वेगळा ( चांगला ) विचार करायला लावणारा लेख आहे. लेख आवडला
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
निर्भिडपणे लिहिलेला चांगला लेख. पण हे समजण्याची कुवत समाजातल्या बर्याच लोकांना नाही. मागे एका प्रतिक्रियेत म्हटले तेच परत म्हणतो, 'कानाखाली आवाज' ही भाषा वापरणार्यांना मानसिक परिपक्वता यायला अजून १०० वर्षे पाहिजेत.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
अनेक प्रतिक्रियांमध्ये अनेक मुद्दे आलेले आहेत. त्यातल्या काहींना हा प्रतिसाद. इतर मुद्द्यांनाही हळूहळू जमेल तसा प्रतिसाद देईन.
लेखाच्या उत्तरार्धात केलेल्या राजकिय विश्लेषणाशी असहमत आहे. या विश्लेषणात मराठा वोट बँकेला आपल्याकडे वळवून घेण्यासाठी रचलेले कारस्थान असा काहीसा सूर आहे. माझ्या मते हे सुलभीकरण आहे.
होय हे सुलभीकरण आहे, पण त्याचा धनी मी नव्हे. शहाबानो प्रकरणात न्यायालयाच्या पुरोगामी निकालाला केराची टोपली दाखवणारं राजकीय नेतृत्व 'असं केलं नाही तर मुस्लिम व्होट बँक आपल्यापासून दुरावेल' असं सुलभीकरण करतं. रामाच्या नावावर भावना भडकावून हिंदू व्होट बँक आपल्याकडे खेचता येईल असं मानणारं नेतृत्व असं सुलभीकरण करतं. त्यांनी ते तसं केलं असावं, असं म्हणणारा राजकीय विश्लेषक सुलभीकरण करतो असं म्हणता येईल का?
'मराठा समाजाला भडकवता' यावे असा मराठा समाज एकजिनसी नाही. अशा फुटकळ प्रकरणांतून कुठल्या राजकिय पक्षाला (हिंदुत्वाप्रमाणे किंवा प्रांतिक मुद्द्यांप्रमाणे) फायदा झाल्याची काही ठोस उदाहरणे नाहीत. प्रस्तुत प्रकरणात सर्वच राजकिय पक्ष सामील झालेले दिसतात. (संभाजी ब्रिगेडचे खेडकर यांच्या पत्नी भाजपत असल्याचे ऐकले होते.) या मुद्द्याचा वापर करून निवडणुका जिंकता येतील असे कुठलेच मतांचे गणित दिसत नाही.
मराठा जात एकसंध आहे असं यात अजिबातच म्हटलेलं नाही. सत्तेवरचे मराठे आणि त्यांना मिळणारे फायदे तळागाळात झिरपत नसल्याचा दावा वर केलाच आहे. शिवाय आर्थिक, सामाजिक, भौगोलिक असे अनेक स्तर मराठा समाजात आहेतच. पण मुद्दा तो नाही. पूर्वी आपला हक्काचा मतदार असलेला मराठा समाज आपल्यापासून दूर चालला की काय याच्या भीतीतून (व असुरक्षिततेतून) ही राजकीय खेळी खेळली गेली असावी, असं वाटतं, एवढंच. त्याचा प्रत्यक्ष राजकीय फायदा किती झाला याविषयीही वर काही म्हटलेलं नाही. त्यामुळे ही खेळी मूर्खपणाची होती, असं आपण खुशाल म्हणू शकता. त्यामुळे मराठा नेतृत्व मूर्ख ठरेल कदाचित, पण विश्लेषण चुकीचं ठरवण्यासाठी ते पुरेसं नाही.
ब्राह्मणांविरुद्ध जमवाजमव करून कुठल्याच पक्षाला फारसे यश मिळण्याची शक्यता नाही. तेव्हा लेखाच्या उत्तरार्धातील राजकिय विश्लेषण अगदीच तकलादू आहे.
अहो हाच तर मुद्दा आहे! soft target ही संकल्पना याचसाठी वापरलेली आहे. ब्राह्मणांविरुद्ध राजकीय खेळी केल्याने तोटा काहीच नाही. पण मराठ्यांची त्या निमित्तानं दिशाभूल/फसवणूक करून (म्हणजे मराठ्यांचा राग ब्राह्मणांकडे वळवून) जर मराठ्यांची मोट बांधता आली, तर त्याचा थोडा फायदाच होईल. मग काय हरकत आहे? अशा विचारातूनच ही खेळी खेळली गेली असावी.
उत्तरार्धातले विश्लेषण शिवाजीची पॅन मराठी ओळख नाकारते
यात पुन्हा एकदा असं म्हणावं लागेल की विश्लेषणात शिवाजीची व्यापक ओळख नाकारलेली नाही. प्रकरणाला ब्राम्हण-मराठा वादाचं स्वरूप देणाऱ्यांना ती कदाचित नाकारायची असेल. शिवाजीच्या पितृत्वाविषयी वदंता पसरवणाऱ्यांना ती कदाचित नाकारायची असेल. पण अशी मंडळी अस्तित्वात आहेत असं म्हणणं म्हणजे ती व्यापक ओळख नाकारणं नव्हे. नाहीतर पुन्हा एकदा निरोप्याच मरायचा.
समाजातील प्रत्येक दुर्गुणासाठी राजकारणास वेठीस धरणे, हे मला सुलभीकरण वाटते.
सर्वसाधारण मुद्दा म्हणून मान्य. पण या विशिष्ट प्रकरणातली राजकीयता दुर्लक्षित करणं अवघड आणि धोक्याचं आहे, असंही वाटतं. ऐन निवडणुकींच्या तोंडावर भांडारकर संस्थेवर हल्ला झाला होता. संभाजी ब्रिगेड म्हणजे कोण ते तोपर्यंत फार कुणाच्या गावीही नव्हतं. त्यांचं ब्राह्मणविरोधी लिखाण त्या सुमाराला सहज उपलब्ध होऊ लागलं. ब्रिगेडचं संधान कोणत्या राजकीय पक्षाशी होतं (आणि आहे), हे तेव्हाही उघड होतं आणि आजही आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर या प्रकरणातली राजकीयता सहजासहजी नाकारता येईल असं वाटत नाही.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
राजकिय नेतृत्वाने सुलभीकरण करावे हे स्वाभाविक आहे. कारण सुलभीकरण त्यांना फायदेशीर ठरते. मात्र विश्लेषकाने अशी चूक करू नये.
शहाबानो प्रकरणात असलेल्या मतांना लांब जाऊ न देणे हे हेतू असावा. तर बाबरी मशीदीच्या प्रकरणात नवीन वोट बँक निर्माण करणे हा हेतू असावा. प्रस्तुत प्रकरणातही मराठा वोट बँक निर्माण करण्याचा किंवा मराठा मते दूर जाऊ नये असा प्रयत्न होत असावा, हे नाकारलेले नाही. परंतु प्रस्तुत लेखातील राजकिय विश्लेषण पटत नसल्याचे मत मांडले आहे. या प्रकरणाबाबत घटनाक्रम तपासल्यास काय दिसते?
२२ डिसेंबर २००३: शिवसैनिकांनी भांडारकर संस्थेशी संबंधित लोकांवर हल्ला केला. संस्कृत अभ्यासक श्रीकांत बहूलकर यांना मारहाण करण्यात आली व तोंडाला काळे फासण्यात आले.
५ जानेवारी २००४: संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्थेत जाऊन मोडतोड केली. दुर्मीळ हस्तलिखितांचे नुकसान केले.
यावरून लक्षात यावे की संभाजी ब्रिगेडच्या गाढवांना या प्रकरणाचा राजकिय वापर करावा हा शोध लागण्यापुर्वी अशा प्रकारांत कौशल्यप्राप्त शिवसेनेने या प्रकाराचा राजकिय वापर करण्याचा प्रयत्न आधी केला. तेव्हा 'पूर्वी आपला हक्काचा मतदार असलेला मराठा समाज आपल्यापासून दूर चालला की काय याच्या भीतीतून (व असुरक्षिततेतून) ही राजकीय खेळी खेळली गेली असावी' हा दावा निराधार आहे.
ब्राह्मणांविरुद्ध राजकीय खेळी केल्याने तोटा काहीच नाही. पण मराठ्यांची त्या निमित्तानं दिशाभूल/फसवणूक करून (म्हणजे मराठ्यांचा राग ब्राह्मणांकडे वळवून) जर मराठ्यांची मोट बांधता आली, तर त्याचा थोडा फायदाच होईल. मग काय हरकत आहे?
मराठा महासंघ नावाची संघटना गेली कित्तेक दशके महाराष्ट्रात अस्तित्त्वात आहे व त्यांचे ब्राह्मणविरोधी गरळ ओकण्याचे काम नित्य सुरूच असते. लेन्स प्रकरणाच्या वेळीच सूचलेली ही गोष्ट नाही. या फ्रींज एलिमेंट्सना राजकिय पक्ष भीक घालत नसत. तेव्हा नव्वदच्या दशकानंतर असे काही राजकारण करता येईल हे नव्याने सूचले, असे विश्लेषण मला पटलेले नाही.
यात पुन्हा एकदा असं म्हणावं लागेल की विश्लेषणात शिवाजीची व्यापक ओळख नाकारलेली नाही.
अर्थातच आपल्या हेतूंविषयी शंका नाही. पण वरील विश्लेषणातून असा समज होणे शक्य होईल असे मला वाटले.
* २२ डिसेंबर २००३: शिवसैनिकांनी भांडारकर संस्थेशी संबंधित लोकांवर हल्ला केला. संस्कृत अभ्यासक श्रीकांत बहूलकर यांना मारहाण करण्यात आली व तोंडाला काळे फासण्यात आले.
* ५ जानेवारी २००४: संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्थेत जाऊन मोडतोड केली. दुर्मीळ हस्तलिखितांचे नुकसान केले.
यावरून लक्षात यावे की संभाजी ब्रिगेडच्या गाढवांना या प्रकरणाचा राजकिय वापर करावा हा शोध लागण्यापुर्वी अशा प्रकारांत कौशल्यप्राप्त शिवसेनेने या प्रकाराचा राजकिय वापर करण्याचा प्रयत्न आधी केला. तेव्हा 'पूर्वी आपला हक्काचा मतदार असलेला मराठा समाज आपल्यापासून दूर चालला की काय याच्या भीतीतून (व असुरक्षिततेतून) ही राजकीय खेळी खेळली गेली असावी' हा दावा निराधार आहे.
तेव्हा शिवसेनेत असलेल्या राज ठाकरे यांनी बहुलकरांची माफी मागितली होती. ज्या प्रकरणाचा राजकीय फायदा उठवायचा असतो, त्या बाबतीत हे वर्तन विसंगत आहे. शिवसेनेचा अशा बाबींतला प्रघात हा माफी वगैरे मागण्याचा अजिबातच नसतो. अशी माफी नंतर ब्रिगेडनं मागितल्याचं ऐकिवात नाही.
शिवसेनेचा हल्ला तात्पुरता राजकीय खेळी मानला, तरीही इतरांना याच प्रकरणाचा राजकीय फायदा उठवण्यापासून तो परावृत्त करत नाही.
दुसरा मुद्दा: लेनच्या पुस्तकाशी संबंध नसताना बाबासाहेब पुरंदरे यांनाही ब्रिगेडने त्याच वेळी लक्ष्य केले. हे शिवसेना कदापि करणार नाही, कारण ठाकरे कुटुंब व बाबासाहेब यांची मैत्री जगजाहीर आहे. ब्रिगेडची ही खेळी लेनच्या निमित्तानं ब्राह्मणांना लक्ष्य करण्याशी सुसंगत होती.
एकंदरीत, प्रत्यक्ष कृती करणं व तिची जबाबदारी (अभिमानानं) स्वीकारणं यात किमान या प्रकरणात तरी शिवसेना काहीशी तळ्यात-मळ्यात होती. हे त्यांचं पारंपरिक वर्तन अजिबातच नाही. उलट संभाजी ब्रिगेड मात्र इथं दोन्ही बाबतींत शिवसेनेच्या पुष्कळ पुढे होती.
मराठा महासंघ नावाची संघटना गेली कित्तेक दशके महाराष्ट्रात अस्तित्त्वात आहे व त्यांचे ब्राह्मणविरोधी गरळ ओकण्याचे काम नित्य सुरूच असते. लेन्स प्रकरणाच्या वेळीच सूचलेली ही गोष्ट नाही. या फ्रींज एलिमेंट्सना राजकिय पक्ष भीक घालत नसत. तेव्हा नव्वदच्या दशकानंतर असे काही राजकारण करता येईल हे नव्याने सूचले, असे विश्लेषण मला पटलेले नाही.
एकेकाळी मराठा महासंघाला कुणी विचारत नसे हे अगदीच बरोबर. म्हणूनच भांडारकर संस्थेवरचा हल्ला ही त्यांच्या मदतीनं आपली पोळी भाजून घेण्याचा डाव होता. म्हणजे वरवर पाहाता 'आमचा यात काही हात नव्हता', असं म्हणताही येतं; पण 'ते आमचेच भाडोत्री पोळ होते, व त्यामुळे आम्हालाच कसं मराठ्यांच्या हिताचं रक्षण करता येतं' हेही दाखवून देता येत होतं.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
शिवसेनेचा अशा बाबींतला प्रघात हा माफी वगैरे मागण्याचा अजिबातच नसतो. अशी माफी नंतर ब्रिगेडनं मागितल्याचं ऐकिवात नाही.
