राजकारण करुन नये. लवकरात लवकर "महाराष्ट्राचे आधिकारीक धोरण" (अंमलबजावणीत) यायला हवे व जे नियमात बसते त्याला लायनीने जाउ द्यावे. जर सुप्रीम कोर्टाने बंदी उठवली असेल गुमान मान्य करावे नसल्यास कायदे बनवावे पण दंगा करत बसु नये. बोलायला मराठी माणुस नेहमी भैय्या लोकांना नावे ठेवतो पण दिवसेंदिवस जातीचे राजकारण करायला भैय्या लोकांना मागे टाकायला बघत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/15/2010 - 03:17 नवीन
लेख आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 07/15/2010 - 04:48 नवीन
सही लिहिलंय. आवडलं.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 07/15/2010 - 06:01 नवीन
सरकारने satanic Verses वर बंदी घातली चालली... अभिव्यक्ति स्वातंत्र्य विचारांचे हवे..विकृत विचारांचे कशा साठी?...
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/15/2010 - 06:27 नवीन
उत्तम लेखाबद्दल जंतुंचे आभार. उत्तरार्धातील जातीय समीकरणाचे राजकारणावर मतमतांतरे असु शकतात.क्रेमर यांनी दर्शवलेल्या मतभिन्नतेत जसा मराठा समाज एकजिनसी नाही तसा कुठलाही समाज एकजिनसी नाही असे म्हणता येते. एका कुटुंबात देखील मतमतांतरे असतात. त्यांचा दुसरा मुद्दा जनक्षोभाची कल्पना लेनला यायला हवी. खर तर हा मुद्दा येथील स्थानिक विद्वानांच्याही लक्षात आला असणार परंतु पुस्तकाचे स्वरुप हे अ‍ॅकॅडमिक असल्याने त्याचा एवढा गदारोळ होईल असा अंदाज त्यांना त्यावेळी आला नसावा. अशा वदंता या अनेक ऐतिहासिक पौराणिक पुरुषांच्या बाबतीत असतात. त्या लोककथा/वदंता म्हणुन मौखिक वा लिखित परंपरेतुन पुढे सरकत असतात. कालौघात प्रक्षिप्त भाग हि घुसडला जात असतो. त्यामुळे या पुस्तकातील अशा जाता जाता केलेल्या उल्लेखावर भविष्यात एवढा गदारोळ होईल याची त्यांना व लेनला कल्पना नसावी. क्रेमर यांचा तिसरा मुद्दा विद्वानांच्या कातडी बचाव धोरणाचा. ही गोष्ट खरीच आहे. पण त्यात महत्वाची बाब अशी आहे कि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करावा यासाठी समाजमन हे तेवढे विकसित असावे लागते. झुंडशाही वा समुह उन्मादा समोर हे अशक्य असते.समुहाला धड असते डोके नसते. अशा वेळी माफी मागणे हाच व्यावहारिक पर्याय असतो.survival is truth. विद्वान टिकला तरच विचार टिकणार आहेत. माझ्या अंनिसतील एका कट्टर नास्तिक मित्राला मी प्रश्न विचारला कि समजा अशी कल्पना कर कि तु जंगलात भरकटला आहेस व आदिवासींच्या तावडीत सापडला. त्यांचा देव हा एक दगड आहे. त्याच्या पाया पडले तरच तुला मी सोडतो असे सांगितले तर तु त्या देवाच्या पाया पडशील का? तो म्हणाला," छॅ! अजिबात नाही. जे आपण मानित नाहि त्याच्या कशाला पाया पडायचे. जीव गेला तरी बेहत्तर." त्याला मी म्हणालो की तु जिवंत राहिला तरच तुझ्या विचारांचा वाद प्रतिवाद प्रचार प्रसार होणार आहे. केवळ पाया पडण्याच्या एका कृतीमुळे तुझ्या विचारांशी प्रतारणा होते काय किंवा त्या कृतीमुळे लगेच तु आस्तिक होतो काय? केवळ विद्वानांच्या माफिमुळे किंवा तडजोडी मुळे त्यांना कणाहीन, भ्याड म्हणणे हे तर्कशुद्ध नाही. तुर्तास इतकेच. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
क
क्रेमर गुरुवार, 07/15/2010 - 13:34 नवीन
त्यामुळे या पुस्तकातील अशा जाता जाता केलेल्या उल्लेखावर भविष्यात एवढा गदारोळ होईल याची त्यांना व लेनला कल्पना नसावी.