राज ठाकरे यांनी माफी मागितली हे बरोबर. राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यात फरक केला जावा. अबू आझमीच्या थोबाडीत मारल्यानंतर मनसेच्या आमदारांनी लेखी माफी मागितली परंतु आझमीविरोध थांबवलेला नाही. २००६मध्ये शिवसेना सोडणार्या राज ठाकरेंना २००३मध्ये स्वत:च्या मनानुसार निर्णय घेणे शक्य झाले असावे. अर्थात या माफीनंतरही शिवसेनेची भुमिका जराही बदलली नाही. जेम्स लेनच्या पुस्तकाविरोधात त्यांनी इतरत्र धुमाकूळ घालणे सुरूच ठेवले होते. बंदी उठवल्यानंतर शिवसेना, मनसे या पक्षांनी केलेली विधाने, काढलेले मोर्चे यावरूनही या प्रकरणाचा राजकिय लाभ उचलण्याविषयी त्यांच्यात इतर पक्षांप्रमाणेच (राष्ट्रवादी, काँग्रेस) चढाओढ सुरू असल्याचे दिसते. राज ठाकरे यांनी तर हे पुस्तक महाराष्ट्रात विकू न देण्याचा संकल्पही सोडला आहे.
उलट संभाजी ब्रिगेड मात्र इथं दोन्ही बाबतींत शिवसेनेच्या पुष्कळ पुढे होती.
संभाजी ब्रिगेडच्या माकडांनी शक्य तितकी प्रसिद्धी मिळवण्यासाठी शिवसेनेपेक्षा पुढे राहण्याचा प्रयत्न केला, हे मान्य आहे.
लेनच्या पुस्तकाशी संबंध नसताना बाबासाहेब पुरंदरे यांनाही ब्रिगेडने त्याच वेळी लक्ष्य केले. हे शिवसेना कदापि करणार नाही, कारण ठाकरे कुटुंब व बाबासाहेब यांची मैत्री जगजाहीर आहे. ब्रिगेडची ही खेळी लेनच्या निमित्तानं ब्राह्मणांना लक्ष्य करण्याशी सुसंगत होती.
ब्रिगेड ब्राह्मणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होती यात काही शंका नाही. मराठा महासंघाच्या पारंपारीक पवित्र्याशी साजेसेच ते वर्तन होते. त्यात 'नाविन्यपूर्ण' काही नव्हते.
म्हणजे वरवर पाहाता 'आमचा यात काही हात नव्हता', असं म्हणताही येतं; पण 'ते आमचेच भाडोत्री पोळ होते, व त्यामुळे आम्हालाच कसं मराठ्यांच्या हिताचं रक्षण करता येतं' हेही दाखवून देता येत होतं.
महाराष्ट्रातील मराठ्यांनी अनेक दशके सत्ता आपल्या ताब्यात ठेवली आहे. लेन किंवा भांडारकर संस्था यांचा वापर करण्याची कुठलीही गरज 'त्या' नेतृत्वाला वाटली नसावी. अर्थात काही स्मॉल टाइम गावगुंडांना आमदारकी पदरात पाडून घेण्याकरता या प्रकाराचा फारतर उपयोग झाला असावा.
.......
या विषयाबाबत माझी असहमती आता मी पुरेशी स्पष्ट केलेली आहे. राजकारणाकडे बोट दाखवून आपल्या समाजातील मुलभूत समस्यांचे आकलन होणार नाही असे माझे मत आहे. त्या मताला बदलावे असे मला या चर्चेदरम्यान वाटलेले नाही. यापुढील चर्चाही त्याबाबत फारशी फलद्रुप ठरेल असे मला वाटत नाही. तेव्हा माझ्या बाजूने चर्चा पुढे चालू ठेवण्याबाबत उत्साह मावळला आहे. सजाण नागरिकांनी अशा प्रकारच्या वैचारीक दमनाचा विरोध करावा या आपल्या व्यापक मुद्द्याशी सहमतीचा पुनरुच्चार करून माझ्या बाजूने ही चर्चा थांबवत आहे.
_________________
बाकी चालू द्या.
राज ठाकरे यांनी माफी मागितली हे बरोबर. राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यात फरक केला जावा. अबू आझमीच्या थोबाडीत मारल्यानंतर मनसेच्या आमदारांनी लेखी माफी मागितली परंतु आझमीविरोध थांबवलेला नाही. २००६मध्ये शिवसेना सोडणार्या राज ठाकरेंना २००३मध्ये स्वत:च्या मनानुसार निर्णय घेणे शक्य झाले असावे. अर्थात या माफीनंतरही शिवसेनेची भुमिका जराही बदलली नाही. जेम्स लेनच्या पुस्तकाविरोधात त्यांनी इतरत्र धुमाकूळ घालणे सुरूच ठेवले होते. बंदी उठवल्यानंतर शिवसेना, मनसे या पक्षांनी केलेली विधाने, काढलेले मोर्चे यावरूनही या प्रकरणाचा राजकिय लाभ उचलण्याविषयी त्यांच्यात इतर पक्षांप्रमाणेच (राष्ट्रवादी, काँग्रेस) चढाओढ सुरू असल्याचे दिसते. राज ठाकरे यांनी तर हे पुस्तक महाराष्ट्रात विकू न देण्याचा संकल्पही सोडला आहे.
राज व शिवसेना यांत फरक करता येईलही, पण लेन-शिवाजी मुद्द्यावर एका बाबतीत दोहोंचं एकसंध वर्तन आहे, आणि तोच माझा कळीचा मुद्दा आहे. ती एकसंधता म्हणजे या वादाला ब्राह्मण-मराठा स्वरूप येऊ न देणं. शिवसेना व आता मनसे या दोहोंनी या प्रकरणात ब्राह्मणांना त्रास दिलेला नाही. म्हणूनच बहुलकरांची माफी मागणं या धोरणाशी सुसंगत ठरतं. त्यामुळे वरकरणी तरी हे राजचं शिवसेनेहून वेगळं वर्तन मानण्यापेक्षा या ब्राह्मणविरोधाला चिथावणी मिळेल अशी आंदोलनं टाळण्यासाठी ती माफी होती याला अधिक सबळ पुरावा दिसतो.
ब्रिगेड ब्राह्मणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होती यात काही शंका नाही. मराठा महासंघाच्या पारंपारीक पवित्र्याशी साजेसेच ते वर्तन होते. त्यात 'नाविन्यपूर्ण' काही नव्हते.
ब्रिगेडचा ब्राह्मणविरोध नवीन नव्हताच. त्याला महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मुख्य धारेत आणण्याचा प्रकार नवीन होता. आणि त्याचे खरे लेखक मराठ्यांचं लाडकं राजकीय नेतृत्व होतं. एकेकाळी महाराष्ट्रानं ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद मोठ्या प्रमाणात भोगला होता; पण भांडारकर संस्थेवर हल्ला झाला, त्या आधीच्या काळात ब्राह्मणविरोध हा काही निवडणुकीतला मुद्दा नव्हता. या सर्व प्रकरणानं तो तसा बनवला गेला. हेच त्या राजकीय विश्लेषणात मांडायचं होतं.
असो. तूर्तास मीही लेखातल्या राजकीय विश्लेषणाबद्दलची मांडणी थांबवतो आणि प्रतिसादांमध्ये आलेल्या इतर काही मुद्द्यांचा परामर्ष घेतो. मात्र त्यासाठी थोडा धीर धरावा ही विनंती.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
भारतीय राजकारणात निम्म्याहुन जास्त गोष्टी या मतांच्या राजकारणावरुनच होतात. नेत्यामधे पॉवर असते आणि त्याचा व्यवस्थित गैरफायदा घेतला जातो. संभाजी ब्रिगेड हे त्याचेच पिल्लु.
संभाजी ब्रिगेडचा नवीन फतवा - निनाद बेडेकर, बाबासाहेब पुरंदरे, या इतिहासकारांना सातार्यात बंदी का तर त्यांनी जेम्स लेन ला पुस्तक लिहायला मदत केली.
अशावेळी कोणताच राजकीय हस्त़क्षेप का नाही होत?बंदी घालणारे हे कोण?
ज्या लोकांनी हे प्रकरण उचलुन धरले आहे त्यापैकी किती जणांनी किल्ल्यांच्या जिर्णोद्धारासाठी पुढाकार घेतलाय?
आज जर एखाद्या पक्षाला मराठा विरुध्द ब्राम्हण हा वाद चिघळत ठेवुन मराठा वोट बँक आपल्या बाजुने वळवण्यात यश येते आहे असा दुसर्या एखाद्या पक्षाला अंदाज आला तर जुन्याच हिंदु विरूध्द मुस्लिम ह्या वादाला पुन्हा मैदानात आणले जाऊ शकते.
मंडल आयोग विस्मरणात जाऊ देवु नका.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
यातून आपण एक समाज म्हणून आपली वैचारिक दिवाळखोरी जगजाहीर करतो
सहमत आहे.मराठी/मराठा वा हिंदु अस्मिता,एकूणच ह्या वृत्तींना पाठिंबा देणारे मराठी सुशिक्षित्,त्यांना ती अस्मिता पटवून देणारे राजकारणी , एकंदरितच महाराष्ट्रात वैचारिक अपरिपक्वता जाणवते.
---------------
बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
हा लेख लिहिल्याबद्दल चिंतातुरजंतुंचे अभिनंदन!
कारण ''हाणा, मारा, झोडा, ठेचा'' च्या सध्याच्या गदारोळात अत्यंत संयतपणे असे विचार मांडायला धैर्यच लागते.
आज शिवाजी महाराजांच्यावर लिहिलेल्या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालायचे चालू आहे. शिवराय लोकप्रिय वीरपुरुष, स्वराज्यसंस्थापक होते, आहेत व राहतील. पण त्या लेनच्या लिखाणाच्या निमित्ताने आपला समाज मतभिन्नता, वेगळी दृष्टी किंवा पाश्चात्याच्या दृष्टीने केलेली लोकप्रिय व्यक्तिमत्वाची मीमांसा(??) स्वीकारण्यास कितपत परिपक्व (???) आहे हे पुन्हा एकदा नजरेसमोर आले. आपली ती मानसिकताच नाही हे अधोरेखित झाले. आम्ही आजही बालिशच आहोत व त्यातच आम्हाला भूषण आहे!
त्यामुळे वाटते की आज एका पुस्तकावर बंदी घालण्याने काम भागेल.
पण भविष्यात कोण कोणाविषयी ''लोककथा, मिथके'' वगैरेंच्या आधारावर काय काय लिहू शकेल ह्याची कल्पना करता येत आहे काय? आणि त्यावर उसळणारे जनक्षोभ आपल्याच जनतेची वैचारिक, मानसिक, शारीरिक व आर्थिक हानी किती प्रकारे करु शकतात ह्याचीही जाणीव ठेवायला हवी. कळपातल्या मेंढरांना कळत नाही कित्येकदा ती कोणत्या दिशेने जात आहेत ते! पण समाजातील दिशादर्शक व्यक्तिमत्वांनी समाजात प्रक्षोभ होऊ नये आणि तसा तो होऊ लागला तर प्रक्षोभ निर्माण करणार्या सर्वच घटकांना आपल्या जबाबदारीचे भान आणून देणे फार गरजेचे आहे. त्यासाठी अजून आग्रही भूमिका हवी. फक्त आपल्या व्होटबँकचा, आपल्या व्यक्तिगत स्वार्थाचा विचार करणारे समाजाला रसातळाचा मार्ग दाखवत आहेत हे मात्र नक्की!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
डिस्क्लेमर –
१. मला ब्राह्मण – ब्राह्मणेतर या वादात पडायचे नाही. मी हा “वाद” मुळातच नाकारतो. माणसाला जातींच्या (फ़ॉर दॅट मॅटर धर्म/ भाषा/ लिंग) रकान्यात बसवणे, आणि त्यावरून त्याचे अमुक अमुक इंटरेस्ट असावेत असं ठरवणं मला मान्य नाही.
२. प्रस्तुत प्रतिसादात मी ब्राह्मण, मराठा, ब्राह्मणेतर इ. जातीवाचक समूहनामे वापरली आहेत, ती केवळ मला दुसरा पर्याय नाही म्हणूनच. कारण प्रतिवाद करण्याच्या मुद्यात ही नामे वापरली आहेत.
लेख वरवर पाहता संयत आणि विचारी वाटतो. पण तसे नाही. लेख पक्षपाती आहे असे जाणवते. खुद्द लेखकाला तरी याची कल्पना आहे की नाही हे समजायला मार्ग नाही. (म्हणजे जाणीवपूर्वक तसे लिहिले आहे, की तसे होत गेले आहे- अशा अर्थाने.) आश्चर्य असे की क्रेमर, वेताळ आणि मैत्र वगळता एकतर कुणी त्यांची नोंद घेतलेली नाही, किंवा नोंद घेऊनही प्रतिसाद दिलेला नाही. असो.
माझा प्रतिसाद पुस्तकाला नाही, तर या लेखाला आहे.
एका काळापर्यंत महाराष्ट्र सरकारचे व त्या अनुषंगानं पवार यांचे लेनसारख्यांशी - म्हणजे व्यक्तिश: लेनच असं नाही, पण महाराष्ट्राविषयी काम करणाऱ्या परकीय इतिहास संशोधकांशी - चांगले घनिष्ठ संबंध होते. उदा: "House and Home in Maharashtra, New Delhi, Oxford University Press, १९९८" हे पुस्तक पाहावे. त्यात परदेशात महाराष्ट्राविषयी घडलेल्या एका चर्चासत्रातले शोधनिबंध आहेत. चर्चासत्राची सुरुवात पवारांच्या बीजभाषणानं झाली होती. म्हणजे पवार त्या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी परदेशात गेले असावेत. अशा चर्चासत्रांना, यात आणि इतरत्र प्रकाशित झालेल्या अनेक संशोधकांना पवारांनी सरकारतर्फे (मुख्यमंत्री म्हणून) मदत केली होती. महाराष्ट्रावर होणाऱ्या संशोधनाशी त्यामुळे ते परिचित असावेत. लेन हा त्यांपैकी एक होता.
या पार्श्वभूमीवर भावना भडकावून राजकीय फायदा उठवता येईल असा मुद्दा म्हणून लेनचा कोलीत म्हणून वापर केला जाऊ शकतो, याची जाणीव मराठा नेतृत्वाला झाली असावी.
लेखाच्या या दुसर्या भागात आडून आडून असे सुचवलेले आहे, की लेनच्या कानावर ही “वदंता” मराठा नेतृत्त्वाने (पवार) घातली (असावी). भांडारकर संस्थेतल्या “ब्राह्मणांनी” नाही. हा अंदाज जस्टिफाय करण्यासाठी एक विश्लेषण मांडलेले आहे. वेल. काही लोक म्हणतात ही “वदंता” लेनच्या कानावर ब्राह्मणांनी घातली. तसं म्हणणार्यांचंही एक विश्लेषण आहेच. हे विश्लेषण आणि ते विश्लेषण यांची कुस्ती न संपणारी आहे. ब्राह्मणविरोधी गटाची, म्हणजे संभाजी ब्रिगेड/ मराठा महासंघ, भाषा आणि कृती हिंसक आहे, भडक आहे; तर प्रस्तुत लेखातील भाषा हिंसक नाही, भडक नाही. (मी संयत म्हणणार नाही – लेख मुळीच संयत नाही. कसे ते पुढे येईलच.) एवढाच फरक. दोन्ही आरोप, अंदाज आणि विश्लेषणे तितकीच बरोबर किंवा चूक आहेत. त्यामुळे यावर माझा एवढाच प्रतिसाद, की ब्रिगेडच्या हिंसक भाषेचा आणि कृतीचा मी निषेध करतो. या लेखातील भाषा शांत आहे, एवढेच. कोणतेही विश्लेषण मान्य केले तरी एक गोष्ट निर्विवादपणे दोन्ही पक्ष मान्य करतात – ते विशिष्ट वाक्य (“वदंता”) त्या पुस्तकात घालण्याचा हेतू राजकारण होता.
म्हणजेच निखळ इतिहास संशोधन नव्हता.
इथेच लेखातील विसंगती उघडी पडते. पहिल्या भागात काय म्हटले आहे –
ज्याची सत्यासत्यता अस्पष्ट आहे किंवा जी असत्यच आहेत अशी साधनंही इतिहासाचा अभ्यास करताना वापरता येतात याची जाण आपल्याकडे फारशी दिसत नाही. मिथकं आणि लोककथा यांचा वापर इतिहासात अशाच प्रकारे केला जातो. त्याची एक पध्दत आहे. त्याचे काही उपयोग आहेत. उदा. रामाविषयी उत्तरेत निर्माण झालेल्या लोककथा आणि दक्षिणेत निर्माण झालेल्या लोककथा यांचा तौलनिक अभ्यास केला तर त्यांत रामाची प्रतिमा भिन्न दिसते. रामाच्या दक्षिण विजयाविषयी जित (म्हणजे हरलेल्या) दक्षिणी लोकांचा जो विचार दिसतो, तो रामाला देव न मानता मर्त्य आणि स्खलनशील दाखवतो. किंवा, शकुंतला-दुष्यंताच्या मूळ कथेतली शकुंतला स्वाभिमानी आहे पण कालिदासाच्या नाटकात ती दुष्यंतानं आपला स्वीकार करावा यासाठी खूप झटते कारण ती कालिदासाच्या काळातल्या पुरुषप्रधान संस्कृतीनुसार वागते. अशा प्रकारे कालसापेक्ष, समाजसापेक्ष विश्लेषण करण्यासाठी लोककथांचा वापर करणं ही इतिहास संशोधनातली एक रूढ पद्धत आहे. हीच पध्दत लेन शिवाजीच्या आजूबाजूला निर्माण झालेल्या मिथकांना लावतो.
म्हणजे, इथे असं म्हणायचं आहे, की लेनने जे “वदंते”विषयी लिहिलंय ती एक इतिहास संशोधनाची पद्धतच आहे. क्षणभर मान्य करू. म्हणजे ही वदंता उल्लेखिण्यामागे राजकारण नव्हते.
मग मराठा नेतृत्त्वाच्या धूर्त राजकारणाचे विश्लेषण करायची काय गरज होती? जर लेन स्कॉलर आहे, तर त्याला स्कॉलरच राहू देत ना. त्याला बिचार्याला “कोलीत” कशाला म्हणताय? त्याने स्वत:ला असं राजकारण्यांना वापरू दिलं असं का म्हणताय?
आता विसंगतींचा मुद्दा बाजूला ठेऊ. या लेखाच्या पहिल्या भागाचा परामर्ष घेऊ.
जी असत्यच आहेत अशी साधनंही इतिहासाचा अभ्यास करताना वापरता येतात याची जाण आपल्याकडे फारशी दिसत नाही.
रामाच्या आणि शकुंतलेच्या उदाहरणावरून रामाचं आणि शकुंतलेचं संशोधन होत नाही, तर ज्या काळात त्या कथा लिहिल्या गेल्या त्या काळातल्या समाजाचं संशोधन होत असतं. बरोबर? शिवाजीच्या आईचं चारित्र्यहनन करणारा “नॉटी” जोक मराठी माणसं एकमेकांना सांगतात असं लेननं म्हणणं म्हणजे शिवाजीचं संशोधन नव्हे, तर जो समाज शिवाजीविषयी असं बोलतो, त्या सध्याच्या मराठी समाजाचं संशोधन. बरोबर? म्हणजे, याचा अर्थ असा होतो की शिवाजीला सध्याच्या मराठी समाजात देव मानलं जात नाही, सामान्य माणूस मानलं जातं. त्याची आई चरित्रहीन होती, स्खलनशील होती, असं मराठी लोक सहजपणे मान्य करतात, त्यावर “नॉटी” जोकपण करतात. इतके मराठी लोक मनमोकळे आहेत, ‘पुढारलेले’ आहेत. असा या विधानाचा अर्थ होतो. असं आहे का? शिवाजीला देव न मानता हाडामांसाचा माणूस मानणारे बरेच लोक असतील. पण जिजाबाईंना स्खलनशील मानणारे किती लोक आपण किंवा लेनने पाहिले आहेत? मी तरी आजपर्यंत मी ज्या ज्या लोकांच्या संपर्कात इतके वर्षांत आलो, त्यातले आपणच पहिले, (आणि नाइल दुसरे) जे म्हणाले, की मी असं असं ऐकलं होतं बुवा. त्यातही आपणही असं म्हणालेला नाहीत, की मी हे मानतो, किंवा मी हा जोक “नॉटीली” मित्रांना सांगितलेला आहे, किंवा मला कुणीतरी हा “नॉटी” जोक सांगितलेला आहे. (लेनला असे नॉटी मराठी लोक कुठे भेटले असावेत बरं? मला बघायची इच्छा आहे त्या विचारवंतांना.)
मिथकं आणि लोककथा यांचा वापर इतिहासात अशाच प्रकारे केला जातो. त्याची एक पध्दत आहे.
शिवाजीच्या आईचं चारित्र्यहनन हे मिथक की लोककथा? आणि ही लोककथा केंव्हा आली अस्तित्त्वात? इंग्रजांच्या पत्रांत आहे की पोर्तुगीजांच्या? औरंगजेबाच्या अखबारांमध्ये होती का ही लोककथा? शिवाजीच्या स्वत:च्या काळात त्याच्या जानी दुश्मनांनी ज्या हीन गोष्टीचा विचार केला नाही, ती ‘लोककथा’ आली कोणत्या काळात? आणि कुणी आणली? का आणली? आपण खालील गोष्ट बोलून मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारलेला आहे –
अशी वदंता खरंच अस्तित्वात आहे का? तर नक्कीच आहे. इतरांविषयी सांगू शकत नाही, पण पुण्यात ब्राह्मणी वातावरणात वाढलेल्या लोकांना कधीतरी असं काहीतरी कानावर येतं. उदा: दत्तो वामन पोतदार यांच्या हे (म्हणजे शिवाजीच्या पितृत्वाविषयीची कथित बाब) लक्षात आलं पण त्यांनी त्याची जाहीर वाच्यता कधी केली नाही असं माझ्या स्वत:च्या कानावर आलं होतं. त्याला आता कित्येक वर्षं लोटली. तेव्हा जेम्स लेनचं अस्तित्व आमच्या दखलपात्रही नव्हतं. त्यामुळे या वदंतेला जन्म देणारा मनुष्य लेन खचितच नाही. त्याला निव्वळ तिची वाच्यता करण्याबद्दल (आणि तेही शिवाजीविषयीच्या मिथकं/लोककथांच्या चर्चेच्या चौकटीत ती करण्याबद्दल) झोडपणं म्हणजे निरोप्याला जीवे मारण्यासारखं आहे.
म्हणजे आपण हे मान्य केलंत की पुण्यातल्या (काही) ब्राह्मणांना ही ‘वदंता’ माहीत होती. ही गोष्ट शिवाजीच्या समकालीनांना माहीत नव्हती. त्याच्या हितशत्रूंना देखील माहीत नव्हती. अशा परिस्थितीत कसलाही शंकेचादेखील आधार नसताना अशी वदंता एका ठरावीक भागातच, ठरावीक लोकांमध्येच अस्तित्त्वात येते तेंव्हा कुणीही हेच म्हणणार, की या वदंतेचा जन्म तिथेच झाला. आपण वरील गोष्ट जाहीरपणे मान्य करून जातीयवादाच्या आगीत तेल ओतले आहे हे नम्रपणे नमूद करतो. महामहोपाध्याय द. वा. पोतदार सूज्ञ होते. कोणती गोष्ट खाजगी ठेवायची, कोणती जाहीर करायची याची जाण त्यांना होती. लेनला नाही. त्याला ज्या कुणी ही वदंता सांगीतली त्यांनाही नाही. आणि आपल्यालाही नाही असे खेदाने म्हणावे लागते. आपण नुसतेच मान्य केले नाही, तर या बेसलेस गॉसीपला लोककथा/ मिथक यांच्याशी तोलून त्याचा सांगोपांग अभ्यास व्हावा असेही सुचवत आहात!
एखादी वदंता अस्तित्वात आहे असं म्हणणं हे पुस्तकात गैरलागू आहे का? तर अजिबात नाही. कारण पुस्तकाचं स्वरूपच शिवाजीविषयीची मिथकं, आख्यायिका, लोककथा यांचा धांडोळा घेऊन त्यातून काय बोध होतो, ते पाहणं हा आहे. त्यामुळे अशा वदंतेचा उल्लेख करणं या पुस्तकाच्या एकंदर स्वरूपाशी सुसंगत आहे.
इ एच कार चे व्हॉट इज हिस्टरी वाचावे. कशाची दखल इतिहासाच्या अभ्यासकाने घ्यावी आणि कशाची नाही हे त्याने छान समजावून सांगितले आहे. असे नॉटी जोक खूपजणांचे सांगता येतील. त्यात काय, डॉमनिक लॅपिएरचं फ्रीडम ऍट मिडनाईट वाचा. भरलंय ते असल्या नॉटी जोक्सनी. सावरकर म्हणू नका, नेहरू म्हणू नका, आणि संस्थानिक तर काय आगारच नॉटी जोक्सचं. तो काय इतिहास आहे काय? तो डॉमनिक लॅपिएरचा मानसिक इतिहास आहे. (म्हणजे त्याच्या कल्पनेतला इतिहास नव्हे, तर त्याचं स्वत:चं मन कसं आहे हे दाखवणारा या अर्थाने.) तसंच हे पुस्तक म्हणजे लेनचा मानसिक इतिहास आहे का? अगदी तो ‘कोलीत’ आहे, ‘निरोप्या’ आहे हे मान्य केले तरी. त्याने कशाला व्हायचे कोलीत किंवा निरोप्या असल्या बेसलेस गॉसीपचा?