कल्पना नसणे यावरून एक समाजशास्त्रीय अभ्यासक म्हणून लेनला मराठी समाज समजलेला नाही असा निष्कर्ष कढता येईल. (ही केवळ शक्यता आहे. वरही पुअर जजमेंट हा आरोप असू शकतो अशी शक्यताच वर्तवली आहे.)
मर यांनी दर्शवलेल्या मतभिन्नतेत जसा मराठा समाज एकजिनसी नाही तसा कुठलाही समाज एकजिनसी नाही असे म्हणता येते.
खरेच आहे. संभाजी ब्रिगेडचा कावा : शिवाजीविषयीचा विनोद -> ब्राह्मण अभ्यासकांनी केलेली मदत -> लेनला मदत केरणारे अभ्यासक, संस्था यांना झोडा -> या प्रकरणाचे खापर ब्राह्मणांवर फोडा. त्याच जातीत हा विनोद होतो असा सोयिस्कर समज. लेखातील सुलभीकरण : पुस्तकावरील बंदी, इतर अरेरावी -> संभाजी ब्रिगेडचा सहभाग -> मराठा जातीचे (काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांचे) राजकारण -> इतरांना (शिवाजीचा अपमान म्हणून) खरोखर वाटलेल्या संतापाचा तसेच राज ठाकरे व इतरांनी याविरुद्ध केलेल्या आवाजाचा सोयिस्कर विसर. अशा प्रकारचे विश्लेषण/ सुलभीकरण घातक आहे. आपल्या समाजात जातीयवाद खोल रुतून बसलेला आहे. त्याचे प्रतिबिंब राजकारणात पडलेले दिसते. राजकारणामुळे जातीयवाद जन्माला आलेला नाही.
पण त्यात महत्वाची बाब अशी आहे कि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.
टोपणनाव यांचा प्रतिसाद पहावा.
केवळ विद्वानांच्या माफिमुळे किंवा तडजोडी मुळे त्यांना कणाहीन, भ्याड म्हणणे हे तर्कशुद्ध नाही.
भीतीमुळे माफी मागणे याला भ्याडपणा म्हणतात. स्ट्रॅटेजिक भ्याडपणा वगैरे वर्गीकरणे करत रहावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
य
यशोधरा गुरुवार, 07/15/2010 - 06:38 नवीन
उत्तम लेख. मांडणी आवडली.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 07/15/2010 - 06:42 नवीन
'शिवाजी राजांचे वडील कोण' हा कुठल्याही ( देशी/पर्देशी)संशोधक म्हणवणार्या लोकांचा विषय कसा काय होउ शकतो हे मला अत्तापर्यन्त कळले नाही! बखरी सोडून, लोककथांच संदर्भ संशोधनासाठी घ्यायचा, आणी वर परत ऑक्सफर्ड नी त्याला मान्यता द्यायची, ह खोड्साळ्पणाच नाही काय? त्याला विरोध करणे आवश्यक आहे. शिवाजीराजांचे वडील, गुरु, आई, कोणीही असोत, ते स्वत। सदा पूजनीयच आहेत! ============ माउ
  • Log in or register to post comments
म
मैत्र गुरुवार, 07/15/2010 - 07:06 नवीन
दिवाळखोरी जगजाहीर आहे. पण ते मांडताना एक दिशाभूल होते आहे असं वाटतं एक महत्त्वाचा मुद्दा: हीच पध्दत लेन शिवाजीच्या आजूबाजूला निर्माण झालेल्या मिथकांना लावतो. लेन ने पुस्तकात, प्रस्तावनेत किंवा इतरत्र लेखी किंवा पत्रकारांसमोर असं विधान केलं आहे काय की या पुस्तकातलं संशोधन हे इतिहासाचा आढावा, माझा दृष्टिकोन, इ. नसून मिथकं, लोककथा यांचा धांडोळा घेऊन तो काळ आणि समाजव्यवस्थेतला महाराजांचा संदर्भ उभा करण्याचा प्रयत्न आहे? म्हणजेच पुस्तकातले बहुतांश संदर्भ / मुद्दे हे कुठल्या पुराव्याच्या नव्हे तर समाजात प्रचलित लोककथा, मत मतांतरे, आणि पिढ्यान पिढ्या ऐकत