मी पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे ते इतिहासाचे पुस्तक आहे, की “शिवाजीविषयीची मिथकं, आख्यायिका, लोककथा यांचा धांडोळा घेऊन त्यातून काय बोध होतो”, ते पाहणारं समाजाच्या मानसशास्त्रावरचं पुस्तक आहे हे मला माहीत नाही. इन एनी केस, शिवाजीच्या आईचं चारित्र्यहनन करणारा आधार नसलेला एक किस्सा, जो खरोखर समाजात प्रचलित नाही, (
पुण्यात ब्राम्हणी वातावरणात वाढलेले
(काही) लोक सोडता कुणाला ते आतापर्यंत खरेच माहीत नसावे) तो लिहून आणि त्याचा विचार करून ना इतिहासाचा अभ्यास होऊ शकतो, ना समाजमनाचा अभ्यास होऊ शकतो. मग शक्यता दोन. लेनने अभ्यासू भाबडेपणाने या ‘वदंते’चा उल्लेख केला. खोडसाळ लोकांनी त्याला ‘कोलीत’ म्हणून वापरले आणि तो मूर्खपणे ‘निरोप्या’ बनला. दोन – त्यानेच, वाद निर्माण करून प्रसिद्ध होण्यासाठी खोडसाळपणे हा उल्लेख केला. म्हणजे एकतर तो मूर्ख आहे किंवा समाजकंटक आहे. किंवा दोन्ही आहे. अभ्यासक नाही. विचारांचे दमन इ. शब्द मी काही प्रतिसादांमध्ये वाचले. इथे काही विचार लेनने मांडला आहे असे वाटते का? म्हणजे मी वादग्रस्त वाक्यापुरते बोलतोय. म्हणजे आपल्या लेखातला पहिला मुद्दा बाद. दुसरा मुद्दा राजकीय विश्लेषणाचा. क्रेमर त्यावर कुस्ती करून दमले आहेत. मला त्यावर काय वाटते ते वर आलेले आहेच. माझा पॉइंट वेगळाच आहे.
पुस्तकाकडे दुर्लक्ष करणे योग्य होते. पण त्याला प्रसिद्ध केले आणि डॅमेज इज डन. आता काहीही करता येणार नाही. त्याने लोकांचा ‘ऑथेल्लो’ ऑलरेडी केलेला आहे. प्रतिसादांवरून लक्षात आले. काही लोकांच्या का होईना मनात संशयाची पाल हळूच चुकचुकली – खरं असेल का ते? खरंच जिजाबाई अशा असतील? त्याशिवाय असल्या स्कॉलरशिपचा पुरस्कार होणार नाही. लेनला या वदंतेचा उल्लेख करायचाच होता, तर फार तर त्याने असे लिहायला हवे होते, (‘पुण्यातल्या, ब्राह्मणी वातावरणात वाढलेल्या’) काही लोकांच्या कानावर अशी अशी काही आधार नसलेली गोष्ट (अधूनमधून) येत असते, त्यावरून अशा गोष्टी करणारे आणि पसरवणारे लोक हे असा असा विचार करतात असे दिसून येते. कंसातले शब्द ऑप्शनल. (तरीसुद्धा घाण ठरलेली होतीच म्हणा.)
मला विचाराल तर त्याने हे लिहायला नको होते.
आणि तुम्हीही हे लिहायला नको होते. म.म. पोतदारांसारखे दुर्लक्ष करायला पाहिजे होते. खाजगीत बोला काय वाटेल ते. असे जाहीरपणे नको.
त्याचे कसल्याही प्रकारचे समर्थन चुकीचे आहे. करू नये. त्याला विरोध करण्यामागे राजकारण असेलही. पण समर्थन करण्यामागे कसलाही वैचारिक आधार नाही. मी सेन्सॉरशिपचे समर्थन किंवा विरोध, काहीच करत नाही. तसा कुठलाही एक स्टॅंड घेता येत नाही. रस्त्यावर कपडे घालून फिरणारी माणसे असतात. रस्त्यावर कपडे काढून फिरणारी माणसे देखील इंटरनेटच्या कृपेने सचित्र बघायला मिळतात. ज्या समाजात नागडे फिरायचे कुणी मनाला लावून घेत नाही तिथे फिरतात काही लोक. ज्या समाजात असं नागडं फिरणं लोक पसंत करत नाहीत तिथं कपडे घालून फिरावे हे बेसीक शहाणपण आहे. द. वा. पोतदारांनी ते शहाणपण वापरले होते. म्हणून तोंडात तीळ भिजवला.
लेनवर बंदी घालण्याच्या मुद्याचं म्हणाल तर रस्त्यावर नागडं फिरणार्या माणसाकडं दुर्लक्ष करावं का अटक करावं असा तो प्रश्न आहे. माझ्या मते अटक करावं. पुस्तकावर बंदी घाला. वादळ उठलंय म्हणून. त्याचं वाचन नको. त्यावर चर्चाही नकोत. राजकारणही नको. वादळ उठलं नसताना, सगळं सामसूम असताना बंदी घालणं चुकीचं पण आहे, आणि मूर्खपणाचं पण आहे. आयदर दुर्लक्ष करा ऑर बंदी घाला. दुर्लक्षही करायचं नाही, बंदीही घालायची नाही, काय लिहिलंय ते वाचा, विचार करा म्हणायचं...विचारांचं दमन करू नका म्हणायचं... बात हजम नही होती.
मी एवढा वेळ घालवून हे का लिहिले?
ही जागा चांगली आहे. बरेच लोक इथे लिहितात, वाचतात. मराठी वाचणारे सगळ्या जातींधर्मांचे लोक येतात इथे. पुढे जाऊन ही जागा अजून समृद्ध व्हावी अशी मनापासून इच्छा. अशा सुंदर जागेवर ना कुणी तथाकथित ब्राह्मणविरोधाचे समर्थन करावे, ना तथाकथित ब्राम्हणांचे समर्थन करावे. या लेखात आणि काही प्रतिसादांत तथाकथित ब्राह्मणवादाचे/ ब्राह्मणांच्या बाजूचे समर्थन दिसले. ब्रिगेडला ती रिऍक्शन असेल. नकळत झाले असेल. पण असं दिसतंय हे खरं. लेख अनेकांना संयत आणि विचारी वाटला याचं आश्चर्य वाटलं.
मी ही गोष्ट संभाजी ब्रिगेडला सांगायला जाणार नाही. तिथे उपयोग नाही. (मी काही ब्रिगेडियरांशी(!) बोलून पाहिलेले आहे.) इथे सांगाविशी वाटली. उपयोग होइल असं वाटतं. कुणाशी ओळख नसतानाही मला काही लोकांच्या लिखाणामुळे आपलेपणा वाटतो. म्हणून बोललो. मैत्री असती तर हक्काने जंतूंना सांगितले असते, असे लिहू नका. या जागेला कसला टॅग लागू नये ही सदिच्छा. लेन म्हणा, संभाजी ब्रिगेड म्हणा, लक्ष देऊ नये हे उत्तम. दुर्लक्ष करण्यात कसली वैचारीक दिवाळखोरी नाही. नॉन इश्यू ला आपण इश्यू बनवत आहात हे लक्षात घ्यावे.
आळश्यांचा राजा
लेखाच्या या दुसर्या भागात आडून आडून असे सुचवलेले आहे, की लेनच्या कानावर ही “वदंता” मराठा नेतृत्त्वाने (पवार) घातली (असावी). भांडारकर संस्थेतल्या “ब्राह्मणांनी” नाही. हा अंदाज जस्टिफाय करण्यासाठी एक विश्लेषण मांडलेले आहे.
हा आपला गैरसमज आहे. तो माझ्या लिखाणातल्या कशामुळे झाला ते कळत नाही. कारण मी पवारांना लेनच्या संशोधनाची कल्पना असावी (महाराष्ट्रावर संशोधन करणार्या या परदेशी संशोधकांच्या परिचयात आल्यामुळे) असा अंदाज बांधला होता. लेनला पवारांनी ही वदंता सांगितली असावी असं मला सुचवायचं नव्हतं. त्यासाठी पुण्यातले ब्राह्मण पुरेसे होते, याविषयी मला जवळपास खात्री आहे.
म्हणजे, इथे असं म्हणायचं आहे, की लेनने जे “वदंते”विषयी लिहिलंय ती एक इतिहास संशोधनाची पद्धतच आहे. क्षणभर मान्य करू. म्हणजे ही वदंता उल्लेखिण्यामागे राजकारण नव्हते.
मग मराठा नेतृत्त्वाच्या धूर्त राजकारणाचे विश्लेषण करायची काय गरज होती? जर लेन स्कॉलर आहे, तर त्याला स्कॉलरच राहू देत ना. त्याला बिचार्याला “कोलीत” कशाला म्हणताय? त्याने स्वत:ला असं राजकारण्यांना वापरू दिलं असं का म्हणताय?
लेनला स्कॉलर राहू देणं मला आवडेल. त्याला तसं राहता येत नाही, यामागे धूर्त राजकारण आहे. म्हणून त्याचं विश्लेषण. ते तुम्हाला पटत जरी नसलं, तरीही त्याची गरज लेनचं उत्तरदायित्व मर्यादित करण्यासाठी आहे. लेन स्वतःच्या मर्जीनं कोलीत झाला आहे, असं मला वाटत नाही. कारण त्याला महाराष्ट्रावर पुढे संशोधन करायला आवडलं असतं, असं वाटतं. ते आता इतक्यात तरी शक्य दिसत नाही.
तुमच्या मते मग लेन कदाचित मूर्ख किंवा भाबडा ठरेलही. पण हेही लक्षात घ्या, की हे प्रकरण होईस्तोवर महाराष्ट्रात अशा प्रकारे संशोधकांना झुंडशाहीचे अनुभव आलेले नव्हते. आपल्या संशोधनामुळे असं काही होऊ शकतं, हे कळल्यावर भांबावलेले संशोधक मी पाहिलेले आहेत (लेन नव्हे).
असो. उरलेल्या मुद्द्यांना सावकाश उत्तर देईन.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
प्रतिसादही मस्त आहेत. फक्त लेनप्रकरणात कोणत्या एकाच समाजाच्याच भावना दुखावल्या जात आहेत की सर्वच स्तरातून अशा भावना दुखावल्या ते चर्चेतून काही स्पष्ट झाले नाही. लेखन स्वातंत्र्यावर गदा येते वगैरे फारसे महत्त्वाचे गदारोळ करणार्यांना वाटत नाही. लेखक-कलावंतांनी क्षमा मागितली की त्या वादावर पडदा पडतो. असो, यावरुन इतिहासात एक तोड-फोडाची वाचलेल्या गोष्टीची आठवण सांगाविशी वाटते. घाशीराम कोतवाल नाटकाचा खास प्रयोग बाळासाहेब ठाकरेंसाठी झाला त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र मिळाले आणि त्या नाटकाचा पुढे परदेशगमनाचा मार्ग मोकळा झाला. 'शिक्षणाच्या आयच्या घो' हे शिर्षक ज्यांना आक्षेपार्ह वाटत होते त्या संस्कृती रक्षकांनी निर्मात्यांशी 'अर्थपूर्ण' संवाद साधून चित्रपटाचा मार्ग मोकळा केला. वरील उदाहरणातून मला म्हणायचे की आहे विनोदी स्वरुपात बोलल्या गेलेले लेखन आक्षेपार्ह ठरले, भावना दुखावल्या गेल्या. जर असाच अर्थपूर्ण संवाद लेनने संबंधीतांशी केला असता तर भावना दुखावल्या असत्या काय ? काय वाटते ?
-दिलीप बिरुटे
आतापर्यंत लेखातल्या राजकीय विश्लेषणाविषयी प्रतिसादांत आलेल्या मुद्द्यांना संबोधलं होतं. हा प्रतिसाद मुख्यत: लेन, एकंदर संशोधक/विचारवंत आणि इतर सुशिक्षित समंजस समाज यांच्यातल्या दोष-गुणांविषयी आहे.
शिवाजी ही व्यक्ती वास्तवात घडून गेली असताही / इतर दस्तऐवज सोडून लोककथा, मिथक, सांगोवांगी वगैरेंचा विचार करावाच तरी कशाला?
शिवाजीचं पितृत्व हा संशोधनाचा विषय कसा ठरू शकतो? वगैरे
कोणत्याही ज्ञानशाखेत वरील प्रकारचे प्रश्न अप्रस्तुत ठरतात. कारण कोणत्याही विषयाशी संबंधित उपलब्ध साधनांना वाजवी विश्लेषण पध्दतींच्या आधारावर तोलता येणं हे त्या त्या ज्ञानशाखेत अंतर्भूतच असतं. म्हणजे काय? तर एकदा मिथकं, आख्यायिका, लोककथा ही इतिहासाची साधनं मानली, आणि त्यांना घेऊन काय प्रकारचं विश्लेषण केलं तर ते इतिहास संशोधन म्हणून वाजवी ठरतं हे एकदा लक्षात घेतलं, तर मग विश्लेषण कुणाहीविषयी करता येतं. यायला पाहिजे. मग शिवाजीचा अपवाद करता येत नाही. आपण हीच बाब विसरतो आहोत, म्हणूनच त्याची जाणीव करून द्यावीशी वाटली.
लेन ने पुस्तकात, प्रस्तावनेत किंवा इतरत्र लेखी किंवा पत्रकारांसमोर असं विधान केलं आहे काय की या पुस्तकातलं संशोधन हे इतिहासाचा आढावा, माझा दृष्टिकोन, इ. नसून मिथकं, लोककथा यांचा धांडोळा घेऊन तो काळ आणि समाजव्यवस्थेतला महाराजांचा संदर्भ उभा करण्याचा प्रयत्न आहे?
पुस्तकाचं स्वरूप हे शिवाजीविषयीच्या विविध कथनांचा धांडोळा (आणि विश्लेषण) असंच आहे. उदा. http://www.amazon.com/Shivaji-Hindu-King-Islamic-India/dp/0195141261 इथे पुस्तकाचं वर्णन पाहा. आणि हे ही लक्षात घ्या की हा इतिहास या ज्ञानशाखेचा एक भाग आहे. म्हणजे असा आढावा हा इतिहासाचाच एक उपप्रकार असतो.
लेखात लेनचं समर्थन आहे, पण लेनचं लिखाण असमर्थनीय आहे.
लेखात लेनचं समर्थन नाही, तर त्यानं वापरलेल्या विश्लेषण पध्दतीचा उल्लेख आहे आणि ती इतिहास संशोधनामध्ये वाजवी आहे असं म्हटलेलं आहे. कारण बऱ्याच जणांना अजूनही असंच वाटतं की लेन सांगोवांगीच्या गोष्टी वापरतो म्हणजे तो खोडसाळ किंवा वाईट इतिहास संशोधक आहे. लेनचं समर्थन असेल तर ते इतकंच की त्यानं वापरलेली पध्दत मुळात गैर नाही; त्यामुळे त्यानं काढलेले निष्कर्ष इतिहास तज्ञांनी तपासून पाहिले पाहिजेत. तसं होण्यासाठी पुस्तक उपलब्ध झालं पाहिजे. त्याचे निष्कर्ष सार्थ आहेत की नाहीत याविषयी माझा अभ्यास अपुरा पडतो, त्यामुळे त्याबद्दल मी काही मतप्रदर्शन करू शकत नाही. जाताजाता हे मात्र नमूद करावं लागेल की शिवाजीच्या पितृत्वाविषयी त्यानं कसलाही निष्कर्ष काढलेला नाही.
लेन कुणी आतंरराष्ट्रीय ख्यातीचा इतिहास संशोधक किंवा लेखक नाही आहे.
ज्याचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळीच्या प्रकाशनांमध्ये प्रसिध्द झाले आहेत, जो एका अमेरिकन विद्यापीठात प्राध्यापक आहे अशा माणसाविषयी असं विधान धाडसी ठरेल.
व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली असली थेरं नको
ब्रिगेडच्या लिखाणावर बंदी यावीच. तशीच या लेनच्या पुस्तकावर घालण्यात काय चूक आहे?
हे व्यक्तीस्वातंत्र्य नाही तर ज्ञानविस्ताराच्या शक्यता खुल्या ठेवायला पाहिजेत असं प्रतिपादन आहे. पुन्हा हे लक्षात घ्या की ज्ञानशाखांची त्यांची त्यांची म्हणून काही शिस्त असते. त्या शिस्तीत कोणताही उपविषय वर्ज्य नसावा. तो वर्ज्य केला, तर समाजाची दीर्घगामी हानी होते. ती कशी हे पाहायला मध्यपूर्वेतले देश हे उत्तम उदाहरण ठरावेत. एकेकाळी तिथे निर्माण झालेलं ज्ञान युरोपात जायचं; कारण अनेक ज्ञानशाखांचा विस्तार युरोपात कमी झाला होता, पण मध्यपूर्वेत पुष्कळ झाला होता. हळूहळू प्रश्न विचारण्यावर, शंका काढण्यावर प्रतिबंध आले. तसा ज्ञानशाखांचा विस्तार थांबला. युरोपात उसनं ज्ञान घेऊन तो सुरु झाला असला तरी पुढे अखंड चालू राहिला. अखेर युरोप पुढे गेला आणि मध्यपूर्व मध्ययुगातच राहिली. आपण कुठे असावं हे आपणच ठरवायचं आहे.
तथाकथित विचारवंतांचा पळपुटेपणा, कातडीबचाऊपणा वगैरे आणि हा विषय मूळ लेखात वगळणे.
याचा प्रतिसाद हसत खेळत द्यायचा झाला तर असं म्हणता येईल, की विचारवंतांवर टीका करायला तत्पर असे पुष्कळ लोक या संस्थळावर कार्यरत आहेत. त्यात मी पामर (तोही नावात जंत असणारा!) काय भर घालणार?
असो. मुळात विचारवंत हे काही आकाशातून पडलेले नसतात. ज्या सुशिक्षित समाजाचा आपण सर्व एक भाग आहोत, त्यातलेच काही अत्यल्प लोक बुद्धिजीवी म्हणता येतील असे पेशे स्वीकारतात. त्यांचे गुणदोष हे देखील आपल्या गुणदोषांसारखेच असतात. इतर समाजघटकांप्रमाणेच ते देखील भ्याड, भ्रष्ट वगैरे असू शकतात. विविध व्यवसायांत काम करणाऱ्या आपणापाशी जर झुंडशाही आणि दमनाला प्रतिकार करण्याचं धैर्य नाही, तर निव्वळ विशिष्ट पेशातल्या लोकांकडे ते असावं अशी अपेक्षा वाजवी आहे का? चांगला इतिहास संशोधक हा निर्भीड असेलच असं नाही. तुम्ही निर्भीड नसाल तर शिवाजी हा तुमच्या संशोधनाचा विषयच ठरू शकत नाही अशी आज परिस्थिती आहे. यानं किमान काही चांगले इतिहास संशोधक शिवाजीपासून दूर पळत असणारच. हे खेदजनक नाही का? यात एक समाज म्हणून आपली हानी नाही का?
हे अर्थात विचारवंतांच्या भ्याडपणाचं समर्थन नाही. तुर्कस्तानसारख्या देशात राहून आर्मेनिअन लोकांचा तुर्कांनी केलेला छळ आणि सामूहिक हत्याकांड याविषयी आवाज उठवणारा ओरहान पामुक आदरणीय आहेच. कारण तिथे त्यालाही अशाच लोकक्षोभाला तोंड द्यावं लागतं आणि देशद्रोही म्हणून कोर्टात उभं केलं जातं. त्याची आणि लेनची तुलना नाहीच. फक्त, इतरांवर टीका करताना आपण स्वत:चे दोष सहज विसरून जातो, हेही लक्षात घ्यावं, एवढीच विनंती. कुणीतरी भ्याड आहे असं म्हणताना आपल्यापैकी कितीजण ज्याची भीती वाटेल अशा झुंडशाहीसमोर त्या झुंडीला अप्रिय अशा गोष्टी जाहीरपणे करण्याचं धाडस करतील याचाही विचार करावा. (आणि हे म्हणताना मी स्वत:ला भ्याड म्हणूनच गणतो आहे.)
आज जेव्हा पाश्चिमात्य देशांतील विचारवंत अशा समाजघातक राजकारणाविरोधी ठाम भूमिका घेतात तेव्हा आपल्यामागे एक मोठा समाज आहे याची त्यांना जाणीव असते. याचा त्यांना आधार असतो. असा आधार आपल्या विचारवंतांना वाटावा असं कोणतं जबाबदारीचं वर्तन आपल्याकडून होतं हा माझ्या दृष्टीनं या संस्थळावर विचारण्याजोगा कळीचा प्रश्न आहे, कारण त्याचा संबंध प्रत्यक्ष तुमच्या-माझ्याशी लागतो. आणि त्याचं उत्तर हे निराशाजनक आहे. आपल्याला अप्रिय वा अगदी घृणास्पद वाटणाऱ्या गोष्टींनाही विशिष्ट चौकटींत काही स्थान आहे ही बाब आपण सातत्यानं विसरताना दिसतो. आपली न्यायव्यवस्था अजून तरी तिची बुद्धी शाबूत ठेवून आहे ही बाब सुप्रीम कोर्टाच्या लेनविषयीच्या निर्णयानं पुन्हा एकदा सिद्ध झाली, पण आपण सुशिक्षित लोक सारासार विचारबुद्धीला तिलांजली देतो हेही पुन्हा एकदा सिध्द झालं. याचंच दु:ख आहे.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
विविध व्यवसायांत काम करणाऱ्या आपणापाशी जर झुंडशाही आणि दमनाला प्रतिकार करण्याचं धैर्य नाही, तर निव्वळ विशिष्ट पेशातल्या लोकांकडे ते असावं अशी अपेक्षा वाजवी आहे का?
होय. ही अपेक्षा वाजवी आहे. सैनिकाला शत्रूच्या गोळीचा सामना करावा लागतो, स्वत: इतरांना मारल्याबद्दल पश्चाताप सहन करावा लागतो. धंद्यात पैसे गुंतवणार्या गुंतवणुकदारास पैसे बुडाल्यास होणार्या परिणामांना तोंड देण्याचे धैर्य असावेच लागते. जनसामान्यांना त्यांच्या कृत्याने होणार्या परिणामांना सामोरे जाण्याचे धैर्य असावेच लागते. विचारवंतांना स्पेशल ट्रिटमेंट दिली जाऊ नये. ज्याप्रमाणे समजाकडून पुरस्कार मिळतात त्याचप्रमाणे लाथाही मिळू शकतात. त्यांना सामोरे जायला हवे.
आज जेव्हा पाश्चिमात्य देशांतील विचारवंत अशा समाजघातक राजकारणाविरोधी ठाम भूमिका घेतात तेव्हा आपल्यामागे एक मोठा समाज आहे याची त्यांना जाणीव असते.
लेन हा अमेरिकेचा नागरिक आहे. इथल्या (अमेरिकेतल्या) समाजाचे तसेच अभ्यासकांचे पाठबळ त्याला आहेच.
आपली न्यायव्यवस्था अजून तरी तिची बुद्धी शाबूत ठेवून आहे ही बाब सुप्रीम कोर्टाच्या लेनविषयीच्या निर्णयानं पुन्हा एकदा सिद्ध झाली, पण आपण सुशिक्षित लोक सारासार विचारबुद्धीला तिलांजली देतो हेही पुन्हा एकदा सिध्द झालं. याचंच दु:ख आहे.
या भावनेशी सहमत आहे.
_________________
बाकी चालू द्या.
लेनने हा जोक केलेला नाही, त्याने फक्त असे म्हटले की असा असा एक जोक आहे, असे काहीजण म्हणतायत. टोपणनावांनी वर शिवाजीच्या पोर्तुगीज पैतृत्त्वाची एक वदंता उल्लेखिली. लेनने ती वदंता सांगितली आहे का? नसल्यास का नाही? (ते लेनला विचारा असे म्हणू नका.) त्याने फक्त महाराष्ट्रातली तथाकथित वदंता सांगितली. पोर्तुगीज वदंता समकालीन होती. महाराष्ट्रातली वदंता समकालीन नव्हती. सांगायचीच असेल तर पोर्तुगीज वदंता सांगणे हे विषयाला धरून ठरले असते. ही वदंता सध्याच्या काळातील आहे. शिवाजीच्या काळातील नव्हे. पुस्तक सध्याच्या काळाविषयी आहे की शिवाजीच्या काळाविषयी? या वदंतेतून शिवाजीच्या काळाचा बोध होतो की सध्याच्या काळाचा? आणि ही वदंता अस्तित्त्वात येण्यासाठी शिवाजी कितपत जबाबदार आहे? त्यामुळे त्याच्या व्यक्तीमत्वावर यातून काय प्रकाश पडतो?
तर याचे उत्तर खोडसाळपणा आहे. नकळत मूर्खपणे झालेला, किंवा मुद्दाम केलेला. लेन किती मोठा स्कॉलर आहे वगैरेंनी ही बाब झाकली जात नाही.
शिवाजीविषयीच्या वदंता, आख्यायिका, लोककथा यांतून धांडोळा घ्यायला अनेक आख्यायिका आहेत. भवानी तलवार, श्रीशैल येथे आत्मसमर्पणाचा प्रयत्न इ. हे जे इथे उल्लेख केलेले गॉसीप आहे, ते या लायनीत बसते का? जंतूंनी भले लेनचे समर्थन केले नसेल, त्याच्या अभ्यास पद्धतीचे समर्थन केले असेल. त्या अभ्यास पद्धतीमध्ये हे बसते का?
असो. पूर्णविराम. थँक्स.
आळश्यांचा राजा
सांगायचीच असेल तर पोर्तुगीज वदंता सांगणे हे विषयाला धरून ठरले असते.
पोर्तुगीज वदंता अस्तित्वात होती अथवा नाही हे मी सांगू शकत नाही. तरीही एवढं नक्की सांगू शकतो की सद्य काळात अस्तित्वात असणारी वदंता वापरणं गैर नाही. यासाठी लेननं वापरलेली संशोधनपध्दती समजून घेणं आवश्यक आहे. तीमध्ये विविध लोकांनी विविध काळात शिवाजीविषयी ज्या (खर्या-खोट्या) कहाण्या रचल्या त्यांचं विश्लेषण केलेलं आहे. त्याला अनेक पदर आहेत. त्यातले काही शिवाजीबद्दल आहेत, तर काही कहाण्या रचणार्यांबद्दल वा सांगणार्यांबद्दल आहेत. पण त्याला काळाचं बंधन नाही.