आलेल्या महाराजांच्या कर्तृत्वाच्या कथा यावर आधारलेले आहेत. दत्तो वामन पोतदार यांच्या हे (म्हणजे शिवाजीच्या पितृत्वाविषयीची कथित बाब) लक्षात आलं पण त्यांनी त्याची जाहीर वाच्यता कधी केली नाही असं माझ्या स्वत:च्या कानावर आलं होतं. -- त्यांनी जाहीर वाच्यता केली नाही .. पण मग हे त्यांच्या लक्षात आलं होतं याला काही पुरावा / संदर्भ आहे काय? हे मान्य की ब्रिगेडचं लिखाण अशक्य कोटीतलं आहे आणि अतिशय गलिच्छ भाषेत वाट्टेल ती विधाने केली आहेत आणि त्यावर बंदी घालणं आवश्यक आहे. आळंदी पालखीने याला केलेला विरोध सर्वांना माहीत आहे. आणि अशा स्वरुपाच्या लिखाणावर बंदी यावीच. तशीच या लेनच्या पुस्तकावर घालण्यात काय चूक आहे? तेव्हा अशा भावना भडकावून लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून राजकारण करणाऱ्या आणि त्यावर आपली पोळी भाजून घेणाऱ्या नेत्यांच्या हातातली आपण बाहुली बनतो. -- हे मान्य आणि हातातून निसटत चाललेला मराठा मतदार मराठा महासंघाच्या माध्यमातून भडकवून ' नरो वा कुंजरो वा' म्हणजे भांडारकर वर हल्ल्याचा निषेध पण महासंघावर किंवा ब्रिगेडच्या पुस्तकांवर कारवाई नाही. किंवा महासंघाच्या सभांन्ना उपस्थित राहणे अशी चतुराई स्पष्ट आहे. जिथे अडचण होईल तिथे प्रतिक्रिया द्यायचीच नाही आणि पत्रकारितेला आपल्या बळावर अशा संबंधांत बरोब्बर लांब ठेवायचे हे आता उघड झाले आहे. लेन इथे असताना त्याला एक आंतरराष्ट्रिय इतिहास संशोधक म्हणून मदत करणार्‍या सर्वांचे त्याने इंग्लिश पद्धतीने आणि या क्षेत्रातल्या मान्यतांप्रमाणे आभार मानले. आता या दहा पंधरा वेगवेगळ्या लोकांनी त्याला पुस्तके, संदर्भ ग्रंथ आणि दस्तावेजांशिवाय फक्त पान ९३ चा हवाला दिला म्हणणे केवळ हास्यास्पद आहे. पण या राजकारणाच्या आणि वैचारिक दिवाळखोरीच्या आधारावर लेनचे समर्थन करता येणार नाही. प्रस्तुत लेखातल्या संयत आणि गंभीर धारेत कुठेतरी याचे समर्थन झाल्याचे वाटते.
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar गुरुवार, 07/15/2010 - 07:49 नवीन
चिंतातुर, अतिशय उत्तम लेख आहे. आवडला. धनंजय बोरगांवकर
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 07/15/2010 - 08:07 नवीन
लेख चांगला लिहिला आहे... पण ऐतिहासिक दस्तऐवज अभ्यासण्याऐवजी लेनला मिथकांचा का आधार घ्यावा वाटला असावा? काहीही झाले तरी शिवाजीराजा हा शूर, पराक्रमी राजा होता आणि त्यांच्यासारखा राजा झाला नाही आणि आता तर शक्यताहि नाही हे वस्तुस्थिती आहे. संभाजी ब्रिगेड वगैरे प्रकार हे फक्त समाजात अस्वस्थ निर्माण करून राजकीय फायदा उपटण्यासाठीच निर्माण केले आहे असे माझे मत आहे. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/15/2010 - 08:42 नवीन