तर याचे उत्तर खोडसाळपणा आहे. नकळत मूर्खपणे झालेला, किंवा मुद्दाम केलेला. लेन किती मोठा स्कॉलर आहे वगैरेंनी ही बाब झाकली जात नाही.
त्यानं सध्याच्या वदंता वापरण्यात काही गैर नाही. त्यामुळे यात (कळत-नकळत) खोडसाळपणा आहे असा निष्कर्ष निघत नाही.
शिवाजीविषयीच्या वदंता, आख्यायिका, लोककथा यांतून धांडोळा घ्यायला अनेक आख्यायिका आहेत. भवानी तलवार, श्रीशैल येथे आत्मसमर्पणाचा प्रयत्न इ. हे जे इथे उल्लेख केलेले गॉसीप आहे, ते या लायनीत बसते का?
होय. आणि अशा अनेक लेननं वापरलेल्या आहेत. उदा: तानाजीच्या सिंहगड विजयाच्या एका पोवाड्यामध्ये तानाजीच्या घरात लग्न असल्यामुळे शिवाजी त्याला मोहिमेवर पाठवायला तयार नाही आणि जिजाऊ त्याला तयार करते. कारण तानाजीला पाठवला नसता तर कदाचित गड जिंकला नसता. अशा अनेक गोष्टींमधून शिवाजीच्या जडणघडणीतल्या जिजाऊच्या भूमिकेविषयी जी प्रतिमा तयार होते त्याचं लेन विश्लेषण करतो. अशा सर्व अधिक महत्त्वाच्या गोष्टींच्या मानानं वादग्रस्त वदंतेला काहीच महत्त्व नाही.
(आता पुढचा भाग माझं मत आहे)
त्यामुळेच माझ्या मते ती काढून टाकायलाही लेन सहजासहजी तयार झाला असावा. त्यानं पुस्तकाच्या दर्जामध्ये काही फरक पडत नाही.
पण मग ती घातली तरी का असावी? खोडसाळपणा का नाही?
कारण त्या वदंतेनं एक प्रकारे शिवाजीचं श्रेष्ठ युगपुरुष असणंच अधोरेखित होतं. म्हणजे ज्याविषयी 'अरे, हा युगपुरुष आपल्यातला असायला हवा होता रे! च्च च्च!' असं वाटतं असा तो होता. यातून ब्राह्मणांचा संकुचितपणा किंवा स्वतःच्या वंशश्रेष्ठत्वाचा दंभही दिसत असेल. पण मग ती वदंता आधुनिक (म्हणजे खर्या अर्थानं हं!) ब्राह्मणांना लाजिरवाणी ठरेल. माझ्यापुरतं मी हे कबूल करतो की मी ती कुणाला सांगितली नव्हती. केवळ या वादाच्या पार्श्वभूमीवर तिचा उल्लेख केला.
पण या सर्वांत लेन शिरत नाही, कारण त्याच्या मुख्य कथनसूत्रात या विश्लेषणाला फार महत्त्व नाही. फक्त जाताजाता जंत्रीवजा त्या वदंतेचा उल्लेख होतो.
म्हणूनच मला असं वाटतं की त्या दोन ओळींमुळे एवढा गदारोळ माजेल याची त्याला थोडी जरी कल्पना असती, तर त्यानं तो भाग मुळातूनच वगळला असता, कारण आपलं काम मोकळेपणानं करता येणं त्याच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचं असावं असं त्याच्या आतापर्यंतच्या कामावरून वाटतं.
जंतूंनी भले लेनचे समर्थन केले नसेल, त्याच्या अभ्यास पद्धतीचे समर्थन केले असेल. त्या अभ्यास पद्धतीमध्ये हे बसते का?
होय, वर उत्तर दिलेलं आहे. शिवाय अॅमेझॉनवरचं वर्णनही असं म्हणतं:
James Laine traces the origin and development if the Shivaji legend from the earliest sources to the contemporary accounts of the tale. His primary concern is to discover the meaning of Shivaji's life for those who have composed-and those who have read-the legendary accounts of his military victories, his daring escapes, his relationships with saints. In the process, he paints a new and more complex picture of Hindu-Muslim relations from the seventeenth century to the present.
तुमच्या पहिल्या प्रतिसादातल्या अजून काही शंकांचं निरसन करणं बाकी आहे असं वाटतं, पण ते करण्याचा प्रयत्न आता उद्या करेन.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
मागच्या प्रतिसादात समकालीन वदंता ही इतिहास संशोधनात एक साधन म्हणून वापरता येते का यासंबंधी सांगितलं होतं. या प्रतिसादात असभ्य वा हीन दर्जाची, ऐतिहासिक आधार नसलेली (थोडक्यात असत्य) आणि अवमानकारक ठरू शकणारी वदंता लेननं आपल्या पुस्तकात वा मी इथं लेखात (म्हणजे जाहीरपणे) उल्लेखण्याच्या योग्यायोग्यतेविषयी आळश्यांचे राजे व इतर काहींनी मांडलेल्या आक्षेपांसंदर्भात निवेदन आहे. ते आक्षेप थोडक्यात असे:
अशी वदंता जाहीर करून जातीयवादाच्या आगीत तेल ओतलं जातं.
अशी घाण उपसण्यानं काही साध्य होत नाही.
त्याचं कोणतंही समर्थन शक्य नाही.
जातीयवादाचं ह्त्यार हे आपल्याकडे अनेक गोष्टींना नको तितकं लावलं जातं. पाठ्यपुस्तकं, चित्रपट वगैरेंमध्ये जातीयवादी शब्द वापरू नयेत याचं एक टोक गाठलं जातं. विशिष्ट काळात विशिष्ट जातींचा उल्लेख शिवी वा अपमान करण्यासाठी होत होता, हे सत्य आहे. ते सवंग पध्दतीनं वापरण्याबद्दलचा आक्षेप योग्य असेलही, पण विश्लेषणासाठीही अशा गोष्टींचा उल्लेख टाळायला हवा, हे मान्य करणं जड जातं. किमान ज्ञानशाखांना तरी आपण अशा जराशानंही अवमानित होणार्यांपासून दूर ठेवायला ह्वं. नाहीतर काही दिशांमध्ये ज्ञानाचा विस्तार होणं थांबतं. ते समाजासाठी हानिकारक असतं. आपल्या समाजाविषयीच्या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीची नोंद घेता आली, तरच आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना आपला समाज नक्की कसा होता, ते समजून घेता येईल. अशा प्रकारची सरसकट बंदी ही अखेर अज्ञान पसरवते. अप्रिय गोष्टींवर सरसकट, संदर्भाशिवाय बंदी घालून कोणत्याही समाजाचं भलं होतं असं इतिहास सांगत नाही.
या संस्थळावर या चर्चेच्या संदर्भात ही वदंता उल्लेखणं अश्लाघ्य होतं का? मला तरी असं वाटत नाही. आणि त्याचं कारणही वर सांगितलं तेच आहे. निंदानालस्ती, कुचेष्टा वा खोडसाळपणा न करता गंभीर चर्चा करायची असेल, तर त्या चौकटीत अशा एखाद्या एरवी असभ्य मानल्या जाणार्या गोष्टीची वाच्यता करणं हे गैर मानू नये. त्यात शहाणपणा नाही, कारण मग हा जो उहापोह या धाग्यावर झाला, तो होऊच शकला नसता.
हे स्थळ संपादित होतं. संपादकांना त्यांची धोरणं आणि सारासार विचारबुध्दी यांच्या चौकटीत काय संपादित करायचं हे ठरवावं लागतं. त्याविषयी इथं वादविवादही होतात. संपादक मंडळ, त्यांची धोरणं, होणारं संपादन आणि ते वादविवाद हे सर्व या संस्थळाचं आरोग्य कायम राखण्यात मदत करतात, असंही वाटतं. त्यामुळे त्यांचा अधिकार मी मान्यच करतो. आतापर्यंत तरी माझ्या लिखाणातल्या 'असभ्य' गोष्टींना त्यांनी इथं जागा दिलेली आहे, आणि ती बहुधा मी ज्या कारणांसाठी ते योग्य मानतो, त्यांसाठीच असावी असंही वाटतं. त्यामुळे संपादकांचे धन्यवाद. धाग्यावर आणि व्यक्तिगत निरोपांतून विविध विचार मांडणार्यांचे वा पसंती/नापसंती दर्शवणार्यांचेही आभार.
जाताजाता: E. H. Carr यांच्या 'What Is History?' या पुस्तकाचा आळश्यांचे राजे यांनी उल्लेख केला. हे पुस्तक अतिशय वाचनीय आणि मननीय आहे. इतिहासाच्या इतिहासातलं ते एक मानाचं पान आहे. ज्यांना इतिहास संशोधनाबद्दल अधिक माहिती करून घ्यायची आहे, त्यांनी ते जरूर वाचावं. मात्र हेही ध्यानात ठेवावं की हे १९६१ साली लिहिलं गेलं. साठच्या दशकात (विशेषतः १९६८ नंतर) अनेक ज्ञानशाखांत मूलभूत बदल झाले. तसे ते इतिहासातही झाले. मी ज्या पध्दतींच्या आधारे माझी विधानं करत होतो, त्या मुख्यतः या नंतरच्या 'न्यू हिस्टरी'मधून आल्या. 'कल्चरल हिस्टरी' या संकल्पनेचाही त्याच्याशी संबंध आहे. इतिहास या ज्ञानशाखेत वापरल्या जाणार्या वेगवेगळ्या संशोधन पध्दतींची प्राथमिक माहिती इथे मिळेल. धन्यवाद.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
आपण माझे म्हणणे समजून घेतलेले आहे असे दिसते. थॅंक्स. त्याबद्दल असहमत आहात. हरकत नाही. संपादकांनी काय भूमीका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दलही काहीच म्हणणे नाही.
पवारांनी लेनच्या कानावर ही वदंता घातली असे आपल्याला म्हणायचे नव्हते हे स्पष्ट केलेत. पण मग पवार लेनला/ त्याच्या अभ्यासपद्धतीला ओळखत होते हे सांगायची गरज काय होती हे समजले नाही. तशी ओळख नसती, तरी आपल्या राजकीय विश्लेषणात काही फरक पडला असता असे वाटत नाही. असो. आपणच ‘तसे म्हणायचे नव्हते’ हे म्हटल्यामुळे यावर वाद बंद.
ज्ञानशाखा खुल्या असाव्यात,आणि त्यासाठी शासनाने पुरेसा पाठींबा द्यावा. हे योग्य आहे. व्यक्ती कुणीही असो, तिचे विश्लेषण करण्याचा संशोधकांचा हक्क अबाधित राहिला पाहिजे. योग्य. परंतु असे विश्लेषण करताना असभ्य आणि तेही असत्य संदर्भ टाळता येणार नाहीत/ टाळू नयेत असं मला तरी वाटत नाही. मुक्तसुनीतांनी थिंकमहाराष्ट्रवरील ज्ञानदा देशपांडे यांच्या सुरेख लेखाची लिंक दिलेली आहे. त्यात त्यांनी तुम्ही म्हणता तसेच संशोधकांच्या/ विचारवंतांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे. त्यांनीही अशा प्रकारच्या संशोधनाविषयी (तुम्ही दाखवली आहे तशीच) सखोल जाण दाखवली आहे. परंतु, त्यांनी लेनच्या हेतूंची आणि ज्या कंटेम्प्च्युअस (मराठी शब्द सुचत नाही) वृत्तीने त्याने हा संदर्भ बेदरकारपणे प्रसिद्ध केला त्याची निर्भर्त्सनाच केलेली आहे. ते मला पटते. प्रस्तुत मजकूर काढून टाकला काय नि राखला काय, गेलेला बाण परत येत नाही. आपण म्हणता तसे त्याने या वदंतेचा केवळ जंत्रीवजा उल्लेख केलेला असेल, त्यावर काही सभ्य/असभ्य भाष्य केले नसेलही, पण त्याचा परिणाम काय झालेला आहे ते दिसले आहेच. त्याला लेन जबाबदार नाही, तर राजकारणी आणि अप्रगल्भ समाज/ जनताच जबाबदार, असे म्हणणे मला पटत नाही. लेनला, आपण म्हणता तशी, परिणामांची कल्पना नसेल असे मला वाटत नाही. त्याबद्दल आपल्याशी असहमत.
याच विचारांमधून, माझे पुस्तकावरील बंदीचे समर्थन स्पष्ट होते. सरसकट बंदीचा मी पुरस्कर्ता नाही हे मी माझ्या पहिल्या प्रतिसादातच लिहिले आहे. परिस्थिती पाहून नियंत्रणे/ बंदी/ सेन्सॉरशिप येत असते. उदा. इथे वातावरण गढूळ होण्याचा धोका वाटल्यास संपादक ‘बंदी’ घालू शकतात/ घालतात. लेख/ प्रतिसाद उडवतात. ते चुकीचे आहे असे कुणीच म्हणणार नाही. (म्हणले तरी कुणी ते मान्य करत नाही.) तो त्यांचा अधिकार. (डिस्क्लेमर - यात टीका नाही. उपमा/ तुलना/ उदाहरण फक्त.) मग शासनाला असा अधिकार का नसावा? पब्लिक आपल्यासारखे प्रगल्भ असावे अशी अपेक्षा मुळातच चूक आहे. अत्र्यांच्या शब्दांत सांगायचे तर गर्दीचे मानसिक वय १३ वर्षे वयाच्या मुलाइतके असते. शासन असल्या बंदी (केवळ) मतांच्या राजकारणासाठी घालते असे समजणे शासनावर अन्याय करणारे आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ना विचारवंतांवर असते ना न्यायालयांवर. शासनावर असते. पब्लिक चिथावले जात असेल, दंगा करत असेल तर अशा पब्लिकचा बंदोबस्त करणे हे जसे रास्त आहे, तसेच, तशी संधी त्या पब्लिकला मिळाली कशी याचाही बंदोबस्त करणे आवश्यक ठरते. मग पुस्तक/ त्यातला असा असा उल्लेख हे कारण नाकारून केवळ चिथावले गेलेले लोक आणि त्यांचे नेते यांनाच कारण म्हणून धरणे योग्य नाही. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमलादेखील झुंडशाही दाबू पहात असेल, आणि दबावाला बळी पडून शासन बंदी घालत असेल, तर अशा बंदीचा मी निषेध करीन. इथे अशी परिस्थिती नाही असे माझे मत आहे. प्रस्तुत वदंता असत्य आणि असभ्य आहे हे आपण मान्य केल्यामुळे त्यावर अधिक भाष्याची गरज नाही. इतकेच ऍड करतो, हा मजकूर ज्या व्यक्तींविषयी आहे, त्या व्यक्ती (सगळ्या ‘भावना’ वगैरे बाजूला ठेवल्या तरीही) चारित्र्याचे मापदंड आहेत. जातीधर्म पार करून. याला खोडून काढणारा एकही आधार उपलब्ध नाही. असे असताना असत्याचा आधार घेऊन चारित्र्याविषयी शंकेचे पिल्लू सोडून द्यायचे यात कोणता ‘विचार’ येतो हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. त्या मायथॉलॊजिकल फिगरही नाहीत. त्यामुळे गांभीर्य अजूनच वाढते. यातूनच हेतूंविषयी शंका निर्माण होतात. त्यांचे नाव वापरून केल्या जाणार्या राजकारणाचा मी (नेहेमीच) निषेध करतो. तसेच प्रस्तुत वदंता जन्माला घालणार्या मानसिकतेचा आणि या वदंतेच्या जाहीर उल्लेखाचाही मी निषेध करतो. हे माझे मत बदलणे मला शक्य नाही.
प्रस्तुत लेखावरील काही प्रतिसाद/ काही अपेक्षित प्रतिसादांचा अभाव ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बर्याच जणांनी या विषयावर न बोलणे शहाणपणाचे मानलेले दिसते. टोपणनावांशी माझ्या झालेल्या संवादावर मी अजून काही भाष्य करण्याची गरज नाही. मोडतोड करणार्या लोकांची प्रगल्भता जगजाहीर आहेच. या संवादाच्या निमित्ताने शिकलेल्या आणि विचार करू शकणार्या (काही) लोकांच्या प्रगल्भतेवरही प्रकाश पडलेला आहे. असो.
आपण म्हणता तसे,
निंदानालस्ती, कुचेष्टा वा खोडसाळपणा न करता गंभीर चर्चा करायची असेल, तर त्या चौकटीत अशा एखाद्या एरवी असभ्य मानल्या जाणार्या गोष्टीची वाच्यता करणं हे गैर मानू नये. त्यात शहाणपणा नाही, कारण मग हा जो उहापोह या धाग्यावर झाला, तो होऊच शकला नसता.
हा बाकी पेचात पाडणारा मुद्दा आहे खरा!
इतिहासाच्या अभ्यासाच्या नवीन पद्धतींविषयी आपण काही माहिती दिलेली आहे. त्याबद्दल आभार.
आपल्याशी बोलून आनंद वाटला हे आवर्जून नमूद करतो.
(श्री. टोपणनावांसाठी - आपल्याशी होणारी उपचर्चा मी माझ्याकडून बंद केलेली आहे. तरी काही बोलणार असाल, तर ते "व्यक्तीस्वातंत्र्य'' आपल्याला अर्थातच आहे.)
आळश्यांचा राजा
दाद दिली पाहिजे तुमच्या या प्रतिसादाला आणि इतरही प्रतिसादांना. पुरेसा बोलका. या वादाचाच समारोप करणारा प्रतिसाद आहे हा. समारोपही अशा बिंदूवर करताहात की तिथं अभ्यासाचे महात्म्य टिकते आणि अभ्यासाच्या नावाखाली होणारा भलताच उद्योगही रोखण्याची गरज व्यक्त होते.
या प्रतिसादातील -
कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ना विचारवंतांवर असते ना न्यायालयांवर. शासनावर असते. पब्लिक चिथावले जात असेल, दंगा करत असेल तर अशा पब्लिकचा बंदोबस्त करणे हे जसे रास्त आहे, तसेच, तशी संधी त्या पब्लिकला मिळाली कशी याचाही बंदोबस्त करणे आवश्यक ठरते. मग पुस्तक/ त्यातला असा असा उल्लेख हे कारण नाकारून केवळ चिथावले गेलेले लोक आणि त्यांचे नेते यांनाच कारण म्हणून धरणे योग्य नाही. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमलादेखील झुंडशाही दाबू पहात असेल, आणि दबावाला बळी पडून शासन बंदी घालत असेल, तर अशा बंदीचा मी निषेध करीन.
हे अगदी स्पष्ट लिहिलेत हे उत्तम. मला या भूमिकेत योग्य तो समतोल दिसतोय. त्याविषयी योग्य तो रास्तपणा शासनाकडे असेलच का याची उत्तरे भिन्न असू शकतात, पण शासनासाठी मार्गदर्शक म्हणूनच ही मांडणी पुरेशी आहे.
त्याविषयी योग्य तो रास्तपणा शासनाकडे असेलच का याची उत्तरे भिन्न असू शकतात, पण शासनासाठी मार्गदर्शक म्हणूनच ही मांडणी पुरेशी आहे.
शासन मार्गदर्शनाकरिता मिपावरील प्रतिसादांकडे बारकाईने लक्ष ठेवून असते हे मिसळपावाचे यश मानून तोषावे, की शासनाचे (आणि कदाचित आणखीही कोणाकोणाचे) मिपावरील प्रतिसादांवर बारीक लक्ष असते म्हणून ("थोरल्या भावा"च्या आठवणीने) हळहळावे, यावर डोक्यात सध्या विचारद्वंद्व चालू आहे.
अशा परिस्थितीत "टोपणनावा"चीच (म्हणजे "टोपणनाव" या आयडीची नव्हे!) पॉलिसी श्रेयस्कर, असे आता पश्चाद्दृष्टीने जाणवू लागले आहे.
अतिशय "मार्गदर्शक" प्रतिसादाबद्दल अनेक आभार.
बाकी चालू द्या.
- पंडित गागाभट्ट.
मराठी माणसे असे जातीवर जाऊन भांडत आहेत. शिवाजी महाराज हे काही एका जाती साठी राजा झाले नव्हते. महाराजांनी स्वताचे हिमतीवर आणि सर्वे जातीचे सहकार्य घेऊन राज्य निर्माण केले. कमीत कमी आता तरी एकजूट होऊन एकजात महाराष्ट्र उभा करू या. मुंबईत तर मराठी माणसास किमत नाही. किमान मला तरी वाटते किवा मी अनुभवले आहे कि महाराष्टातील कुठल्याही जातीतील माणसाला शिवाजी महाराजा विषयी आदर आहे. मग तो ब्राम्हण असो कि मराठा किवा इतर जातीतला पण आंबेडकरच्या बाजूला शिवाजीमहाराजाचा फोटो नक्कीच असतो. पण मिपाचा हा लेख व प्रतिसाद वाचून वाईट वाटले. चालू द्या. ..
जय महाराष्ट्र.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचला तर त्यात काही रोचक गोष्टी समोर येतात.
नक्की कोणत्या समाजगटाच्या शिवाजीचा अनादर करणार्या (आणि म्हणून आक्षेपार्ह) मतामुळे वैमनस्य निर्माण होऊ शकेल असा प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारला असता त्याचं उत्तर सरकारला देता आलं नाही. फक्त भांडारकर संस्थेचे कर्मचारी हा तो गट आहे का, यावर सरकारचं उत्तर नाही असं होतं. मग तो कोणता गट, तर याला सरकारपाशी उत्तर नव्हतं.
(माझं मतः सर्व ब्राह्मण किंवा बरेचसे ब्राह्मण असं उत्तर योग्य ठरलं नसतं, कारण असे सर्व शिवाजीचा अनादर करतात हे सिध्द करता आलं नसतं; आणि असे काही ब्राह्मण अस्तित्वात आहेत, एवढंच म्हणून ते कायदा भंग सिध्द करायला पुरेसं ठरलं नसतं.)
अत्र्यांच्या शब्दांत सांगायचे तर गर्दीचे मानसिक वय १३ वर्षे वयाच्या मुलाइतके असते. शासन असल्या बंदी (केवळ) मतांच्या राजकारणासाठी घालते असे समजणे शासनावर अन्याय करणारे आहे.
या संदर्भात न्यायालयाच्या निर्णयात दिसणारा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांच्या भावना दुखावतील असा दावा आहे, तो गट हा समंजस, स्थिर मनाचा, कणखर व धैर्यशील असला तरीही त्याच्या भावना दुखावतील, हे सिध्द करता आलं पाहिजे, असा कायद्याचा अर्थ आहे. दुबळ्या वा अस्थिर मनाच्या, वा ज्यांना आपल्या विरोधातलं कोणतंही मत धोकादायक आहे असं वाटतं, अशा लोकांच्या भावना दुखावल्यानं प्रस्तुत मजकूर आक्षेपार्ह ठरत नाही.
तसंच पुस्तकाचा परिणाम काय होईल, हे पाहाताना ज्या प्रकारचे लोक हे या पुस्तकाचे अपेक्षित वाचक आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे, असाही कायद्याचा अर्थ आहे.
असो. आपण असहमत असण्याविषयी सहमत आहोत, असं मानू. भारतीय दंडविधानाविषयी माझा आदर मात्र हे निकालपत्र वाचून वाढला आहे, हे नमूद करतो. आपलाही तो वाढला असेल अशी आशा व्यक्त करतो, आणि इथे थांबतो.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
अर्थातच.
कोर्टाचा निर्णय जालावर असल्यास दुवा दिलात तर बरं होईल. कोर्टाचा निर्णय केवळ कोर्टाच्या इंटरप्रिटेशनवर अवलंबून नसून पक्ष आपली बाजू कशी मांडतात यावरही अवलंबून असतो. भारतातील न्यायव्यवस्था इन्क्विझिटिव्ह नाहीये. एखाद्या पक्षाने आपली बाजू नीट मांडली नाही/ किंवा पक्ष हजरच राहिला नाही तर न्याय त्याच्या बाजूला असूनही कोर्टाचा निर्णय त्याच्या बाजूने लागेलच याची शाश्वती नसते. याचा अर्थ कोर्टाला काही कळत नाही असा नसून, न्यायव्यवस्था अशी आहे, एवढाच होतो.
असो. कोर्टाच्या या निर्णयावर, आणि त्यावरच्या आपल्या टिप्पणीवर माझे काहीच भाष्य नाही.
आळश्यांचा राजा
कोर्टाचा निर्णय केवळ कोर्टाच्या इंटरप्रिटेशनवर अवलंबून नसून पक्ष आपली बाजू कशी मांडतात यावरही अवलंबून असतो. भारतातील न्यायव्यवस्था इन्क्विझिटिव्ह नाहीये. एखाद्या पक्षाने आपली बाजू नीट मांडली नाही/ किंवा पक्ष हजरच राहिला नाही तर न्याय त्याच्या बाजूला असूनही कोर्टाचा निर्णय त्याच्या बाजूने लागेलच याची शाश्वती नसते.
हे अगदी बरोबर आहे. या निर्णयाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारला कदाचित काही युक्तिवाद नीट करता आला नसेलही. परंतु निर्णयात उद्धृत केलेल्या काही गोष्टी या कायद्याचा अर्थ काय आहे, हे समजावून सांगतात. वादी-प्रतिवादींनी कसा युक्तिवाद केला, यामुळे तो बदलत नाही. मी उल्लेख केलेले दोन मुद्दे हे असा कायद्याचा अर्थ सांगतातः
ज्यांच्या भावना दुखावतील असा दावा आहे, तो गट हा समंजस, स्थिर मनाचा, कणखर व धैर्यशील असला तरीही त्याच्या भावना दुखावतील, हे सिध्द करता आलं पाहिजे.
पुस्तकाचा परिणाम काय होईल, हे पाहाताना ज्या प्रकारचे लोक हे या पुस्तकाचे अपेक्षित वाचक आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे.
असो. न्यायालयाच्या निर्णयाचा दुवा सहज मिळत नाही आहे. इतर कुणाला सापडल्यास तो द्यावा.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
न्यायव्यवस्था, न्यायालय, आपले दंडविधान, त्यांच्यावर आपण दाखवलेला विश्वास, आदर इ. पाहून बोलावेसे वाटते. आपल्या सोयीनुसार आपल्याला (म्हणजे तुम्हालाच नाही, सर्वांनाच – मलाही) कधी दंडविधानाविषयी आणि न्यायव्यवस्थेविषयी आदर वाटतो तर कधी कायदा गाढव वाटतो, न्यायदेवता आंधळी वाटते. सगळ्याच गोष्टी इथे स्पष्टपणे बोलता येतील असे नाही. पण राजकीय विश्लेषण वापरण्यासाठी लावलेली बुद्धी इथे या न्यायालयीन लढाईबाबत लावलीत तर एक इंटरेस्टिंग कंजेक्चर (अर्थातच सुलभीकरण असलेले) असे दिसेल:
हे वादळ आत्ता का उठले? बंदी हटली म्हणून. बंदी हटली नसती तर आत्ताचे दंगे झाले नसते. राजकीय हितसंबंधांना आपली पोळी भाजून घेता आली नसती. अर्थात, बंदी हटणे हे राजकीय हितसंबंधांना हवेच होते. मग,
१. सुप्रीम कोर्टात जावा, असे अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाल्या लोकांना राजकीय नेतृत्त्वाने सांगीतले/ भरीला घातले किंवा
२. अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले जेन्युइनली, विदाउट एनी पॉलिटिकल इंटरेस्ट कोर्टात गेले. सरकारने तिथे आपली बाजू जाणीवपूर्वक समर्थपणे मांडली नाही. बंदी हटली. काम झाले. अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले खूष. राजकारणीही खूष.
हे असे झाले असेल असे म्हणायचा माझा हेतू नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की अशा शक्यता/ अंदाज/ विश्लेषण एण्डलेस आहेत. कायद्याचा कीसही जगाच्या अंतापर्यंत काढता येईल. आपल्या सदसदविवेकबुद्धीला काय वाटते हे सरतेशेवटी महत्त्वाचे ठरते. कायदा काय म्हणतो/ दंडविधान काय म्हणते, न्यायालय काय म्हणते या बाबी नंतर येतात. एक शहाणा समाज म्हणून आपली काय जबाबदारी आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या मुद्यावर आपण असहमत रहायचे मान्य केलेले आहेच.
आळश्यांचा राजा
शक्यता अनेक आहेतच, पण त्यांचा तर्काधार तपासून पाहावा, असं वाटतं.
१. सुप्रीम कोर्टात जावा, असे अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाल्या लोकांना राजकीय नेतृत्त्वाने सांगीतले/ भरीला घातले किंवा
ज्यांची हयात विविध राजकीय पक्षांना गैरसोयीचे चित्रपट बनवण्यात आणि नंतर त्यांचे विना-काटछाट प्रदर्शन व्हावे यासाठी म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या लढ्यासाठी गेली, ते आनंद पटवर्धन ही बंदीविरोधातली जनहित याचिका दाखल करणार्यांपैकी एक होते. अचानक राजकीय नेत्यांनी भरीला घातलं म्हणून त्यांना अभिव्यक्ती आणि तिचं स्वातंत्र्य यांचा पुळका आला, अशा शक्यतेला फारसा तर्काधार मिळत नाही.
२. अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले जेन्युइनली, विदाउट एनी पॉलिटिकल इंटरेस्ट कोर्टात गेले. सरकारने तिथे आपली बाजू जाणीवपूर्वक समर्थपणे मांडली नाही. बंदी हटली. काम झाले. अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले खूष. राजकारणीही खूष.
राजकारण्यांना खर्या लाभाची आशा जेव्हा अशा गोष्टी निवडणूक आसपास असताना घडतात, तेव्हा असते. भांडारकर संस्थेवरचा हल्ला तसाच झाला. मिरजेची घडवून आणलेली दंगल हे अगदी ताजं उदाहरण आहे. शिवाय कोर्टाचा निकाल नक्की कधी लागेल, हे सांगणं अवघड आहे. त्यामुळे आता राजकारणी फार तर वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत, असं म्हणणं जास्त तर्काधारित वाटतं.
आपल्या सदसदविवेकबुद्धीला काय वाटते हे सरतेशेवटी महत्त्वाचे ठरते. कायदा काय म्हणतो/ दंडविधान काय म्हणते, न्यायालय काय म्हणते या बाबी नंतर येतात.
होय, पण माझी सदसदविवेकबुध्दी जे सांगते त्याला कायद्याचा वा तर्काचा आधार नाही असं जेव्हा मला दिसतं, तेव्हा सदसदविवेकबुध्दीला काही कठोर प्रश्न विचारावेत, असं मला वाटतं. कारण अखेर ती माझ्यासारख्या एका मूलतः स्खलनशील आणि विकारी मनुष्याच्या मनात निर्माण होते. त्यामुळे ती कधीकधी अज्ञानाधारित आणि (म्हणून अयोग्य) गोष्टी योग्य असल्याचं मला भासवते, असं मला जाणवतं. उदा: दीडशे वर्षांपूर्वी माझ्या पत्नीला शिकू देणं वा विधवा मुलीचा पुनर्विवाह करणं माझ्या सदसदविवेकबुध्दीला बहुतेक पटलं नसतं. त्यामुळे माझी सदसदविवेकबुध्दी ही माझा तरी अखेरचा खात्रीशीर आधार नाही.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
धागा इतर कुणाला दिसत नाही, पण मला दिसतो आहे. नवीन प्रतिसाद देता येतो आहे का, याची ही चाचणी.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
नमस्कार मिपाकरहो,
चिंतातुर जंतू यांचा हा उत्तम लेख त्यावर काही आक्षेपार्ह प्रतिसाद आल्याने आणि त्या प्रतिसादांचा त्रास मिसळपाव प्रशासनाला होऊ शकेल या शंकेतून काही काळ अप्रकाशित करण्यात आला होता. सध्या लेख प्रकाशित करून वाचनमात्र ठेवला आहे. लेखावरील आक्षेपार्ह प्रतिसाद एक एक करून अप्रकाशित केले जातील. तरीही असे प्रतिसाद राहील्यास सजग सदस्यांनी संपादकांना तसे कळवावे.
धन्यवाद,
संपादक मंडळ
- ५ जानेवारी २००४: संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्थेत जाऊन मोडतोड केली. दुर्मीळ हस्तलिखितांचे नुकसान केले.
यावरून लक्षात यावे की संभाजी ब्रिगेडच्या गाढवांना या प्रकरणाचा राजकिय वापर करावा हा शोध लागण्यापुर्वी अशा प्रकारांत कौशल्यप्राप्त शिवसेनेने या प्रकाराचा राजकिय वापर करण्याचा प्रयत्न आधी केला. तेव्हा 'पूर्वी आपला हक्काचा मतदार असलेला मराठा समाज आपल्यापासून दूर चालला की काय याच्या भीतीतून (व असुरक्षिततेतून) ही राजकीय खेळी खेळली गेली असावी' हा दावा निराधार आहे. मराठा महासंघ नावाची संघटना गेली कित्तेक दशके महाराष्ट्रात अस्तित्त्वात आहे व त्यांचे ब्राह्मणविरोधी गरळ ओकण्याचे काम नित्य सुरूच असते. लेन्स प्रकरणाच्या वेळीच सूचलेली ही गोष्ट नाही. या फ्रींज एलिमेंट्सना राजकिय पक्ष भीक घालत नसत. तेव्हा नव्वदच्या दशकानंतर असे काही राजकारण करता येईल हे नव्याने सूचले, असे विश्लेषण मला पटलेले नाही. अर्थातच आपल्या हेतूंविषयी शंका नाही. पण वरील विश्लेषणातून असा समज होणे शक्य होईल असे मला वाटले.- अशी वदंता जाहीर करून जातीयवादाच्या आगीत तेल ओतलं जातं.
- अशी घाण उपसण्यानं काही साध्य होत नाही.
- त्याचं कोणतंही समर्थन शक्य नाही.
जातीयवादाचं ह्त्यार हे आपल्याकडे अनेक गोष्टींना नको तितकं लावलं जातं. पाठ्यपुस्तकं, चित्रपट वगैरेंमध्ये जातीयवादी शब्द वापरू नयेत याचं एक टोक गाठलं जातं. विशिष्ट काळात विशिष्ट जातींचा उल्लेख शिवी वा अपमान करण्यासाठी होत होता, हे सत्य आहे. ते सवंग पध्दतीनं वापरण्याबद्दलचा आक्षेप योग्य असेलही, पण विश्लेषणासाठीही अशा गोष्टींचा उल्लेख टाळायला हवा, हे मान्य करणं जड जातं. किमान ज्ञानशाखांना तरी आपण अशा जराशानंही अवमानित होणार्यांपासून दूर ठेवायला ह्वं. नाहीतर काही दिशांमध्ये ज्ञानाचा विस्तार होणं थांबतं. ते समाजासाठी हानिकारक असतं. आपल्या समाजाविषयीच्या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीची नोंद घेता आली, तरच आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना आपला समाज नक्की कसा होता, ते समजून घेता येईल. अशा प्रकारची सरसकट बंदी ही अखेर अज्ञान पसरवते. अप्रिय गोष्टींवर सरसकट, संदर्भाशिवाय बंदी घालून कोणत्याही समाजाचं भलं होतं असं इतिहास सांगत नाही. या संस्थळावर या चर्चेच्या संदर्भात ही वदंता उल्लेखणं अश्लाघ्य होतं का? मला तरी असं वाटत नाही. आणि त्याचं कारणही वर सांगितलं तेच आहे. निंदानालस्ती, कुचेष्टा वा खोडसाळपणा न करता गंभीर चर्चा करायची असेल, तर त्या चौकटीत अशा एखाद्या एरवी असभ्य मानल्या जाणार्या गोष्टीची वाच्यता करणं हे गैर मानू नये. त्यात शहाणपणा नाही, कारण मग हा जो उहापोह या धाग्यावर झाला, तो होऊच शकला नसता. हे स्थळ संपादित होतं. संपादकांना त्यांची धोरणं आणि सारासार विचारबुध्दी यांच्या चौकटीत काय संपादित करायचं हे ठरवावं लागतं. त्याविषयी इथं वादविवादही होतात. संपादक मंडळ, त्यांची धोरणं, होणारं संपादन आणि ते वादविवाद हे सर्व या संस्थळाचं आरोग्य कायम राखण्यात मदत करतात, असंही वाटतं. त्यामुळे त्यांचा अधिकार मी मान्यच करतो. आतापर्यंत तरी माझ्या लिखाणातल्या 'असभ्य' गोष्टींना त्यांनी इथं जागा दिलेली आहे, आणि ती बहुधा मी ज्या कारणांसाठी ते योग्य मानतो, त्यांसाठीच असावी असंही वाटतं. त्यामुळे संपादकांचे धन्यवाद. धाग्यावर आणि व्यक्तिगत निरोपांतून विविध विचार मांडणार्यांचे वा पसंती/नापसंती दर्शवणार्यांचेही आभार. जाताजाता: E. H. Carr यांच्या 'What Is History?' या पुस्तकाचा आळश्यांचे राजे यांनी उल्लेख केला. हे पुस्तक अतिशय वाचनीय आणि मननीय आहे. इतिहासाच्या इतिहासातलं ते एक मानाचं पान आहे. ज्यांना इतिहास संशोधनाबद्दल अधिक माहिती करून घ्यायची आहे, त्यांनी ते जरूर वाचावं. मात्र हेही ध्यानात ठेवावं की हे १९६१ साली लिहिलं गेलं. साठच्या दशकात (विशेषतः १९६८ नंतर) अनेक ज्ञानशाखांत मूलभूत बदल झाले. तसे ते इतिहासातही झाले. मी ज्या पध्दतींच्या आधारे माझी विधानं करत होतो, त्या मुख्यतः या नंतरच्या 'न्यू हिस्टरी'मधून आल्या. 'कल्चरल हिस्टरी' या संकल्पनेचाही त्याच्याशी संबंध आहे. इतिहास या ज्ञानशाखेत वापरल्या जाणार्या वेगवेगळ्या संशोधन पध्दतींची प्राथमिक माहिती इथे मिळेल. धन्यवाद. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||- ज्यांच्या भावना दुखावतील असा दावा आहे, तो गट हा समंजस, स्थिर मनाचा, कणखर व धैर्यशील असला तरीही त्याच्या भावना दुखावतील, हे सिध्द करता आलं पाहिजे.
- पुस्तकाचा परिणाम काय होईल, हे पाहाताना ज्या प्रकारचे लोक हे या पुस्तकाचे अपेक्षित वाचक आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे.
असो. न्यायालयाच्या निर्णयाचा दुवा सहज मिळत नाही आहे. इतर कुणाला सापडल्यास तो द्यावा. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||