एखाद्याच कर्तुत्व, सत्य, भावनिक आवाहन, शपथ या गोष्टी साठी कशाला तरी वेठीस ( परमेश्वर, आई) धरण्याची आपली परंपरा तशी जुनीच. आमच्या शाळेत (जीवन शिक्षन मंदिर) आजुबाजुच्या वाड्यातोड्यांची पोर असायची. एखादी अफवा कि सत्य याची शहानिशा करताना प्रवर्तक पोरगा म्हणायची," ख्वॉट नाय सांगत.हा लागली पैस चाल. ख्वॉट आसन तर आपन दोन बापाचं" म्हणजे एखादी पराधीन गोष्ट सत्य आहे कि नाही हे ठरवण्यासाठी आपण आपल्या आईचे चारित्र्य पणाला लावतो आहे हे त्याच्या गावी ही नसायचे. आपल्या भावनाविश्वातील एखादी घटना, सत्य, समजुती, आश्वासने यासाठी तुम्ही एका बापाचे आहात हे सांगण हा जणु काही त्याचा पुरावाच. समाजातील त्याचे अस्तित्व हे बापाच्या कर्तुत्वावर असल्याने हे मुद्दे कळीचे बनतात.पुरुष प्रधान संस्कृतीत तो कोणत्या बापाचा आहे यावर त्याचे 'अस्तित्व'च अवलंबुन असते. व्यक्तिगत संवेदनशील मुद्दे, समाजाचे संवेदनशिल मुद्दे हे जनप्रक्षोभात विचारात घ्यावे लागतात. ती संवेदनशीलता कशी उलगडायची वा फुलवायची यावर बरेच काही अवलंबुन असते. इतिहासहा शेवटी उपलब्ध साहित्यातुन काढलेला अन्वयार्थ असतो. इतिहासात नेमक सत्य काय हे उलगडणे अशक्य. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन गुरुवार, 07/15/2010 - 10:57 नवीन
हा एक उत्तम लेख आहे हे वेगळे सांगायलाच नको. जेम्स लेनच्या पुस्तकाविषयी झालेला गदारोळ बघून लेनने खरोखरच असे काही म्हटले आहे का याची खात्री करण्यासाठी मी ते पुस्तक अमेरिकेत असताना ग्रंथालयातून वाचले होते.बाकी पुस्तक खास काहीच नाही निदान आपल्यासारख्यांना शिवभक्तांना तरी शिवाजी महाराजांविषयी असते त्यापेक्षा बरीच कमी माहिती त्या पुस्तकात आहे असे जाणवले. आणि आक्षेपार्ह मजकूर म्हणाल तर तो त्या पुस्तकात नक्कीच आहे याची खात्री मी करून घेतली आहे. चिंतातुरजंतूंच्या मुद्द्यांविषयी पूर्णपणे सहमत. त्यात आणखी एका मुद्द्याची भर. जेम्स लेनच्या पुस्तकात श्रेयनामावलीमध्ये भांडारकर संस्थेतील बहुलेकरांचा उल्लेख महाराजांच्या किल्ल्यांना जेम्स लेनेने दिलेल्या भेटींसाठी बहुलेकरांनी मदत केली याबद्दल आहे.यावरून जेम्स लेनच्या वादग्रस्त विधानांबद्द्ल बहुलेकर जबाबदार कसे ठरतात?स्वत: बहुलेकरांनी असे विधान केले आहे का?माझ्या एम.एस थिसिसमध्ये एकूण ४० वेगवेगळ्या व्यक्तींच्या लिखाणाचा संदर्भ मी दिला होता.समजा मी काही वादग्रस्त विधान त्या थिसिसमध्ये केले असते तर त्याबद्दल त्या ४० पैकी कोणालाही जाऊन मारणार का?अर्थात संभाजी ब्रिगेडसारख्या रिकामटेकड्या आणि बेअक्कल लोकांकडून इतका विचार केला जायची शक्यता जराही नाही. संभाजी ब्रिगेडवाल्यांना रस केवळ तोडफोड आणि गुंडगिरी करण्यात.स्वत: शिवछत्रपतींचे ध्येय आसेतुहिमाचल हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे होते.त्यात पूर्वी कधीही कोणीही केला नव्हता तो अश्लाघ्य प्रकार (शिवाजी महाराजांना एका जातीच्या बंदिस्त चौकटीत कोंडणे) या मंडळींनी केला आहे.मला वाटते जेम्स लेनने आमच्या महाराजांची बदनामी जितकी केली नसेल तितकी या मंडळींनी त्यांचेच नाव घेऊन केली आहे. त्यांचा बंदोबस्त पहिला व्हायला हवा.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा